ती आणि मी....
लेखनविषय:
ती तशी नेहमीच गराड्यात असते
मी त्या गर्दीचा एक भाग असतो
ती तशी सगळयांच्या जवळ असते
मीच कधी तिच्या नजरेत नसतो
ती नुसती येण्याची चाहुल देते
तो मुक्त तिच्यावर बरसत जातो
ती चिंब तारुण्य उधळून देते
मी धुंद स्वत:ला हरवत जातो
ती गुलाबी सांज लेवुन येते
मी क्षितिजासवे तिच्यात रंगून जातो
ती नशावते कातरवेळ तिच्याच अदांनी
मी नकळत तिच्यात विरघळत जातो
ती अलगद रात्री स्वप्नात येते
सारा आसमंत तिनेच भारलेला असतो
ती एकच वेळ अशी असते
जिथे ती "फ़क्त" माझी अन मी तिचा असतो
पण........
ती आता चंदेरी दुनियेतच रमते
मी आजही तिला दुरूनच न्याहाळतो
अन तिच्या आठ्वांची कोमजलेली फुले
मी गुपचुप हृदयात जपत असतो.
वाचने
1428
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
जमलिय पण समथिंग इज मिसिंग.
तुझ्या जुन्या कवितामधला फ़ॅक्टर इथे मात्र गायबलाय.
पु ले शुभेच्छा.
In reply to जमलिय पण समथिंग इज मिसिंग. by अभ्या..
+१
एक धुंद कविता....
छान आहे !!
जमलिय पण समथिंग इज मिसिंग.