झेंडूची फुले
लेखनविषय:
काव्यरस
"दाखिव सखया मजला तू
काय ठेविलास लपवुनी?
आणिलास गेंद गुलाबाचे
बागेतुनी कुठल्या (चोरुनी?)
गजरा किंवा आणिलास
तू (दहा रुपये खर्चूनी?)
आणिलास नभिचे तारे वा
तव हस्ताने याच तोडूनी?"
"काय करायचे त्या
गुलाबांचे सजावटी?
काय करावे की
गजरा अन तो माळुनी?
काय करतेस ते
नभीचे तारेच आणि?
प्रिये तुजसाठीच
'झेंडूची फुले' आणिली
वाचू आस्वादू
चल तो काव्य रस चाखू
न विसरु ते खाण्या
आतिल खोबरे परंतु!"
वाचने
2349
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
ह्म्म्म..
झेंडूची फुले, फुकट आहे आंजावर
हे आत्मलिखित आहे काय?
छापिल प्रत आहे माझ्याकडे!
हो, स्वरचित कविता आहे!
In reply to हो, स्वरचित कविता आहे! by सुधीरन
आमच्या एका मित्रांचेही हे
In reply to आमच्या एका मित्रांचेही हे by प्रचेतस
कोण हो हे मित्र? ;
In reply to कोण हो हे मित्र? ; by बोका-ए-आझम
आपले नेहमीचेच. :)
छान! ते पुस्तक मिळते का बघतो.
In reply to छान! ते पुस्तक मिळते का बघतो. by सुधीरन
सध्या ही प्रत दुर्मिळ आहे.
हेच का?