मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

वैभव जाधव · · काथ्याकूट
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का? - विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.

वाचने 31995 वाचनखूण प्रतिक्रिया 180

गामा पैलवान Sat, 04/23/2016 - 19:18
चौकटराजा, तळ्याच्या पाण्याला आणि समुद्राच्या पाण्याला मिळालेलं त्वरण (accleration) एकसारखं आहे. वर मराठी कथालेखाकाने न्यूटनचा नियम दिला आहे. त्यानुसार : F=Gm1m2/(r^2) G= Gravitational constant m1= mass of object 1 = चंद्राचे वस्तूमान m2 = mass of object 2 (केस १ = समुद्राचे पाण्याचे वस्तूमान, केस २ = तळ्याच्या पाण्याचे वस्तूमान) r = distance between 2 objects (चंद्रापासून समुद्र वा तळ्यापर्यंतचे अंतर) m1 स्थिर असताना : m2 म्हणजे दुसर्‍या वस्तूचे वस्तूमान कमी असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार. तरीही गुरुत्वीय त्वरण एकंच असेल. कारण की F/m2 = गुरुत्वीय त्वरण = G*m1/(r^2) मग तळ्याला समुद्राप्रमाणे उधाण आलं पाहिजे. ज्याअर्थी ते येत नाही त्याअर्थी न्यूटनच्या नियमात काहीतरी त्रुटी आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Mon, 04/25/2016 - 06:19
आपल्या सर्वसाधारण निरीक्षणांतून न्यूटनच्या नियमांवरच संशय घेण्याच्या तुमच्या धार्ष्ट्याला सलाम. तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर असं आहे - महासागराचं वस्तुमान प्रचंड असतं, त्यामुळे त्या पाण्यावर होणारा परिणाम दृश्य असतो. तलावांचं वस्तुमान कमी असतं त्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या लाटा लहान असतात. त्यांनाही भरती ओहोटी येते. पण हजारो किलोमीटर लांबीच्या समुद्रावर ती काही मीटरची दिसते. रंकाळ्यासारख्या तलावावर ती काही मिलीमीटरचीही नसते. लेक मिशिगन, जो सुमारे शंभर मैल रुंद आणि दोनशे मैल लांब आहे, त्यावर लाटा दिसतात. भरती-ओहोटीही येते. पण भरती-ओहोटीतल्या पाण्याची उंची पाच सेंटीमीटर इतक्या फरकाची असते. हे समजावून घेण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर - तापमान वाढल्यामुळे वस्तू प्रसरण पावतात. जर एखादी वस्तू मोठी असेल तर तिचं प्रसरणही मोठं दिसतं. लहान वस्तूचं प्रसरण त्यामानाने कमी होतं. मोठ्या वस्तूचं नजरेत भरण्यासारखं असेल, आणि लहान वस्तूचं दिसत नसेल तर याचा अर्थ 'तापमानामुळे प्रसरण होतं हे चुकीचंच आहे' असा होत नाही. असो. तुम्हाला ज्योतिषशास्त्र खरं, न्यूटनचे नियम खोटे हे मानायचं असेल तर त्यापासून मी तुम्हाला थांबवू शकत नाही. फक्त न्यूटनच्या नियमांवर आधारित कार, टॅक्सी, रिक्षा, ट्रेन, विमान वापरताना तुम्हाला 'न्यूटनचे नियम चुकीचे आहेत, तेव्हा मी या गोष्टी वापरू नयेत' असं वाटतं का?

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान Mon, 04/25/2016 - 18:06
राजेश घासकडवी, प्रतिसादाबद्दल आभार! माझी मतं सांगतो. १. >> आपल्या सर्वसाधारण निरीक्षणांतून न्यूटनच्या नियमांवरच संशय घेण्याच्या तुमच्या धार्ष्ट्याला सलाम. न्यूटनबाबांचे प्रमाणवाक्य स्वत:च्या निरीक्षणाशी ताडून पाहणे म्हणजे वैज्ञानिक पाप आहे का? २. >> महासागराचं वस्तुमान प्रचंड असतं, त्यामुळे त्या पाण्यावर होणारा परिणाम दृश्य असतो. तलावांचं वस्तुमान कमी >> असतं त्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या लाटा लहान असतात. माझ्याही मनात अगदी हाच विचार होता. म्हणून न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम लावून बघितला. त्यानुसार गुरुत्वीय त्वरण म्हणजे भरतीची मात्रा येते : F/m2 = G*m1/(r^2) या समीकरणाच्या डाव्या बाजूस गुरुत्वीय त्वरण म्हणजे भरतीची मात्रा आहे. मात्र उजव्या बाजूस समुद्राचे वा तलावाचे वस्तुमान दर्शवणारे कोणतेही पद नाही. हा तिढा कसा सोडवायचा? ३. >> फक्त न्यूटनच्या नियमांवर आधारित कार, टॅक्सी, रिक्षा, ट्रेन, विमान वापरताना तुम्हाला 'न्यूटनचे नियम >> चुकीचे आहेत, तेव्हा मी या गोष्टी वापरू नयेत' असं वाटतं का? काय राव, उगीच गरीबाची थट्टा उडवता होय! न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि प्रतिक्रियेचा नियम एकंच आहेत की काय? बोंबला तिच्यायला आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Mon, 04/25/2016 - 20:49
न्यूटनबाबांचे प्रमाणवाक्य स्वत:च्या निरीक्षणाशी ताडून पाहणे म्हणजे वैज्ञानिक पाप आहे का?
नाही नाही, पाप वगैरे काही नाही. वेळ फुकट घालवणं आहे इतकंच. कारण ते इतक्या वेळा, इतक्या अचूकपणे पडताळून झालेलं आहे की विचारता सोय नाही. आणि ते अमुकतमुक बाबाने सांगितलंय म्हणून खरं नाही तर अब्जावधी निरीक्षणांमधून सत्य सिद्ध झालेलं आहे म्हणून ते प्रमाण आहे. भरतीओहोटीसाठी तलावांच्या वस्तुमानापेक्षा आकारमानाशी संबंध आहे. लहान आकारांत होणारे बदल लहान असतात, मोठ्या आकारात होणारे बदल पुरेसे मोठे आणि म्हणून दृश्य असतात. दुर्दैवाने मला हे प्रतिसादात अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येत नाही. गूगलून पाहा, पटलं तर मान्य करा, नाही तर ऱ्हायलं.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि प्रतिक्रियेचा नियम एकंच आहेत की काय?
चला, निदान न्यूटनबाबाचे गतीचे तीन नियम तरी तुम्हाला मान्य आहेत. बाबा त्याच्या थडग्यात कूस बदलायचा कमी झाला असेल. बरं, रिक्षा वगैरे ऱ्हायलं. तुम्ही इंटरनेट वापरता का? सॅटलाइट टीव्ही पाहाता का? जीपीएस वापरता का? हे सर्व करू शकणारे उपग्रह पृथ्वीभोवती कुठच्या नियमांनी फिरताहेत? त्यांना त्या कक्षेत सोडून येणारी रॉकेट्स कुठच्या नियमांनुसार डिझाइन झाली?

In reply to by गामा पैलवान

पिलीयन रायडर गुरुवार, 04/28/2016 - 16:46
***डिस्क्लेमर - माझं फिजिक्स कच्चं आहे. त्यातही मी ते इंग्रजी भाषेत शिकले म्हणुन मला पटकन त्वरण, बल हे शब्द कळत नाहीत.*** एक प्रश्न आहे. असं बघा की मला असं वाटतय की तुम्ही Acceleration due to gravity "g" आणि Acceleration due to Tidal Force (Force exerted by Moon and Water on each other - Newton's law of universal gravitation ) ह्यात गल्लत करताय का? १. Newton's law of universal gravitation F=Gm1m2/(r^2) इथे F = ma चे सुत्र लावुन जे Acceleration तुम्ही काढले आहे ते तर ह्या बलामुळे असणारे त्वरण आहे. म्हणजे F / m1 = G*m2/(r^2) आणि F / m2 = G*m1/(r^2) अर्थातच सारखे नसतील. मग त्यांना सारखेच त्वरण मिळाले आहे असे कसे म्हणता येईल? 2. Acceleration Due to Gravity F = m2g. Here acceleration we are talking about is "g" - gravitational acceleration. तुम्हाला हे गुरुत्वीय त्वरण म्हणायचे आहे का? पण ते वायलं आणि वरचं त्वरण वायलं ना? माझ्या समजुतीत काही घोळ असेल तर सांगा. कारण माझ्यामते By F = ma, Force is directly proportional to the acceleration. So higher the force magnitude, higher would be acceleration. You agree that force would be higher for higher mass. But then you say acceleration would be same. I do not understand this statement. पण एक नक्की, ह्यात तुमच्या - माझ्या समजुतीचा घोळ होतोय. न्युटनच्या नियमांवर शंका घेणे हास्यास्पद आहे!

गामा पैलवान Tue, 04/26/2016 - 02:13
राजेश घासकडवी, १. >> अब्जावधी निरीक्षणांमधून सत्य सिद्ध झालेलं आहे म्हणून ते प्रमाण आहे. इतर अब्जावधी निरीक्षणांवर मी आक्षेप घेत नाहीये. माझ्या एकुलत्या एक निरीक्षणातून ते सिद्ध होत नाहीये. २. >> हे सर्व करू शकणारे उपग्रह पृथ्वीभोवती कुठच्या नियमांनी फिरताहेत? न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पूर्णपणे खरा नाही. अर्धवट खरा आहे. दीर्घ अंतरावरून फिरणाऱ्या ग्रहगोलांच्या बाबतीत तो खरा असेल, पण पृथ्वीसारख्या उच्च वस्तुमानाच्या वस्तूपाशी तो खरा ठरत नाही. त्याच्यावर मर्यादा आहेत. या मर्यादांचा विचार केलेला दिसंत नाही. ३. >> दुर्दैवाने मला हे प्रतिसादात अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येत नाही. काय गुगलून पाहू? नाहीतर ब्येस म्हणजे तुम्ही गुगलून पहा आणि जो लेख पटेल त्याचा दुवा इथे डकवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Tue, 04/26/2016 - 07:52
दीर्घ अंतरावरून फिरणाऱ्या ग्रहगोलांच्या बाबतीत तो खरा असेल, पण पृथ्वीसारख्या उच्च वस्तुमानाच्या वस्तूपाशी तो खरा ठरत नाही. त्याच्यावर मर्यादा आहेत. या मर्यादांचा विचार केलेला दिसंत नाही.
अहो चुकतं शास्त्रज्ञांचं. ते पुरेसा विचार करत नाहीत. त्यांच्यासाठी तुम्ही करून टाका दुरुस्ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत. तुमचे फार आभारी राहातील ते.
काय गुगलून पाहू? नाहीतर ब्येस म्हणजे तुम्ही गुगलून पहा आणि जो लेख पटेल त्याचा दुवा इथे डकवा.
म्हाला तुमच्या निरीक्षणांतून न्यूटनच्या नियमांत त्रुटी सापडल्या. इतरांना त्या दिसत नाहीत. मग जगाला त्या समजावून सांगण्याचं काम तुमचं. काय बोलता?

In reply to by गामा पैलवान

टवाळ कार्टा Tue, 04/26/2016 - 11:45
पैलवान बुआ...ता टाकाच पुरावे...भारतात एक विज्ञानाचे नोबेलतरी येईल...फक्त पुरावे देताना ते पोथ्या-पुराणांतले देउ नका =))

गामा पैलवान Wed, 04/27/2016 - 01:38
राजेश घासकडवी, १. >> त्यांच्यासाठी तुम्ही करून टाका दुरुस्ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत. तुमचे फार आभारी राहातील ते. सूचनेबद्दल धन्यवाद. मात्र ते माझं काम नाही. २. >> तुमच्या निरीक्षणांतून न्यूटनच्या नियमांत त्रुटी सापडल्या. इतरांना त्या दिसत नाहीत. डोळ्यावर कातडं ओढून घेतलं की त्रुटी दिसंत नाहीत. विज्ञानाच्या नावाने फक्त ढोल बडवायचे. प्रत्यक्ष निरीक्षण सादर केलं की दुर्लक्ष करायचं. विज्ञानाश्रम मस्त चालू आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Wed, 04/27/2016 - 01:58
इक्वेशनं वगैरेंच्या भानगडीत न पडता समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता हे घ्या. For a fluid sheet of average thickness D, the vertical tidal elevation ς, as well as the horizontal velocity components u and v (in the latitude φ and longitude λ directions, respectively) satisfy Laplace's tidal equations:[28] टाइड इक्वेशन आता यातलं पहिलं इक्वेशन बघा. त्याचा थोडक्यात अर्थ असा होतो की टाइड एलेव्हेशनमध्ये जे व्हेरिएशन होतं ते तुमच्या फ्लुइडच्या सरासरी खोलीच्या समानुपाती असतं. म्हणजेच समुद्रापेक्षा तळं जर दहाहजार पटीने कमी खोल असेल तर त्यात दिसणारं भरती-ओहोटीचं प्रमाण दहाहजार पटीने कमी असेल. हेच तुम्हालाही गुगलून सापडू शकलं असतं. पण तुम्हाला खरोखऱ ज्ञान मिळवण्यापेक्षा 'विज्ञानाचे ढोल बडवणे' 'विज्ञानाश्रम' 'न्यूटनबाबांचं प्रमाणवाक्य' वगैरे ताशेरे ओढण्याचीच इच्छा होती असं दिसतं.

In reply to by राजेश घासकडवी

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 02:30
नाही गुर्जी, तुम्हीच खोटं बोलताय, गा.पै. म्हणतायत ते बरोबर आहे. कारण माझ्या समोर ही मेणबत्तीची ज्योत फडफडते पण सूर्य फडफडत नाही. सरळ निरिक्षण आहे हो. ह्याचा अर्थ सुर्य ही आग नाही. तुम्हाला मान्यच करायचं नसेल तर राहिलं.

In reply to by तर्राट जोकर

राजेश घासकडवी Wed, 04/27/2016 - 03:48
मग, तुम्हाला ती आग वाटली? अहो सूर्य हा देव अाहे. अरुणाच्या रथावर बसून तो दिवसरात्र पृथ्वीभोवती फिरतो. आता पृथ्वी गोल आहे असं माझं म्हणणं नाही, कारण उघड आहे ती डोळ्याला सपाट दिसते. आणि ती गोल असती तर खालच्या बाजूचे लोक पडून गेले असते ना... इतकं सोपं कसं कळत नाही तुम्हा झंटलमन लोकान्ला.

In reply to by राजेश घासकडवी

बबन ताम्बे Wed, 04/27/2016 - 12:34
गोल असती तर ते कसे काय राहीले असते ? सांडून गेले असते. दुसरे, ते समुद्राला भरती आल्यावर एव्ह्ढे पाणी नंतर कुठे जाते काय कळत नाय.

In reply to by तर्राट जोकर

बबन ताम्बे Wed, 04/27/2016 - 14:22
पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण चंद्रापेक्षा जास्त. असे असताना चंद्र पृथ्वीवरचे पाणी खेचतो हे पटत नाही. पाण्याने भरलेला फुगा स्वतःच्या आसाभोवती गरगर फिरवला तर असाच बल्ज येतो फुग्याला. पृथ्वीचेही तसेच होत असावे. उगाच लोक चंद्राचा संबंध लावतात. :-)

In reply to by तर्राट जोकर

बबन ताम्बे Wed, 04/27/2016 - 15:48
लहानपणी आम्ही नदीच्या पात्रात पाण्याच्या वरील पातळीला समांतर जाईल अशा त-हेने दगड जोरात फेकायचो. तो दगड टप्पे खात खात, पाणी उडवत जायचा. चंद्र पण फिरता फिरता सुमुद्राचे पाणी असेच उडवत असावा. त्यालाच आपण भरती म्हणतो.

In reply to by तर्राट जोकर

मार्मिक गोडसे Wed, 04/27/2016 - 17:53
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रासमोरील बाजुच्या समुद्राला भरती येते हे समजू शकते,परंतू त्याच वेळेस पृथ्वीच्या विरुद्ध बाजुच्या समुद्रालाही भरती कशामुळे येते ?

In reply to by मार्मिक गोडसे

तर्राट जोकर Wed, 04/27/2016 - 18:04
विषय गहन भौतिकी आहे. मी समर्थ नाही त्याचे उत्तर द्यायला. तसेच एका वाक्यात हे उत्तर शक्य नसावे असे वाटते. विकिची माहिती डोक्यावरुन गेली.

In reply to by मार्मिक गोडसे

sagarpdy गुरुवार, 04/28/2016 - 14:34
"भरती येणे" पेक्षा "भरती राहणे" असा प्रकार आहे तो. चंद्रा जवळील पाण्यावर सर्वाधिक, त्यापेक्षा कमी मधील पृथ्वी (स्थायू ग्रह) आणि सगळ्यात कमी पलीकडील बाजूस असलेल्या पाण्यावर असे गुरुत्वीय बल लागेल, बरोबर ?(अंतराच्या वर्गाशी बलाचे व्यस्त प्रमाण) त्यामुळे जवळील पाणी चंद्राकडे खेचले जाऊन एका बाजूला भरती आली (पाणी पृथ्वीवर आले) तशीच पृथ्वी दुसऱ्या बाजूला पाण्यात ओढली गेल्याने पण भरती येईल ना ?

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान गुरुवार, 04/28/2016 - 01:46
राजेश घासकडवी, सरळ हा दुवा द्यायचा होता की : https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_tides आता तुमचं समीकरण बघूया. १. >> म्हणजेच समुद्रापेक्षा तळं जर दहाहजार पटीने कमी खोल असेल तर त्यात दिसणारं भरती-ओहोटीचं प्रमाण >> दहाहजार पटीने कमी असेल. म्हणजेच पाण्याच्या एकेक रेणूंवर जे गुरुत्वीय आकर्षण काम करतंय त्याची बेरीज होऊन फुगवटा तयार होतो. समुद्राचे रेणू तलावाच्या तुलनेने संख्येने जास्त असतात. म्हणून समुद्राचा फुगवटा जास्त मोठा असतो. बरोबर? तर मग माझा प्रश्न असा की बरोबर नेमक्या विरुद्ध बाजूलाच भरतीचा फुगवटा कसा तयार होतो? विशेषत: अमावास्येच्या दिवशी हे फारंच विसंगत दिसतं. कारण सूर्य आणि चंद्र एकाच बाजूला आलेले असतात. मग मागील बाजूला भरती येते ती कशामुळे? २. >> . पण तुम्हाला खरोखऱ ज्ञान मिळवण्यापेक्षा 'विज्ञानाचे ढोल बडवणे' 'विज्ञानाश्रम' 'न्यूटनबाबांचं प्रमाणवाक्य' >> वगैरे ताशेरे ओढण्याचीच इच्छा होती असं दिसतं. तुम्ही नाही का न्यूटनचे गतिविषयक नियम उकरून काढले? गरज होती का? गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर चर्चा चाललीये ना? मग त्याला थडग्यात लोळायला कशाला लावलात? आ.न., -गा.पै.

राजेश घासकडवी Wed, 04/27/2016 - 05:16
माझ्या मनात या चर्चेवरून काही प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः गामा पैलवानांनी मांडलेल्या निरीक्षणांवरून. त्यांनी म्हटलं की 'मला काही तळ्यात भरती येताना दिसत नाही. आणि माझ्या समजुतीप्रमाणे न्यूटनचे नियम खरे असले तर तळ्यात भरती येताना दिसली पाहिजे. ज्याअर्थी ती येताना दिसत नाही, त्याअर्थी न्यूटनचे नियम चुकीचे असले पाहिजेत' आपल्या वैयक्तिक निरीक्षणांना ते इतकं महत्त्व देतो का, की त्यांना दिसलेलं बरोबर, त्याअर्थी न्यूटनचे नियम चूक! मला वाटतं खरा ज्ञानपिपासू माणूस म्हणेल 'न्यूटनच्या नियमांनी इतकी अब्जावधी निरीक्षणं बरोबर आलेली आहेत. कदाचित माझं निरीक्षण, किंवा न्यूटनच्या नियमांनुसार त्यांचं अर्थनिर्णयन चुकलं असेल का?' पण अनेक बाबतीत लोक स्वतःच्या निरीक्षणांना इतकं प्राधान्य देतात, की बाकीची अब्जावधी निरीक्षणं गेली खड्ड्यात, माझं एक निरीक्षण त्या सर्वांना खोटं ठरवण्यासाठी पुरेसं आहे, असा विश्वास त्यांच्यात असतो. या आत्मविश्वासाबद्दल मला प्रचंड कुतुहल आहे. कारण खोट आपल्याच विचारांत असू शकेल याचा गंधही त्यांच्या विचारांत नसतो. दुर्दैवाने स्वतःच्या अज्ञानाबद्दल गाढ अज्ञान असणारे स्वतःच्या मतांबद्दल भयंकर ठाम असतात. डनिंग-क्रूगर इफेक्ट असं या परिणामाला नाव आहे.

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान गुरुवार, 04/28/2016 - 01:54
राजेश घासकडवी, >> दुर्दैवाने स्वतःच्या अज्ञानाबद्दल गाढ अज्ञान असणारे स्वतःच्या मतांबद्दल भयंकर ठाम असतात. डनिंग-क्रूगर >> इफेक्ट असं या परिणामाला नाव आहे. तुमचा नेम साफ चुकला आहे. मी मांडलेल्या दाव्यास फॉल्सिफिकेशन डॉक्ट्रिन म्हणतात. आ.न., -गा.पै.

स्थितप्रज्ञ Sun, 05/01/2016 - 16:17
शनी हा पापग्रह असण्यावरून बरीच चर्चा झाली आहे. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की शनी पापाचा कारक नाही तर आपण केलेल्या पापाची कुठलीही दया माया न दाखवता सर्वांना एकाच तराजूत यथोचित शिक्षा करणारा ग्रह आहे. आपण मनानी निर्मळ (म्हणजेच पाप रहित किंवा कमीत कमी पापी) असल्यास शनी कशाला त्रास देईल? अहंकार असणाऱ्या व्यक्तीस शनी यथेच्छ समाचार घेतो.

मार्मिक गोडसे Mon, 05/02/2016 - 16:04
चंद्र व पृथ्वीच्या ग्रुरुत्वीय आकर्षणामुळे चंद्रासमोरील बाजुचे समुद्राचे पाणी खेचले जाऊन त्या भागात भरती येते. त्याचवेळेस नेमके विरुद्ध बाजूस चंद्र व पृथ्वीचे क्षीण गुरुत्वीय आकर्षण असते. अशावेळेस ग्रुरुत्वीय बलापेक्षा जडत्व अधिक असल्यामुळे पाणी पृथ्वीपासून दूर सरळ रषेत जाण्याचा प्रयत्न करते व त्यामुळे त्या भागात पाण्याला फुगवटा येतो. http://oceanservice.noaa.gov/education/kits/tides/media/supp_tide03.html http://oceanservice.noaa.gov/education/kits/tides/media/supp_tide04.html