मन
लेखनविषय:
काव्यरस
मन धावून धावून जातं
आणि बिलगतं -
पानाफुलांना,
वृक्षवेलींना, रानवाटांना,
डोंगरदऱ्यांना.
मन पंख उघडतं
आणि झेपावतं
त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात;
आणि तरंगत, उमलत राहतं
एखाद्या शुभ्र मेघासारखं.
मन चांदण्यात जाऊन बसतं
आणि अबोल रात्रीला पुसतं
तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं.
मन वहिवाट सोडतं
आणि निघतं त्या वाटेने
ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत,
दिशा आणि देशांचे फलक नाहीत;
जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !
वाचने
3563
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
काय सुंदर लिहिलेयस मित्रा.
In reply to काय सुंदर लिहिलेयस मित्रा. by विजय पुरोहित
मन पंख उघडतं
In reply to मन पंख उघडतं by विजय पुरोहित
(No subject)
In reply to (No subject) by विजय पुरोहित
या कवितेच्या शब्दांना सूट
In reply to या कवितेच्या शब्दांना सूट by विजय पुरोहित
छान आहे चित्र...
In reply to काय सुंदर लिहिलेयस मित्रा. by विजय पुरोहित
_/\_
अहाहाहाहाहा.
सुरेख...
कडक!!!
आवडली
भांडकुदळ, फाटेफोडू
कविता भावली
सुरेख.
सर्वांना धन्यवाद !!! _/\_
परत एकदा हे अतिशय सुंदर काव्य
In reply to परत एकदा हे अतिशय सुंदर काव्य by प्रभास
_/\_
(No subject)
In reply to (No subject) by प्रभास
थोडासा या वाटेवर चालण्याचा
In reply to थोडासा या वाटेवर चालण्याचा by प्रभास
चित्र दिसत नाहीये..
मस्त कविता आवडली.