भटकंती लंडनची.. खेळवेड्यांसाठी!
"व्हेन यू आर टायर्ड ऑफ लंडन, यू आर टायर्ड ऑफ लाइफ..." असे कोणीतरी म्हणून ठेवलंय...
माझ्या मते हे शहर एका मस्त, मोठ्या बुफे टेबल सारखं आहे. इथे प्रत्येकाच्या आवडीचं, रुचीचं काही ना काहीतरी आहेच. इतिहास प्रेमींसाठी टॉवर ऑफ लंडन, चर्चिल वॉर रूम्स आहे. कला, संगीत, स्थापत्यकलेमधे रुची असणार्या लोकांना सेंट पॉल्स कॅथेड्रल आहे. इथली असंख्य संग्रहालये, आर्ट गॅलरीज आहेत, थियेटर्स आहेत. लहान मुलांसाठी लंडन झू, हॅरी पॉटर वर्ल्ड आहे. राणीचा राजवाडा आहे, लंडन आय, फेरफटका मारायला थेम्सचा किनारा, रीटेल थेरेपी साठी अख्खा ऑक्स्फर्ड स्ट्रीट आहे आणि खेळ वेड्यांसाठी ... अर्थातच लॉर्ड्स आणि विम्बल्डन आहे.
जगभरातल्या टेनिस आणि क्रिकेट शौकिनांसाठी विम्बल्डन आणि लॉर्ड्स वर जाऊन प्रत्यक्ष मॅच बघण्यासारखी सुखाची गोष्ट नाही. पण लंडन मधे जर तुम्हाला कमी वेळ असेल तर दुसरा बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे या दोन्ही ठिकाणी गाइडेड टूर्स घेणे. मॅच न बघता सुद्धा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड आणि विम्बल्डन स्टेडियम प्रत्यक्ष बघण्याचा उत्तम पर्याय आहे हा! जेव्हा मॅच बघणं जमेल तेव्हा जमेल पण तोपर्यंत या तीर्थक्षेत्रांचे निदान दर्शन तर घेऊ असा विचार करून आम्हीही हा पर्याय घ्यायचे ठरविले. आधी बुक केली लॉर्ड्स ची टूर. सकाळी अकराची वेळ मिळाली होती. आठवड्याचा अधला-मधला दिवस असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती.
वेलकम टू लॉर्ड्स, होम ऑफ क्रिकेट

डावीकडे अॅशस अर्न आणि उजवीकडे अॅशस ट्रॉफी
ही अॅशसची गोष्ट टूर गाइड सांगत होता पण माझं पूर्ण लक्ष होतं अर्थात प्रुडेन्शियल वर्ल्ड कप १९८३ कडे..
१९७५ मधे सुरू झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप चे पहिले तीन सामने इंग्लंड मधेच पार पडले. या तिन्ही कप्सचे प्रयोजक होती प्रुडेन्शियल पी एल सी कंपनी.
या संग्रहलयात अजूनही बर्याच गोष्टी आहेत. खेळाडूंचे पोर्टेट्स, डॉन ब्रॅडमन सारख्या दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट किट्स, जुने बॉल्स, बॅट्स, कागदपत्रे आणि पत्रव्यवहार इत्यादी.
म्युझीयम नंतर आता आम्ही लॉर्ड्स पॅविलियन कडे वळलो.
फोटोत उजवीकडे गॅलरीचा भाग दिसत आहे..
लॉर्ड्स गॅलरी-- डावीकडची इंग्लिश आणि उजवीकडे जी दिसते ती पाहुण्या संघाची..
दोन गॅलरिजच्या मधे खालचा मजल्यावर दिसतेय ती जगप्रसिद्ध लॉंग रूम. इथे फोटो मात्र काढू देत नाहीत. प्रत्येक खेळाडू हा ड्रेसिंग रूम मधून तयार होऊन खाली येतो मग लॉंगरूम मधून चालत, सगळ्या MCC सभासदांचे अभिवादन स्वीकारत इथल्याच दारातून खाली ग्राउंडवर उतरतो. मॅचच्या वेळेस प्रेक्षकांच्या प्रचंड आवाजाने, गदरोळाने इथे टांगलेली झुंबरे कधी कधी थरथरतात.
लॉर्ड्स ग्राउंड हे MCC ( Marylebone Cricket Club ) या क्रिकेट क्लबच्या अखत्यारीत येतं.
१९९९ पर्यंत इथे स्त्रियांना मेंबरशिप मिळत नसे . MCC च्या या भेदभावामुळे एक ईंग्लंडची राणी सोडली तर सामन्यादरम्यान कुठल्याही स्त्रीचा प्रवेश या pavilian मधे निषिद्ध असे. प्रत्यक्ष लॉर्ड्सच्या क्रिकेट ग्राउंड बदद्ल मी काय बोलणार? बस, नाम ही काफ़ी है....
धंकु ग
झकास!
जबर सफर !
मस्तच.
झक्कास..!!!!
मस्त
मस्त झालीये टुर. कधी आलोच
लंडन वर्ल्ड कप बघायची इच्छा
हि दोन्ही ठिकाणे २००७ मध्ये
आवडली ओळख!
मस्त!
काही नावं बघूनच लेखांचा अंदाज
खेळनगरी लंडनची आगळीवेगळी सहल
क्रिडा विषयी सुंदर लेख
मस्तच पद्मावती!
वेगळ्याच प्रकारची भटकंती
वेंबली आणि ओल्ड ट्रॅफर्ड
लेख आवडला.
मस्त!
लेख तुझं नाव वाचून उघडला आणि
आगळी भटकंती आवडली!!
वावा..
सुरेखच!!! डोळ्याचे पारणे
अरे वा छान वर्णन केलंय.
खूप छान वर्णन आणि फोटो.
लाॅर्ड्सवर पाय ठेवला ते
Mast lekh....