मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसामधल भंकस इंद्रधनुष्य

सुशेगाद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाउस पडत नसताना किंवा पाउस पडून गेल्यावर जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल त्याच्या मधल्या कालावधीत सिटी बसने मी प्रवास करत असतो खिडकीतून बाहेर पाहत राहतो बाहेर ओली झालेली जमीन झाडांवरून ठिबकणार पाणी त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला श्रन्धाजली देणारी ग्राफिटी कुठल्यातरी stop वर बस चे automatic दरवाजे उघडतात ती बस मध्ये येते अप्रोन घालून माझ्या बाजूला बसते आम्ही एकमेकांना नाव न विचारता बोलायला सुरु करतो मानसाच डिसेक्शन करताना कस वाटत यावर बोलतो ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा आतडी , फुफ्फुस आणखीन सगळ काही ती कितीही क्रूर बोलली तरी मला मोहकच वाटते माझ्या छातीचे डिसेक्शन तिने कराव आणि तिचा गंध आतमध्ये सामावून ध्यावा म्हणजे पुन्हा पुन्हा श्वास घ्यावा लागणार नाही तिचा stop येतो ती बसच्या पायर्यात उभारून बाय म्हणते नाहीशी होते एका रस्त्याच्या कडेकडेने चालत चर्चच्या घंटानादाचा आवाज सामावलेला असतो पाउस सगळ वातावरण अंधुक करून टाकतो तिचा गंध तिचा ब्रेसलेट तिचे मोठे चोकलेटी डोळे तिचे सोनेरी केस तिचा वेल्वेटचा ड्रेस सगळाच मेमरी मध्ये जमा होत पावसाला चिरत बस तशीच पुढे चालली आहे बाजूचे सर्व नाहीस होत फक्त पाउस आणि पाऊसच शिल्लक तरल प्रेम सायकलीच्या pandle ला पाय मारतो तेवढा तरल सायकल पार्क करून अंधार्या खोलीत laptop ओपेन करून सेवड बुकमार्क्स मध्ये ती खेळत असते तिच्या सिलीकोन स्तनांबरोबर दूर दूर कुठल्यातरी देशात इथेही पाउस असतो तेव्हा रात्रीचा भयानक फक्त स्क्रीन ची लाईट सुरु ती तिच्या शरीराचा व्यवहार करते सेक्स वर्च्यूल आहे पण ती वर्च्यूल नाही आहे तिच्या डोळ्यात रिअल भाव आहेत केसांना हिसडे देत तिचे मादक हावभाव स्क्रीन व्यापून टाकतात तिच्या चीत्कारांपुढे बाकी काहीच एकू येत नाही पावसाचा आवाज देखील नाही आत्ता बस मधली ती मुलगी कुठे असेल मी या स्क्रीनवरच्या बाईच्या प्रेमात पडलोय का? इंद्रधनुष्य नाहीस झाल का? रात्री इंद्रधनुष्य तयार होत का? बस तिच्या हेड्लाइट लावून कुठे गेली असेल? त्या cartoonist ला गोळ्या का घातल्या? हि कुठल्या भाषेत बोलेल? आपण स्क्रीनला भोगतोय का? निर्जीव झालो आहोत का आपण ? फक ! स्क्रीन बंद अंधार पावसाचा आवाज lusty प्रेम स्थल-फ्रान्स २०१५

वाचने 987 वाचनखूण प्रतिक्रिया 3

जव्हेरगंज 30/05/2016 - 19:12
थोडासा finishing cut मारा! जबरा होऊन जाईल हे!!!! [सरळसोट इंग्लिश शब्द लिहीण्याऐवजी मराठीत लिहा. जसे की stop ऐवजी स्टॉप.]