मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संघाने मला काय दिले?

रमेश भिडे · · काथ्याकूट
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

वाचने 34020 वाचनखूण प्रतिक्रिया 221

mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 08:38
हे सगळे आम्ही संघात न जाताही करतो.

In reply to by तर्राट जोकर

रिम झिम गुरुवार, 05/12/2016 - 20:19
एक तर हे साधे संस्कार वाटतात तेवढे सोपे नसतात त.जो. साहेब.. त्यासाठी एक तर तुम्हाला खुप कडक स्वभाव असावा लागेल अथवा तुमच्या घरात सगळेच शिस्तप्रिय असावे लागतील. सामान्यपणे असे असण्याचे प्रमाण खुपच कमी असेल.

आनन्दा गुरुवार, 05/12/2016 - 09:33
समूहात आणि प्रत्यक्ष फिल्डवर शिकलेल्या गोष्टी जास्त पक्क्या असतात. ज्यांना केवळ विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यांचा भाग सोडून द्या.

mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 09:39
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. पोराबरोबरच बापालाही संघात जाण्याची गरज आहे . पुढच्या शिबिरात बापाने जावे.

मुक्त विहारि गुरुवार, 05/12/2016 - 10:21
"संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात." ????????????????? ?????????????????????????/// ?????????????????????????????????????????// कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....

मार्मिक गोडसे गुरुवार, 05/12/2016 - 10:41
शिबिरात चांगलेच पिदवून घेतलेले दिसतेय लेकराला, 'टेली शॉपिंगच्या' जाहिरातीसारखे वाटते. संघात जाणार्‍या माझ्या बर्‍याच (सगळ्यांच्या नव्हे) मित्रांच्या घरातील वॉश बेसिनच्या नळाला हात लावायलाही किळस वाटेल इतके कळकट असतात, त्यांच्या पाणी प्यायच्या पेल्यालाही ओशट वास येतो.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 10:55
संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. लेखात लिहिलेल्या सवयी आम्हाला गरीबी ने शिकवल्या आहेत १ आवरून ठेवणे - घरात बोंबलायला सामानच कमी त्यात कपडे वर्षात दोन जोड़ी न आवरून जातोय कुठे कपडे फाटले तर उघडे रहावे लागले ह्यातून आवराआवर शिकलो २ म्हातारी कंबर तुटेपर्यंत काम करुन परत पाण्याला मैलभर चालत जायची तिथे पाणी वाचवणे शिकलो ३ घरात टीवी वगैरे चैन कधीच नव्हती तेव्हा गोट्या अड्डूल गस्टिल खेळणे अन पुस्तके वाचणे हे शिकावेच लागले ४ नेतृत्व गुण शिकायला कारणीभूत, कांडी हरवल्यामुळे भोकाड पसरलेला मित्र अन त्याला पेन हरवला म्हणून अर्धमेला होइस्तोवर कुटनारा त्याचा बाप ह्यांच्यापासून वाचवायला सगळ्या पोराकडून चार चार आणे वर्गणी काढून मित्राला पेन घेऊन देणे अन मुस्काड मारून परत हरवु नको हे सांगणे ठरले बघा विशेष सूचना :- अस्मादिक बाल शाखेत गेलेले आहेत अन अस्मादिकांची कॉमेंट ही वैयक्तिक अनुभवांवर आधारीत आहे, संघ ऑन अ लार्ज असेलही महान वगैरे मी मला जो वैयक्तिक अनुभव आला अन जो बप्तिस्मा संघाने द्यायचा प्रयत्न केला त्या आधारावर बोलतो आहे. आग्रहाची विनंती :- संघ अनुभवायची गोष्ट आहे वगैरे मखलाशी आहेर आणु नये, आपले शिव्याशाप हाच आमचा आहेर "आमच्या ककाच्या डोक्याला ताप द्यायला नाही यायचं बरं" -बाल शाखेत जाणारा पुतण्या बबल्या अजिबात कळवु नये अन लोभ तर मुळीच ठेऊ नये धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. गुरुवार, 05/12/2016 - 11:03
अगदी अगदी, उपरोल्लेखित गुण शिकण्यासाठी संघाची गरज भासली नाही. किंबहुना संघात नियमित जाणार्‍या सहाध्यायींपेक्षा जास्त चांगले वागायला जमले. आईबाप आणि परिस्थिती शिकवतेच. शिकणे आणि शिकवणे यात कोताही झाली की बाह्याधाराची किंमत वाटायला लागते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 11:28
तुम्ही वेगळ्या संघाबद्दल बोलत असाल कदाचित. हा धागा बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आहे. ज्याच्याबद्दलचा माझा अनुभव वेगळाच आहे. मी काय शिकलो ही गोष्ट वेगळी. पण वाईट काही शिकलो नाही. बाकी संघात शिकायला मिळत नाहीत अश्या गोष्टी बर्‍याच असाव्यात. पण योग्य वेळी योग्य गोष्टी शिकायला मिळाले तरी खुप झाले. असो. संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. तुमच्या रुपाने एक उदाहरण आमच्यासमोर आहेच. संघात जाउनही कदाचित आमच्या हातुन आपल्या एवढी देशसेवा घडु शकत नसेल (आमच्यापरीने प्रयत्न करतो). परंतु तरीही संघामुळे अनेक चांगल्या गोष्ती मनावर बिंबल्या हे नक्की. संघ नसता तर हे घडले नसतेच असे सांगता येत नाही पण संघामुळे घडले असेल तर वाईट काही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिनार गुरुवार, 05/12/2016 - 15:43
बापू साहेब, ज्या गरिबीने आपल्यासारखा चांगला माणूस घडवला तीच गरिबी कधी कधी गुन्हेगार घडवायला सुद्धा कारणीभूत ठरते. अर्थात श्रीमंत घरातून सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू शकते. मुद्दा असा आहे, ध्येयापासून भरकटलेल्या गरीब किंवा श्रीमंत मुलाला संघासारखी एखादी संघटना योग्य मार्गवर आणत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. आता ही गोष्ट फक्त संघातच घडू शकते असं काहीही नाही. बाकी सैन्यानंतर संघा इतकी शिस्तबद्ध संघटना माझ्या तरी पाहण्यात नाही

In reply to by चिनार

तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 16:03
तुम्ही सैन्य आणि संघाची शिस्तीबद्दल तुलना केली तर एक सहज विचार माझ्या मनात आला. सैन्यात शिस्त बाणवायला ConformityObedience आवश्यक असते. ह्याबद्दल खरेसर आणी बापुसाहेब जास्त योग्य सांगू शकतील. सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी. ह्या विषयावर चर्चा झाल्यास आवडेल.

In reply to by तर्राट जोकर

मन१ गुरुवार, 05/12/2016 - 17:09
सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी.
हं . सगळ्याच केडर बेस्ड संघटनांत हे थोड्याफार फरकानं असणारच की . राजकिय, सामाजिक विषयांचा मी जाणकार नाही. पण माझा अंदाज असा की अगदि कम्युनिस्टांतही हे लक्षण/ फीचर दिसणारच. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसमध्ये, भारवलेल्या कार्यकर्त्यांतही दिसेल. आणि कोणतीही संघटना असू देत किंवा कंपनी, कोणतीही ओर्गनायझेशन ही प्रत्येक सदस्याच्या सहमतीनंतरच चालेल असं ठरवलं तर तिचं चालणं मुश्किल होइल. आपण काम करतो ती कंपनी सुद्धा एक ऑर्गनायझेशन असते. तिची सगळी ध्येय धोरणं आणि हरेक कृती कुठं आपल्याला मान्य असतात ? मला खुद्द आपल्या देशाची काही धोरणं मान्य नाहित. पण राहतोच की मुकाट्यानं इथ एक कायदाभिरु नागरिक म्हणून. (स्वगत -- च्यायला लैच अवांतर होतय का ? सॉरी बॉस.)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रदीप गुरुवार, 05/12/2016 - 18:18
संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. ह्याविषयी, तसेच आपण जेव्हा बालशाखेत जात होतात त्यावेळचे इतरही काही बरेवाईट अनुभव असतील, त्या सगळ्याबद्दल आपण इथे कृपया सविस्तर लिहाल का?

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 11:37
संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. प्रतिसाद पोचला धन्यवाद! मी गेलो तो संघ किंवा मुळ संघाला माझ्यासमोर विपर्यस्त पद्धतीने मांडणाऱ्या लोकांबद्दल बोलतो आहे बुआ मी तर! मुद्दा काय उडदामाजी काळे गोरे! संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल ह्यावर बहुदा तुमचे आमचे एकमत असावे परत एकदा धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 12:26
संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल हे फारच जेनेरिक विधान आहे. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. - संघाशी असंबंधित सामान्य माणूस

In reply to by अप्पा जोगळेकर

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 12:50
. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. अगदी अगदी लागु होते त्यात काही वादच नाही, १००% sacrosanct काहीच नाही ह्यात वाद असायचे कारण नाही, कदाचित म्हणून मला मी करतो ते काम जस्ट अनदर जॉब वाटतो त्यात ग्लोरिफिकेशन नसावे हे मी वेळोवेळी नमूद सुद्धा केले आहेच तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. ह्यावर मी पुढे "संघ असेलही महान फ़क्त मला दिसलेला अन आलेला अनुभव जसा आला त्यावरून मांडतो आहे" अश्या स्वरुपात बोललोच आहे, मला संघ म्हणून जो जो अनुभव आलाय तो मी लिहिला आहे बुआ वैयक्तिक मी माझ्या अनुभवांची जबाबदारी घेतोय, त्यावर प्रतिसाद देताना कोणाला पुर्ण संघाची जबाबदारी घ्यायची असले तर तो त्याचा प्रश्न आहे माझा नाही, माझ्या अनुभवांवरुन आकलनावरुन निरीक्षाणांवरुन संघ जसा वाटला ते मी मांडले त्याचे सर्वत्रिकरण करायची गरज नाही , शिवाय धागा लेखकांनी सुद्धा "मला काय मिळाले" हेच मांडले आहे तेव्हा मी धागा प्रमाणिक लिहिले असे मी समजतो बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. धागा धोरणात्मक संघ त्याची ध्येय धोरणे इत्यादीवर असता तर मी ऑन अ लार्ज स्केल संघात चांगले वाईट काय मिळाले/नाही मिळाले, असते/नसते ते बोललोही असतो, धागा वस्तु वैयक्तिक काय मिळाले वर केंद्रित आहे म्हणून मी तितकेच बोललो, बाकी तुमची मर्जी अप्पा :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 13:22
संघाबद्दल तुमचे आणि माझे अनुभव पुर्ण वेगळे आहेत हे तर ओघाने आलेच. फक्त एक शाखा म्हणुन नाही तर संघातील ज्या प्रचारकांची, कार्यकर्त्यांची ओळख झाली आहे त्यापैकी बरेच लोक तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कारी आणि दुरदृष्टी असलेले विद्वान लोक होते त्यामुळे तुमचा आणि माझा संघाबद्दलचा दृष्टीकोन वेगळा असणार यात शंकाच नाही. पण एक संघटना म्हणुन संघाच्या सेवाभावी वृत्तीबद्दल आणि कार्याबद्दल मला आदर आहे. त्यामुळेच तुमचा आणि माझा संघच वेगळा आहे असे लिहावेसे वाटले. त्यामुळेच संघ आणि इतर म्हणजे उडदामाजी काळे गोरे हे मला मान्य नाही. पण व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल यावर दुमत नाही. असो. धन्यवाद. वैचारिक मतभेद असुनही शांतपणे चर्चा करता येणार्‍या थोड्या आयडी पैकी आपण एक असल्याने आपण आपले आपले अनुभव मांडले आहेत त्यावर येथेच थांबुयात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/12/2016 - 12:41
माझं संघाबद्दल फार चांगलं मत नै ये, पण व्यक्तिमत्वात बदल होणार्‍या कोणत्याही उपक्रमाचं ब्वा मला लै कौतुक हेही नम्रपणे नमुद करतो. आपल्या मुलामधे बदल झालेले पाहुन आनंद वाटला. शुभेच्छा. अजून एक, मी कॉलेजला जाईपर्यंत अशा सांस्कृतिक उद्योगात होतो. शीबीर, शाखा, खेळ, शहरप्रमुख अशी सर्व पदंही भूषवली आहेत. पण, तेव्हा काय कळत नव्हतं, आता थोडं थोडं कळायला लागलं आहे. -दिलीप बिरुटे (दक्ष)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु गुरुवार, 05/12/2016 - 12:55
म्हणजे तुम्च्या सदैव दक्ष राहाण्याचे मूळ संघाच्या शाखेमुळे (जात होता तेंव्हा पासून आहे तर). भीतीने लांब पळालेला नाखुस.

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 13:31
मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 13:34
तांदुळात एक खडा निघाला. तेंव्हा सगळे तांदूळ खड्यानीच भरलेले आहेत असे म्हणण्यासारखा हा प्रतिसाद आहे. सरळ स्पष्ट ब्राम्हण द्वेष आणी संघ द्वेषाने भरलेला प्रतिसाद आहे. इतके खाली उतरू नका चंद्रनील साहेब. संघाला थोडे सुद्धा ओळखणारे लोक हा प्रतिसाद अजिबात अमान्य करतील.

In reply to by सुबोध खरे

अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 05/12/2016 - 13:50
संघाला ओळखणारे किंवा संघ जाणणारे हे कधिच मान्य करणार नाहित. एखाद खडा असेल गोष्ट वेगळी मात्र त्यामुळे संघ असा आणि तसा म्हणणं चुकीचं....तशी वागणुक देणार्‍यांनाही आणि प्रस्तुतकर्त्यालाही संघ कळला नाही अस सिद्ध होतयं.

In reply to by सुबोध खरे

अर्धवटराव Fri, 05/13/2016 - 00:07
आजन्म संघात घालवलेले, आसिंधु-सिंधु हिंदु बांधवतेच्या गर्जना देणारे अनेक संघी जातीय द्वेषापासुन स्वतःला सोडवु शकत नसलेले बघुन मला फार आश्चर्य वाटायचं. पण मग जातीभेद समाजात मुरल्याची कारणं, एकुणच हिंदु संघटनेचा कन्सेप्ट, संस्कृती आणि देशकारणाचा परस्पर संबंध, देशाच्या समस्या आणि त्यांचं परिशीलन या बद्द्ल परस्परविरोधी पण एकदम लॉजीकल विचारधारा, या सगळ्यांचा शेवटी मानवतेवर होणारा परिणाम... हे सगळं पुढे येत गेलं व संघ आणि संघी यातला भेद समजत गेला. ज्यांच्यापुढे केवळ नतमस्तक व्हावे असे अनेक महानुभाव भेटले, त्यातले बरेचसे संघी देखील होते. सांगायचा मुद्दा असा कि संघावर जातीयतेचा आरोप लागण्याचं एक कारण जुन्या पिढीतल्या अनेक संघी लोकांची मानसीकता आहे. हे एकदम नाकारता येत नहि.

In reply to by अर्धवटराव

वैभव जाधव Fri, 05/13/2016 - 00:29
http://misalpav.com/comment/839359#comment-839359 विठा मोड- हे आधीच सांगितले आहे, तस्मात आपला मुद्दा नवीन राहिलेला नाही- विठा मोड

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 15:09
मी जोशी हायस्कूलमध्ये असताना एकदा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या जोशी हायस्कूल मध्ये शिकल्या होत्या. घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आलेजोगळेकर म्हणजे तू भटाचा का असे एक आजी म्हणाल्या. मी पुन्हा एकदा मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले. अत्यंत सापत्न वागणुक मिळाली. तेव्हा या शाळेचे जातियवादी स्वरुप समजले. ही शाळा फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला तेंव्हा खुली झाली, जेंव्हा मी शाळा सोडून कोलेज मध्ये गेलो. त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने जोशी हायस्कूलचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये. तसेच मुलांना कोणत्याही आजींच्या संपर्कात येऊ देऊ नये.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 15:12
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, एखादी शाळा किंवा जगातल्या सगळ्या आज्या 'ऑन अ लार्जर स्केल' महान असतीलही पण माझी कमेंट वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 15:36
जसे या उपरोधिक प्रतिसादातून तुम्ही चंद्रनील यांच्या अनुभवातील ३ पिढ्या संघात घालवलेल्या कुटुंबाच्या विचारसरणीचा/वर्तणूकीचा संघाशी संबंध नाकारताय, त्याच मापदंडाने रमेश भिडे यांच्या लेखातील १०-१५ दिवस शिबिरात घालवलेल्या मुलाच्या वागणूकीचाही संघाशी संबंध नाकारता येतो.

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 15:50
नाही नाकारता येत कारण रमेश भिड्यांच्या लेखातल्या देवर्‍यांनी स्वतः तो बदल संघामुळे झाला आहे असे म्हटले आहे. ती बाब त्यांची स्वतःशी निगडीत आहे. आणी मुल्हेरकर एका व्यक्तीच्या अनुभवावरुन संघाबद्दल निष्कर्ष काढत आहेत. एका व्यक्तीवरुन संघटनेबद्द्दल निष्कर्ष काढता येत नाही. माझ्या ३ पिढ्या संघाशी संबंधित आहेत आणि मी सर्व जातिधर्माच्या लोकांकडे जाउन जेवुन आलो आहे आणि ते देखील माझ्याकडे येउन जेवुन गेले आहेत. तसे करताना त्यात माझ्याबाजुने तरी कुठलाही भेदभाव कधी केला गेला नाही. किंबहुना असे करताना "जात " हा विचारच कधी मनात आला नाही. सध्या पद्धतशीरपणे जो ब्राह्मणांबद्दल अपप्रचार केला जातो तेव्हा त्यामुळेच हे सगळे विचित्र वाटते

In reply to by मृत्युन्जय

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 16:03
देवरे आणि चंद्रनील दोघांचाही अनुभव आहे .. दोघांना वेगळे अनुभव आले.. ठीक आहे. माझा मुद्दा अप्पांच्या प्रतिवादाविषयी होता.. असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. बाकी देवरे आणि चंद्रनील यांच्या अनुभव कथनात दोघांचाही संघाविषयीचा पूर्वग्रह डोकावतोय.. दोन्ही विरुद्ध टोकांना अतिशयोक्त आहेत.

In reply to by बाळ सप्रे

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 16:08
आणि हो.. वाईट अनुभवाविषयी संघ तुम्हाला समजलाच नाही आणि चांगल्याचं श्रेय द्यायला चढाओढ हे आता खूप अंगवळणी पडलय..

In reply to by बाळ सप्रे

मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 16:21
परत एकदा सांगतो.: १. एक स्वयंसेवी संस्था आहे. त्या संस्थेच्या विचारसरणीने माझ्या आयुष्यात आमुलाग्र सकारात्मक बदल घडुन आला. मला ती संस्था आवडते. असे एक माणुस म्हणतो. २. एक माणुस एका स्वयंसेवी संस्थेचा सभासद आहे. त्या माणसाचा व्यवहार अभद्र आहे. त्यासाठी ती संस्थाच अभद्र आहे असे दुसरा माणुस म्हणतो. संस्था अनेक सभासदांनी बनलेली असते. त्यामुळे त्या संस्थेतील अधिकाधिक लोक जर नकारात्मक प्रवृत्तीचे असतील तर ती संस्था चुकीची म्हणता येइल कदाचित. पण एका माणसाच्या चुकीच्या वर्त्नामुळे (जो काही संघटनाप्रमुख पन नाही) आख्खी संघटनाच चुकीची आहे हा आरोपच मुळात हास्यास्पद आहे आणि त्यामुळे पहिल्या अनुभवाशी दुसरा अनुभव कंपेअर करता येत नाही, आणि हो. उठसुट संघाला नावे ठेवायची फ्याशन फार जुनी आहे फक्त आता मोदीविरोधामुळे संघविरोधही प्रबळ आहे इतकेच. आता सरावलो आहे त्याला.

In reply to by मृत्युन्जय

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 18:25
तुम्हाला संघ आवडतो की नाही यावर काहीच वाद नाहिये इथे. ते परत मला कशाला सांगताय. प्रतिवादाच्या पद्धतीवर प्रतिसाद होता.. आणि जसं चांगल्या अनुभवावरून लोक संघाला चांगलं म्हणू शकतात तसं वाईट अनुभवावरून वाईट म्हणणारच.. वाईट आलं की मात्र त्या माणसाला संघापासून नामानिराळा करणे योग्य नव्हे.. जसं शिबिर भरवणारे संघाचे प्रतिनिधित्व करतात तसचं संघाच्या कामाला आलेल्या माणसांची संघप्रेमासाठी रहायची सोय करणारी कुटुंबही संघाचंच प्रतिनिधित्व करतात..

In reply to by बाळ सप्रे

आनन्दा गुरुवार, 05/12/2016 - 23:27
मी स्वतः आयुष्यातला काही काळ संघात घालवलेला आहे. संघाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी पण झालेला आहे. विविध गोष्टींच्या निमित्ताने संघाचे कार्य जवळून बघितले आहे, आणि तसेच शाखेत असणार्‍या काही "कार्यकर्त्यांच्या" टवाळक्या, इतकेच नव्हे तर काही संघाच्या क्रियाशील सभासदांच्या जीवनाची काळी बाजू देखील जवळून पाहिलेली आहे. काही वेळेस त्याची झळ देखील सोसलेली आहे. परंतु संघाचे तत्वज्ञान आणि सकारात्मक कार्य इतके मोठे आहे की त्यापुढे या गोष्टींचे फारसे महत्व वाटत नाही. एका विशिष्ट वळणावर वैचारिक मतभेदांमुळे संघापासून वेगळा झालो, पण तरीही मी आजन्म संघाचा हितचिंतक राहीन.

In reply to by बाळ सप्रे

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 16:36
असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. जरुर काढावेत. मुल्हेरकरांनी उगाच इथे 'जात' आणली आहे म्हणून प्रतिसाद देणवाआवश्यक वाटले.

In reply to by मी-सौरभ

नाखु Fri, 05/13/2016 - 14:37
दुसर्याचे खरे खुरे अनुभवही यांना कल्पनाविलास वाटतात आणि त्यांचे पालन-पोषणकर्ते त्याचा अगदी मनःपूत पाठींबा देऊन जयजयकारही करतात. चालायचंच शिक्ष्णाने माणुस प्रगल्भ होते यावर कितपत विश्वास ठेवावा हेच आपले आपण ठरवावे. तयार नाखु

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 20:25
का, तर त्यांच्या कुठल्यातरी पुतणीने ब्राम्हण मुलाशी लग्न केलेलं म्हणून. मी ना त्या मुलाचा भाऊ ना त्याचा काका-मामा. आणि ही मुंबईतली गोष्ट आहे. आता बोला. तरीही आमच्या मोठ्या बहिणीने मराठा मुलाशी लग्न केलं तेव्हा आम्ही कुठलाही विरोध केला नाही. हे आमचे जावई सगळ्या सासुरवाडीत एकदम आवडते आहेत. एका कुटुंबाकडून असला अनुभव आल्यावर संपूर्ण संघटनेविषयी इतकी टोकाची भूमिका घेणं हे जरा जास्तच आहे. आणि हे जातीयवादी संस्कार त्यांच्यावर संघाने केले होते याचा काय पुरावा आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

खटपट्या गुरुवार, 05/12/2016 - 23:38
९६ कुळी मराठा अशी कोणतीही जात अस्तीत्वात नाही. कागदावर फक्त "हींदू मराठा" ही एक जात आहे. बाकी चालू द्या.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/12/2016 - 21:01
मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.
हे वाचून गोंदवले प्रकरणाची आठवण आली व सदस्य कोण आहे याचाही अंदाज आला.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

खटपट्या गुरुवार, 05/12/2016 - 23:47
चंमु साहेब, खूप सरसकटीकरण होतय. ठाण्यातल्या एका अग्रगण्य बँकेत काम केले आहे. या बँकेची स्थापना संघाने केली. बँकेच्या व्यवस्थापनाने मुद्दामुन ठाण्यातील दुरवर असलेल्या खेड्यापाड्यातील आदीवासी आणि दलीत मुलांना नोकर्‍या देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्य कर्मचारी ब्राह्मण आहेत हे मान्य तरीही ब्राह्मणेतर मुलांना शिक्षणात आणि मार्कांत विशेष सुट देण्यात येते. यातील कीतीतरी मुले नंतर वरच्या पदावर पोचली. कामात चुका करत असतानादेखील त्यांना सांभाळून घेण्यात आले (याठीकाणी ब्राह्मणांवर मात्र कडक कारवाइ होत असे) त्यामुळे एखादा संघातील माणूस फक्त तुमच्याशी वाइट वागला म्ह्णून अख्खा संघच तसा आहे असे म्हणू नका.

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 13:41
डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही गैर आहे का? जगभरातल्या अनेक संघटनांचा दाखवायचा हेतू एक आणि अंत्यस्थ हेतू वेगळाच असतो हे मला सुचित करायचे आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

नाखु गुरुवार, 05/12/2016 - 14:24
असा अनुभव आला असेल तर निस्श्चीत्च तो चांगला नाही आणि निंदनीय आहे.पण जरा ही चित्रफीत पहा आणि ठरवा भुजबळ कुटुंबीय भारावले ही बाब तुम्ही वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली आहे काय? किंवा त्याचा पाठपुरावा केला आहे काय असल्यास तोही टंकावा. नितवाचक

हकु गुरुवार, 05/12/2016 - 14:08
त्या ब्राह्मण कुटुंबाची वागणूक चुकीचीच आहे, पण अशी किती कुटुंबं तुम्हाला भेटली? तुम्ही म्हणता ते फुले आंबेडकरांच्या विचाराने वागणारे सर्वच जण सर्वसमावेशक वागतात का?

mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 14:27
राजस्तान की गुजरातेत शालेय अभ्यासात नेहरुंचा उल्लेख गाळला आहे व संघ गाणी पुस्तकात सामील केली आहेत म्हणे. आता लवकरच या राज्यांत सुसंस्कारीत प्रजा जन्मास येइइल अशी अपेक्षा.

In reply to by mugdhagode

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 14:29
पाठ्यपुस्तके वाचुन पोरे निपजतात का निपजलेली पोरे ठराविक वयाची झाली की शाळेत जाऊन बुके वाचतात!?? अरे भाई कहना क्या चाहते हो आप??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अद्द्या गुरुवार, 05/12/2016 - 14:37
त्यांना काय म्हणायचं नसतं , त्यांना फक्त अंधळा द्वेष करायचा असतो बापू :) जाऊद्या , तुम्ही कायला शक्ती आणि वेळ वाया घालवताय

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 14:40
दोन्हीही होइल हो. शाळेत सध्या असलेली मुले आता सुधारतील. नंतर काही काळानी त्यानाही मुले होतील. ती बाय डिफील्ट जन्मापासुनच सुसंस्कारीत असतील.

In reply to by mugdhagode

हकु गुरुवार, 05/12/2016 - 14:51
कृपया कोणती संघ गाणी सांगू शकाल का? शालेय मुलांना शिकवू नयेत असे त्यांचे अर्थ आहेत का? संघाचे एक गाणे आपल्या आर्मीच्या मराठा लाईट इंफंट्रीच्या बँड पथकाने गेल्या महिन्याच्या 21 तारखेला रायगडावर म्हंटलेले मी स्वतः पाहिले व ऐकले आहे. हेही आपण चूक म्हणाल का?

सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 15:03
चंद्रनील साहेब, मी "संघात असताना " तुम्ही जर खरंच संघात होतात तर संघ जातपात मानत नाही हे तुमच्या लक्षात आलं असतं. ते जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही संघात गेलातच नाही असा आरोप करण्याचे मी धारिष्ट्य करेन. तीन पिढ्या "संघात" असलेले "ब्राम्हण" कुटुंब असा देखावा उभा करून तुम्ही एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे तो खालच्या पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. संघ पोथीनिष्ठ आहे झापडबंद आहे हे मी मान्य करेन. किंवा त्यांची वरिष्ठ पिढी पुराण मतवादी किंवा हटवादी पण आहे हे हि मान्य करेन पण संघ जातपात मानतो हे मला मान्यच नाही. आपलयाला असा अनुभव आला त्याबद्दल आपण संघातील कोणाशी चर्चा केलीत का?आपला ब्राम्हण द्वेष स्पष्ट दिसतो आहे आणि त्यात संघाला गोवण्याचा आपला प्रयत्न अतिशय हीन पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. तो पूर्ण तुमचा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे कोणी शहानिशा करण्याची शक्यता नाही अशी खेळी खेळण्यात आपला काय हेतू आहे ते मला माहित नाही. लष्करात असल्यामुळे माझा संघाशी संबंध फारसा आलेलाच नाही परंतु लातूर किंवा गुजरात येथे झालेल्या भूकंपात काम करणारे देशभरातील स्वयंसेवक मी प्रत्यक्ष पहिले आहेत . आम्ही लष्करी माणसे आपली नोकरी म्हणून तिथे भूकंप सहाय्य कार्याला गेलो होतो आणि तो आमच्या कर्तव्यच भाग होता. परंतु स्वतःच्या खिशातील पैसे टाकून हे स्वयंसेवक काय श्रद्धेने तेथे काम करत होते ते पाहिले तर हि माणसे काय मातीची घडवली गेली आहेत याचा प्रत्यय येतो. लष्कर किंवा निमलष्करी दले सोडली तर तोंड बंद ठेवून इतक्या शिस्तीत काम करणारी संघटना भारतात दुसरी नसेल असे मला वाटते. असाच अनुभव माझ्या मित्रांना सुद्धा उत्तराखंड येथे भूकंपात आणि काश्मीरच्या पुरात आला आहे. काश्मीर मध्ये तर त्यांनी तेथील जनतेला( सर्व मुसलमानच होते ) मदत केली ती तर त्यांच्यावर मुस्लीम द्वेष्टे असा जाहीर आरोप असतानाही. जर आपण डोळे उघडे ठेवून पाहण्याचा प्रयत्न केलात तर सत्यस्थिती आपल्याला जाणवेल पण केवळ द्वेषाने भारून तुम्हाला आपलेच म्हणणे खरे आहे असे म्हणायचे असेल तर मी येथेच पूर्ण विराम देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

हकु गुरुवार, 05/12/2016 - 15:22
नेपाळ भूकंपाच्या वेळी सुद्धा जगभरातल्या मिल्ट्रीज आल्या असताना ढिगार्याखाली गाडलेल्या प्रेतांना बाहेर काढण्याचे काम करणार्या केवळ तीनच संघटना होत्या; भारतीय लश्कर, भारताची आपातकालीन सेवा संस्था आणि राषट्रीय स्वयंसेवक संघ.

In reply to by सुबोध खरे

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 15:24
साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. म्हणजे सगळेच वैयक्तिक अनुभव खोटे नसतील पण असे बरेच 'वैयक्तिक अनुभव' लिहिले गेले की आपोआप बदनामी होतेच. टिंगल करावी असे बरेच मटेरिअल शाखेत असते. पण द्वेष करावा असे काय आहे हे समजण्या पलीकडे आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

नाखु गुरुवार, 05/12/2016 - 16:26
खात्रीने सांगतो ते उत्तर देणार नाहीत आणि त्यांची जाहीर पाठराखण करणारे इकडे फिरकणार नाहीत हे ही खरे मी वर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली जाणार नाहीत. ठोकुनी दे ऐसाजे आणि इतरांनी दिलेल्या अनुभवास मात्र "कल्पनाविलास" म्हणून हेटाळणे खचितच भूषणास्पद नाही. मिपा नितवाचक नाखु

In reply to by mugdhagode

प्रसाद१९७१ गुरुवार, 05/12/2016 - 15:56
आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती व संघटना काम करत असतात .
हो ना, आलेली मदत लाटण्याची. किंवा मदत पोचायच्या आधीच त्याचे पैसे लुबाडायची.

मारवा गुरुवार, 05/12/2016 - 15:31
गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. प्रकरण फार गंभीर झालेल दिसतय गोळवलकर गुरुजींची पुस्तके तर नाहीत ना त्या यादीत ? मनुस्मृती वगैरे विषय इ.इ.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 15:34
अप्पा मी जे काही बोललो तुम्ही त्याच धाटणी वर बोलताय असे दिसते, जर आपणांस काही प्रॉब्लम असता/आहे तर आपण थेट मला विचारलेले श्रेयस्कर कसे? उगाच पेड़गाव ट्रिप कश्याला , ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. असो. तुमचे तुमच्यापाशी, मी थेट बोलतो म्हणून विचारतो आहे हे असले प्रकार जमत नाहीत मला तरी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 16:27
मला तुमच्याशी काही एक प्रोब्लेम नाही. किंबहुना 'अकादमी' आणि 'एका ढिशक्यांवची कहाणी' वाचल्यापासून मी तुमचा निस्सीम 'पंखा' आहे आणि राहणार. ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे हे माझ्याकडून दुर्लक्षित झाले. तुम्ही ते लक्षात आणुन दिले त्याबद्दल आभारी आहे. आणि म्हणूनच 'ओके' लिहिले. बाकी इथे टिंगल टवाळी, तिरके प्रतिसाद असे प्रकार चालतातच. मी तुमचा 'पंखा' आहे म्हणून तुम्ही लिहाल ते सगळेच गोड मानून घेणे किंवा +१ करणे मला जमणार नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 17:04
टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त तिरके कळतात मला . असो बाकी माझे पंखे व्हा किंवा माझ्या म्हणण्याला +१ करा अश्या अक्षता मी कधीच कोणाला वाटलेल्या नाहीत, गैरसमज नसावा. जे आहे ते समोरासमोर , विचार पटत नसले अन तसे तोंडावर सांगितलेले चालते, नथीतुन तीर मारणे होत ही नाही अन रुचत पण नाही . आभारी आहे _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 17:27
मीदेखील तुमचा पंखा होतो आहे, मंजुरी द्या. असा अर्ज खरडला नाही. अर्थातच तुमचा 'पंखा' होणे/न होणे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही. असो.मंडळ आभारी आहे.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 15:37
साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. हे धागा लेखकाला सुद्धा लागु असेल का असा प्रश्न पडला आहे! की विरोधी काही बोलले की "वैयक्तिक अनुभव" अवतरणात टाकून गोग्गोड तितके वैलिड मानायचे हा एजेंडा आहे ते कळेना झालंय बरंका अप्पा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 15:41
तुम्हाला वाईट अनुभव आले की ते लोक संघाचे नसतातच मुळी. चांगले अनुभव आले तर ते लोक संघाचेच असतात. हा फॉर्मुला आहे बापुसाहेब. तुम्ही संघात जाउन तुम्हाला कळला नाही असे म्हणत असाल तर तुम्ही संघात कधी गेलेच नाही असा दावा मी धारिष्ट्याने करेन.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 20:18
बाकी संघ आणि भाजप म्हटल्यावर तुम्ही कसे नसणार तिथे? पण आता जरा नवीन मुद्दे आणा हो. तेच तेच मुद्दे आणि तेच प्रतिवाद वाचून कंटाळा आला. प्रत्येक सर्कशीत जोकरने त्याच कोलांट्या उड्या मारल्या तर हसू येईनासं होतं. नवीन आयटेम दाखवा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ट्रेड मार्क Sat, 05/21/2016 - 02:12
मूळ लेखकाने संघाच्या शिबिरात त्यांच्या मुलाला संघाबद्दल आलेला अनुभव, त्यामुळे लेखकाला स्वतःला मुलात दिसलेला फरक लिहिलाय. तर चंमुंनी त्यांना स्वतःला कोणा एका व्यक्तीचा आलेला अनुभव लिहिलाय. आणि चंमुंच्या म्हणण्याप्रमाणे ती दुसरी व्यक्ती ब्राम्हण असून त्यांच्या गेल्या ३ पिढ्या संघाशी संबंधीत होत्या. याचा काही पुरावा आहे का? आता सिद्धच करायचं म्हणलं तर संघाच्या विरोधकांना एखाद्या शिबिरात जाउन शहानिशा करता येईल. चंमुंनी त्या "संघिष्ठ ब्राह्मणाच्या" वागण्याचा पुरावा द्यावा. विषय मिटेल.

शान्तिप्रिय गुरुवार, 05/12/2016 - 15:42
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.

In reply to by शान्तिप्रिय

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 15:45
भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते.
असे संघकार्याचे ग्लोरिफिकेशन करण्याचीपण 'फ्याशन' आहे असे दिसते.

शान्तिप्रिय गुरुवार, 05/12/2016 - 15:42
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.

तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 15:47
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. >> आजकाल कुणावरही टिका करणे हीच फ्याशन झाली आहे संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. >> महात्मा गांधी??? सिरियसली??? कट्टर संघभक्त आणि कट्टर गांधीद्वेष्टे असे दोन्ही एकाच वेळेस असलेले एक मिपासदस्य आहेत, सदर वाक्याची त्यांचे कडून पावती घ्यायला लागेल. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. >> मग कशासाठी चाललंय तर?

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 16:44
संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि त्यांची स्वयंसेवा उल्लेखनीय आहे असे म्हणताना इतर कोणीही तसे नाही असे कुठे लिहिलेले मला दिसत नाही. हे म्हणजे अक्षय कुमार अतिशय उत्तम कलाकार आहे असे म्हटल्यावर त्याचा अर्थ इतर कुणीही उत्तम कलाकार नाही असा होत नाही. की तुम्हाला संघ आवडत नाही म्हणुन इतर कुणी त्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करुच नये? की असा काही नियम आहे की एकाची स्तुती करताना त्या क्याटेगरीतल्या इतर सगळ्यांची स्तुती कंपल्सरी केलीच पाहिजे अन्यथा तो फाउल असतो. उगा कशाला त्रागा करुन घेताय?

विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 19:12
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.

विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 19:12
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.

सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 19:21
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! हे उद्गार एका प्रामाणिक बापाचे आहेत असे जाणवले. बाकी संघावर केवळ टीका करणाऱ्याच्या उद्देशाने लिहिणाऱ्या लोकांचे मन बदलणे त्यांना स्वतःलाच शक्य आहे इतर कोणालाही नाही. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण यांचे उद्गार आजही आठवतात. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही पण "दुराग्रहा"चा जरूर होतो असो.

वैभव जाधव गुरुवार, 05/12/2016 - 19:26
संघात जात थेट विचारली जात नाही हे खरं आहे. आता तर फार विषय देखील निघत नाही. पूर्वी संघिष्ट म्हणजे ब्राह्मणी तोंडवळा असलेली संघटना असा विषय असताना संघ स्वयंसेवकांच्या घराचे जुने सदस्य जे थोडे कर्मठ होते ते त्यांच्या मानसिकतेनुसार असले प्रश्न विचारायचे. मात्र काही काळानंतर ती पिढी इन जनरल च संपल्यानंतर असे अनुभव दिसत नाहीत. यात संघाच्या हिंदू संघटन आणि संवर्धन या विचाराचा मोठा सहभाग असावा असं वाटतंय.

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 19:36
संघाच्याच एका कार्यक्रमात जेवनावळ घातली गेली,त्या जेवनावळीत दलीतांसाठी वेगळी पंगत होती.दस्तुरखुद्द उमा भारती यांना त्या चर्मकार समाजाच्या आहेत म्हणुन दलितांच्या पंगतीत बसवण्यात आले ,हे एका इंटर्व्युमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकले आहे.इतक्या मोठ्या नेत्याला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सापत्न वागणुक मिळत असेल तर मला आलेल्या अनुभवावर बोट ठेऊन मला खोटं पाडणार्यांची किव करावीशीही वाटत नाही.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

हकु गुरुवार, 05/12/2016 - 20:40
मुल्हेरकर साहेब, तुम्ही म्हणताय तसा काही कार्यक्रम जरी झालेला असला तरी तो संघाचा असेल असं मला अजिबात वाटत नाही. असो. आपण माझ्या वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. मला सांगा आपण संघावर जातीयतेचा आरोप करत आहात, तर मग आपण ज्या फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या सर्वसमावेशक संस्था संघटनेचे समर्थन करता त्यातलं कोणीच जातीयवाद पाळत नाहीत का?

In reply to by हकु

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 20:49
त्यातलं कोणीच जातियवाद पाळत नाही,हे मी अनुभवाने सांगत आहे.मी गेली विस वर्ष परिवर्तनवादी संघटनेत आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 23:36
आणि अजूनही ब्राम्हण-ब्राम्हणेतर भेद पाळता? वीस वर्षे वाया गेली हो!

In reply to by विकास

नाखु Fri, 05/13/2016 - 08:38
टंकनचुकी दुरुस्त करून घ्या त्यांची वीस वर्षे ऐवजी

विर्से

असे वाचा आणि पुढच्या हेरकथेला हात घाला. तुम्हाला इथ गुंतवून ठेऊन आम्हाला मालिकेच्या भागास विलंब करण्याचा अंतस्थ हेतु आम्हा वाचकांनीच ओळखला पाहिजे हा जनमताचा रेटा आहे असे समजलयास आमची त्या समजण्यास हरकत नाही असा आम्ही निर्वाळा देतो. वरील ठळक शब्द आणि काल मनोबाशी झालेली भेट हे निव्वळ योगायोग आहे (शब्द श्रेय मनोबा)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/12/2016 - 20:56
संघाच्याच एका कार्यक्रमात जेवनावळ घातली गेली,त्या जेवनावळीत दलीतांसाठी वेगळी पंगत होती.दस्तुरखुद्द उमा भारती यांना त्या चर्मकार समाजाच्या आहेत म्हणुन दलितांच्या पंगतीत बसवण्यात आले ,हे एका इंटर्व्युमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकले आहे.इतक्या मोठ्या नेत्याला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सापत्न वागणुक मिळत असेल तर मला आलेल्या अनुभवावर बोट ठेऊन मला खोटं पाडणार्यांची किव करावीशीही वाटत नाही.
उमा भारती लोध या जातीच्या आहेत. लोध म्हणजे चर्मकार नाहीत. वरील प्रतिसाद वाचून एका महान सदस्याने लिहिलेला "गोंदवल्याला जेवायला बसताना पुरूषांना उघडे बसायला सांगतात कारण त्यांना कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे बघायचे असते. नंतर तिथे आंदोलन करून हा प्रकार बंद पाडण्यात आला." या धडधडीत खोट्या व जातीयवादी प्रतिसादाची आठवण झाली. या प्रतिसादातून सदस्याचाही अंदाज आला. आजवर 'नाना'रूपे घेऊन वावरलेल्या या सदस्याला स्वतःला लपविणे अशक्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पक्षी Fri, 05/13/2016 - 10:57
या प्रतिसादातून सदस्याचाही अंदाज आला. आजवर 'नाना'रूपे घेऊन वावरलेल्या या सदस्याला स्वतःला लपविणे अशक्य आहे.
तर... श्रीगुरुजी, जसे हॉलीवूडपटात घोस्टहंटर, विचहंटर किंवा भेडियाला शोधून मारणारे असतात (पहा: van helsing )... अगदी तसेच, आपण मिपावरचे नानाहंटर आहात. मिपावरील नाना प्रकारचे नाना शोधून त्यांचा उचात्तन करणे हाच आपल्या अवतार कार्याचा उद्देश आहे, असे समजतो... आणि समस्त मिपा वासियांना विंनती करतो कि, श्रीगुरुजी यांना नानाहंटर उपाधी देवून सन्मानित करण्यात यावे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महालास्ट...

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 21:34
चंद्र्निल साहेब आपलं चक्क खोटे बोलत आहत. अपन कधीच संघाच्या पंगतीत जेवायला बसले नसल. बाकी उमा भारती लोध राजपूत आहेत. केंव्हा ही देशात कुठे ही संघाच्या पंगतीत जेवायला बसा. सत्य आपसूक उमगेल.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बेकार तरुण Fri, 05/13/2016 - 07:37
तुमची काहीही मते असोत संघाबद्दल, आदरच आहे त्याचा. पण तुम्ही हे जे सांगत आहात ते १०००००००% खोट आणि फक्त खोटच आहे. जर उमा भारती तसे म्हणल्या असतील तर आजच्या मीडिया युगात ते नक्कीच खोदुन काढता येईल. आपण जरूर लिंक द्यावी, मी (तुम्ही खोटे बोलत आहात हे) माझे मत बदलेन. तुम्हाला संघ आवडत नाही, त्याला नावे ठेवाविशी वाटतात, मान्य. तुमचे काही कडवट अनुभवहि असु शकतील त्यामुळे तुमचं मत तसं बनले असावे. पण हे तर तुम्ही पहिले मत बनवुन कडवट अनुभव शोधत (रचत) आहात !!! अगदीच दयनीय धडपड आहे ही !! तुम्ही टीका करा, नावे जरुर ठेवा. पण जेव्हा खोट्या कुबड्यांचा आसरा लागतो तेव्हा ही धडपड फारच हास्यास्पद वाटते बे.त. तळटीप - मी स्वतः संघाशी कुठल्याहि प्रकारे संलग्न नाही, मला संघाचे फार प्रेमहि नाही. पण म्हणुन मी संघ किंवा संघी लोकांचा (गोष्टी रचुन) द्वेश करत (आणि पसरवतहि) नाही

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी Fri, 05/13/2016 - 15:36
तुमची काहीही मते असोत संघाबद्दल, आदरच आहे त्याचा. पण तुम्ही हे जे सांगत आहात ते १०००००००% खोट आणि फक्त खोटच आहे. जर उमा भारती तसे म्हणल्या असतील तर आजच्या मीडिया युगात ते नक्कीच खोदुन काढता येईल. आपण जरूर लिंक द्यावी, मी (तुम्ही खोटे बोलत आहात हे) माझे मत बदलेन.
अहो खोटंच आहे ते. हे चंद्रनील मुल्हेरकर म्हणजे पूर्वाश्रमीचे ग्रेटथिन्कर, ग्रेटथिंकर, टॉपगिअर्ड फिलोसोफर, सचीन, माईसाहेब फुसकुलीकर, नानासाहेब नेफळे, काकासाहेब केंजळे .... अशा अनेक डु आयड्यांचे धनी आहेत. ते ब्रिगेडी विचारांचे असून सुरवातीपासूनच ब्राह्मणद्वेषी व संघद्वेषी आहेत. संघ व ब्राह्मणांवर धडधडीत खोटे आरोप करणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यापूर्वी अनेकवेळा त्यांनी ब्राह्मण व संघावर खोटे आरोप केले आहेत (अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे एका धाग्यात त्यांनी गोंदवले या देवस्थानाबद्दल गरळ ओकली होती). सध्या ते चंद्रनील मुल्हेरकर व पिंपळगावचा पिराजी हे दोन आयडी घेऊन मिपावर वावरतात. माईसाहेब या आयडीने ते स्त्रीरूपातही वावरतात. त्यांचे अनेक निद्रिस्त आयडी असतात. जसे अतिरेक्यांचे स्लीपर सेल्स असतात तसेच यांनी अनेक निद्रिस्त आयडी निर्माण करून ठेवले आहेत. एक आयडी डिलीट झाला की यांचा एखादा निद्रिस्त आयडी जागा होतो.

मारवा गुरुवार, 05/12/2016 - 19:59
१-मुस्लिम २-ख्रिश्चन ३-कम्युनिस्ट्स गोळवलकर गुरुजी इतक्या स्पष्टतेने हे तीन धोके कसे आहेत ते सांगतात त्यावर उपाययोजना सुचवितात. तरीही संघ कम्युनल नाही हे ठामपणे संघ समर्थक म्हणतात तेव्हा त्यांनी बंच ऑफ थॉट्स वाचलेले नसते की वाचुन न वाचल्यासारखे ते करतात ?

In reply to by मारवा

वैभव जाधव गुरुवार, 05/12/2016 - 20:08
संघ कम्युनल असण्याचा किंवा नसण्याचा वरच्या लेखाशी काय संबंध येतो हे समजले नाही. बाकी लेख संस्कारांबाबत आहे. संघ शब्द काढून एखादा उन्हाळी संस्कार वर्ग, शिबीर चालू शकलं असतं असं यांचं मत -माई

In reply to by मारवा

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 20:14
पण कम्युनिस्ट हे देशाला धोका आहेत याच्याशी हजार टक्के सहमत. आणि गोळवलकर गुरुजींनंतर बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आपलं स्वतःचं लहानपणी जे मत असतं त्याबद्दल आता विचारलं तर चालेल का?

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 20:07
एक, संघाच्या विचारसरणीला तात्विक विरोध करणारे, आणि दोन, संघ ही संकल्पनाही सहन न होणारे. पहिल्या प्रकारच्या लोकांशी बातचीत शक्य आहे. त्यांचं 'संघ जातीयवादी, धर्मवादी असल्यामुळे संघाला विरोध' असं मत असतं आणि ते असण्याचा त्यांना अधिकार आहे. संघातल्या काही लोकांचा या लोकांना जातीयवादी आणि उद्वेगजनक अनुभव आलेला असू शकतो. मी त्यांना सांगू इच्छितो की संघ एक संघटना म्हणून अजिबात जातीयवादी नाही. एका पोलिस हवालदाराने तुमच्याकडून पैसे खाल्ले म्हणून संपूर्ण पोलिसखातं भ्रष्ट आहे हे म्हणणं जितकं सरसकट आहे, तितकंच हेही आहे. अशा लोकांचा जातीयवाद हा इतका त्यांच्या मनात भिनलेला आहे की संघही तो काढून टाकू शकलेला नाही असं म्हणू शकतो. आणि तसे लोक प्रत्येक पक्षात असतात. संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे पण राष्ट्रवादीला जातीयवादी म्हटलेलं पाहिलेलं नाही कुठेही. मग संघाला वेगळ्या फूटपट्ट्या का लावल्या जातात? असो. संघ आपल्या कामाचं glorification करतो असं काहींचं म्हणणं आहे. त्यात वाईट काय आहे? सर्व संघटना आपल्या कामाची प्रसिद्धी करतातच. त्यामध्ये वाईट काय आहे? जर तुमचा सामाजिक संघटनांनी in general स्वतःच्या कामाची प्रसिद्धी करण्याला विरोध असेल तर हेही समजू शकतो, पण जेव्हा हा विरोध फक्त संघाला दाखवला जातो तेव्हा तो पक्षपात आहे. उदाहरणार्थ वरती मुल्हेरकरांच्या प्रतिसादात संघटनेचा दाखवायचा हेतू एक आणि अंत:स्थ हेतू वेगळा असं म्हटलेलं आहे. हे जगातल्या प्रत्येक संघटनेला लागू पडतं. कुटुंब, कंपन्या, राजकीय पक्ष, अगदी मिसळपाव.काॅम सुद्धा. मग फक्त संघाला का बोलावं? पहिल्या प्रकारच्या लोकांशी बातचीत शक्य असते त्याचं अजून एक कारण म्हणजे ते असे मुद्दे मान्य करतात/करु शकतात आणि त्यावर चर्चा करतात आणि पराकोटीचे राजकीय मतभेद असले तरी त्याचा परिणाम इतर relations वर होऊ देत नाहीत. दुस-या प्रकारच्या लोकांशी चर्चा संभवतच नाही. त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही.

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 20:29
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा उघड मुस्लिमविरोधी आहे हे नागडं सत्य आहे.त्यामुळे या संघटनेला " राष्ट्रीय" म्हणावं का ईथपासुनच सुरवात आहे.मुस्लिम ,ख्रिश्चन ,बौद्ध व दलित हिंदू यांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतून वगळणे ज्यांना मान्य आहे अश्या संघाला जनाधार का लाभला नाही हे उघड गुपीत आहे. हिंदूतल्या मागास जातींना मंडल आयोगातून आरक्षण मिळाले व काही प्रमाणात का होईना ते निर्णय प्रक्रीयेत आले .हे मागास हिंदू आंबेडकर फुल्यांच्या समतावादाच्या भुमिकेशी प्रामाणिक आहेत त्यामुळे ते " हिंदुत्वाकडे " कधीच वळणार नाहीत हे संघाला ठाउक आहे या ईतर मागस समाजाचे आरक्षण काढून त्यांना परत गुलामगीरीत ढकलणे घटनात्मदृष्ट्या अशक्य आहे .मग संघाने यांच्या आरक्षणातच घुसघोरी करण्याचा डाव आखला आहे .महाराष्ट्रात मराठा समाजाचे ओबिसीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे तो याचसाठी संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही.उत्तरेतही पटेल, जाट ,गुजर या उच्चवर्णीय जातींना ओबिसीत ढकलण्याचे प्रयत्न संघाकडून चालू आहेत.यातून त्यांना आंबेडकरवाद संपवायचा आहे व परत उच्च हिंदू जातीची संघाला अपेक्षीत " हिंदुत्वाची " पुनर्मांडणी करायची आहे.या पुनर्मांडणीत मुस्लिम,ख्रिश्चन,हिंदू दलित यांना कोणतेच स्थान नसेल हे उघड आहे.

In reply to by बोका-ए-आझम

चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 21:07
जनाधार नाही तो व्यापक अर्थाने ,म्हणजे दलित हिंदू ,इतर मागस हिंदू यांच्यात.बाकी आपल्याला अपेक्षीत समाजरचनेची निर्मिती करण्यासाठी साम दाम दंड भेद वापरण्याएवढे उपद्रवमुल्य संघात आहे हे निश्चीत. महाराष्ट्रात आज भाजपची सत्ता असतानाही संभाजि ब्रिगेडवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही,उलट देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा ओबिसी मध्ये समावेश करणार यावर ठाम आहेत पण मुस्लिमांना आरक्षण देणार नाही असे सांगतात.यातून यांचा अश्या संघटनांशी असलेला नेक्सस कळुन येतो.मराठा आरक्षण ,जाट आरक्षण हे विषय संघाच्या डोक्यातून आलेले आहेत.या उपद्रवी लोकांना संघाची फुस आहे. संघाचा मोटो एकच आहे, दलित ,मागासवर्गीय,मुस्लिम यांना निर्णय प्रक्रीयेतून बाद करणे.त्यांचे खच्चीकरण करुण पुन्हा उच्चजातवर्गाची सत्ता स्थापण करणे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 21:38
१. भाजपची सत्ता असतानाही संभाजी ब्रिगेडवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.>>> काय केलंय ब्रिगेडने कारवाई करण्यासारखं? २.देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा आरक्षणात समावेश करणार यावर ठाम आहेत. पण मुस्लिमांना नाही >>> कारण आपल्या राज्यघटनेत धर्माधारित आरक्षणाची तरतूद नाही. अखंड आंध्रप्रदेशात हा प्रयत्न झाला होता. तिथल्या हायकोर्टाने तो रद्दबादल केला. अगदी याच कारणावरून. ३.मराठा आणि जाट आरक्षण हे विषय संघाच्याच डोक्यातून आलेले आहेत >>> मराठा आरक्षणाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री नारायण राणे या तिघांनी पाठिंबा दिला होता. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी हा ठराव घाईघाईने विधानसभेत पास करून घेतला होता. हे तिघं संघाचे कार्यकर्ते आहेत हे माहित नव्हतं. हरियाणामध्ये जाटांनी आरक्षण हवं म्हणून आंदोलन केलं तेव्हा मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारविरुद्ध आंदोलन केलं. त्यात झालेल्या नुकसानीत माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि त्यांचे पुत्र दीपिंदर हुडा यांच्या मालमत्तेला काहीही झालं नाही. हुडा काँग्रेसचे आणि जाट. कट्टर भाजपचे आणि बिगरजाट. शिवाय संघकार्यकर्ते. या लोकांना संघाची फुस आहे >>> कशी काय? पुरावे आहेत का? उद्या तुम्ही त्यांना काँग्रेसची फूस आहे असं म्हणालात तरी पुरावे द्यावेच लागतील. दलित, मागासवर्गीय, मुस्लिम यांना निर्णयप्रक्रियेतून बाहेर काढणं हा संघाचा हेतू आहे >>> म्हणूनच त्यांनी घांची या अत्यंत उच्चवर्णीय जातीत जन्माला आलेल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद आणि वंजारी या तितक्याच उच्चवर्णीय जातीत जन्मलेल्या गोपीनाथ मुंड्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद दिलं. यापेक्षा मोठं खच्चीकरण असूच शकत नाही. बरोबर. माझे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बोका-ए-आझम

अद्द्या Fri, 05/13/2016 - 11:58
बोकोबा असं पुरावे मागत राहिला तर बिचाऱ्या ब्रीगेडींनी जायचं कुठे ? यांचा धंदा फक्त ३ रुपयाची पिवळी पुस्तके वाटणे/ वाचणे . कुठलाही आधार आणि सोयर सुतक नसलेले आरोप करणे/ सातत्याने करत राहणे. ज्या लोकांचा आदार वाटावा अश्या लोकांची नावे घेऊन हे लोक बरळत असतात, त्यांची शिकवण कण भर हि यांच्या डोक्यात गेलेली नसते. असती तर असले पांचट आरोप करत बसले नसते. बरं, यांचा मुद्दा पुरावे देऊन खोडून काढला कि वैयक्तिक होऊन तिथेही आपली घाणेरडी वैचारिक पातळी दाखवून द्यायची संधी सोडत नाहीत हे लोक. आजकाल या लोकांचा राग यायच्या जागी किळस वाटते.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

काळा पहाड गुरुवार, 05/12/2016 - 23:03
संघाचं कै है कै माहिती नाही, पण मी उघडपणे जातीयवादी आहे. आणि हो, मुसलमानांना पण हाकलून द्यावं अशा मताचा मी आहे. लईच टिवटिव लावल्ये. काय उपडणार आहेस काय बे?

In reply to by बोका-ए-आझम

अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 22:04
सध्या भारतात बीजेपीचे सरकार आहे हे त्यांना बहुधा ठाऊक नाही. किंवा जनाधार म्हणजेच निवडणूक हे माहीत नसावे.

In reply to by अप्पा जोगळेकर

सतिश गावडे गुरुवार, 05/12/2016 - 22:53
तुमचे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत.
सध्या भारतात बीजेपीचे सरकार आहे हे त्यांना बहुधा ठाऊक नाही.
त्यांचा मुद्दा "संघाला जनाधार का नाही" हा आहे. बीजेपीच्या जनाधाराचा मुद्दा नाही.
किंवा जनाधार म्हणजेच निवडणूक हे माहीत नसावे.
निवडणूक म्हणजे जनाधार नव्हे. ती जनाधार आजमावण्याची पद्धत आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

श्रीगुरुजी गुरुवार, 05/12/2016 - 20:58
या ईतर मागस समाजाचे आरक्षण काढून त्यांना परत गुलामगीरीत ढकलणे घटनात्मदृष्ट्या अशक्य आहे .मग संघाने यांच्या आरक्षणातच घुसघोरी करण्याचा डाव आखला आहे .महाराष्ट्रात मराठा समाजाचे ओबिसीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे तो याचसाठी संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही.उत्तरेतही पटेल, जाट ,गुजर या उच्चवर्णीय जातींना ओबिसीत ढकलण्याचे प्रयत्न संघाकडून चालू आहेत.यातून त्यांना आंबेडकरवाद संपवायचा आहे व परत उच्च हिंदू जातीची संघाला अपेक्षीत " हिंदुत्वाची " पुनर्मांडणी करायची आहे.या पुनर्मांडणीत मुस्लिम,ख्रिश्चन,हिंदू दलित यांना कोणतेच स्थान नसेल हे उघड आहे.
आता तर खात्रीच झाली.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 21:38
संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही
आँsss !!!!!

In reply to by आनन्दा

नाखु Fri, 05/13/2016 - 09:09
सर्व चर्चा आणि पाककृती संघ घडवून आणतो.. दैनीक डॉन पाकिस्तान. देशात घडणार्या प्रत्येक नैसर्गीक आपत्तीमध्ये संघाचा हात असतो. दैनिक चंद्रनील टाइम्स. संघाला दुसर्या संघटनेचे काम पाहवत नाही म्हणून ते आपत्तीकार्यात झोकून काम करतात आणि शिस्त्बद्द शिबिर भरवितात त्यामुळे इतरांनाही विधायक काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि म्हणून्च संघाला सरसकट वाईट ठरविलेच पाहिजे.त्या करिता शोधून शोधून वैयक्तीक खुस्पटे आम्हाला कळवावित. बुधला गोडेतेल्वाला संकलक नाखु

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

अर्धवटराव Fri, 05/13/2016 - 00:30
या सगळ्यात काहि तथ्य नाहि. संभाजी ब्रीगेडला बारामतीमधुन रसद मिळते. दलित आणि ओबीसी शक्तीची जाण संघाएव्हढी कोणाला नसेल. पुढील काहि वर्षात फुले-आंबेडकर भिंतीवरील फोटोंमधुन आशिर्वाद देतील व या समाजाचं संघीकरण झालेलं असेल. येत्या ५ दशकात जगाचं अर्थकारण इतकं बदलेलं असेल कि सद्यःस्थितीतील आरक्षण वगैरे मुद्दे अगदी निकामी झाले असतील. हे बदल समजुन घेणारी व त्यानुसार आराखडे बनवणार्‍यात संघ नक्कीच असेल. मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट हि समस्या एका वेगळ्या रुपात जगाला वेठीस धरेल, इन्क्लुडींग मुस्लीम अ‍ॅण्ड ख्रिश्चन जनता. तो निराळा विषय आहे.

मी-सौरभ गुरुवार, 05/12/2016 - 21:28
मिपाधोरणात हा धागा बसतोय हे बघुन आश्चर्य वाटल्या गेले आहे. शतका बद्दल शुभेच्छा!!

In reply to by सतिश गावडे

बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 23:17
भीमसेनजींच्या एका अभंगात (तुका आकाशाएवढा) अशी ओळ आहे हे आठवलं - सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी.

In reply to by बोका-ए-आझम

सतिश गावडे गुरुवार, 05/12/2016 - 23:34
मी ते गंमतीत लिहिलं होतं. तो पूर्ण अभंगः अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ गिळूनी सांडिलें कळिवर । भवभयाचा आहार ॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥ तुका म्हणें आता । उरलो उपकारा पुरता ॥ त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टींचा समुह. अभंगात ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय हे त्रिकुट अभिप्रेत आहे. जाणून घेणारा (साधक), ज्याच्या मदतीने जाणून घ्यायचे ते ज्ञान (आत्मज्ञान), ज्याच्याबद्दल जाणून घ्यायचे ते (परमतत्व) हे तीन्ही एकरुप होण्याची अवस्था म्हणजे त्रिपुटीचा लय. रच्याकने, मला काही "अनुभव" नाही याचा. ही पुस्तकी माहिती आहे. :)

कविता१९७८ गुरुवार, 05/12/2016 - 22:03
मी ब्राह्मण नाही पण सतत ब्राह्मणाना दुषणे देणे हाही मला एक जातीयवादच वाटतो. चान्गले-वाईट हे माणसाचे विचार असतात आणि अशी माणसे एखादि विशिष्ट जात किन्वा धर्म सोडाच जगभरात कुठेही गेलो तरी आढळतीलच. चान्गले सन्स्कार सन्घाबाहेरही मिळतीलच पण धागाकर्त्याच्या मुलाला सन्घाने शिकवले आणि त्याबाबत धागार्त्याने ईथे उल्लेख केला ईतकेच. त्यासाठी सन्घाची उणीदूणी काढण्याची खरच काही गरज नाहीये

शलभ Fri, 05/13/2016 - 01:28
मला वाटलेलं असंबद्ध बडबड करण्यात मोगाबाईचा हात कोणी धरणार नाही. पण चंमु तर एकदम भारी निघाला. ;) रच्याकाने गुरुजी एकदा माझ्या वडिलांच्या वसतीगृहात आलेले, दिवसभर थांबले, त्यांच्याबरोबर पंगतीत जेवले. आणि ते वसतीगृह तथाकथित दलित आणि मागासवर्गीय मुलांचं होतं.

In reply to by शलभ

धनावडे Fri, 05/13/2016 - 06:15
माझाही एक डोंबारी समाजातला मित्र विद्यार्थीदशेत असताना संघाच काम करयचा आणि त्याला तेव्हाही आणि आता ही संघाचा अभिमान आहे