मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी अजून जिंकलो नाही

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
म्हणतात ना , अंत भला तो सब भला , हेच खरे . सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला वाईट न म्हणनेच बरे वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई हरलास तू , असं कुणी बोलत असेल अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं म्हणावं , जिंकला आहेस तू , मी हरलो नाही शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही - अभिषेक पांचाळ

वाचने 1840 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चांदणे संदीप 05/04/2016 - 11:07
सुंदर कविता! मिपाच्या गदारोळात हे चांगल कुठेतरी दुर्लक्षित व्हायला लागलंय! :( Sandy