बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे.
भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू.
या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत.
१. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल.
२. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू.
३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू.
म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे.
याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच.
या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते.
अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत.
मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की.
बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे.
माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?
वर्गीकरण
वाचने
116462
वाचनखूण
प्रतिक्रिया
254
पुढील सहभाग बुधवारनंतर
लेख सुंदर. तुमचा मुद्दा व
उत्तर सोपं आहे. जगातल्या अनेक
लेख आवडला. अनेक इतर पायाभूत
In reply to लेख आवडला. अनेक इतर पायाभूत by राजेश घासकडवी
असेच..
In reply to असेच.. by पीके
शुद्ध लेखन समजुन घ्या..
In reply to लेख आवडला. अनेक इतर पायाभूत by राजेश घासकडवी
अनेक इतर पायाभूत
In reply to अनेक इतर पायाभूत by अनुप ढेरे
+१
In reply to अनेक इतर पायाभूत by अनुप ढेरे
मंगळयानाचा खर्च याच्या
In reply to मंगळयानाचा खर्च याच्या by राजेश घासकडवी
यशातुन प्रतिमा झाली.
In reply to अनेक इतर पायाभूत by अनुप ढेरे
तंत्रज्ञाना साठी फक्त १०००
In reply to तंत्रज्ञाना साठी फक्त १००० by प्रसाद१९७१
नाही.
यात किती शहरांमधून मेट्रो
In reply to यात किती शहरांमधून मेट्रो by काळा पहाड
मधेच चेन खेचायची ठरवली..
In reply to यात किती शहरांमधून मेट्रो by काळा पहाड
जपान तुम्हाला बुलेट ट्रेनचे
In reply to जपान तुम्हाला बुलेट ट्रेनचे by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, तुमच्या
In reply to जपान तुम्हाला बुलेट ट्रेनचे by सुबोध खरे
लेख, चर्चा दोनही खूप
In reply to जपान तुम्हाला बुलेट ट्रेनचे by सुबोध खरे
प्रॉब्लेम एकीकडे सोल्युशन वेगळीकडे असे नको
In reply to प्रॉब्लेम एकीकडे सोल्युशन वेगळीकडे असे नको by गॅरी ट्रुमन
सहमत
पाउल पुढे टाकायचे की नाही?
या मागचं एक कारण
असली गणिते अनेकवेळा मांडली गेली आहेत.
बहुधा काही तरी शो-शायनिंग करण्याच्या हेतूने बुलेटट्रेन पुढे केली जात आहे.जगातल्या अनेक भांडवलशाही देशांप्रमाणेच भारत सरकार कॉर्पोरेट जगाच्या गरजा लक्षात घेऊन धोरण ठरवू लागले आहे.भारतात सध्या विषमता खूप जास्त आहे आणि बर्याच लोकांना वाटते की इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास झाला की आपोआपच सगळ्यांचा विकास होईल.एवढ्या खर्चात देशातल्या सगळ्या सरकारी शाळा अत्याधुनिक करता येतील. दोनचार कोटी घरांमध्ये शौचालयं बांधता येतील. कित्येक गिगावॉटचे सोलार प्रकल्प उभे करता येतील.यात किती शहरांमधून मेट्रो झाली असती आणि रेल्वेचं सध्याचं जाळं किती मजबूत आणि व्यवहार्य झालं असतं हे लक्षात घेतलं तर हा अनुपयोगी खर्च आहे असं वाटतं.Express Highway आणि मुंबईतील उड्डाण पुलाचे वेळी सुद्धा भरपूर बोंब मारलेली होती. अनेक कुजकट प्रतिक्रिया दिल्या होत्या. काम पुर्णत्वाला गेले आणि लोकांना जाणीव झाली की आपल्याला असे रस्ते हवे आहेत. एक साधा प्रश्ण. भारतात विषमता आहे. अनेकांना एक वेळचे जेवणसुध्दा मिळत नाही. म्हणून कितीजण रोज उपाशी राहतात.In reply to असली गणिते अनेकवेळा मांडली गेली आहेत. by चिंतामणी
Express Highway आणि मुंबईतील
In reply to Express Highway आणि मुंबईतील by काळा पहाड
त्याचं असं समर्थन करण्यासाठी
In reply to Express Highway आणि मुंबईतील by काळा पहाड
अरे वाह.
बाकी बोंब मारणं वगैरे वाक्यांमुळे ऑडिट करणं, हिशेब ठेवणं, आढावा घेणं वगैरे गोष्टींशी आपला संबंध येत नसावा अशी खात्री वाटते.हे फक्त तुम्हालाच कळते का हो? असो. मी छोटासा व्यावसाइक आहे आणि वाणिज्य पदवी धारकसुद्धा आहे. एव्हढा परीचय पुरेसा आहे. काही गोष्टी दिर्धकालीन योजनेचा भाग असतात. फकत भावनीक दृष्टीकोनातुन त्या "होउ नये" असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्या दिशात अनेक गोष्टी आहेत की त्या वरील अनेक प्रतिक्रीयांप्रमाणे व्हायलाच नको होत्या.पण असं वाक्य समर्थनासाठी वापरावं असं मला वाटत नाहीअनेक कल्याणकारी योजना चालू आहेत अथवा नव्याने आणण्यात आलेल्या आहेत. त्याचा प्रभावीपणे उपयोग कसा होइल बघणे हे फक्त राज्यकर्त्यांचे काम नाही तर सर्व जनतेचे आहे. मी उपासाचे उदाहरण नाइलाजाने दिले आहे. कारण वरती नोंदलेल्या अनेक प्रतिक्रीया. एकाने प्रतिक्रीया लिहेली "याखर्चातुन आनेक संडास बांधले जाउ शकतील". या प्रतिक्रीयेबद्दल सुद्धा "असं वाक्य समर्थनासाठी वापरावं असं मला वाटत नाही" असे म्हणता येइल ना. सरकारने CSR च्या माध्यमातुन एका वर्षात अनेको ठिकाणी शौचालये बांधली आहेत. खाजगी ठिकाणी बांधण्यासाठी सबसिडी देते सरकार. याचा विचार प्रतिक्रीया देणार्याने केलेला नाही म्हणून असे उत्तर दिले आहे.मांडणी योग्य .
आशयाशी सहमत
गॅरींचा मुद्दा " ही बुलेट
In reply to गॅरींचा मुद्दा " ही बुलेट by कंजूस
त्यासाठी हुकूमशाही हवी.
In reply to गॅरींचा मुद्दा " ही बुलेट by कंजूस
मैंगलेव केली खरं आहे पण फक्त
In reply to गॅरींचा मुद्दा " ही बुलेट by कंजूस
कोणत्याही देशातले सद्याचे
इतर देशात
In reply to इतर देशात by ट्रेड मार्क
असा प्रश्न विचारायचा नसतो
होऊ दे खर्च,काम आहे घरचं
@खरे साहेब,
एक वेगळा अँगल
ह्या प्रकल्पा वर टीका
मला वाटते जर बुलेट ट्रेन
In reply to मला वाटते जर बुलेट ट्रेन by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पु
भव्य-दिव्य, डोळे दिपवणारे पण
In reply to भव्य-दिव्य, डोळे दिपवणारे पण by राही
राही ताई
In reply to राही ताई by सुबोध खरे
मुंबईच्या उड्डाण पुलान्बाबतही
In reply to मुंबईच्या उड्डाण पुलान्बाबतही by सुबोध खरे
सगळ्याच नव्हे
In reply to सगळ्याच नव्हे by राही
पेडर रोड फ्लाई ओवर ला मंगेशकर
In reply to पेडर रोड फ्लाई ओवर ला मंगेशकर by कैलासवासी सोन्याबापु
तसं नाही हो..
In reply to तसं नाही हो.. by तुषार काळभोर
त्याला फक्त त्यांंचाच नाही
In reply to मुंबईच्या उड्डाण पुलान्बाबतही by सुबोध खरे
Express Highwayचे वेळी सुद्धा
In reply to राही ताई by सुबोध खरे
सरसकट मेट्रोविरोध नाही
In reply to सरसकट मेट्रोविरोध नाही by राही
Express Highway खूप विरोध
In reply to भव्य-दिव्य, डोळे दिपवणारे पण by राही
प्रत्येक पार्टी वेगवेगळ्या
सुबोध खरे तुम्हाला खरे ते नेमके समजले
आहे तीच बैलगाडी सुधारून
याचाच अर्थ अन्यथा विमानाने
In reply to याचाच अर्थ अन्यथा विमानाने by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, बुलेट ट्रेन चे
In reply to डॉक्टर साहेब, बुलेट ट्रेन चे by प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब, बुलेट ट्रेन चे
In reply to डॉक्टर साहेब, बुलेट ट्रेन चे by प्रसाद१९७१
पण प्रसादसाहेब,
In reply to पण प्रसादसाहेब, by बोका-ए-आझम
तुमच्या मते तर हा प्रकल्प
In reply to याचाच अर्थ अन्यथा विमानाने by सुबोध खरे
टारगेट कस्टमर्स
आणि हे सगळे रथ छपरा, जौनपूर ,
माझ्या हातून काही मुद्दे
दूरदृष्टीने आखलेली योजना वाटत आहे
Indian Railways earns about
मला नेहमी एक प्रश्न पडतो...
In reply to मला नेहमी एक प्रश्न पडतो... by बबन ताम्बे
रेलवे मधील शौचालयांवरचे
In reply to रेलवे मधील शौचालयांवरचे by कैलासवासी सोन्याबापु
ओह!! धन्यवाद माहीतीबद्द्ल.
In reply to मला नेहमी एक प्रश्न पडतो... by बबन ताम्बे
अॅक्चुअली
रोचक चर्चा.
In reply to रोचक चर्चा. by जेपी
त्या बुलेटवर
दमामि एक गाणे होउन जाऊ द्या
मुंबई मध्ये राहणारे गुज्जू
In reply to मुंबई मध्ये राहणारे गुज्जू by अभिजित - १
इतका गुज्जू लोकांचा द्वेष
In reply to इतका गुज्जू लोकांचा द्वेष by सुबोध खरे
अजिबात द्वेष नाहीये मनात.
http://www.loksatta.com
चर्चा भरकटवू नका
In reply to चर्चा भरकटवू नका by बाजीगर
ओ बाजीगर. लोकसत्ता ची लिंक
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा
In reply to माहितीपूर्ण लेख आणि चर्चा by पैसा
अवांतर
In reply to माहितीपूर्ण लेख आणि चर्चा by पैसा
तंत्रज्ञान
In reply to माहितीपूर्ण लेख आणि चर्चा by पैसा
हे अंतर २५० कि मी नसुन ४३१ कि.मी आहे.
In reply to हे अंतर २५० कि मी नसुन ४३१ कि.मी आहे. by चिंतामणी
हो काय!
In reply to हो काय! by पैसा
थोडा समजुतीचा घोटाळा झाला.
In reply to थोडा समजुतीचा घोटाळा झाला. by चिंतामणी
:)
कोकणकन्या गाडीला
तर्क...
आर्थिक तर्क
बुलेट ट्रेनचा खर्च अफाट आहे हे मान्य. त्यात गॅरींनी लिहीलेला हिशेब पण बरोबरच आहे. फक्त त्या हिशेबात मला काही नकळत केली गेलेली गृहीतके मर्यादीत वाटत आहेत. (चुकले असले तर क्षमस्व!) म्हणजे असे की, यात मुंबई-अहमदाबाद या भागाच्या आर्थिक विस्ताराचे या सरकारचे आणि अगदी आधीच्या सरकारपासूनचे नक्की काय प्लॅन आहेत? आधीच्या म्हणण्याचे कारण इतकेच की बुलेट ट्रेन हे आधी लालू रेल्वे मंत्री असताना पुणे-मुंबई-अहमदाबाद कॉरीडॉर साठी सुचवले गेले होते आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले होते. थोडक्यात केवळ जैसे थे असलेली शहरे जोडण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प चालू केला होता का त्यात ह्या संपूर्ण मार्गावर उद्योग-विकास करण्याच्या उद्देशाने जोडण्याचा उद्देश होता? मूळ प्रकल्पाच्या अभ्यासानुसार त्यात मुंबई-अहमादाबाद मार्गावर महाराष्ट्रात ७ आणि गुजरातमधे ४ स्थानके गॄहीत धरली आहेत. शिवाय हा प्रकल्प ठाण्यावरून नेण्याचा प्लॅन आहे कारण त्यामुळे पुढे त्याला पुणे पण जोडता येईल. हे सर्व युपिएच्या काळातले प्लॅनिंग आहे आणि काही अंशी त्याच अहवालावर हे सरकार देखील हा प्रकल्प सुचवत आहे असे दिसते आहे. त्यामुळे मला कुठेतरी वाटत आहे की ह्या सर्व भागात (विशेष करून मुंबई-अहमदाबाद सोडा, पण मधल्या ६-७ स्टेशन्सच्या भागात) उद्या कंपन्या किती आणणार, त्यातून उत्पन्न, आर्थिक विकास, जिडीपी वगैरे जे काही मोजायला वापरायचे आहे त्याचा यात कसा संबंध लावला आहे, हे पहाणे इष्ट ठरेल. त्याच बरोबर भारताची लोकसंख्या त्यातून निर्माण होणारी रोजगाराची गरज, हाउसिंग डेव्हलपमेंट यांचा विचार करावा लागेल. अशा ट्रेनचा वापर हा रहीवाशी लांब रहात असले तरी रोज प्रवासासारखा करता येईल का? तसे झाल्यास त्यातून विमानांना धोका नाही तर नवीन गिर्हाईक मिळू शकेल. या सर्वांचा विचार करणे आणि त्यातून होऊ शकणारी जिडीपी मधली वाढ, सरकारी कर वसुलीतील वाढ, एकूण प्रदेशाचा आर्थिक विकास बघणे देखील गरजेचे आहे. केवळ या चर्चेसाठी मी जिडीपी, हे आर्थिक विकास आणि उत्पन्नाचे स्केल आहे असे गृहीत धरत आहे: मला वाटते १५ बिलीयन डॉलर्स हे देशाच्या सध्याच्या जिडीपीच्या ०.६% इतका खर्च हा पन्नास वर्षांवर वाटलेला आहे. (आयएमएफ नुसार, २०१६ चा भारताचा अपेक्षित जिडीपी 2,384.726 बिलियन डॉलर्स, २०१५ चा 2,182.577 बिलियन डॉलर्स इतका आहे.). मुंबईचा जिडीपी $278 billion तर अहमदाबादचा $119 billion इतका आहे, थोडक्यात दोघांचा मिळून सुमारे $४०० बिलियन्स आहे. आता जर मुंबई - अहमदाबाद या कॉरीडॉरचा अजुन अगदी ७०-८०% सुनियोजित विकास केला गेला तरी या एकूण भागाचा जिडिपी किमान आणि अगदी सरासरी २ टक्क्याने वाढला तरी तो $ ८ बिलियन्सने वाढू शकेल. आता इतक्या विकासाची अपेक्षा करणे हे कमी अथवा जास्त, कुठल्याच प्रकारचे टोकाचे ठरेल का? हा प्रश्न आहे. पण तितके मी सध्या गृहीत धरले आहे हे इतकेच... आता बुलेट ट्रेन हे प्रकरण मला वाटते महागडे ठरले असले तरी जपान मधे बर्यापैकी यशस्वी ठरले आहे पण जर्मनीत आणि इतरत्र बोंब आहे. मला वाटते याचे अंशतः कारण लोकसंख्या आणि लोकसंख्येला धरून होणारा विकास आहे. त्या अर्थाने इथे बुलेट ट्रेन आणणे हे गरजेचे आहे का नाही हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे, पण आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास ज्याला calculated risk म्हणता येईल असाच प्रकल्प आहे असे वाटते. या खर्चाला एक समांतर उदाहरण देतो, ज्याच्या भानगडीत आपण पडू नये असे वाटते... ते म्हणजे ऑलिंपिक्सचे यजमानपद... आजच्या घडीच्या अंदाजानुसार त्याचा खर्च देखील जवळपास $१५ बिलियन्स च आहे. त्यातून चार दिवसाची गंमत आणि देशाला शो ऑफ करता येतो, पण नंतर जो काही तथाकथीत विकास झालेला असतो त्याचा काही उपयोग होत नाही आणि ती शहरे आणि त्या मोठ्या डेव्हलपमेंट्स नंतर ओसाड पडतात (कारण इतका मोठा समारंभ परत तिकडे येत नसतो). आता गंमत म्हणून हीच analogy पुढे लावत एक उदाहरण घेऊयात... १९८२ साली दिल्लीत एशिआड झाले. दिल्लीत झाल्याने तिथे काही झालेल्या डेव्हलपमेंट्सचा नंतर देखील वापर करता आला असेल कदाचीत. पण त्यावेळेस विकासासाठी म्हणा अथवा एकूण उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणा, महाराष्ट्राला सगळ्यात जास्त फायदा झाला तो त्यावेळेस महाराष्ट्राने दिलेल्या एशियाड बसेसचा. त्या बसेस नंतर मुंबई-पुणे मार्गावर धावू लागल्या. तत्कालीन दुर्मिळ असलेल्या लक्झरी बसेस पेक्षा स्वस्त, इकॉनॉमि बसेस (एसटी)पेक्षा जास्त कप्फर्टेबल असा सुवर्ण मध्य असलेल्या बसेसनी डेक्कनक्वीन चुकलेल्यांना एक पर्याय दिला. दर अर्ध्या तासाने दादर आणि पुणे येथून या बसेस सुटायच्या आणि (घाटात अडकल्या नाहीत तर) साधारण साडेतीन-चार तासत दुसर्या बाजूस आणूण सोडायच्या. जनतेचा प्रवास हा सुसह्य झाला. बसेस कधी मोकळ्या देखील गेल्या नाहीत... आता हा सगळा इतिहास आहे. पण मुद्दा इतकाच की त्या बसेस नी नक्कीच "मोलाची" कामगिरी त्यानंतर (१९८२ नंतर) अनेक वर्षे केली हे वास्तव आहे. बुलेट ट्रेन्सचे पण तसेच होऊ शकते. - निव्वळ प्रस्थापित विकासाला हातभार लावण्याऐवजी, नव्या विकासाचा मार्ग तयार करू शकतात...राजकीय तर्क
हा सोप्पा आहे. पण तो स्वतंत्र नाही. आर्थिक तर्क जर लागू होत असला तर "बाय वन गेट वन फ्री" म्हणून ठरू शकतो... आज भारताला सगळ्यात जास्त गरज कसली असली तर ती उर्जेची. शक्य तितकी शुद्ध उर्जा ही चार प्रकारातून मिळू शकते - सौर, पवन, पाणी, आणि अणू. यातील पाण्यासाठीची उर्जा ही धरणांवर अवलंबून आहे. त्याची म्हणून वेगळीच राजकारणे, समाजकारणे आणि पर्यावरणकारणे आहेत. निव्वळ सौर आणि पवन उर्जा पोट भरू शकणार नाही. मग उरते ती अणू उर्जा. त्यासाठीचे तंत्रज्ञान केवळ अमेरीका-रशिया-कॅनडावर अवलंबून रहाण्याऐवजी कदाचीत जपानकडून मिळणे सोयीचे ठरू शकेल. पण त्यासाठी अजून काही देणे देखील गरजेचे आहे. जे या प्रकल्पातून साध्य होऊ शकेल. असो!!! :)In reply to तर्क... by विकास
सहमत
In reply to तर्क... by विकास
सहमत
In reply to तर्क... by विकास
विकास
सिडको...
In reply to सिडको... by विकास
नवा मार्ग
In reply to नवा मार्ग by राही
सह्मत
In reply to नवा मार्ग by राही
नवी मुंबईबाबत एक प्रश्न
In reply to नवी मुंबईबाबत एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to बरोबर by विकास
धन्यवाद
In reply to नवा मार्ग by राही
अभ्यास
साला काय भंकस लावली
In reply to साला काय भंकस लावली by सुज्ञ
थोडी सुधारणा
In reply to साला काय भंकस लावली by सुज्ञ
तसेच
( उदा एकदा पुणे मुंबई रेल्वे चालू झ्हाल्यावर नंतर सर्वत्र रेल्वे चालू झ्हाली.. अभ्यास ब्रीटीश काळ )एकदा मुंबई- पुणे express way झाल्यावर सगळीकडे असे रस्ते व्हायला लागले.In reply to तसेच by चिंतामणी
एक्स्प्रेस-वे
बुलेट समर्थनार्थ एक हफिंगटन
In reply to बुलेट समर्थनार्थ एक हफिंगटन by कैलासवासी सोन्याबापु
हाच मुद्दा लिहिणार होतो.
आपल्याकडे कोणतीही नवीन गोष्ट
चेपूवरून काही साभार
In reply to चेपूवरून काही साभार by श्रीरंग_जोशी
काहीही हां श्री
In reply to काहीही हां श्री by आदिजोशी
एक लिहायचं राहून गेलं
In reply to चेपूवरून काही साभार by श्रीरंग_जोशी
तुमचे प्रतिसाद नेहमीच
In reply to तुमचे प्रतिसाद नेहमीच by अभिजित - १
अरे देवा
पायलट प्रकल्प
In reply to पायलट प्रकल्प by स्मिता.
पायलट = पथदर्शी
ताशी पाचशे किलोमीटर वेगाने
In reply to ताशी पाचशे किलोमीटर वेगाने by काकासाहेब केंजळे
शुभ बोल रे ...
In reply to ताशी पाचशे किलोमीटर वेगाने by काकासाहेब केंजळे
अभ्यास वाढवा
In reply to ताशी पाचशे किलोमीटर वेगाने by काकासाहेब केंजळे
कैच्या कै... जिथून ही बुलेट
बुलेट ट्रेन पुणे-मुंबई मध्ये
इथे बिनव्याजी पैसे जपानी देत
शेंच्युरी उलटलेल्या बद्दल
अजून कोणी भारताच्या मंगळ मोहीमेचा
दुसरा दृष्टीकोन
सुरवातीला एशियाड बसच्या
In reply to सुरवातीला एशियाड बसच्या by हेमंत लाटकर
नाही हो.
In reply to नाही हो. by राही
आशयाशी सहमत
In reply to आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
होय
In reply to नाही हो. by राही
दूरगामी व्यवस्थापन
In reply to दूरगामी व्यवस्थापन by विकास
विरोध नव्हता
In reply to विरोध नव्हता by राही
पवार कसारा घाटातही अडकले होते
In reply to पवार कसारा घाटातही अडकले होते by श्रीरंग_जोशी
तसेच त्या हायवेचे
In reply to तसेच त्या हायवेचे by मराठी_माणूस
अच्छा
In reply to नाही हो. by राही
जुन्या रा.म. ४ वरील वाहतूक कोंडी आणि मृत्यू
सुरवातीचे माहीत
रोचक धागा....
जपानचे फायदे-तोटे...
In reply to जपानचे फायदे-तोटे... by डॉ सुहास म्हात्रे
अजून एक फार महत्वाचा आणि
हे ९८,००० कोटी इथेच खर्च
In reply to हे ९८,००० कोटी इथेच खर्च by मनो
मनरेगा
काही बिन्दू
In reply to काही बिन्दू by लॉरी टांगटूंगकर
मस्त प्रतिसाद
In reply to काही बिन्दू by लॉरी टांगटूंगकर
धन्स मन्द्या! आज नवीन काही
In reply to काही बिन्दू by लॉरी टांगटूंगकर
मुद्दा
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
कदाचित,
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
सोलर पॉवरवरून आठवले...नागपूर
In reply to सोलर पॉवरवरून आठवले...नागपूर by ए ए वाघमारे
हा प्रतिसाद ग़ॅरी यांना
In reply to काही बिन्दू by लॉरी टांगटूंगकर
कर्ज देतंय कोण?
In reply to कर्ज देतंय कोण? by स्वधर्म
डेफिसीट कव्हर करायला बहुतांश
बुलेट ट्रेन चे पर्याय ह्या
मला लोकांना एकाच सांगावेसे
In reply to मला लोकांना एकाच सांगावेसे by सुबोध खरे
+१००
तेंव्हा पैशाचे मुल्य कमी होते हे लक्षात असावेजी माणसे व राष्ट्रे ही "टाईम व्हॅल्यु ऑफ मनी" संकल्पना जाणून त्यावर आपले निर्णय घेतात, तीच सधन बनतात असा इतिहास आहे.In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
आणखी एक अॅन्करींग पॉईंट
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
मस्त . सुंदर उत्तर. याच्या
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असते
In reply to तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असते by डॉ सुहास म्हात्रे
हा प्रतिसाद क्लिंटन यांच्या
In reply to हा प्रतिसाद क्लिंटन यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
हो तुमच्या प्रतिसादालाही