"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!
एक चिमुरडी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली!
"बाबा खाली वाका"
म्हातारा थबकला!
"बरं बाई या जगण्याच्या ओझ्याने वाकलोय, आता तुझ्यासाठी वाकतो!"
आणि तिने त्याच्या चिंधि बांधलेल्या कपाळावर आपले ओठ टेकवले!
म्हातारा अवाक झाला!
त्याच्या ओठावर हसू फुलले!
आणि त्याच क्षणी तो समाधानी होऊन खाली कोसळला!
आकाशवाणी झाली,
'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12148
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मांडली आहे !
प्रेरणास्थान:
दुखः अश्वथामा्याचे संपले?
किती दिवस फिरणार बिचारा!
In reply to दुखः अश्वथामा्याचे संपले? by नीळा
अरे वा
thanks!
In reply to अरे वा by स्पा
सुंदर मांडणी व कल्पना डेडपूल.
मस्त!
वाचकांना एक विनंती आहे!
वाह..
थँक्स राघव!
In reply to वाह.. by राघव
चांगली आहे
:)
थँक्स मंडळी!
मस्त रे ...
'अश्वत्थाम्या- नागपूरचा होता का आकाशवाणीवाला :)भैया होता! ;)
In reply to मस्त रे ... by ब़जरबट्टू
बढीया है
+१००
In reply to बढीया है by महासंग्राम
मॉडर्न आर्ट
+१
In reply to मॉडर्न आर्ट by आकाश कंदील
एक नंबर !!!
आवडली!
छान आहे आवडली!!
याच सीरिज़मधील दूसरी कथा
वेगळी कथा. आवडली.
मस्त!
मस्त..
+१००
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
धँस पैजारबुवा!
छान...
मस्त
वेगळी कथा
आवडली कथा.