मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

प्रचेतस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a

वाचने 23130 वाचनखूण प्रतिक्रिया 104

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/04/2016 - 09:33
मालोजीराव अभिनंदन. बातमी सांगितल्याबद्दल वल्लीसेठ आभार. -दिलीप बिरुटे

नीलमोहर 30/04/2016 - 09:50
हे फारच मोठे काम केले आहे, मालोजीराव यांचे अभिनंदन आणि आभार !!

नाखु 30/04/2016 - 10:21
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे.. तुम्ही धर्माचे (शिवबावरील अनन्य्साधारख प्रेम भक्ती) भक्कम पालन करता आहात , अभिनंदन आणि तुमच्या व्यासंगाला/पाठपुराव्याला कुर्नीसात. नाखु मावळा

In reply to by नाखु

अन्या दातार 30/04/2016 - 10:45
नाखु मावळ्याशी सहमत अन्या शिपाई

ज्ञानोबाचे पैजार 30/04/2016 - 10:34
अरे मस्तच बातमी आहे ही मालोजी रावांचे दणकून अभिनंदन आणि वल्लींचे आभार. पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा 30/04/2016 - 11:06
@
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
http://www.sherv.net/cm/emo/happy/cheering-clapping-smiley-emoticon.gif कचकून अभिनंदन! http://www.sherv.net/cm/emoticons/new-year/confetti-smiley-emoticon.gif आणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif

डॉ सुहास म्हात्रे 30/04/2016 - 11:07
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही मोलाची कामगिरी बजावली आहात !! उद्याच्या महाराष्ट्रदिनानिमित्त ही तुम्ही महाराष्ट्राला दिलेली प्रसंगोचित भेटच समजायला हवी !!!

In reply to by खेडूत

माहितगार 30/04/2016 - 11:33
+१

बाबा योगीराज 30/04/2016 - 11:31
मालोजीराव, ____/\____ आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला. वल्लीशेठ धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

बाबा योगीराज 30/04/2016 - 12:48
खरे सरां सारखे व्यक्ती सोबतीला, आन मालोजी राव किस्सा सांगायला समोर बसलेले. बाब्बो, कल्पना करूनच आमचं इमाईन ढगात पोचलय.

In reply to by बाबा योगीराज

वैभव जाधव 30/04/2016 - 14:09
खरे सरांबरोबरच आम्ही आमच्या सगळ्या आयडींकडून पार्टीसाठी हातभार लावू. खाण्यास व आर्थिक देखील. मालोजीराव हार्दिक आभार. आमच्या राजांचे दर्शन घडवल्याबद्दल. अभिनंदन तर आहेच.

सुबोध खरे 30/04/2016 - 12:26
नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.

वैदेही बेलवलकर 30/04/2016 - 13:14
अभिनंदन मालोजीराव! अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.

भीडस्त 30/04/2016 - 14:55
राजे तन मन धन सारंच झोकून देऊन काम केलेलं दिसतंय. कुर्निसात __/\__

चांदणे संदीप 30/04/2016 - 17:09
आज एक मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! ही बातमी मित्र - नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवताना जो आनंद होईल तो काय सांगावा! जय शिवराय! Sandy

किलमाऊस्की 30/04/2016 - 19:02
अभिनंदन. खूपच छान काम. याविषयी सविस्तर वाचायला आवडेल.

अजया 30/04/2016 - 19:54
_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

माम्लेदारचा पन्खा 30/04/2016 - 21:18
मालोजीरावांनी नाव सार्थ केलं अगदी......मोहीम फत्ते केली.... बहोत खूब !

मी-सौरभ 01/05/2016 - 01:16
मालोजी मुजरा स्वीकारा

नावातकायआहे 01/05/2016 - 08:35
_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

इष्टुर फाकडा 01/05/2016 - 08:58
अगायो मालोजीराव जगदाळे तुम्हीच होय !!! दंडवत घ्या मालक. कुठेशी असता तेही सांगा, एखादी सिंगल माल्ट तुमच्या पायाशी घालावी या विचारात आहे.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 02/05/2016 - 10:27
अभिनंदन मालोजीराव आणि समस्त शिवप्रेमींकडुन धन्यवाद सविस्तर लेखाची वाट बघतोय.

चिगो 02/05/2016 - 17:04
अभिनंदन मलोजीरव.. लैच भारी कामगिरी केलीत..

जगप्रवासी 02/05/2016 - 17:16
बातमी वाचली होती पण हे आपले मिपाकर मालोजीराव आहेत हे माहित नव्हते, अभिनंदन. खूप छान काम केलात. शिवप्रेमी, जगप्रवासी

मदनबाण 02/05/2016 - 23:55
अभिनंदन ! या निमित्त्याने एक व्हिडियो इथे ध्यायचा मोह झाला आहे तो देतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/

टिवटिव 03/05/2016 - 19:59
मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.

नमकिन 04/05/2016 - 18:31
जिद्द, चिकाटी, निस्सीम भक्ती, प्रखर निष्ठा, प्रबळ आशावाद, काटेकोर नियोजन व स्वराज्याच्या प्रेरणात्मक व्यक्तिमत्वासाठी सैल सोडलेली थैली या जगात खरोखर तोड नाहीं हे तुम्हाी दाखवून दिलेत मालोजीराव, धन्यवाद कृतकृत्य केल्याबद्दल.

प्रमोद देर्देकर 04/05/2016 - 19:37
मालोजीरावांचे अभिनंदन नुकतीच आयबीन लोकमतने दखल घेतली आहे १.३२ मि. ची क्लिप आहे उद्या डकवतो.

मैत्र 04/05/2016 - 20:58
खरी शिवजयंती साजरी झाली तेव्हा ही बातमी चेपुवर वाचून..आणि इथला धागा पाहून.. डॉ. खरे यांच्या मताशी प्रचंड सहमतः नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.

सविता००१ 05/05/2016 - 10:23
आज सकाळी ८ वाजता झी २४ तास वर मी मालोजीरावांची मुलाखत पाहिली. खरंच सांगते, मिपा सदस्य असल्याचा एवढा अभिमान वाटला की बास. आपल्या घरातल्याच कुणीतरी हे भारी काम केलंय असंच वाटत होतं. प्रचंड अभिमान वाटला. ताबडतोब घरातल्यांसमोर जेवढा जमेल तेवढा भाव खाउन घेतलाच मी... :) मालोजीराव रॉक्स