मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गरिबाला विचार

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ? दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ? नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ? - अभिषेक पांचाळ

वाचने 1224 वाचनखूण प्रतिक्रिया 4