जीव नांगरटीला आलाय
काव्यरस
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं
घंघाळभर पाण्यानं भागंना
आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण
खळ्यावर आलू
बांधावर फिरताना जवा
सोग्यानं त्वांड पुसलं
तवा म्होरल्या वावरात मला
ऊसाचं कांडं रवताना
उफाड्याचं सामान दिसलं
आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत
पायताणं तिकडं वळावली
मग दगडं घेऊन गोफणीत
जवारीवरं भिरकावली
तसं म्होरलं वाफं सोडून
सामान मधल्या आळ्याकडं आलं
कंबरचा काष्टा काढून
निऱ्या सावरत ताठ उभं झालं
तोबरा भरुन म्या
पानाचा इडा तिच्याम्होरं धरला
"खाणार का इडा बिगर सुपारी,
रंगणार मातुर नंबरी "
काताचा खडा तोंडात टाकत
म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली
आन पिचकारी मारत म्हणलो
"ऊस पाण्याला म्हाग "
तसं सामान बांधावर आलं
कमरंवर हात ठिवून लाल व्हटानं म्हणलं
"पाटील, येरवाळीच काय काढलंय ही,
येवढ्या उनाचं वाड्यात पडावं, गपगार झोपावं "
"मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या, जीव नांगरटीला आलाय " शेवटच्या पानावर चुना माखत आम्ही पटका काढला.
तसं सामान फडात शिरलं
हिकडंतिकडं बघून आमीबी सरसावलो
येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय
"म्होरल्या बाजारला कमरबंद करायचं" आसं सामान जवा म्हणलं
तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलं
वाचने
15340
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान रंगलं की वो...
असो... भन्नाट काव्य...
In reply to जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान by विजय पुरोहित
बाकी काळ्या मातीत रंगणारं आणि फुलणारं तुमचं काव्य आणि साहित्य जबर आवडतं...
झिंग झिंग झिंगाटची आठवण झाली हो...
येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हायअगागागागागा. जव्हेरभौ, एकदम पल्टीफाळानंच काढली नांगरट. बारका कुबोटो घ्या आता. ;)
=))
खतर नाक!
सैराटच की =))
_/\_ जादू करता राव!
उभ्या उसाच्या फडात नांगरणी. अगागागा मूळीला गुतला तर फाळच मोडायचा =))
मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या
पाटलाची आवड भलतीच दिसतेय!
In reply to मग हिकडचा वाफसा कुणी काढावा by सायकलस्वार
पाटलानी स्वतः साठी वापरलाय तो शब्द.
तुमीबी ना...
समदे पाटील अशेच चावट अस्त्यात.
'बाई वाड्यावर या'च्या ऎवजी 'बाईsss फडावर या!' ;)
In reply to समदे पाटील अशेच चावट अस्त्यात by किसन शिंदे
अगदी खरेय किसनरावजी शिंदे पाटील.
In reply to अगदी खरेय किसनरावजी शिंदे by प्रचेतस
काहो पाटलांवर ऊठलाय?
बाकी कविता फर्मासच
काळी माती हिरवा ऊस
दिसली बाई, फडात घुस
ओ पाटील...हीच काय
तुमची विचारपूस?
=)) =))
फर्मास फार्मकाव्य!!
Sandy
In reply to फर्मास फार्मकाव्य!! by चांदणे संदीप
शिघ्रकाव्य लै भारी !
बैजाट, झिंगाट, सैराट,अफाट!!!!
नंबरी!!
छान!
मी या धाग्यावर आलोच नव्हतो आणि हा धागा वाचलाच नाही !
=====
कांडका नाखु
In reply to छ्या by नाखु
नाखुस तुम्ही नाखुश झालाय का ?
चलायचंच,
आजकालची जवान पोरं कायबी लिव्हत्यात. उगा म्हाताऱ्याला तरास.
(ह.घ्या. हो, नस्ता विकेट काढायचा माझी ) ;)
शौकीन पाटील...
विडंबन चांगले जमले आहे
पैजारबुवा,
आरे द्येवा माझ्या, _/\_
---------
अवातरः फेसबुकावर चाललेलं रणकंदन बगुन हे आटवलं, नेमकं उलटं असतं तर लोक खवळतात.
भारीच की! मजा केलासा म्हणा की. कामापायी काम आणि...
येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हायकोरड्या रानात नांगुर अडकतो भावा. मग जीवाला घोर. जरा वल आसली म्हंजे मग उनात पण नांगरट सर्राट होतीय बघा. ;) तसं तुमाला सांगायचं म्हंजे माशाला पवायला शिकवल्या सारखंच म्हणा.
In reply to येवढ्या उनाची नांगरट काढायची by सच्चिदानंद
पोचलेले दिसताय ..
In reply to खिक्क by जव्हेरगंज
हा हा हा.. तुमच्यापुढे कमीच हो. ;)
बायदवे,
लेखनविषय:: वावर मौजमजायातला श्लेष कोणी नोटिस केलाय का.
आता पुढची मागणी काय आणि पाटील त्याची कशी वसूली करतील याची उत्सुकता लागलीया !
लै म्हंजी लैच आवडले.
चहा पिता पिता वाचत होतो आणि शेवटच्या ओळीत
तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलंठसका लागला! ;)
In reply to लै म्हंजी लैच आवडले. by कानडाऊ योगेशु
तुमचाच धुमाकूळ पाहून आपसुकच आलंय ;)
तुमासनी येवढ शब्द कस आठवत्याती काय म्हायत.
जव्हेरभौ, लय भारी... नुसतीच नांगरट की मग काही पेरणारपण आहात?? घेवडा पेरा..
In reply to मस्त by स्वप्नज
घेवडाच का तेवडा पेरायचा इस्काटताकाय?
In reply to घेवडाच का तेवडा पेरायचा by जव्हेरगंज
ईस्काटलं तर गोंधूळ हूईल ओ... नगं इस्काटायला.
In reply to तसं कसं,तसं कसं... by स्वप्नज
'घेवडा'चं यमक पेरायचंय का?
मग लै झ्याक ;)
जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान