सोलापूरचे कुणी आहे का?
नमस्कार,
कालच "मिळून सार्याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला.
त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला.
ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे.
आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले.
मी आणि आमची सौ. ५ ता.ला रात्री सोलापूरला पोहोचू.
६ ता.ला पूर्ण दिवस आम्ही अंकोल्याला सौर शेती बघायला जावू.ज्या मिपाकरांना आमच्या बरोबर ही सौर शेती बघण्यात रस असेल त्यांनी जरूर यावे.श्री.अरूण देशपांडे ह्यांनी पण असेच सुचवले आहे.
६ ला रात्री एखादा कट्टा सोलापूरकरांबरोबर करायला नक्कीच आवडेल.
कळावे,
लोभ आहेच, तो कट्ट्याच्या निमित्ताने अजून वाढेल, ह्यात शंका नाही.
वाचने
7746
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
चिपळूण क्यान्सल का, मुवि ?
In reply to चिपळूण क्यान्सल का, मुवि ? by सस्नेह
चिपळून कॅन्सल नाही....
In reply to चिपळून कॅन्सल नाही.... by मुक्त विहारि
मुवि, मला पण देशपांडे यांच्या
In reply to मुवि, मला पण देशपांडे यांच्या by पिंगू
शक्य असेल तेवढी माहिती गोळा करा आणि सांगा.
In reply to शक्य असेल तेवढी माहिती गोळा करा आणि सांगा. by मुक्त विहारि
हा सौर शेती प्रकल्प फारच
हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन.नक्की आठवणीने लिहा. जेवढे वाचले आहे त्यावरून अधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली आहे.In reply to मुवि, मला पण देशपांडे यांच्या by पिंगू
+१
मुवि राव, वीकांत तरी ठरवा की
In reply to मुवि राव, वीकांत तरी ठरवा की by मोदक
ते..
अभ्या जब्या डब्या
मी सोलापूर पासून ५० km लांब rahato
In reply to मी सोलापूर पासून ५० km लांब rahato by अजय देशपांडे
काय सांगताय.
In reply to काय सांगताय. by प्रचेतस
या
In reply to मी सोलापूर पासून ५० km लांब rahato by अजय देशपांडे
सोलापूर ते अंकोली असा बसप्रवास करणार आहे.
अभ्या डब्या... आहे सोलापुरात.
शनिवारी असतं तर आलो असतो
मस्त
मुविशेठ....अहो नंदी प्यालेसचं काय??
मुविकाका सोलापुरात तुमचा
In reply to मुविकाका सोलापुरात तुमचा by अभ्या..
उल्हासनगर ला काय काम रे अभ्या
In reply to उल्हासनगर ला काय काम रे अभ्या by वैभव जाधव
युएसए म्हणलो नाहीये कडू. युएस
In reply to युएसए म्हणलो नाहीये कडू. युएस by अभ्या..
आम्ही अलीकडे हावो,यु एस लै
In reply to युएसए म्हणलो नाहीये कडू. युएस by अभ्या..
हे युएस सोलाप्रात
In reply to हे युएस सोलाप्रात by चांदणे संदीप
सॅन्डीबाबा नकाशा काढून बग.
In reply to सॅन्डीबाबा नकाशा काढून बग. by अभ्या..
ह्म्म्म
In reply to युएसए म्हणलो नाहीये कडू. युएस by अभ्या..
कडू !
In reply to कडू ! by चौथा कोनाडा
कडूलिंब मधला कडू. आम्हाला
In reply to कडू ! by चौथा कोनाडा
हेच्च म्हणतो. असलं कायतरी
सोलारपूरबद्दल श्री.अनिल अवचट
In reply to सोलारपूरबद्दल श्री.अनिल अवचट by नूतन सावंत
ताय, लै दीसान दीसला?
मुवींना शुभेच्छा
स्टार माझावरून
fसोलापूर : महाराष्ट्र आहे की माफिया राज्य? असा प्रश्न राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा पोलिस बंदोबस्तात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी भूमीमुक्ती आंदोलन सुरु केलं होत. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. माफियांच्या दहशतिमुळे शेतकरी आपल्याच शिवारात पोलिस बंदोबस्तात राहतो हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आपल्याच शेतात वावरताना पोलीस बंदोबस्तात राहण्याची अनिवार्यता अरुण देशपांडे यांच्यावर आली आहे. अरुण देशपांडे गेली 25 वर्षे अंकोली गावात वास्तव्याला आहे. इथं राहून ते कृषी आणि जलसाक्षरतेच काम करत आहेत. वॉटर बँकेचा अभिनव उपक्रम अरुण देशपांडेंनी राबवला आणि त्याचा देशभर प्रचार केला. त्यांचा अंकोलीतला विज्ञानग्राम प्रकल्प पाहायला देशभरातून लोक येतात. त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आंदोलनात पुढाकार घेतला. माफियांच्या दहशतीमुळे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ काढण्यासाठी 25 वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यातील 350 एकर जमीन एका ट्रस्टने घेतली. 1980 च्या सुमारास श्रीनिधी ट्रस्टने अंकोली, शेजबाभळगाव आणि कुरुल या गावच्या हद्दीतील सुमारे साडेतीनशे एकर जमीन नाममात्र किंमतीने विकत घेतली. आजही इथे विद्यापीठाचा एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. उलट प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून बडे बिल्डर, शासकीय अधिकारी आणि गावगुंडांनी या जमिनी बळकावल्याच उघड झालं आहे. शिवाय सध्याचा भूमी अधिग्रहण कायदा भूमाफियांच्या मदतीला आला आहे. नारायण पवार हे गावातले जेष्ठ नागरिक आहेत. विद्यापीठासाठी जमीन देण्याच्या प्रक्रियेत त्याकाळी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. लोक जमिनी द्यायला तयार नव्हते. पवार यांनी पहिल्यांदा स्वतःची जमीन श्रीनिधी ट्रस्टला दिली. यामुळे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या जमिनी दिल्या. कारण विद्यापीठ झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी, गावाला पाणी आणि मुलभूत सुविधा पुरवण्याच आश्वासन ट्रस्टने दिलं होतं. 25 वर्षांचा काळ निघून गेला, विद्यापीठ तर उभारलं नाहीच. उलट या जमिनी आता विकण्यात आल्या आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून भूमाफियांनी या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. एक हजार रुपये प्रती एकराने घेतलेली जमीन 40 लाखाला विकली जातेय. यामुळेच गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा सुरु केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा लढा सुरु आहे. या जमिनी विकत घेण्यात आघाडीवर आहेत कोकण विभागाचे महसूल उपायुक्त भा. च. पाटील. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केलाय. गेल्या वर्षी त्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्यावर अंकोलीची जमीन त्यांनी पत्नीच्या नावे घेतल्याच उघड झालं होत. आता शेतकऱ्यांनी आपल आंदोलन तीव्र केल्यावर भूमाफियांनी दहशत माजवली आहे. यामुळेच आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची वेळ येते हेच महाराष्ट्राला शोभणारं नाही.श्री.अरूण देशपांडे ह्यांच्या सौर शेतीला भेट दिली.
काय राव मुवी तुम्ही पन,