Skip to main content

कवचकुंडले!

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 28/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!" अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना! सूर्यपुत्र परत आला होता! 'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!" "माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!" "बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!" "सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!" अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला. "तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ. सोड ब्रम्हास्त्र माझ्यावर!' अर्जुनाने मोठ्या कष्टाने ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने सोडले. "बंधु माफ कर मला!" अर्जुन उच्चारला! ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने झेपावले! क्षणार्धात आसमंत उजळून निघाले! ब्रम्हास्त्र भेदुन कर्ण डौलाने उभा होता. 'कसं शक्य आहे? मग युद्धात कर्ण कसा हरला?' कर्ण अर्जुनाकडे बघून निराशेने हसला! "नात्याची कवचकुंडले सर्वात अभेद्य असतात बाळा! ती जर आडवी आलीत तर कुठलाही बाण ती भेदु शकत नाहीत!"

वाचने 13335
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

In reply to by सूड

जाऊ द्या मग! जगातील सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत असं थोडच आहे? मात्र समजवून घ्यायच्या असतील तर वेळ मात्र हवा!

धन्यवाद मंडळी आपल्या प्रतिसादाबद्दल! आणि विजुभौ हम अपने मूड मे दुनिया गई भाड़ मे!

अर्जुनाने अंजलिका बाण वापरुन कर्णाला मारलं ना? ब्रह्मास्त्र कर्ण शिकला होता पण ऐन युद्धात विसरला. कथा चांगल्या आहेत तुमच्या पण तपशीलात चूक असेल तर रीलेट करता येत नाही. किंवा माझ्याच तपशीलांमध्ये चूक असू शकेल.

In reply to by स्रुजा

हो तोच बाण वापरला होता! पण जर ब्रम्हास्त्र वापरूनही कर्णाची कवचकुंडले भेदली गेली नाही, परंतु अर्जुन आपला भाऊ आहे हे माहीत असल्याने कर्णाच्या आक्रमणाला धार चढली नाही असे दाखवायचे आहे!

In reply to by DEADPOOL

भाऊ/तै, माझा प्रश्न सरळसोट होता. परत वाचा असं उद्धट उत्तर आल्यावर मी वे़ळ नाही म्हटलं. असो, भावना पोचल्या.

In reply to by DEADPOOL

bhau umajala nahi kahi! DEADPOOL - Tue, 29/12/2015 - 07:49 bhau umajala nahi kahi! प्रतिसाद द्या पुन्हा एकदा वाचा! जव्हेरगंज - Tue, 29/12/2015 - 18:39 पुन्हा एकदा वाचा! नक्कीच समजेल! प्रतिसाद द्या Bhau vachalaa!!!! DEADPOOL - Thu, 31/12/2015 - 10:48 Bhau vachala!! baryach vela vachala! data samajal! jabarat! सूडभौ यात जव्हेरभौनी माझा अपमान केल्याच मला कधीही वाटलं नाही!

In reply to by टवाळ कार्टा

सूडने विचारले तेव्हा का नाही दिले हे पश्टिकरण?
ब्लॅकपूल यांचा प्रतिसाद वाचून उगी पतिलअमित यांची आथवन जाली.. :D

In reply to by स्रुजा

काय स्रुजातै! हीच पदवी मिळाली का मला द्यायला! वाईट वाटतंय मला की तुम्ही मला त्या आयडीशी जोडलेत!

In reply to by विजय पुरोहित

ताई अहो मी कधीतरी कप्तान आणि डाॅ सुहास म्हात्रे यांच्याविषयी अनुदार उद्गार काढेन का? अहो हे माझे आवडते आयडी आहेत. का करेन मी असं? कप्तान सारख्या दिलदार माणसाला कधीतरी स्वप्नात तरी चुकिचं बोलेन का? कधीच नाही. डाॅ. सारख्या निष्पक्ष आयडीला कधीतरी चुकीचं बोलेन का? मुळीच नाही. राग मानू नका. तुम्ही विनोद केला असलात तरी मला ते मनाला लागलंय!

In reply to by विजय पुरोहित

तुम्ही विनोद केला असलात तरी मला ते मनाला लागलंय!
आई ग्ग... कळवळला अख्खा मिपा ! ताई कसं हो बोलवतं तुम्हाला असं काही.. ;)

In reply to by विजय पुरोहित

कप्तान सारख्या दिलदार माणसाला कधीतरी स्वप्नात तरी चुकिचं बोलेन का?
अहो एखाद्याला खरं वाटेल ओ मी दिलदार आहे म्हणुन =)) aa

In reply to by साहित्य संपादक

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र चुकुन हापिशियल डु आयडीने पडली प्रतिक्रिया =)). संपादक रिपेर करा हो जरा घोळ =))

In reply to by विजय पुरोहित

तुम्ही दोघांनी काय एकमेकांच्या पाठी खाजवायचं ठरवलंय काय हो ? ;) पुरोहित(मांत्रिक)राव, जोक होता, इतरांना समजला, तुम्ही अगदी भावना वगैरे दुखावून घेतल्या. डेडपूलराव आणि आम्ही काय बघून घेतलं असतं की. लगेच भावा बिवा करत तुमची कंपुबाजी कशाला पायजे.

In reply to by सच्चिदानंद

राव तुम्ही धडाधड आरोप करत सुटलाय आणि त्यांनी सपोर्ट केला तर कंपुबाजी? आणि पाठीत सुरा खुपसण्यपेक्षा पाठ खाजवण श्रेयस्कर, नाही का;) ह.घ्या!

In reply to by DEADPOOL

हा सभ्य प्रतिसादच दाखवतो की डेडपूल हा पतील अमित नाही... तरी पण लक्षात येत नसेल तर जौ देत!!!

In reply to by DEADPOOL

मी हे वाचलं पण तरी माझा गोंधळ होतो आहे. अर्जुनाने ब्रह्मास्त्र कर्णावर वापरलं नाही, अश्वत्थाम्यावर वापरलं. आणि अर्जुनाच्या अंजलिक बाणानंतर जीव जाऊन ही कर्ण एका अर्थाने परत आलाच कारण पांडवांना कुंतीने कर्णाचं रहस्य सांगितलं, असा अर्थ आहे का? तसं असेल तर ब्रह्मास्त्र ( अमोघ अस्त्र , जीव जाणारच) या लाक्षणिक अर्थाने बघता येईल. मला किस पाडायचा नाहीये, पण अर्थ निसटतोय तो समजुन घेण्याचा प्रयत्न करते आहे.

मृत्युंजय वगैरेसारख्या कादम्बरींत कर्णाचे उदात्तीकरण केलेय. पण व्यासांच्या महाभारतात कर्ण तसा नाहीय हे खरे आहे का ?

In reply to by बबन ताम्बे

बिलकुल ! दाजी पणशीकर यांचं "कर्ण खरा कोण होता ? " हे पुस्तक वाचा. मृत्युंजयचं म्हणाल तर कादंबरी म्हणुन खूप चांगलं आहे. पण कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे !

मस्त कथा लिहिली आहे ....अजून लिहा.