मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरवीन

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :) ______________________________________________ अरे हटाव बाजू, हिमालया आन फेअर ॲन्ड लवलीच्या कापूसभरल्या भावल्यांना     तूच माझी खरी हिरवीन ग!     एकच बावनकशी ब्युटी ग! झालो तर्राट आन लैच्च सैराट खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ लोकं बघणार कायबाय बोलणार,     तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!     आता ही येवढीच माझी ड्युटी ग! काय सांगू, दिसते कशी तू फुलावरली जणू पाकुळीच मऊ ग्वाड गुलाबजाम पाकातला     आन रसमलाई सगळी फिकी ग!     तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग! - संदीप चांदणे

वाचने 9773 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अभ्या.. Tue, 05/24/2016 - 14:55
काळ्या आभाळी चमचमती तारका तू पाठीवरती हात फिरिवता लागे कसे मऊ वळून वळून पोरी आन ट्राफिक सगळी बघती ग! तूच ग मायेची, हायेस स्कूटी ग!
. असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)

नाखु Tue, 05/24/2016 - 14:58
आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो.. प्रेक्षक बाकडा क्रं ५

In reply to by प्रचेतस

चांदणे संदीप Tue, 05/24/2016 - 20:17
रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता! 1 (फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

चांदणे संदीप Tue, 05/24/2016 - 20:22
वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस Tue, 05/24/2016 - 20:29
दिसली का आमची? बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.

In reply to by जव्हेरगंज

चांदणे संदीप Tue, 05/24/2016 - 20:01
जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!! बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे! १. त्यातले = तांब्यातले २. आतले = मनातले Sandy

चौथा कोनाडा Tue, 05/24/2016 - 20:43
सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात ! (आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )