ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी
क्रमांक ९७ आणि त्याचा जगप्रसिद्ध प्रवास
१९ जून २०१४ रोजी वॉली उर्फ विल्सन जॉनसन नावाच्या जीवशास्त्रज्ञाने (बायालॉजीस्ट) अलास्कामधिल नोम या ठिकाणी एक पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर जातीचा नर पकडला. वॉलीने जीवशास्त्रिय निरिक्षण (वजन, लांबी, इ) केल्यावर त्याच्यावर एक छोटा सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवला आणि त्याला मुक्त केले. त्या ट्रान्समीटरचा क्रमांक ९७ होता, त्यावरून वॉलीने पक्षाचे "नंबर ९७" असे नामकरण केले. अश्या तर्हेने "नंबर ९७" चा नकळत एका ऐतिहासिक प्रकल्पात समावेश झाला. .
क्रमांक ९७ बरोबर वॉली जॉनसन
क्रमांक ९७ : त्याच्या उजव्या पायावर पांढर्या निशाणीसह जिओलोकेटर (geolocator) हे उपग्रहांच्या सहाय्याने जागा नक्की करणारे उपकरण चिकटवले आहे, तर स्थानिक पक्षिनिरिक्षकांना डोळ्याने त्याची ओळख पटावी यासाठी डाव्या पायावर तांबडी पट्टी बांधली आहे. उपकरण व खुणा अत्यंत कमी वजनाच्या असून त्यांचा पक्षाच्या हालचालीवर अजिबात ताण पडत नाही.
प्लोव्हर नंबर ९७ चा प्रवासमार्ग
(युट्युबवरून साभार)
दुर्दैवाने समुद्रकिनारी पक्षांची संख्या दिवसे दिवस धोक्यात येत आहे आणि काही तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे शत्रू आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या ओळखीचेच आहेत... पक्षांच्या नेहमीच्या वाटेवरच्या जमिनीवर होणारे मानवी आक्रमण, पर्यावरणाचा र्हास व त्यामुळे कीटकांची कमी होणारी संख्या. यामुळे पक्षांच्या प्रवासातले थांबे व त्यांचे अन्न नष्ट होऊन प्रवासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हे प्रवासी पक्षांचे पुढे काय होईल हा यक्षप्रश्न शास्त्रज्ञांना भेडसावित आहे. मर्यादीत नैसर्गिक शरीरसाधने वापरून छोटे छोटे प्रवासी पक्षी मोठमोठी अंतरे काटतात. यामागची शास्त्रिय कारणे शोधून काढण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे... आणि मानवाच्या मर्यादांची क्षितीजे विस्तारायला त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल, यावरही ! त्यावर आपण पुढच्या भागांत विचार करु. (क्रमश : ) =================================================================== संदर्भ : १. https://en.wikipedia.org/wiki/Plover २. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id ३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover =================================================================== उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे... ०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !... ०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे... ===================================================================लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून किंवा इतर जालस्त्रोतांवरून घेतलेले आहेत.
===================================================================In reply to फोटो दिसत नाहीयेत काका. by बोका-ए-आझम
In reply to एकदा स्क्रिन रिफ्रेश करून पहा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आता दिसताहेत. by बोका-ए-आझम
पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके!
अगदी, अगदी ! लेख लिहिण्यापूर्वी हेच गीत मनात घोळत होते... पण लेखन करून प्रकाशित करताना मधे मधे आलेल्या व्यत्ययामुळे ते टाकायला विसरलो ! :( आता ते टाकून घेतो.In reply to पंछी,नदियां,पवन के झोके; कोई by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेखात ती भर आता टाकली आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
ही ८,८०० किलोमीटरची महाभरारी त्याने एकही थांबा न घेता आठ दिवसात पूर्ण केली.या काळात हे काही खात पीत नाहीत का? त्याची सोय कशी करतात? या बद्दल काही माहिती उपलब्ध झाली आहे का?
In reply to अबबबब!! पक्षी जाय दिगंतरा!_/\_ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to खुप छान माहीती by नेत्रेश
In reply to निव्वळ अप्रतिम लेख आणि by प्रसाद गोडबोले
In reply to निव्वळ अप्रतिम लेख आणि by प्रसाद गोडबोले
In reply to अजब आहे सगळं by चौकटराजा
In reply to काय अचाट प्रकार आहे हा by अजया
In reply to आपली पण हीच इछा by चौकटराजा
In reply to आपली पण हीच इछा by चौकटराजा
In reply to एका रोचक प्रवासाचा थरारक वृत्तांत.... by ज्ञानोबाचे पैजार
त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय.
हा शॉर्टकट नसून तो तसा का करावा लागतो याची शक्य असलेली भौतीक कारणे पुढच्या भागात येतील.
फोटो दिसत नाहीयेत काका.