बँकॉक : धावती भेट: १ 'कला आणि संस्कृती केंद्र'
माझ्या भेट द्यायच्या यादीत ‘बँकॉक’ हे शहर खरं तर नव्हतं. पण एका कामासाठी अचानक इथं आले. मी पोचले ती गुरूवारी रात्री. थाई-लँडच्या बँकॉक विमानतळावर उतरले तेव्हा ‘सुवर्णभूमी’ हे विमानतळाचं नाव पाहून गंमत वाटली होती. बाहेर पडल्यावर दिसले ते रस्ते रूंद आणि चकाकक होते. माझ्या सुदैवाने वाहतूक कोंडी नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गगनचुंबी इमारती दिसत होत्या. हॉटेलमध्ये स्वागतकक्षात दोन्ही हात जोडून स्वागत झाल होतं. दुस-या दिवशी कळलं की असं स्वागत मी भारतीय असल्याने नाही तर स्थानिक पद्धत म्हणून होतं.
शुक्रवारी इथलं काम आटोपून शनिवारी पुढच्या मुक्कामाला जायचं असा बेत होता. पण शुक्रवारी काही काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे शनिवार-रविवार असे दोन दिवस आयते मोकळे हातात पडले. दिवसभर भयंकर उकडत होतं, पावसाची चिन्हं नव्हती. त्यामुळे उन्हातान्हात फार धावपळ न करता आणि फार पैसे खर्च न करता काय पाहता येईल यावर एकीचं मार्गदर्शन घेतलं आणि शनिवारी सकाळी बाहेर पडले. शहरातले आतले रस्ते मात्र असे छोटे होते.
पहिल्या दिवशी दोन जी दोन ठिकाणं मी ठरवली होती, त्यासाठी ‘स्काय ट्रेन’ सोयीची होती. बँकॉकमध्ये मी ‘सुखुमवित’ (Sukhumvit) नावाच्या भागात रहात होते. तिथं ‘असोक’ (Asok) हे ‘स्काय ट्रेन’ स्थानक जवळ होतं.
स्थानकात प्रवेश केल्यावर एका खिडकीत नोटांच्या बदल्यात नाणी मिळत होती. स्वयंचलित यंत्रांत नाणी टाकून हव्या त्या स्थानकाचं तिकीट मिळण्याची चांगली सोय होती. स्थानकांवर आणि मेट्रोत नकाशे होते.
स्थानकाच्या नावाच्या उद्घोषणाही होत्या. ‘नाना’ नावाचंही एक ‘स्काय ट्रेन स्थानक’ आहे. गर्दी भरपूर असली तरी धक्काबुक्की अजिबात नव्हती. दिल्ली मेट्रोने मी बराच प्रवास केला आहे. दिल्ली मेट्रोत आणि बँकॉक स्काय ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे फरक जाणवले. एक तर दिल्ली मेट्रोत आहे तसा स्त्रियांसाठी वेगळा डबा इथं नाही. दुसरं म्हणजे मेट्रोच्या सरकत्या दरवाजांसोबत फलाटावर काचेचे सरकते दरवाजे आहेत.
तिसरं म्हणजे इथं प्रवाशांना सुरक्षाद्वारातून प्रवेश करावा लागतो पण त्यांची पुन्हा वेगळी व्यक्तिगत सुरक्षा तपासणी होत नाही. आणि चौथं म्हणजे बौद्ध भिक्षुंना इथं किती मान आहे हे स्पष्ट करणारा हा सूचनाफलक.
तिकिटावर स्काय ट्रेनचा मार्ग सविस्तर छापला असल्याने ‘सयाम’ स्थानकावर जाण्यात मला काही अडचण आली नाही. तिथं बाहेर पडल्यावर मात्र उजवीकडं वळायचं की डावीकडं हे न समजल्याने मी गोंधळले. तेवढ्यात प्रवासी मार्गदर्शन केंद्र दिसलं. मग तिथल्या बाईंनी सांगितलेल्या खुणांचा मागोवा घेत पाच मिनिटांत मी ‘बँकॉक आर्ट ऍन्ड कल्चर सेंटरला’ पोचले. या सेंटरमध्ये प्रवेशशुल्क नाही.
हे सेंटर म्हणजे एक संग्रहालय असेल असा माझा अंदाज होता – तो काही अंशी खरा ठरला. या नऊ मजली इमारतीत चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, डिझाईन अशा अनेक विषयांवर सादरीकरण आणि शैक्षणिक उपक्रम होत असतात. इथं पुस्तकांची दुकानं आहेत, कलाविषयक संदर्भ ग्रंथालय आहे आणि चित्र प्रदर्शनाची अनेक दालनं आहेत. सिरॅमिक वस्तू, लाकडातून निर्माण केलेली कला असं बरंच काही आहे. कॉफी पीत चर्चा करत बसायला जागा आहे. कलेच्या संदर्भात मी निरक्षरच आहे म्हणा ना, तरीही जवळजवळ तीन तास या सेंटरमध्ये होते. तिथल्या या आणखी काही कलाकृती.
प्रत्येक कलाकृतीसोबत कलाकाराची माहिती दिली होती.
या सेंटरमध्ये मी एक नवीच गोष्ट अनुभवली. काही प्रकाशचित्रं भिंतीवर लावली होती. त्या प्रत्येक चित्राला एक क्रमांक दिला होता. प्रदर्शन पाहायला येणा-या व्यक्तीच्या हातात मोबाईल हॅन्डसेटसारखं असं एक यंत्र किंवा साधन दिलं जात होतं.
चित्राचा क्रमांक या यंत्रावर टंकायचा, हिरवं बटण दाबायचं आणि यंत्र कानाला लाऊन ध्वनिलहरी ऐकायच्या. वेगवेगळ्या प्रकाशचित्रांच्या वेगवेगळ्या लहरी मला ऐकू आल्या, पण त्यातलं विज्ञान काही मला नीट कळलं नाही. याविषयी अधिक माहिती खालच्या प्रकाशचित्रात आहे.
तिथं कला म्हणून एका हिंदी चित्रपटाची भिंतभर लावलेली जाहिरात पाहून मजा वाटली. हा चित्रपट आपल्याकडं प्रदर्शित होऊन गेला आहे काय?
तीन तास चालून दमले होते, पण पुढं जायचं होतं. पुढच्या ठिकाणाची चौकशी करता ते अगदी जवळ असल्याचं कळलं आणि नव्या उत्साहाने मी बाहेर पडले.
क्रमश:
तिकिटावर स्काय ट्रेनचा मार्ग सविस्तर छापला असल्याने ‘सयाम’ स्थानकावर जाण्यात मला काही अडचण आली नाही. तिथं बाहेर पडल्यावर मात्र उजवीकडं वळायचं की डावीकडं हे न समजल्याने मी गोंधळले. तेवढ्यात प्रवासी मार्गदर्शन केंद्र दिसलं. मग तिथल्या बाईंनी सांगितलेल्या खुणांचा मागोवा घेत पाच मिनिटांत मी ‘बँकॉक आर्ट ऍन्ड कल्चर सेंटरला’ पोचले. या सेंटरमध्ये प्रवेशशुल्क नाही.
वाचने
12183
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वाचतेय..
आणि त्याचेही भाग १, २, ३.... होणार हे पाहून अंमळ कसेसेच झाले! ;)
मीपण वाचतोय, पुभाप्र!
Sandy
In reply to धावती भेट... by चांदणे संदीप
लेखन कमी आणि प्रकाशचित्रं जास्त असल्याने एकापेक्षा जास्त भाग होताहेत, बाकी काही नाही.
वाचतेय.तुमच्या नजरेतून थायलंड बघायची उत्सुकता आहे.
पुभाप्र.
लेख पटला नाही
बँकॉकला पहिल्यांदाच जाताय आणि फक्त २ दिवस हातात आहेत, ते सुदधा अनपेक्षितरित्या मिळालेले, तर (तुम्हाला बँकॉकच्या नाईट लाईफमध्ये इंटरेस्ट नसावा असे गृहीत धरूनसुदधा)
तिथला राजवाडा + त्याच्या आजूबाजूला असणारी ३-४ मंदिरे + कालव्यातली बोट राईड हे एका दिवसात आणि दुसऱ्या दिवशी टायगर टेंपल + खाओसान रोडची खाऊगल्ली हे करता येते
हे न करता बँकॉक आर्ट अँड कल्चरल सेंटरला जाणे म्हणजे औरंगाबादला पहिल्यांदी जाऊन अजिंठा-वेरूळ + बीबी का मकबरा + पाणचक्की न बघता आपल्या बिरुटेसरांबरोबर लोकल हॉटेलात कट्टा करणे
In reply to लेख पटला नाही by टवाळ कार्टा
'पसंद अपनी'!
'टायगर टेंपल'बद्दलची अलीकडची ही बातमी कदाचित तुमच्या नजरेतून सुटली असेल.
In reply to 'पसंद अपनी'! by आतिवास
हो , मी गेलेलो तेव्हा असे काही असु शकते असे वाटलेले....बाकी पसंद अपनी तर आहेच
In reply to लेख पटला नाही by टवाळ कार्टा
हे न करता बँकॉक आर्ट अँड कल्चरल सेंटरला जाणे म्हणजे औरंगाबादला पहिल्यांदी जाऊन अजिंठा-वेरूळ + बीबी का मकबरा + पाणचक्की न बघता आपल्या बिरुटेसरांबरोबर लोकल हॉटेलात कट्टा करणेहा हा हा!
हा हा हा लय भारी.
चित्रे बघायला मजा येतेय. तो कुठचाही हिंदी सिनेमा आहे असे वाटत नाही. रंगवलेले कलाकार पण ओळखीचे नाहीत. कदाचित असंच कल्पनेने रंगवलेले पोस्टर असावे.
लेख छान आहे.
तो हिंदी (+ थाई) चित्रपट बहुधा थायलंडमध्ये कित्येक वर्षांपासून स्थायिक असलेल्या भारतीय लोकांच्या गटाने बनवला असावा असे वाटते. वर जी ओळ लिहिली आहे त्यात डायस्पोराचा उल्लेख आहे आणि एका थायलंडमधील स्टुडिओचादेखील उल्लेख आहे. तिथून सुरू होऊन त्या नायकाचा प्रवास बॉलीवूडपर्यंत होत असावा असा अंदाज आहे. पोस्टरवर थाई भाषादेखील दिसतेय. म्हणजे हिंथाई असावा हा चित्रपट. :-)
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असा कुठला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याचं माझ्या माहितीत नाही. बहुधा नाहीच. आणि हे पोस्टर तसं जुन्या पद्धतीचं, रंगवलेलं वगैरे दिसतयं. म्हणजे चित्रपट 70-80 च्या दशकातला असावा. नटदेखील थाई वाटतायेत.
माझा वर्षांचा अंदाज चुकला पण बाकी बहुतांशी बरोबर आहे. चित्रपट 2008 चा आहे. आणि नवीन रावांचाईकुल नावाच्या थाई कलाकाराचा आहे. सुरू थायलंडमध्ये होऊन चित्रपट मुंबईत पोहोचतो असं काहीसं कथानक आहे. 10-11 मिनिटांचा आहे हा चित्रपट. ही बघा लिंक:
http://www.navinproduction.com/library_detail.php?id=6
http://www.navinproduction.com/gallery.php?project_id=164
हा नवीन रावांचाईकुल थाई कलाकार आणि निर्माता दिसतोय. हे प्रोडक्शन हाऊस त्याचंच दिसतंय. पण संग्रहालयात लावावं एवढं मोठं काम आहे का याचं? नो आयडिया.
In reply to चित्रपट 2008 चा आहे by समीरसूर
अरे वा,तुम्ही माहिती शोधून काढलीत.
थाईलँडमध्ये बरेच भारतीय अनेक पिढ्यांपासून तिथं राहत आहेत - पण ते थाई नागरिक मात्र नाहीत अशी माहिती माझ्या सहप्रवासी स्त्रीने दिली होती.
आता थाईलँडमधल्या भारतीयांबाबत अधिक जाणून घेणं आलं :-)
छानच.
वाचतेय..