भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html
विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.
पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.
आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.
हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.
#macaulayism
युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.
नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.
सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.
या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.
आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.
मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.
https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-young-learners-home-language
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-secondary/moi/key-events-moi-fine-tuning-bg/moi-guidance-for-sec-sch/sep-1997/mother-tongue/index.html
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-when-taught-in-mother-tongue/articleshow/49212516.cms
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue-first-is-key-to-success-at-school
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-philippines
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pachl.html
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-tongue-education-indigenous-school-students
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-primary-education-gurmeet-kaur
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-primary-education-gurmeet-kaur
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdfवर्गीकरण
वाचने
24857
वाचनखूण
प्रतिक्रिया
94
आवडलं. आणि पटलं सुद्धा!
>> शेवटी माणसं घडवायची आहेत;
गुजरातेत १२ पर्यंत गुजराती
ठोस कार्य
In reply to ठोस कार्य by नमकिन
अधिकाधिक लोकांनी आपापल्या
In reply to अधिकाधिक लोकांनी आपापल्या by वेल्लाभट
MLM
लेख आवडला आणि पटला.
तुमची मुले ?
In reply to तुमची मुले ? by हेमन्त वाघे
वाघे साहेब, मुद्दा न
भारतासारख्या बहुभाषिक देशात
ईंग्रजी व मराठी माध्यम
In reply to ईंग्रजी व मराठी माध्यम by प्रियाजी
प्रियाजी धन्यवाद. तुमचा
आपल्या मातृभाषीक राज्यात
In reply to आपल्या मातृभाषीक राज्यात by डॉ सुहास म्हात्रे
माझे स्वतःचे ११ पर्यंतचे
In reply to माझे स्वतःचे ११ पर्यंतचे by डॉ सुहास म्हात्रे
गैरसमज
In reply to गैरसमज by नमकिन
योग्य उत्तर दिलंत नमकिन.
In reply to गैरसमज by नमकिन
संशोधन करताना कुठल्याही भाषेत
संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.गैरसमज !? नक्की ??? भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही. जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल : १. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल. २. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल. ३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील. ४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल. सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे. मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल. भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.In reply to संशोधन करताना कुठल्याही भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
अर्थात...
In reply to अर्थात... by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे साहेब;
In reply to म्हात्रे साहेब; by वेल्लाभट
मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची
आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल.अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!). त्यातच त्यांनी,मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे.असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते... "आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत. आपल्याला ममत्व वाटणार्या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्या दाव्यांची (आणि दावे करणार्यांचीही) विश्वासार्हता कमी होते. या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले. . * : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे. =============== अजून थोडेसे... (अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही : १. केवळ भाषेचे गोडवे गाणे. २. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. ३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील. (आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल : १. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते. २. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते. मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.In reply to मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची by डॉ सुहास म्हात्रे
बरं, तुमची मतं कळली.
In reply to मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची by डॉ सुहास म्हात्रे
सुरुवात
In reply to सुरुवात by नमकिन
@ वेलाभट व नमकिन :
मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात.हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी... मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो. मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच. आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण... यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते. असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो. धन्यवाद !In reply to संशोधन करताना कुठल्याही भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत
सुरेख लेख! तुमच्या
एकच, तुम्ही म्हणालात तसे
बाकी चालू द्या
प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशितIn reply to एकच, तुम्ही म्हणालात तसे by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू,
In reply to सोन्याबापू, by वेल्लाभट
पहिली गोष्ट "ऐड होमिनेम"
In reply to पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" by कैलासवासी सोन्याबापु
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात
In reply to चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात by वेल्लाभट
ही लिंक द्यायची आहे का?http:/
In reply to एकच, तुम्ही म्हणालात तसे by कैलासवासी सोन्याबापु
मुद्दा काय तर ही प्रमाणित
In reply to एकच, तुम्ही म्हणालात तसे by कैलासवासी सोन्याबापु
बोली भाषा
In reply to एकच, तुम्ही म्हणालात तसे by कैलासवासी सोन्याबापु
सरकारी अभ्यासक्रमात शिकवली
In reply to सरकारी अभ्यासक्रमात शिकवली by अप्पा जोगळेकर
:-D
In reply to सरकारी अभ्यासक्रमात शिकवली by अप्पा जोगळेकर
आप्पा आमचे लैच भारी ! फट
खुन्नसअर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा, अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!In reply to आप्पा आमचे लैच भारी ! फट by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही सांगता ते प्रमाण असा
In reply to तुम्ही सांगता ते प्रमाण असा by अप्पा जोगळेकर
बस काय अप्पा??
तूर्तास ही कालची बातमी वाचा.
In reply to तूर्तास ही कालची बातमी वाचा. by वेल्लाभट
हो हो अगदी !!
In reply to हो हो अगदी !! by कैलासवासी सोन्याबापु
ते चालू दे बाकी तुमचं आहे.
In reply to ते चालू दे बाकी तुमचं आहे. by वेल्लाभट
हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.
बाकी चालू द्या!
;)In reply to हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते. by आनंदी गोपाळ
मराठी माध्यम, इयत्ता पहिली
In reply to मराठी माध्यम, इयत्ता पहिली by असंका
साहेब,
In reply to साहेब, by आनंदी गोपाळ
अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर
In reply to हो हो अगदी !! by कैलासवासी सोन्याबापु
आणिक एक;
In reply to तूर्तास ही कालची बातमी वाचा. by वेल्लाभट
प्रतिसाद
वेगळी मतं असणार्यांनी नाही
In reply to वेगळी मतं असणार्यांनी नाही by मधुरा देशपांडे
थोडकंच सांगतो
In reply to थोडकंच सांगतो by वेल्लाभट
तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या
In reply to वेगळी मतं असणार्यांनी नाही by मधुरा देशपांडे
मुळात जर्मनी या देशात एकच
In reply to मुळात जर्मनी या देशात एकच by अभिनव
वा
उत्तम लेख
सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत
In reply to सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत by मारवा
धागालेखकांनी थोडा मतभेदांना
In reply to सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत by मारवा
अवांतरः
माझेही शिक्षण मराठी भाषेत
In reply to माझेही शिक्षण मराठी भाषेत by शान्तिप्रिय
आपणास लेखाचा मुद्दा कळलेला
In reply to आपणास लेखाचा मुद्दा कळलेला by असंका
भाषा
In reply to माझेही शिक्षण मराठी भाषेत by शान्तिप्रिय
मराठी हा विषय सर्व शाळात १ ली
In reply to मराठी हा विषय सर्व शाळात १ ली by श्रीगुरुजी
लाखवेळा सहमत
In reply to लाखवेळा सहमत by llपुण्याचे पेशवेll
..
In reply to मराठी हा विषय सर्व शाळात १ ली by श्रीगुरुजी
+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण
हे जुनं नाटक नवीन संचात परत
In reply to हे जुनं नाटक नवीन संचात परत by रमेश भिडे
खेळ व्हायचा
काथ्याकुट
उत्तम विषय
In reply to उत्तम विषय by माईसाहेब कुरसूंदीकर
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही
In reply to मातृभाषेतून शिक्षण केव्हाही by वेल्लाभट
बरोबर
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
मुलास इंग्रजी माध्यमात घालून
In reply to मुलास इंग्रजी माध्यमात घालून by वेल्लाभट
वर लिहिल्याप्रमाणेच परत लिहीतोय
In reply to मुलास इंग्रजी माध्यमात घालून by वेल्लाभट
मस्तंवेल्ला
नेहमीचाच विषय आणि सर्वांचे
In reply to नेहमीचाच विषय आणि सर्वांचे by संदीप डांगे
नेहमीचा पण दरवर्षी
In reply to नेहमीचाच विषय आणि सर्वांचे by संदीप डांगे
सहमत
In reply to सहमत by llपुण्याचे पेशवेll
तो बंगाल चा
मला स्वतःला सेमि इंग्लिश हा
In reply to मला स्वतःला सेमि इंग्लिश हा by टवाळ कार्टा
सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या
छान लेख आहे.
@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच
In reply to @वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच by सुचिकांत
मेल पाठवला आहे..
In reply to मेल पाठवला आहे.. by असंका
मेलला प्रतिसाद दिला आहे ..
In reply to मेल पाठवला आहे.. by असंका
मी
माझा मुलगा एकाच भाषेतुन काही
In reply to माझा मुलगा एकाच भाषेतुन काही by पिलीयन रायडर
मी तुमची याअगोदरचीपण मते
उत्तम विषय...
मातृ भाषेतून शिक्षण
In reply to मातृ भाषेतून शिक्षण by Nitin Palkar
तुमचं अभिनंदन व कौतुक. योग्य
माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
_/\_
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अत्यंत बेजबाबदार विधान करताय!
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
खिक्क...गिर्जाचा सल्ला जास्तच
'अनावस्था' हा शब्द या चर्चेत
In reply to 'अनावस्था' हा शब्द या चर्चेत by एस
.
In reply to 'अनावस्था' हा शब्द या चर्चेत by एस
दुरवस्था