दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके
लेखनप्रकार
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया
१. करीयर मार्गदर्शन
२. प्रेरणादायी (चरित्र वगैरे)
या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.
वाचने
9700
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मी कसा झालो ? ले. अत्रे.
खालील मराठी अनुवाद
Godfather
Papillon
In reply to करीयर मार्गदर्शन ?? प्रेरणादायी ?? by हेमन्त वाघे
हा हा
In reply to हा हा by अत्रे
पॅपिलॉन एक जाऊदे. गॉडफादरचा नक्की विचार करा.
In reply to पॅपिलॉन एक जाऊदे. गॉडफादरचा by आदूबाळ
या पुस्तकाबद्दल आठवीन वाचले होते . दहावीच्या सुट्टीत हातात पडले आणि पूर्ण रात्र जागवून पाहते पाहते संपवले.
नंतर मराठी अनुवाद ३-४ वेळा वाचला. इंग्लिश तर विकत घेवून वाचला!
११ वीत एकदा “I'll make him an offer he can't refuse.” चे मराठी ब्व्हाशंतर बोल ल्यावर ऎक अजून गॉडफादर प्रेमी मित्र मिळाला ... आणि आम्ही अजूनही २७ वर्षानंतर family सारखे जवळ आहोत ..
“Friendship is everything. Friendship is more than talent. It is more than the government. It is almost the equal of family.- Don Corleone”
― Mario Puzo, The Godfather
एखादा अगदी "सखाराम गटणे " असेल तरी सुद्धा त्याला हि "सुसंस्कारित " करायची गॉडफादर ची ताकद आहे !
“I don't trust society to protect us, I have no intention of placing my fate in the hands of men whose only qualification is that they managed to con a block of people to vote for them.”
― Mario Puzo, The Godfather
In reply to तुम्हीही गॉडफादरचा चे फान दिसता ? by हेमन्त वाघे
त्याला "द डिपार्टेड" ची DVD द्या
In reply to "द डिपार्टेड" ची DVD द्या by सिरुसेरि
"संस्कारांचा " भडीमार येवढा नको ! ;)
अग्निपंख
या विषयांवरील पुस्तके आठवण अवघड आहे. नुकतंच वाचलेल रारंगढान्ग छान आहे. करीयर मार्गदर्शन नसले तरी एखादे वेगळे करीयर निवडल्यावर निर्माण होणाऱ्या संघर्षाचे (वैयक्तिक किंवा सामाजिक), येणाऱ्या अडचणींचे वर्णन छान आहे. पुस्तक नेमकं हेच सांगत का याचं प्रत्येकाचा अंदाज वेगळा असेल पण मला स्वतःला ही कादंबरी खूप आधी वाचायला हवी होती असे वाटले. झालंच तर शितू खूप छान आहे या वयातल्या मुलांना वाचण्यासाठी. वरील केटेगरीत नाही बसायची पण बरंच काही शिकवणारी. अजून एक मला वाटतं प्रकाशाच्या वाटा असं काहीसं नाव असलेले एक पुस्तक आहे. त्यात सामाजिक कार्य करणाऱ्या काही जनांविशयी माहिती आहे. मी डॉ अभय आणि राणी बंग या दोघांवरचा लेख(?) त्यात वाचला आणि स्वतःची लाज वाटू लागल्याने ते पुस्तक पुन्हा काढले नाही. :(
मुलाला ऐतिहासिक वाचनाची आवड असेल तर श्रीमान योगी अवश्य द्या. डॉ अब्दुल्ल कलामांचे अग्निपंखदेखील वाचनीय आहे. अजून आठवली तर सांगेन. फक्त माहिती सद्रुश्य पुस्तके न वाचता कथा कादंबरी स्वरूपातील वाचली तर त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो असे माझे मत.
In reply to या विषयांवरील पुस्तके आठवण by रातराणी
त्यात सामाजिक कार्य करणाऱ्या काही जनांविशयी माहिती आहे. मी डॉ अभय आणि राणी बंग या दोघांवरचा लेख(?) त्यात वाचलाअनिल अवचटांच्या "कार्यरत" विषयी बोलताय का?
१. करीयर मार्गदर्शन , २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) - या दोन्ही गोष्टी लक्षात घेता "हि श्रीची इच्छा " ( लेखक - श्री . ठाणेदार ) , आमचा बाप आणी आम्ही ( लेखक - नरेन्द्र जाधव ) हि पुस्तके आठवली .
अजुन आठवलेली पुस्तके म्हणजे - "एक होता कार्व्हर ", "देनीसच्या गोष्टी " आणी "इवान" हि रशियन पुस्तकांची भाषांतरे , "डायरी ऑफ अॅन फ्रॅन्क" .
एक होता कार्व्हर द्या..
त्यालाच विचारून तो वाचेल अशी पुस्तकं द्या.
In reply to त्यालाच विचारून तो वाचेल अशी by आदूबाळ
+१
आधी तो/ती पुस्तके वाचत आहेत का? हे बघा.
वाचनाची आवद असेल तर मुले ज्ञानकण कुठूनही गोळा करतात.
शिवाय आजकाल गूगल आणि विकिपेडियामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे.
कार्यरत - अनिल अवचट
माणसं - अनिल अवचट
एका रानवेड्याची शोध यात्रा - कृष्णमेघ कुंटे
समिधा - सधना आमटे
प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
रोजच्या आपल्या व्यवहारीक जिवनापलीकडे पण खुप वेगळ जग आहे हे सांगणारी पुस्तकं आर्वजून वाचायला द्यायला हवीत. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या किती सहज मिळतात आणि जे आहे अपल्याकडे ते खुप काही आहे हे नक्कीच ह्या अश्या पुस्तक वाचनातून जाणवतं.
मस्तराम की मस्त कहानी का संग्रह
In reply to मस्तराम की मस्त कहानी का by अनुप ढेरे
आजकाल मोबल्यात पहातात हे सगळं.
१-एक होता कार्व्हर
२-फाउंटन हेड - अॅन रॅन्ड मराठी अनुवाद आहेत.
३-सेव्ह्न हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पिपल- स्टीफन कोव्ही मराठी अनुवाद मिळेल
४-एव्हरी डे ग्रेटनेस - स्टीफन कोव्हीचेच -याचा मराठी अनुवाद आहे की नाही माहीत नाही माहीत नाही,
बाकी मराठी नावे पटकन आठवत नाहीत इंग्रजीत खुप चांगली आहेत.
थोडीफार लव्हस्टोरी वगैरे सारखी रोमँटीक पुस्तके ही द्यायला आता हरकत नाही.
In reply to प्रॅक्टीकली प्रेरणादायी मला वाटतं by मारवा
फौंंटनहेड (शिखर) मीही दहावीच्या आसपासच वाचलं होतं बहुधा...
पण बक्षिस म्हणून हे पुस्तक देणं म्हणजे जरा जास्तच धाडसी पर्याय होइल असं नाही वाटत?
In reply to फौंंटनहेड (शिखर) मीही by असंका
फाउंटन हेड पुस्तक या वयासाठी चुकीचंच आहे.
माझ्या लक्षात आल नाही.
अजून एक पुस्तकांचा प्रश्न इथे विचारला तर चालेल का?
In reply to अजून एक पुस्तकांचा प्रश्न इथे by रेवती
चालेल की
In reply to अजून एक पुस्तकांचा प्रश्न इथे by रेवती
तुम्ही मंगला गोडबोलेंना एकविसाव्या शतकाचं उत्तर आहात. जरूर विचारा ;)
सिडने शेल्डन संग्रह (वाचनाची नक्की आवड लागेल)
In reply to सिडने शेल्डन संग्रह (वाचनाची by sagarpdy
स्ट्रेंजर इन द मिरर :)
पुण्यात इंग्रजी टीनसाहित्याची लायब्ररी आहे का?
एफ . सी . रोडला ब्रिटिश कौन्सिलची लायब्ररी आहे .
In reply to The British Library Pune by सिरुसेरि
ओक्के.
त्याला एक kindle घेऊन द्या, आणि हवं ते वाचू द्या.
अजून घेत आहात का पुस्तक की घेउन दिलंत कुठलं? काय स्टेटस आहे सांगा की जरा...!!
In reply to अजून घेत आहात का पुस्तक की by असंका
एक विज्ञान कथेचं पुस्तक घेतलं नारळीकरांचं, पण इथले सजेशन्स चांगले आहेत. कधी तरी कामी येतील. :)
मन में है विश्वास - विश्वास नांगरे पाटील
मी कसा झालो?