एकटा !
काव्यरस
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला,
मित्र आला, तो धुरात धुसमटलेला,
आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला,
सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला,
आता तिघे, क्षण बावचळलेला..
इशारा घुमला, YZ मंदावलेला,
येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला..
आता परत आम्ही दोघे,
मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला
हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला...
(सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
वाचने
4263
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
व्यथा पोचली/भिडली. फक्त आता वेगळा चालू असल्याने अंमळ घाई झाली का कविता टाकायला?
(शेम टू शेम YZ मित्र असलेला)
Sandy
In reply to लोल! by चांदणे संदीप
फक्त आता वेगळा ऋतू चालू असल्याने...
असे वाचावे...
In reply to फक्त आता वेगळा ऋतू चालू असल्याने by चांदणे संदीप
वळीव येईल की राव आता,,, :)
In reply to अरे,,, by ब़जरबट्टू
हक्काच्या मान्सूनची चोरी आणि तुम्ही दिवाळी बोनससारख्या वळीवाची अपेक्षा धरून बसताय ! ;)
लोल...
पण भारीच काव्य...
आइशप्पाथ.
खत्तरनाक. जबरा म्हणाव का अजून काय?
.
.
माझ्या नशीबात न्हाइत राव अस्ले वायझेड. ;)
यमकारी कविता
In reply to यमकारी कविता by प्रचेतस
या प्रकाराला कविता समजल्याबद्दल धन्यवाद ! :)
कळ्ळं नाय!! कोणी कोणाच्या श्रीमुखात हाणली?
In reply to कळ्ळं नाय!! कोणी कोणाच्या by सूड
तुम्ही राहू द्या हो, आयुष्यात असेच निरागस रहा.. :)
अगदीच YZ
हाहाहा!
लोल!
हाहा
लोलवा
भारी
आज जरा व्यवस्थित वाचली अन समजली !
जबरा झालीय की !
कडक !
आवडले. पु.ले.शु.
लोल!