नमस्कार,
उसगावातील एक लोकप्रिय राज्य म्हणजे कॅलिफोर्निया. बरेच लोकांना (यात पर्यटक देखील आले) कॅली म्हणजे फक्त सॅन फ्रान्सीस्को ,एल ए ही शहरं आणी योसेमीटी नॅशनल पार्क, नापा व्हॅली ह्याच ठळक जागा माहीत असतात. पण या शिवाय तिथे अनेक अतिशय सुरेख बघण्या सारखी स्थळं आहेत. मला नैसर्गिक सौंदर्य शहरांपेक्षा जास्त आवडते. अशीच काही मला आवडलेली स्थळं मी खाली देते आहे.
टीप:- सर्व फोटो जालावरुन साभार.
१. लेक टाहो (lake Tahoe) - आम्ही उन्हाळ्यात येथे प्रथम आलो आणी याच्या प्रेमात पडलो. कॅली आणी नेवाडाच्या सीमांना लागून असलेला अती प्रचंड तलाव. चारी बाजूंना डोंगर आणी मध्ये हा अती खोल तलाव. फेरी मारायला गाडीने एक सव्वा तास लागतो. तलावाला ३ पब्लिक बीचेस आहेत. एका टोकावरून दुसरे टोक दिसत नाही, त्यामुळे समुद्राचा भास होतो. पाणी अगदी नितळ स्वच्छ. २० फूट देखील सहज तळ दिसतो.
आजूबाजूला ३-४ गावं आहेत. एके ठिकाणी वर डोंगरावर जायला केबल कार आहे. वरून तलावाचे विहंगम दृश्य दिसते. शिवाय बोटिंग ची सोय आहे.
सगळीकडे मस्त हिरवाई.
दुसऱ्यांदा येथे हिवाळ्यात आलो. आता एकदम वेगळ्या ठिकाणी आल्या सारखे वाटले. सगळीकडे बर्फाच्या पांढर्या भिंती. सगळ्या झाडांवरून ओघळणारा शुभ्र चुरा. आयुष्यात पहिल्यांदा स्की चा आनंद घेतला. बरेच वेळा आपटून देखील उत्साह कायम होता. दुसरा साधा आणी मजेदार प्रकार म्हणजे ट्युबींग. रबराच्या मोठ्या ट्यूब मध्ये बसवून वर ओढत नेतात आणी मग आपण बर्फा वरून घसरत खाली यायचं. नुसती मज्जा.
मग मात्र या ठिकाणी येत राहिलो. दर वेळेला वेगळा अनुभव व तलाव पहिले पेक्षा सरस वाटायचा. कोणी चुकूनही चुकवू नये असे ठिकाण.
२. रेडवुड नॅशनल पार्क- कॅली आणी ओरेगॉन च्या सीमेवर असलेलं पार्क. आपलं अस्तित्व किती नगण्य आहे याची प्रचीती ठळक करणारी ही जागा. इथे येई पर्यंत मी फक्त नारळ पोफळी किंवा सुरू ची झाडं उंच बघितली होती. पण आपण मुंगी वगैरे झालो की काय असे वाटायला लावणारे ही अती महाकाय वृक्ष बघितली आणी एकदम वेगळ्याच दुनियेत आलो. अक्षरश: 'हनी आय श्रंक द कीड्स' पिक्चर मध्ये घुसल्या सारखं वाटलं. ३-४ लोकांनी हात धरून रिंगण केले तरीही त्या वृक्षांना मिठी मारण शक्य नाहीये. मान वर करून पाठीला टेकली तरी त्यांची उंची संपत नाही. हजारो वर्षा पासून अस्तित्वात असलेलं ते जंगल बघितलं की डोळ्याचं पारणं फिटतं. काही काही वृक्ष इतके मोठे आहेत की अख्खी कार त्याच्या खोडाच्या बोगद्यातून आरपार जाते. आणी ते महावृक्ष अजूनही जिवंत आहे. काही जुन्या पडलेल्या खोडांपासुन पूर्णं १२-१३ फूट बाय ३०-४० फुटाचे सलग घर केले आहे.
ठणठणीत दुपार असताना जेमतेम खाली पोचणारी उन्हं. एक विलक्षण अनुभव होता.
३. मॅक वे फॉल, बिग सर (Big Sur) - एक दिवसाची छोटेखानी ट्रीप करायला मस्त जागा. दणादण पडणारा धबधबा सगळ्यांना आवडतो. तसेच पांढरी शुभ्र वळू असलेला समुद्र किनारा देखिल. आता कोणी सांगितला की ह्या दोनही गोष्टी एकत्र केल्या तर !!! मज्जाच मज्जा.
बिग सर ला एक मस्त धबधबा डायरेक्ट ८० फूट खालच्या बीच वर पडतो. दोन लाडक्या गोष्टी अश्या अनपेक्षित एकत्र आल्या म्हणून ही जागा आमची लाडकी होती. दुर्दैवाने त्या बीच ला थेट रस्ता नाही. पण स्वतःची बोट असेल तर समुद्र मार्गे बीच वर जाता येतं.
४. पॉइंट रेयस (Point Rayes) - मैलोंनमैल लांब बऱ्यापैकी सरळ असलेल्या पॅसिफिक चा किनारा मध्येच एका ठिकाणी आत शिरला आहे. जुन्या काळी तेथे हमखास बोटी आपटायच्या. म्हणून तिथे एक लाइट हाउस बांधले. समुद्राचा नीळा रंग आणी खडकाळ किनार्यावर आपटणार फेसाळ पांढरं पाणी. सण सण वाहणार थंड बेभान वारा. एकूणच फार रमणीय आणी आल्हाददायक वातावरण. वरून ते छोटंसं लाइट हाउस एकदम गोंडस दिसतं. काहीशे पायऱ्या उतरून लाइट हाउसला जाता येत. सुरेख जपलं आहे. मूळ पितळी दिवा, एकट्या गार्ड ची खोली, इतर काही अवजारं, सगळं जसं च्या तसं.
पण दिवसा उजेडी ती जागा कितीही सुंदर दिसली तरी रात्री च्या काळोखात, रोरावणाऱ्या वाऱ्यात आणी प्रचंड उसळणाऱ्या लाटा झेलत तो एकटा गार्ड कसा राहायचा ते देवाला ठाऊक.
५. सॉलव्ह्यॅंग (Solvang) - मानव निर्मीत असली तरी एकदम गोड जागा. इथे एका डॅनिश गावाची हुबेहूब प्रतिकृती उभी केली आहे. युरोपियन गावाचा फील देणारी छोटी छोटी घरं, गल्ली बोळ, कॉफी शॉप्स, दुकानं इतकंच काय मस्त छोट्या पवनचक्क्या देखील आहे. अप्रतिम कॉफी, पेस्टरीज आणि चॉकलेटं. शिवाय जेवणात विविध Sandwiches आणी Pie. इथे टिणुकले डॅनिश जोडे व अतिशय गोड बाहुल्या आपले लक्ष वेधून घेतात.तसेच अप्रतिम क्रॉस स्टीच नी भरलेली पेंटिंग्ज. पर्यटकांसाठी खास जुन्या काळ च्या घोडे गाडी आहेत. नक्की चक्कर मारावी. मस्त दणकट उंच आणी उमदी जनावरं. छोट्या छोट्या उपाहारगृहांसमोर त्यांची वाद्य व नृत्य पण सादर केली जातात. आवर्जून भेट द्यावी अशी जागा.

वाचने
10193
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप मस्त फोटो आणि माहीती.
माहिती व फोटू आवडले.
आवडले
अहाहा!!
मस्तं जागा, मस्तं फोटो.
रेड्वुड फॉरेस्ट
सोल्वांग सिटीला भेट दिली आहे
सुंदर जपलेलं सुंदर ठिकाण!
वा, मस्त रिफ्रेशिंग वाटलं..
वा! मस्त नेत्रसुखद जागा.
छान ,
अहाहा काय निसर्गसौंदर्य !
मस्तच!
१९९१ मध्ये हा महाप्रचंड वृक्ष
In reply to मस्तच! by बोका-ए-आझम
बोगदा - रेडवुड
In reply to १९९१ मध्ये हा महाप्रचंड वृक्ष by श्रीगुरुजी
मी पाहिलेला हा वृक्ष नाही. तो
In reply to बोगदा - रेडवुड by आनंदयात्री
सुंदर!
सुंदर लेख व प्रकाशचित्रे!
काका, माउंट शास्ता आणी क्रेटर
In reply to सुंदर लेख व प्रकाशचित्रे! by श्रीगुरुजी
माऊंट शास्ता वेगळा आणि शास्ता
In reply to काका, माउंट शास्ता आणी क्रेटर by मानसी१
ओकेके. आमचं मिस् झालं वाटते.
In reply to माऊंट शास्ता वेगळा आणि शास्ता by श्रीगुरुजी
ही शास्ता लेकची माहिती
In reply to ओकेके. आमचं मिस् झालं वाटते. by मानसी१