थोडेसे ज्वलनशील
नमस्कार मंडळी,
माझं गाव सोलापूर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा इतर मोठ्या गावाप्रमाणेच बोजवारा उडालेलं. अर्थात खाजगी वहाने बेसुमार. पुण्यानंतर कदाचित जास्त टूव्हीलरचं गाव सोलापूर असावे हे सतत बदलत्या आरटीओच्या सिरिजमुळे लक्षात येतंय. लहान खड्डेमय रस्ते असलेले गाव आता बदलतय. काही रस्त्यांचे काम चालूय पण गावातील बरेच रस्ते खूप चांगले झालेले आहेत. अगदी पुण्यामुंबईच्या तोडीस तोड असे. एमेमआरडीए ची कृपा. पण ह्यासाठी आम्हाला इतर शहरापेक्षा जास्त सेस भरावा लागतो. पेट्रोलच्या भावात तो वसूल केला जातो. त्यामुळे इतर शहरांपेक्षा सोलापुरात पेट्रोल महाग आहे. मोदीकाकांच्या कृपेने अच्छे दिन अनुभवतानाच १ जूनला झालेल्या भाववाढीनुसार आधी ६६.५२रु. प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज ७०.५८ रु. प्रतिलिटर झालेय. शहरात पेट्रोलचे दोन भाव चालतात. नाक्याबाहेर सेस बसत नसल्याने पेट्रोल ३-४ रुपयाने स्वस्त आहे. शहरातील पेट्रोल पंपचालकाचा दावा आहे की शहरातील पेट्रोल बीएस थ्री प्रकारचे पुरवले जाते पण नाक्याबाहेरील पंपावर बीएस टू दर्जाचे. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी हे केले जाते. पैसे वाचवण्यासाठी नागरिक सर्रास शहराबाहेरील पंपावर पेट्रोल भरुन येतात. टूव्हीलरचे ईंजिनास ह्या पेट्रोलमुळे किती फरक पडतो? बरेचसे मेकॅनिक इंजिनाच्या पार्ट आणि दुरुस्तीसाठी पेट्रोलला दोषी ठरवतात. शिवाय शहरात इंडीयन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियम आणि एस्सार असे चार कंपन्यांचे पेट्रोल पुरवले जाते. त्यात फक्त इंडीयन ऑइलच्या पंपावर १० टक्के इथेनॉल मिक्स असे स्टीकर्स आहेत. त्या पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिन लाईफ आणि परफोर्मन्सवर काही फरक पडेल काय? इथेनॉल मिक्स केल्याने पेट्रोलच्या किंमतीत काही फरक पडत नाही का? इथेनॉल मिक्स करणे हे फक्त फॉसिल प्रॉडक्ट्सला पर्याय म्हणून आहे की त्यापेक्षा स्वस्त पर्याय आहे? नुसते इथेनॉल वापरले तर वाहनांना चालू शकेल का? त्यासाठी काही फॉर्म्युला सरकारकडून ठरवला गेला असल्यास फक्त ईंडीयन ऑइलच्या पंपावर हे कसे उपलब्ध? सर्वच शहरात हे आता चालू झाले आहे का? असल्यास ते सर्वच कंपन्यांना सक्तीचे करायला हवे. स्पीड, पॉवर सारखी काही अॅडीटिव्ह मिक्स ची पेट्रो उत्पादने वापरा म्हणून केलेल्या जाहीराती आजकाल दिसत नाहीत. त्या पर्पजली थांबवल्या गेल्या आहेत का?
समाधानकारक उत्तरे आणि चर्चेसाठी अग्रीम धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
9139
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
अभ्यादादा
In reply to अभ्यादादा by तुषार काळभोर
महत्वाचं
In reply to महत्वाचं by तुषार काळभोर
तुमच्या वरील दोन्ही
In reply to महत्वाचं by तुषार काळभोर
+१११
In reply to अभ्यादादा by तुषार काळभोर
मग तसं म्हणलं तर इथेनॉलने पण
In reply to मग तसं म्हणलं तर इथेनॉलने पण by अभ्या..
सॉरी. विकी नाही तर हे
ह्याबाबतीत काही कल्पना नै.
In reply to ह्याबाबतीत काही कल्पना नै. by प्रचेतस
दरात कितपत फरक
In reply to ह्याबाबतीत काही कल्पना नै. by प्रचेतस
शेलसाठी +1234567890
In reply to शेलसाठी +1234567890 by तुषार काळभोर
अता
टमटम
मज्झ दएव!
च्यायला मिपावरचे सगळे काय
http://mrunal.org/2012/10
इथॅनोलवर (म्हणजे इथिल
अपडेट
चांगला धागा
In reply to चांगला धागा by बहुगुणी
यस्स बहुगुणीमालक,
सगळी केमिस्ट्री आहे ती.हवेचे
आठ कार्बन अ़ॅटमच्या रेणूत दोन
हे असेही असते?
केमिस्ट्रीचं एक खातं उघडलं
वा.
In reply to वा. by अभ्या..
+१
आता परवडणारे नसलेलं इंधनही
इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण
In reply to इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण by गणेशा
कच्चे तेल आयात करूनसुद्धा