अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली
एक सुनामी आली की जगबुडी झाली,
अन बाई सोडून गेली
किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली
पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली
अन बाई सोडून गेली
म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली
जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली
अन बाई सोडून गेली
तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली
तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली
तरीही बाई सोडून गेली
म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली
बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली
कशी बाई सोडून गेली
झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली
फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई मनाची झाली
हरकत नाही जरी बाई सोडून गेली
कपडे रगडू रगडू धुता, कित्येकांची मनोमन धुलाई केली
भांडी घासू घासू काढता, नकोशी बोलणी घासून काढली
बरं झालं बाई सोडून गेली
अखंड कामे करूनि अंग जरी दुखले, कंबर ढिली झाली
पाठ कामातून गेली, हातांचीही वाट पूरी लागली
ठीक आहे जरी बाई सोडून गेली
सगळेच न मिळतसे, एक हे नाहीतर ते, कायम निवड करावी लागली
आयुष्य म्हणजे घरचं बाहेरचं सांभाळत, तारेवरची कसरत सारी झाली
त्यात बाई सोडून गेली
स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही मारा, खरेच का मुक्तता मिळाली
एका बाईच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात दुसरी मुक्त झाली
शेवटी बाई सोडून गेली
स्त्रीमुक्ती वाल्यांनी समानतेसाठी आंदोलने जरी किती केली
लढण्यासाठी बाहेर त्या पडता, कोण करत असेल कामे घरातली
जर बाई सोडून गेली
काव्यरस
वाचने
9012
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही
दुसरी कामवाली शोधा..
@जेपी - Mon, 18/04/2016 - 10
In reply to दुसरी कामवाली शोधा.. by जेपी
=))
=))
हाय हाय !
अरेरे...
अहो ताई,
=))
In reply to अहो ताई, by एस
भापो म्हणजे काय रे भाउ ?
In reply to अहो ताई, by एस
लो,
In reply to भापो म्हणजे काय रे भाउ ? by संजय पाटिल
धाग्यापर्यंत
=))
मोलकरीण सोडून गेली होय!! आपण
=)) =)) 'आपण' महत्त्वाचा.
In reply to मोलकरीण सोडून गेली होय!! आपण by सूड
कर्रेक्ट !
In reply to =)) =)) 'आपण' महत्त्वाचा. by तर्राट जोकर
किंवा अर्धा तासही लागू शकतो.
In reply to कर्रेक्ट ! by सस्नेह
कविता आवडली.
मला वाटलं मोगाखान नं लिहिली
कविता छानच आहे
हा हा हा!!
प्रतिसादातला कंस काढला
In reply to हा हा हा!! by राजेंद्र मेहेंदळे
;)
:)
मस्त