शेअरबाजार : 'डिस्काऊण्ट...पहावा मिळवुन' !!!
"चिरंजीव शेअरबाजारांत करियर करणार आहेत म्हणे...." अशी माझ्या (कु)प्रसिध्दीची नुकतीच सुरवात होवु लागलेला, 20 एक वर्षांपुर्वीचा काळ, पोटापाण्याचे काहितरी बघावे या विवंचनेत घराबहेर पडलेला मी टळटळीत दुपार झाल्याने घरी परतण्यासाठी बस स्टॅंड्वर उभा होतो, तितक्यांत माझ्या ओळखीचे एक सदगृहस्थ व त्यांच्या पत्नी सुहास्य वदनाने येताना दिसले. दोघांच्याही हातात एक/एक ड्रायफ्रुटसचा पॅक !!... तो जमाना असे बॉक्स फक्त दिवाळींत मिळण्याचा होता. मी एखाद्या गोलंदाजाने पंचांकडे केवळ औपचारिकता म्हणुन अपील करावे, तसे नुसतेच मान व डोळे हलवुन बॉक्सकडे पहात 'आज काय विषेष??' अशी विचारणा केली. झाSSSले... पानशेतचा प्रलय प्रलय म्हणजे काय असेल..त्याची अनुभुती मला पुढच्या काही वेळांत आली
(नशीबवान आहात तुम्ही, येथे मी तुम्हांला फक्त सारांश सागतोय....) मुद्दा असा होता की हे साहेब काही ठराविक कंपन्याचे प्रत्येकी २ शेअर्स घरातील प्रत्येकाच्या नावे घेत. आणि मग हे आख्खे 'शेअरहोल्डर्स' कुटुंब अशा कंपन्यांच्या पुणे शहरांत होणाऱ्या 'वार्षिक सर्वसाधारण सभेला'(AGM) अगदी न चुकता हजेरी लावे....."सभा ही कोणत्यातरी पॉश ए.सी सभागृहांतच होणार, तास दोनतास छान विश्रांती…..मस्त सरबराई होते,आणि वर अशी सप्रेम भेट मिळते...शिवाय डिव्हीडंड आहेच, तो कुठे जातोय??" श्री काका उवाच. मला उगीचच मेसच्या जेवणाचे आवढण आले की शोधुन शोधुन काढलेल्या मित्र/नातेवाईकांकडे संध्याकाळी उशीरा जाणारे माझे होस्टेलवर रहाणारे मित्र आठवले.
"...बघ, XXXचे मुळ शेअर्स घ्यायला दहा हजार पण नाही लागले, आत्ता मार्केट व्हॅल्यु कैकपट आहे, पुर्वी माझ्या एकट्याच्या नावे होते, आता डि-मॅटची सोय झाल्याने तेच शेअर्स तिघांच्या नावे केले. तेवढीच एखाद्-दुसरी गिफ्ट एक्स्ट्रॉ. उगीच सोडा कशाला?? नाही का..” म्हणुन ते गडगडाटी हसले. काकांच्या या उद्गारांतुन मला मात्र शेअरबाजारांतील गुंतवणुकीचा एक नवा धडा मिळत होता.
एक मात्र आहे,कोणत्या कंपनीची AGM पुण्यांत होते आणि कोणाच्या 'पाहुणचाराचा' दर्जा किती आहे याचा या काकांचा अभ्यास जबरदस्तच होता..
पुढे काही दिवसांनी सुदर्शन कंपनीतील माझे एक वरिष्ठ सहकारी माझ्याकडे आले, त्यांना TELCO मध्ये एक F.D.करावयाची होती. फोर्मवरील 'शेअरहोल्डर्सना अर्धा टक्का जास्त व्याज' ही ओळ पहाताच माझ्या मनांत श्री. काकांचे मौलिक विचार विजेसारखे चमकुन गेले.. 'सर, आपण दोन/तीन दिवसांनी करुयात F.D...." मी म्हणालो. "आधी 02 शेअर्स विकत घेवुन शेअरहोल्डर बनु... दोन शेअर घ्यायला जेमतेम 250 रुपये लागतील, जे ही फुकट जाणार नाहीतच मात्र त्यामुळे आपल्याला पुर्ण डिपॉझिटवर दरवर्षी अर्धा टक्का जास्त व्याज मिळेल.." आयडियेच्या ह्या कल्पनेने माझ्यातला आर्थिक सल्लागार आणि सरांमधला एक गणिती..दोघेही खुष झालो..
'एखादी गोष्ट दोनदा घड्ली ..की ती वारवार घडते Everything that happens once may never happen again. But everything that happens twice will surely happen a third time " असा काहीसा एक सिद्धांत आहे म्हणे, खरे खोटे देवास ठावुक.. पण मला त्याचा प्रत्यय आला. काही कारणाने माझ्या ओळखीच्या एका समव्यवसायी गुजराथी मित्राला भेटायला चर्चगेट्ला गेलो असता पठ्ठ्या 'ताज' मध्ये नाश्ता करावयास गेला आहे असा गौप्यस्फोट त्याने फोनवरुन केला.....त्या काळी अगदी सचिन तेंडुलकरनेही असे करणे धाडसाचे झाले असते तिथे 'ह्याची' काय कथा??.. सहाजिकच मी चक्रावुन गेलो. पुढे अलिबाबाच्या गोष्टीतील कासिमच्या पत्नीला जसे 'भानगड काय आहे?' हे कळल्याशिवाय रहावले नव्हते तसेच माझे झाल्याने मी तो भेटल्यावर हळुच विषय काढला तेंव्हा खुलासा झाला.. "अरे यार, ये इंडियन हॉटेल वाले शेअरहोल्डर्स को 30% डिस्काउंट वाली कुपने देते है....एक बडा 'बकरा' मिला था..सोचा..थोडा ईंप्रेस कर दुं.." थंडपणे तो म्हणाला. ईकडे मी मात्र ‘ह्या ताजचे मालक असलेल्या इंडियन हॉटेलवाल्यांची AGM कुठे होत असेल बरे??' या विचाराने श्री.काका झालो होतो.
दरम्यानच्या काळांत रिलायन्स, अरविंद मिल्स, मफतलाल, रेमंड्स सारख्या कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना कंपनी शोरुममधुन खरेदीसाठी 15/20% भरघोस सवलत देतात हे मला पहावयास मिळाले. मला मिळालेली अशी कुपन्स मी कोणा ईच्छुकांस आवर्जुन देत असे आणि ‘नाखुन काट के शहिद होना’’ असा काहीसा वाकप्रचार हिंदीत आहे, त्याचा प्रत्यय घेत असे. ‘हॉकिन्स कुकर्स’ हे आणखी एक नाव मला येथे जोडावे लागेल. ही कंपनीही भागधारकांना तिच्या उत्पादनांवर 20% सवलत देते ज्याचा वापर करुन मी आमच्या संसारातील पहिला फ्युचुरा नॉनस्टीक संच घेतला.
अनेक जगप्रसिद्ध महिलांप्रमाणेच माझ्या कन्येला सतत नवनवीन चप्पल्स,सॅंडल्स वापरायचा सोस आहे. मुलीचे पाय चप्पलांत (तेही निरनिराळ्या) दिसल्याने त्रस्त होतात्सा तिच्या एका वाढ्दिवशी गुरुवर्य श्री. काकांचे आदरपुर्वक स्मरण करुन मी तिच्या व माझ्या डि-मॅट खात्यांत 'बाटा' कंपनीचे दोन दोन शेअर्स घेतले. पाच एक वर्षे झाली असावीत, मला आठवते मला 310 च्या भावाने साधारण 1250 रु.चे आसपास गुंतवणुक झाली. हे 'बाटा'वाले प्रत्येक शेअरहोल्डरला 20% सवलतीची 02 कुपन्स देत असल्याने चप्पल्स पर्सेस ई. 'अत्यावश्यक'(?) खरेदीपोटी मला दरवर्षी किमान 600/700 रुपये डिस्काउंट मिळतो. कंपनी दरवर्षी 60/65% लाभांश देते, आणि शेअरचा भाव वाढतो ते निराळेच (आजचा भाव रु. 525).
शेअर्स का घ्यावे आणि शेअर्सच का घ्यावे अशी भुमिका नेहमीच अहममिकेने मांडणारा मी आज ह्या अशा ‘ऑफ-बीट’ गोष्टींकरता वेळ का दवडतोय असे अनेकांना वाटल्याशिवाय रहाणार नाही. पण एकापेक्षा एक क्लिष्ट कायदे, चक्करदार वाजवुन दर्दी लोकांच्या टाळ्या घेणारे उस्तादही जसे नवीन, शिकावु प्रेक्षकांसाठी तबल्यावर रेल्वेचा, पाउसाचा आवाज काढणे असे सोप्पे प्रकार करतात (आणि त्यात गैर काहीही नाही असे मी मानतो)… तसेच काहीसे हे आहे.
अर्थात उत्तम, ब्ल्यु-चीप शेअर्स मधील दीर्घकालीन गुंतवणुकीची भुमिका केवळ कुपने वा एखादे उत्तम जेवण वा गिफ्ट मिळविण्यापुरती मर्यादित ठेवणे म्हणजे घरांतील असलेल्या ऐतिहासिक तलवारीचा उपयोग कांदे बटाटे भाजी चिरण्यासाठी करण्यासारखे वा दारी असलेल्या कल्पवृक्षापासुन फुकट पाने मिळतात त्यातुन पत्रावळींचा व्यवसाय करण्यासारखे आहे, अगदीच हल्लीच्या भाषेत A.T.M.चा वापर आतील A.C ची थंड हवा अनुभवण्यासाठी करण्यासारखे आहे असे माझे मत आहेच.
आणि हो..महत्वाचे. अशा गिफ्ट/डिस्काउंट कुपन्स देणारी कोणतीही कंपनी म्हणजे अगदी डोळे झाकुन खरेदी करावी अशी उत्तम कंपनी, असे मला बिलकुलच सुचवायचे नाही. किंबहुना बाजारांतील भविष्यकाळांतील भाव वा लाभांश अशा गोष्टींप्रमाणेच ही कुपन्स वा गिफ्ट्स मिळतील याची कोणतीही हमी नसते बरं का. उलट खरेतर हल्ली कंपनी कायद्यान्वये कंपनीच्या वार्षिक वा कोणत्याही सभेत थेट भेटवस्तु वाटण्यावर निर्बंध आहेत. मात्र सवलतीची कुपन्स देण्यावर अथवा सभेस उपस्थित सभासदांचे आदरातिथ्थ्य करण्यावर मात्र असे निर्बंध नाहीत.
तर मंडळी, हे सारे, या लेखाचे, सव्यापसव्य करण्याचे कारण, म्हणजे कालच वाचलेली एक बातमी.
जर्मनीतील प्रख्यात Daimler AG या, जगांतील लक्झरी कार बनविणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) दोन शेअरहोल्डर्समध्ये चक्क बाचाबाची झाली ज्यात कंपनी व्यवस्थापनाला मध्यस्थी करुन दिलगिरी व्यक्त करावी लागली.
….निमित्त होते सभेनंतरच्या Buffet मध्ये कमी पडलेल्या खाद्यपदार्थांचे. जर्मनीत म्हणे अशा सभांनंतर भरगच्च मेनु असलेला ‘अल्पोपहार’ ठेवण्याचा प्रघात आहे, ज्याचा हजारो शेअर होल्डर्स फन्ना उडवतात…येथे sausage चे पाउचेस कमी पडण्याच्या शक्यतेने हा अनावस्था प्रसंग ओढवला..
शेवटी घरोघरी मातीच्याच चुली..दुसरे काय. – प्रसाद भागवत
वाचने
31942
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
:)
AGM मध्ये अशा भेटी मिळत असतात
In reply to AGM मध्ये अशा भेटी मिळत असतात by प्रचेतस
लेखात लिहिल्याप्रमाणे पुर्वी
In reply to AGM मध्ये अशा भेटी मिळत असतात by प्रचेतस
कमिन्स, किर्लोस्कर,सुदर्शन,
In reply to कमिन्स, किर्लोस्कर,सुदर्शन, by प्रसाद भागवत
दुर्दैवाने एकाही पुणेस्थित
In reply to दुर्दैवाने एकाही पुणेस्थित by प्रचेतस
तुम्हाले
In reply to तुम्हाले by नाखु
धन्यवाद.. टक बनविणार्या
In reply to धन्यवाद.. टक बनविणार्या by प्रसाद भागवत
त्यो वल्लींना
In reply to त्यो वल्लींना by नाखु
अगागागागा =))
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by सतिश गावडे
बहुतेक चित्रपटांत नायक गोल्ड
In reply to बहुतेक चित्रपटांत नायक गोल्ड by प्रसाद भागवत
ते ही आहेच म्हणा.
In reply to ते ही आहेच म्हणा. by सतिश गावडे
अनेक लोक हा मार्ग स्विकारतात
मस्त लिहिलय, नविन माहिती
भागवतजी,
In reply to भागवतजी, by भंकस बाबा
कोल इंडिया घेऊनच ठेवा. सलग
In reply to भागवतजी, by भंकस बाबा
मला REC पेक्षा पॉवरग्रीड आणि
In reply to मला REC पेक्षा पॉवरग्रीड आणि by प्रसाद भागवत
बँकिंग चे शेअर हल्ली का पडत
In reply to बँकिंग चे शेअर हल्ली का पडत by स्पा
आपल्या बहुतेक राष्ट्रीकृत
In reply to आपल्या बहुतेक राष्ट्रीकृत by प्रसाद भागवत
धन्यवाद, icici, hdfc सारख्या
In reply to धन्यवाद, icici, hdfc सारख्या by स्पा
अगदीच तसे नसले, सरकारी
In reply to अगदीच तसे नसले, सरकारी by प्रसाद भागवत
धन्यवाद सर
रिलायन्स व रेमंड्सची कुपन्स
मी बर्याचशा कंपन्यांचा
In reply to मी बर्याचशा कंपन्यांचा by सुबोध खरे
+१
In reply to मी बर्याचशा कंपन्यांचा by सुबोध खरे
असे सेल मर्यादित कालवधीकरिताच
मस्त लेखं …. १+
वाह उस्ताद, वाह!
उत्तम लेख!
थोडासा बाळबोध प्रश्न आहे.
In reply to थोडासा बाळबोध प्रश्न आहे. by काळा पहाड
खरेतर नाही. उलट मी म्युच्युअल
In reply to खरेतर नाही. उलट मी म्युच्युअल by प्रसाद भागवत
धन्यवाद.
भागवत राव जर एखाद्या
In reply to भागवत राव जर एखाद्या by श्री गावसेना प्रमुख
गासेप्र साहेब, 52 आठवड्यांतील
In reply to गासेप्र साहेब, 52 आठवड्यांतील by प्रसाद भागवत
भागवत साहेब
In reply to भागवत साहेब by सुबोध खरे
धन्यवाद. आपल्या या विचारंशी
फंडापेक्षा अग्रेसीव ट्रेडिंग
In reply to फंडापेक्षा अग्रेसीव ट्रेडिंग by सुबोध खरे
सुबोधजी सहमत,
In reply to सुबोधजी सहमत, by भंकस बाबा
सध्या बाटा, पॉवर ग्रीड ,लेलँड
In reply to फंडापेक्षा अग्रेसीव ट्रेडिंग by सुबोध खरे
सट्टा म्हणजे काय ?
भागवत साहेब,
In reply to भागवत साहेब, by स्नेधा
हे घ्या
In reply to हे घ्या by तुषार काळभोर
पैलवान साहेब.. मनःपुर्वक
In reply to भागवत साहेब, by स्नेधा
धन्यवाद. वाचुन साधक बाधक
मान्सून चांगला झाला तर शेअर
In reply to मान्सून चांगला झाला तर शेअर by निनाद मुक्काम …
साहेब, आजही आपली अर्थव्यवस्था
In reply to मान्सून चांगला झाला तर शेअर by निनाद मुक्काम …
मॉन्सून चांगला झाला तर
In reply to मॉन्सून चांगला झाला तर by सुबोध खरे
मोटार सायकल... बाकी सहमत फक्त
In reply to मॉन्सून चांगला झाला तर by सुबोध खरे
होय सुबोध सर,
In reply to होय सुबोध सर, by भंकस बाबा
मार्गद्र्शन वगैरे शब्दांची
In reply to होय सुबोध सर, by भंकस बाबा
समजा, तुम्ही एका मिट्ट अंधार
In reply to समजा, तुम्ही एका मिट्ट अंधार by प्रसाद भागवत
यात एक खोच आहे.
In reply to यात एक खोच आहे. by सुबोध खरे
डॉक्टर्साहेब, आपण म्हणता त्या
In reply to डॉक्टर्साहेब, आपण म्हणता त्या by प्रसाद भागवत
भागवत साहेब
In reply to यात एक खोच आहे. by सुबोध खरे
कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो
In reply to कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो by प्रसाद भागवत
भागवतजी,
In reply to भागवतजी, by भंकस बाबा
बाबाश्री, '... आपण या
In reply to यात एक खोच आहे. by सुबोध खरे
कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो
In reply to यात एक खोच आहे. by सुबोध खरे
मी एप्रिलमधे मान्सुन्चा
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)
उत्तम लेख आणि माहितीपूर्ण
उत्तम लेख
माझ्या सततच्या शेअरबाजाराशी
In reply to माझ्या सततच्या शेअरबाजाराशी by प्रसाद भागवत
एक बॉण्ड जर दहा लाखांचा असेल
In reply to एक बॉण्ड जर दहा लाखांचा असेल by एस
येस बॉस. सहमत. पण हे असेच आहे
In reply to येस बॉस. सहमत. पण हे असेच आहे by प्रसाद भागवत
रिस्क रिटर्न्स पहाता ही योजना
In reply to रिस्क रिटर्न्स पहाता ही योजना by काळा पहाड
पहाड्साहेब,होय.आपण व्यक्त
सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा
In reply to सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, शेकड्यानी
In reply to डॉक्टर साहेब, शेकड्यानी by प्रसाद भागवत
इथे एक
In reply to इथे एक by ज्ञानव
त्यादिवशी तो शेअर ७ पर्यंत
मस्त लिहिता तुम्ही
In reply to मस्त लिहिता तुम्ही by स्वीट टॉकर
धन्यवाद..
कॅस्ट्रॉल (ई) बद्द्ल काय मत
In reply to कॅस्ट्रॉल (ई) बद्द्ल काय मत by वेदांत
सर्वाधिक वेळा बोनस देणारी आनि
धन्यवाद.
टायटन ने दिड महिन्यात २०%
एक शंका...कदाचीत धाग्याच्या
In reply to एक शंका...कदाचीत धाग्याच्या by टवाळ कार्टा
लागेल..05 शेअर्सची एकुण (
In reply to लागेल..05 शेअर्सची एकुण ( by प्रसाद भागवत
अच्छा...धन्यवाद
In reply to अच्छा...धन्यवाद by टवाळ कार्टा
खरेदी व मग विक्री यामधे १
Sovereign Gold Bond
In reply to Sovereign Gold Bond by सिरुसेरि
Sovereign Gold Bond Scheme
In reply to Sovereign Gold Bond by सिरुसेरि
व्यक्तीशः मी या योजनेत काही
Y'day Wipro announced a share