मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ठुमरी)

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

पुलस्तिंची सुरेख  ठुमरी ऐकली आणि आमच्या लेखणीने पुन्हा ठेका धरला

उधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाही

मास्तर म्हणती चविष्ट आहे हे  प्रौढांचे शिक्षण
'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

गाणे  अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे
ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही

किती "केशवा"पाडशील तू सुमार कविता आता
लिहावेस तू अशी कुणाची ही बळजबरी नाही

केशवसुमार


वाचने 3441 वाचनखूण प्रतिक्रिया 13

झेल्या गुरुवार, 01/22/2009 - 14:10
धन्य धन्य ती विडंबने अन धन्य सुमारी तुमची कविता ही ही उत्तम आहे, ट-ट री-री (किंवा 'मुळीच टपरी') नाही... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

राघव गुरुवार, 01/22/2009 - 15:07
च्यायला... यांची लेखणी कशी चालेल काय सांगता नाय यायचे ब्वॉ! ख्याल असो वा ठुमरी , त्यांना चढतो साज सुमारी केश्या तुझ्या फटकार्‍यांना बंध कशाचा उरला नाही!! ह. घ्या. :) मुमुक्षु

मैत्र गुरुवार, 01/22/2009 - 15:38
तुमच्या प्रतिभेला दंडवत. नेहमीच अतिशय चपखल शब्दयोजना आणि अचूक काफिया.

चतुरंग गुरुवार, 01/22/2009 - 19:10
'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही मास्तर म्हणती चविष्ट आहे हे प्रौढांचे शिक्षण 'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही एकदम झक्कास! फार हसलो!! :) चतुरंग

लिखाळ गुरुवार, 01/22/2009 - 19:54
वा वा .. टपरी आणि शाळा छपरी आवडले :) मजा आली. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सुहास..सदेव हसनार्.. गुरुवार, 01/22/2009 - 20:01
'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही पाय कुठायत आपले...

प्राजु गुरुवार, 01/22/2009 - 20:25
मस्त.. सकाळी आल्या आल्या हे वाचलं आणि मजा आली. जबरदस्त. गुरूजी... आपण धन्य आहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 22:47
नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही गाणे अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही मस्त रे केशवा! :) आपला, (चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.

केशवसुमार Fri, 01/23/2009 - 12:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार