चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)
लेखनविषय:
काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2
तुज्या वीन राहु कसा
गीत हे गाऊ कसा
स्वप्न हे पाहू कसा
तुज्याच प्रीतीचे
काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2
भास सारे हे छळती
भाव मजला न कळती
साद का ऐकू येते
सांग ना रे......
का कुठे मी हरवतो
मीच मजला मिरवतो
चाहुली का पुन्हा या
सांग ना रे
परतुनी ये तू ग पुन्हा...
सांग वेडे माझा गुन्हा
ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी...
आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
भान नाही मनाला
साजणी ग...
स्पर्श पुन्हा करुदे
हात हाती धरुदे
आज मिटूदे अबोला
सजणी ग....
जिव माझा आतुरला
ध्यान नाही माझे मला...
ऐकुदे....मज पुन्हा...आज प्रेमाची कथा...
वाचने
2371
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)
कोणता चित्रपट? सिच्युएशन काय आहे? त्याच्या आधी व नंतर काय होते? गीताच्या चित्रिकरणात काय होते?
In reply to (चित्रपट गीत लिहिण्याचा by तर्राट जोकर
आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
भान नाही मनाला
साजणी ग...
स्पर्श पुन्हा करुदे
हात हाती धरुदे
आज मिटूदे अबोला
क्या बात है...!
दाटी वाटी, छळती कळती, पुन्हा गुन्हा, वारा गारा, करुदे धरुदे...
एकापेक्षा एक सरस.
येउं द्या अजून.
In reply to खूपच छान by प्रचेतस
सुक्ष्म रसग्रहण, व्वा!. आणखी एक, हे चित्रपट गीत कितीतरी मजल्यांचे आहे हे लक्षात आले का वल्लीसाहेब?
In reply to सुक्ष्म रसग्रहण, व्वा!. आणखी by तर्राट जोकर
प्रेमात पुढे पुढे जाताना करावी लागणारी मजल दरमजल आहे ही.
In reply to प्रेमात पुढे पुढे जाताना by प्रचेतस
"लिफ्ट" न मिळाल्याने करावी लागणारी मजल दरमजल आहे काय? कारण आजकाल प्रेमातही "लिफ्ट " (कधीमधी गिफ्ट) मिळू शकते असे पोपशास्त्रींचे म्हणणे आहे.
पोपवचन नितवाचक नाखु
आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
ओ भौ भाइर गारा पडतायत....टकुर फुटल ना र बाबा.
In reply to आज बेधुंद वारा by होबासराव
स्वारी, वारा ला यमक लागलं नाही म्हणुन गारा टाकल्या.
हे बघा कसं वाटतंय?
आज बेधुंद वारा
कढईत गरम झारा
किंवा
आज बेधुंद वारा
निवृत्त झाला लारा
किंवा
आज बेधुंद वारा
आकाशी एक तारा ( हायला, हे जमलं की चूकून ;-))
In reply to स्वारी, वारा ला यमक लागलं by तर्राट जोकर
_/\_ तजोसाहेब...
In reply to स्वारी, वारा ला यमक लागलं by तर्राट जोकर
१. आज बेधुंद वारा
साथीस पाऊसधारा
२. आज बेधुंद वारा
मज तूच किनारा
३. आज बेधुंद वारा
प्रितरंग हा न्यारा
४. आज बेधुंद वारा
बोल तुझा मज प्यारा
५. आज बेधुंद वारा
खुला आसमंत सारा
६. आज बेधुंद वारा
सहवास तुझा प्यारा
७. आज बेधुंद वारा
विसरु ज़माना सारा
इ.
In reply to हे पण घ्या- by सुधीरन
होबासराव, बघा. बरसल्या की नाही गारा? =))
In reply to हे पण घ्या- by सुधीरन
आहे विचित्र थोड़ी तरी समर्पक वाटते म्हणून लिहिली...सुचनांचा जरुर विचार करेंन
छान जमले आहे!
आज बेधुंद वारा
वाढला उन्हाचा पारा
येऊ दे पावसाच्या धारा
.
.
.
[ पुढे काय बरे ? हं ' आठवले ' ]
चला आता घरी जाऊ .
In reply to आज बेधुंद वारा by नुस्त्या उचापती
आठवले म्हणून पाठवले!
आज बेधुंद वारा
वाढला उन्हाचा पारा
येऊ दे पावसाच्या धारा
मग बसु घेउन व्हिस्कि आणि खारा
In reply to आज बेधुंद वारा by होबासराव
मस्तच होबासराव!
(चित्रपट गीत लिहिण्याचा