पहिले जागतीक(ऑनलाईन) मिसळपाव साहित्य संमेलन
मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्या या संमेलनाकरिता बर्याच गावकर्यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्यासारख्यांना या स्पर्धेतून बरेच काही वाचता आणि शिकता येईल.
या संमेलनाचे स्वरुप असे असेल( उदाहरणार्थ)
१)एखादा आठवडा साहित्य संमेलन म्हणून जाहिर करावा.
२)या आठवड्यात प्रसिद्ध होणारे सर्व साहित्य स्पर्धेत समाविष्ट करण्यात यावे.
३)प्रत्येक विभागाकरीता स्वतंत्र स्पर्धा असावी(लेख,कविता,विडंबन,चारोळ्या वगैरे)
४)दिग्गज ग्रामस्थांकडून या साहित्याचे परीक्षण करुन त्यानुसार त्यांना गुण देण्यात यावेत.
५)विजेत्या स्पर्धकाला ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात यावी.
वरील नियम केवळ उदाहरणादाखल देण्यात आले आहेत. इतर ग्रामस्थांनी आपापले विचार मांडावे(आपटू नये).
ही कल्पना अद्याप सरपंचांना कळविण्यात आलेली नाही. त्यांचे मत जाणून घेण्यास उत्सूक आहोत.
-इनोबा मिसळे
(काळजीवाहू) व्यवस्थापक
जागतीक मिसळपाव साहित्य संमेलन
वाचन
8953
प्रतिक्रिया
20
मस्त कल्पना
सहमत आणि सुचना
In reply to सहमत आणि सुचना by ऋषिकेश
धन्यवाद!
कल्पना आवडली
चांगली कल्पना...
In reply to चांगली कल्पना... by विसोबा खेचर
हे ही नसे थोडके!
In reply to चांगली कल्पना... by विसोबा खेचर
तात्या म्हणजे तुम्ही,
कल्पना चांगली..
In reply to कल्पना चांगली.. by प्राजु
कल्पना
सही
एकदम जबरदस्त कल्पना !!!
In reply to एकदम जबरदस्त कल्पना !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी
उत्तम कल्पना
वाहवा!
फक्त सुचना क्र. २ बद्दल
In reply to फक्त सुचना क्र. २ बद्दल by मनीष पाठक
झाले गेले गंगेला मिळाले.
चांगली कल्पना आहे.
पाककला
प्रकटने, प्रवासवर्णने वगैरे .....
छान