ठाण्यातला पाचू - गजबजाटात वसलेली गर्द हरितसंपदा
कंजूस यांच्या या धाग्यात सदर उद्यानाबद्दल वाचल्यापासून इथे भेट द्यायची होती. तो मुहूर्त यायला हा वीकांत उजाडला. पण भेट अतिशय सुखद होती. शहराच्या मधोमध इतकी घनदाट (असंच म्हणायला हवं) बाग आहे यावर विश्वास बसत नाही पटकन. तरी आत्ता उन्हाळा आहे; पावसाळ्यात तर बघायला नको. आत्ता इथे जितके फुलांचे प्रकार बघायला मिळाले त्याच्या तिप्पट नक्की होतील पावसाळा उन्हाळ्यात. वॉचमनशी बोलल्यावर कळलं की आता नवीन झाडं आणून लावली जातील. पावसाळ्याआधी. सो पावसाळ्याच्या भेटीची फार उत्सुकता आहे, तूर्तास या भेटीतील काही निवडक फोटो मिपाकरांकरता खास.


वाचने
7785
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वा. छायाचित्रे खूपच सुंदर!
छान! या बागेत ते तरातरा चालणारे येत नाहीत हे फार आवडले.वाटेवर त्यांच्यामध्ये कोणी आले की फार संतापतात.ते सर्व शेजारच्या सर्वोदय गार्डनला जातात.
In reply to छान! या बागेत ते तरातरा by कंजूस
असं काही नाही बरं का. एक दोन दिसले तसेही.
एक गुज्जु ग्रूपही दिसला (कलकलाट न करणारा). मी सहज गप्पा मारायला गेलो तर 'भाय यहां मराठी बोलनेवाला कोई नही है' असं म्हणाला एक जण. 'हो की काय!? कठीण आहे' असं म्हणून काढता पाय घेतला मी.
एक फोटो काढत होतो तर एकदम मागून ओ.......... असा कोरस आला. दोन सेकंदांनी कळलं ग्रूप ओंकार चालू होता.
मग एक रमत गमत चालत मोबाईलवर मोठ्या आवाजात लताचं कुठलं तरी गाणं लावून चाललेले काका क्रॉस झाले.
धावायला, व्यायाम करायला आलेले तीन नवतरूण दिसले.
परत जाताना वॉचमन ला या गोष्टी सांगून आलो. की ब्वा हिरवळीबरोबर शांतताही राहील असं बघा. हे मोबाईल वाजवणारे, किंवा तत्सम न्यूसन्स करणारे वेळीच आवरा.
भारीच.
सुंदर छायाचित्रे.
__/\__ खूप आवडले फोटो
सुंदर !
खूप छान फोटो. आम्ही या भागाला बारा बंगला भाग म्हणतो. हा भाग पुर्वीपासून हीरवागार आणि निसर्गसंपन्न आहे. स्वातंत्रोत्तर काळात गोरे ऑफीसर येथील बंगल्यात रहात असत. आता हे बंगले मोठ्या अधिकार्यांना दीलेत...
In reply to खूप छान फोटो. आम्ही या भागाला by खटपट्या
आम्हीही या भागाला बारा बंगलाच म्हणतो. पण व्यापक दृष्टीने हा भाग कोपरीत आहे. आणि बारा बंगला हा त्याच्या बाजूच्या गल्लीपासून सुरू होतो.
झकास फोटो..!! भारी जागा आहे.
सुंदर छायाचित्रे!
In reply to सुंदर छायाचित्रे! by एस
तुम्ही सुंदर म्हणणं म्हणजे विशेष आहे माझ्यासाठी, धन्यवाद :)
In reply to तुम्ही सुंदर म्हणणं म्हणजे by वेल्लाभट
छाया चित्रे दिसत नाहीये काका? आपल्या ग्रूपावर पाठवता का?
In reply to छाया चित्रे दिसत नाहीये काका? by सूड
दिसतायत की! मलापण आणि अर्थातच प्रतिसाद आले त्या अर्थी दिसत असावीत. तरीही पाठवतो जी आहेत ती.
सर्वांना मनापासून धन्यवाद :) _/\_
मस्तं!
अतिशय सुंदर फोटोज.
नक्की कुठेशीक आहे ही जागा?
In reply to नक्की कुठे ही जागा? by किसन शिंदे
West to east जाताना कोपरी पूल ओलांडला की फुल राइट मारायचा आनंद नगर कडे. तो जो सर्विस रोड लागतो तिथे लगेच आहे.
In reply to नक्की कुठे ही जागा? by किसन शिंदे
ठाणे जीमखाना कुठे आहे विचारा.
सुरेख फोटो!
फोटू आवडले.
पण ठाणे म्हणजे फारच लांब आहे दररोज येण्यासाठी.
In reply to फोटो छान! by बोका-ए-आझम
बघा, बोललात ना.
अहो मध्यवर्ती ठीकाण आहे ते...
आणि लांब म्हणायला येणार कुठून आहात आपण... :)
In reply to बघा, बोललात ना. by खटपट्या
डोंबोलीच आहे....
अर्थात मध्यवर्ती ठिकाणापासून ठाणे तसे काही फार दूर नाही...
मस्तच फोटो.छान ठिकाण दिसतंय.ठाणे कट्टा करा की लेको इथे.
"फोटो.छान ठिकाण दिसतंय.ठाणे कट्टा करा की लेको इथे."
++1
मस्त फोटो!!
अहा
डोळे निवले
एकदम शांत वाटले फोटो पाहून
खूप आवडले. ही बाग नक्की पाहणार.
झक्कास....
सुंदर फोटो! भर ठाण्यात इतकी सुंदर बाग आहे हे बघून बरं वाटलं.
वा. छायाचित्रे खूपच सुंदर!