मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ

वाचने 899 वाचनखूण प्रतिक्रिया 3