निषेध!
लेखनविषय:
काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..
कवितेला नसतं विषयाचं बंधन
पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?
असल्या कवितांचा मी निषेध करतो
- जव्हेरगंज
वाचने
3771
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ टाकत आहेत एकानंतर एक कविता ; हुच्भ्रू वर्तुळातून आयडी हॕक झाल्याचा संशय
In reply to ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ by उगा काहितरीच
अजून काही रतीबाच्या कविता येणे बाकी आहे !
लोभ असावा (`´)
In reply to अजून काही रतीबाच्या कविता by जव्हेरगंज
असो...यावरून हे आठवलं.
काय झालं जव्हेरभौ?
In reply to काय झालं जव्हेरभौ? by रातराणी
आज अचानक हुक्की आली!
बाकी कै नै (-.-)
मुळात कविता एक नाजुक कलाविष्कार आहे त्यात छंद व्याकरण वृत्त सगळ्यांचा कस लागतो, लोकं फ़क्त यमक तितकं पाहतात अन नको नको ते सोसायला लावतात ! मुळात काव्यशास्त्राचा पुरेसा अभ्यास झाल्या शिवाय कविता करुच नयेत, मी तरी अजुन धजावलो नाही
तरीही कोणाला जर काव्यशास्त्र शिकायचेच असेल तर रविकिरण मंडळीचं 'छंदोरचना' उपयोगी ठरावे
धन्यवाद
In reply to मुळात कविता एक नाजुक by नाईकांचा बहिर्जी
अन नको नको ते सोसायला लावतात !
येग्झ्याटली !
हेच तर मला सांगायचंय ;)In reply to अन नको नको ते सोसायला लावतात by जव्हेरगंज
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! असो! आपला आक्षेप समजू शकतो
In reply to अहो पण असं सोसायतान भोग नजर by नाईकांचा बहिर्जी
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात !
अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!आमचा पण निषेध.
In reply to आमचा पण निषेध. by बाबा योगिराज
अत्यंत विचार प्रवण कविता. उद्युक्त वगैरे करायला लावणारी. आता नकोच ना करायला कविता वगैरे ????
-बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज चा प्रशंसक. ;)
In reply to अत्यंत विचार प्रवण कविता. by रमेश भिडे
-बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज

कविता फ़ाडण्याचा मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याचा
दुसरे दिवशी वाण्याचा
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!
- पुलं
=))
Sandy
ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ