एक वेगळी भेट NRCC ला
(बीएसएफ ऊंट दस्ता,चित्र जालावरून साभार)
तर, हल्लीच काही वैयक्तिक कामानिमित्त राजस्थामधे बीकानेरला जाणे झाले असता, एकेदिवशी करायला काही नाही म्हणून भटकंती करायला ठिकाणे शोधता शोधता एक नवे ठिकाण सापडले, ते म्हणजे "राष्ट्रिय उष्ट्र संशोधन केंद्र" उर्फ़ "National Research Center on Camels".बीकानेर शहरा पासुन जवळपास 7 किमी अंतरावर जोधपुर बायपास लगत जोरबीर (उच्चारी जोड़बीड)मधे हे संशोधन केंद्र, जवळपास 700 हेक्टेयर जमीनीवर वसलेले आहे. 1984 मधे स्थापित ह्या संस्थेची ख्याती म्हणजे,1984 मधे हे केंद्र "Project Directorate on Camel" म्हणून अस्तित्वात आले अन पुढे 1995 साली एक पूर्णवेळ रिसर्च सेंटर म्हणून ह्या केंद्राला मान्यता मिळून आज हे केंद्र आशिया खंडातले सगळ्यात मोठे उष्ट्र संशोधन केंद्र अन फार्म म्हणून नावाजले. हे संशोधन केंद्र भारतीय कृषि अनुसंधान परिषद उर्फ़ Indian Council For Agricultural Research
च्या अखत्यारीत काम करते.
(NRCC logo, चित्र जालावरून साभार)
राष्ट्रिय ऊंट संशोधन केंद्र (ह्यापुढे उल्लेख केंद्र असा करतो) हे एक महत्वाचे पर्यटक आकर्षण म्हणून नावारुपाला न आल्यास नवल वाटेल इतके सुंदर ह्याचे कैंपस मेंटेन केले गेले आहे, रोज सकाळी इथे असलेले 350 ऊंट चरायला म्हणून केंद्राच्याच मागे असलेल्या 650 हेक्टेयर रानात सोडले जातात अन ते स्वयंप्रेरणेने दुपारी ठरल्यावेळी परत येतात. ह्यामुळेच इथे पर्यटकांसाठी वेळ दुपारी अडीच ते सायंकाळी साडे सहा ठेवली जाते व सहा वाजता तिकीट विक्री बंद होते. नाममात्र 30 की 50 रूपये माणशी तिकीट असते प्रवेशाकरीता. इथे एक आवर्जून सांगावे वाटते की केंद्राला भेट देतेवेळी गाइड नक्की घ्यावा नाहीतर कश्याचीकश्याशी टोटल न लागता नुसता ऊँटाचा कळप पाहून परत फिरायची वेळ येऊ शकते. गाइडचे शुल्क अवाजवी नसुन फ़क्त 150 रुपये प्रति टूर इतके आहे. गाइड्स सौजन्यपूर्ण अन माहितगार आहेत केंद्राचे. खालील माहीती गाइड ने दिलेली असुन ती त्रोटक स्वरुपात मांडतो आहे ती फ़क्त आपल्याला गाइड का करावा ह्याची नीट कल्पना यावी म्हणूनच.
मुळात ऊंट वाळवंटाचे गलबत वगैरे प्रार्थमिक माहीती आपल्याला असते पण गाइडने दिली ती माहीती प्रचंड सुरस होती (माझ्यासाठी तरी). भारतात मूलतः चार प्रकारचे ऊंट बहुतकरून सापड़तात अन ह्याच चार प्रजातींवर केंद्रात मुख्य संशोधन चालते.
1 बीकानेरी
2 जैसलमेरी
3 मेवाड़ी
4 कच्छी
एक एक प्रजातीची माहीती मिळाली ती खालील प्रमाणे
1 बीकानेरी ऊंट
बीकानेरी ऊंट हे उंटातले जर्सी ब्रीड समजले तरी हरकत नसावी. मजबूत बांधा बऱ्यापैकी ऊंची ही ह्या जातीची स्पेशलिटी म्हणवली जाते. ह्यांची ओळख म्हणजे घुमट किंवा डोम शेप्ड डोके. ह्यांच्या पापण्यांवर बऱ्यापैकी केस असतात जे त्यांना वाळुच्या वादळांत संवेदनशील डोळ्यांची काळजी घ्यायला मदतगार असतात. रंग कथ्या खाकी ते काळ्याच्या मधे असतो. प्रसंगी एखाद लालसर झाक असलेला ऊंट ही बीकानेरी जातीत सापडतो. ही जात अतिशय एक्टिव असुन हिचा उपयोग भारवाहन ते दुग्धउत्पादन दोन्हीमधे होतो. डोके संपून नाक अन जबड़ा (muzzle) सुरु होतो तिथे एक खळगा ही अजुन एक ओळख ह्या प्रजातीची.
(बीकानेरी ऊंट, चित्र जालावरून साभार)
2. जैसलमेरी ऊंट
ही जात मध्यम आकारचे ऊंट म्हणून ओळखली जाते, हिचा रंग फिकट कथ्था असतो बहुतकरुन . ह्यांचे पाय काटकुळे असतात अन जबड़ा छोटा असतो, वाळवंटी ऊंट असल्यामुळे ह्यांच्या पापणीवर सुद्धा बरेच केस असतात, ह्यांचे शरीरावर असलेले केस तुलनेने थोड़े कमी लांबीचे अन रखरखित असतात. दुग्धोत्पादन सुद्धा थोड़े कमीच असते , एकंदरित हा ऊंट शोपीस म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.
(जैसलमेरी ऊंट, चित्र जालावरून साभार)
3.मेवाड़ी ऊंट
मेवाड़ी ऊंट ह्यांची पैदास बहुतेक उदयपुर जिल्ह्याकड़े होते, बीकानेरी पेक्षा थोड़ी बुटकी तरी मजबूत अशी ही जात वाढीव दुग्धोत्पादनासाठी (प्रत्येक वेतात रोजचे 5-8 लीटर) प्रसिद्ध आहे तसेच डोंगराळ भागात बोजड़ वजन वाहण्या करीता प्रसिद्ध आहे, ह्यांचा रंग फिक्कट ते गडद कथ्था असतो अन क्वचितप्रसंगी पांढरेशुभ्र पिलु सुद्धा होते ह्यांच्यात.
(मेवाड़ी ऊंट, चित्र जालावरून साभार)
.
(मेवाड़ी ऊंट पांढरे पिलु, चित्र जालावरून साभार)
4. कच्छी ऊंट
कच्छी ऊंट सुद्धा मध्यम बांधणीचे ऊंट असतात, ह्यांची विशेषता म्हणली तर हे ऊंट रंगाने फिक्कट असतात फिक्कट कथ्था ते भुरकट असतात रंगाने हे ऊंट, जबड़ा मध्यम लांबीचा असतो अन पापण्यावर केस नसतात ह्या ऊँटाची खासियत म्हणजे विलक्षण दमट अश्या कच्छी वातावरणात सुद्धा तगण्यालायक हे ऊंट असतात, थोडेसे मंद हालचाली असणारे हे ऊंट असतात. ह्यांच्यात बरेच वेळा खालचा ओठ लटकलेला असतो ज्यामुळे त्यांचे दात दिसतात .
(कच्छी ऊंट , चित्र जाला वरुन साभार)
ऊंट हे मुळातच अतिशय हुशार प्राणी असतात, दिशा निर्देशक अश्या काहीही खाणाखुणा नसलेले वाळवंट हे जन्मस्थान असल्यामुळे ऊँटाची स्मरणशक्ती प्रचंड शार्प असते, आमचे गाइड श्री रामजी ह्यांनी सांगितल्या प्रमाणे तर ऊंट जर एखाद्या रस्त्यावर सतत ने आण केला तर त्याला तो रस्ता तोंडपाठ होतो,बरेचवेळी तर ऊंटगाड़ीला ऊंट जोडून नेहमीच्या रस्त्यावर आणला की त्याचा सारवान (ऊंट/ऊंटगाड़ीचालक) चक्क लगाम मोकळी सोडुन गाड़ीत झोपुन जातो अन तरीही हे तेज जनावर इच्छित स्थळी अगदी बरोबर पोचते. ह्याच स्मरणशक्ती मुळे बरेचवेळी ऊंट धोकादायक सुद्धा होतात म्हणजे लहानपणी किंवा आधी कधीतरी जर एखाद्या मनुष्याने त्यांना मारहाण केली असल्यास ती लक्षात ठेऊन ऊंट नंतर त्या व्यक्तिवर हल्ला सुद्धा करू शकतात,पण एकंदरित असे किस्से खुप कमी असतात.
ह्या प्राण्याच्या ह्या बुद्धिमत्तेमुळेच केंद्रात ह्यांची विशेष निगा रखावी लागते. प्रणायोत्सुक नर अतिशय जास्त एग्रेसिव असतात व ते सतत लाथा मारत वा चावत असतात म्हणून त्यांना ठेवायला वेगळी जागा आहे.
(स्टड कोरल्स चित्र जालावरून साभार)
काही काही नाठाळ जनावरे ही प्रणयऋतू असो वा नाही कायम मारामारी मोड़ मधे असतात त्यांना ठेवायला वेगळा कोंडवाङा आहे
मॅटरनीटी वॉर्ड वेगळा इथे गाभण किंवा डिलीवरी जवळ आलेल्या अन ओल्या बाळंतिणी सांडण्या ठेवल्या जातात इथे त्यांच्या पिलांसोबत ती पिले घन आहार घेणे सुरु करेपर्यंत राहतात.
.
(मॅटरनीटी वॉर्ड)
ह्याच्या पलिकडेच मिल्क पार्लिंग एरिया आहे , इथे सांडणीची धार काढली जाते, कुठलेही यंत्र न वापरता माणसे इथे धार काढ़तात, धार काढ़ताना पर्यटक तिकडे फिरकले तर जनावरे बिचकु शकतात म्हणून तिथले फोटो नाही काढता आले (जालावर एक मिळाला तो इकडे देतो आहे)
(धार काढणे फ़ोटो जालावरून साभार)
उंटाचे बछड़े थोड़े मोठे झाले की त्यांच्यात सुद्धा टीनएजर प्रॉब्लम सारखे प्रॉब्लम असतात म्हणून त्यांना (वय वर्षे 3-5) ठेवायला वेगळे कोरल्स असतात ,
(टीनएजर कोरल्स)
उंटाच्या आहारात मुख्य समावेश असतो तो वाळवंटी खुरट्या वनस्पतींचा ह्यात बाभुळ, शमी, कडुनींब वगैरे झाडांचा समावेश असतो, लिंबोळ्या ह्या उंटाला विशेष प्रिय असतात. ह्या शिवाय केंद्रावर त्याना चराई सोडुन रोज त्यांच्या वय अन गरजेनुसार 3- 15 किलो मिश्र चारा ज्याच्यात हिरवे अल्फ़ाअल्फ़ा गवत भुईमुगाचे कुट्टी कुटार इत्यादी पौष्टिक जिन्नस दिले जातात , आठवड्यातुन एकदा 100 ग्रॅम खड़े मीठ पावशेर गुळ वगैरे पोषण सुद्धा त्यांना विशेषतः बाळांतीण असलेल्या सांडणीला दिले जाते , काही ऊंट संशोधन करायला म्हणून वेगळे बांधलेले असतात एकटे एकटे त्यांचा डाइट खुप कड़क कंट्रोल करुन ते कुठला चारा किती खातात शेण किती तयार होते त्याच्यात नत्र किती उष्मांक किती वगैरे संशोधन सतत सुरु असते.
(भुईमुग कुटाराचा ढिग)
ह्या सगळ्याशिवाय ऊंट हा वाळवंटाची कामधेनु आहेच. स्थानिक संस्कृती मधे त्याचे महत्व अपरंपार आहे, शुभकार्याला सोवळ्याचे जेवण उंटाच्या वाळल्या शेणाच्या आगीवर शिजवले जाते कारण ते शुद्ध समजले जाते, एक ऊंट (बीकानेरी जैसलमेरी) सरासरी वर्षाला 400-700 ग्रॅम केस देतो, हे केस पिंजून ते इतर धाग्यात मिसळून उबदार अन गर्मी च्या मोसमात चक्क गार राहणारी कापडं वीणली जातात, उंटाच्या कातड़ीची जॅकेट किंवा इतर उपयोगी वस्तु बनवल्या जातात. मालवाहतुक ते दूध सगळे काही करायला ऊंट उपयोगी असतो.
उंटाच्या दुधाचे वेगवेगळे खाद्य अन पेय प्रकार चाखायचे असल्यास केंद्रातच एक "कॅमल मिल्क पारलर" आहे तिथे उंटाच्या दुधाचे चहा कॉफ़ी, फ्लेवर्ड मिल्क, कुल्फी, वगैरे प्रकार विक्रीला ठेवलेले असतात. उंटाचे दूध किंचित खाराट अन मधुर असे असते, सवय नसता हे दुग्धपदार्थ ट्राय न करणेच उचीत , पचायला ते दूध कसे हे माहीती नसल्यामुळे मी तरी नाही केले ट्राय कारण आम्हाला अजुन प्रवास करायचा होता, तसे पाहता प्रोसेस केलेला पदार्थ म्हणजे फ्लेवर्ड मिल्क किंवा कुल्फी ट्राय करवायास हरकत नाही, केंद्राच्या मुख्य गेट वर हे मिल्क पार्लर आहे.
(कैमल मिल्क पारलर चित्र जालावरून साभार)
उंटाला माणसांचे निर्देश शिकवायला एक खास भाषा आहे त्या भाषेचे ज्ञान अन त्याचे उंटाला ट्रेनिंग द्यायला राजस्थान मधे एक खास जातीचे लोक बोलवले जातात त्यांना राजस्थानात राईका किंवा गुजरात मधे रेवाड़ी असे म्हणले जाते.
असे हे केंद्र तुम्हाला 2 तासात सहज पाहून होईल, आम्ही तिथे गेलो असता निघायची घाई असल्यामुळे आम्ही म्यूजियम नाही पाहिले तिथले ! पण एकंदरित स्वच्छता टापटीप माहीती अन अनुभव म्हणून खुप मजा आली
काही आमची वैयक्तिक स्मरणचित्रे (श्रेय आमचे मेव्हणे श्री. किरण)
सौ.बापुसाहेब एका ऊंट बाळाचे लाड करताना
.
बालऊंट नर्सरी
.
चराई कर्म करुन परत येणारा कळप
.
मॅटरनीटी वॉर्ड मधील निवांत मम्मी ऊंट
In reply to बापू, परत लिहायला सुरूवात केलीत हाच आनंद पुष्कळ आहे. by बोका-ए-आझम
In reply to खरंच नवीन माहीती मिळाली. by मार्मिक गोडसे
In reply to राम राम by कपिलमुनी
In reply to कमु by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लामा (Llama) म्हणजे हाच दोन मदारींचा उंट ना? by बोका-ए-आझम
"Camel" is also used more broadly to describe any of the six camel-like mammals in the family Camelidae: the two true camels and the four New World camelids: the llama, alpaca, guanaco, and vicuña of South America.हे विकिपीडिया वर सापडले
In reply to अरे वा बापूसाब. मस्तच माहीती by अभ्या..
In reply to वा अगदीच वेगळ्या विषयावर छान by उगा काहितरीच
In reply to एक नंबर लेख! बहुत धन्यवाद! by आदूबाळ
In reply to मस्तं धागा. ते पांढर्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to छान लेख by इडली डोसा
In reply to लष्कर उर्फ़ रेगुलर आर्मी मधे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to धन्यवाद सोन्याबापु साहेब! by इडली डोसा
In reply to अहो क्षमा वगैरे नको हो! प्लीज by कैलासवासी सोन्याबापु
In reply to फारच सुंदर by राही
In reply to फारच सुंदर by राही
In reply to फारच सुंदर by राही
In reply to बापूसाहेब उंटावरचा उत्तम लेख! by चांदणे संदीप
In reply to बापूसाहेब उंटावरचा उत्तम लेख! by चांदणे संदीप
In reply to बापूसाहेब उंटावरचा उत्तम लेख! by चांदणे संदीप
In reply to बापूसाहेब उंटावरचा उत्तम लेख! by चांदणे संदीप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- GeniusIn reply to वा बापूसाहेब !! एक नम्बर by चिनार
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
In reply to जबरदस्त कमब्याक हो बापूसाहेब! by स्वामी संकेतानंद
झकास धागा. क्रमश: आहे का?