मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोबी कोफ्ता करी ..

पियुशा · · पाककृती
कोबी कोफ्ता करी .. आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात मला स्वत:ला कोबी फार आवडतो. पण मग कधी कधी इतराना आवडत नाही म्हणून कोबी घेण आपोपाप टाळल जात म्हणून नेटवर कोबीच्या वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली सगळ्यांना खूप आवडली देखील, म्हणून आता हा लेखन प्रपंच साहित्य : (कोफ्त्यासाठी ) १) बारीक चिरलेला कोबी -२ वाट्या. २) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून. ३) लाल तिखट - १ छोटा चमचा ४) बेसन - १ वाटी ५) मीठ चवीनुसार ६) तळण्यासाठी तेल ७) कोथीबीर चिरुन - २ चमचे कृती : चिरलेल्या कोबीत सर्व साहित्य मिसळून थोड किंचित पाणी घालून घट्टसर कालवून त्याचे लहान लहान गोळे करून घ्या न थोडे चपटे ठेवा म्हणजे आतपर्यंत तळले जातील . तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व कोफ्ते तांबूस लालसर तळून घ्या . k 3 आता ग्रेवि बनवु .. साहित्य : - १) ४ मोठे tomato २) १ हिरवी मिरची ३) लाल तिखट - २ छोटे चमचे. ४ ) धने पावडर - १ चमचा . ५) जिरे पावडर - १ चमचा . ६) गरम मसाला - २ चमचे ( हा होम मेड गरम असला आहे आमचा ) ७) आल लसुण पेस्ट - १ चमचा. ८) मीठ चवीनुसार. ९) ३ मोठे चमचे तेल. १० ) हळद - १ छोटा चमचा कृती : tomato धुवून त्यात १ हिरवी मिरची घालून त्याची मिक्सीवर प्युरी करून घ्या , कढइत तेल तापवून त्यात जिरे , चिमुटभर हिंग ,अन हळद घाला , आता त्यात आधी लाल तिखट घालून घ्या ( याने ग्रेविचा रंग लाल राहतो ) मग tomato प्युरी घाला परतून परतून घ्या अगदी तेल सुटेपर्यंत , मग अनुक्रमे गरम मसाला , धना पावडर ,जिरे पावडर घाला हे करत असताना शेजारी थोड पाणी गरम करून घ्या . सर्व मसाले निट परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला न तुम्हाला जशी ग्रेवी हवी त्यानुसार गरम पाणी घाला ,थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातल्यामुळे ग्रेवीची चव टिकून राहते. आता ४-५ मिनिट ग्रेवी मंद आचेवर निट उकळून घेऊन त्यात तळलेले कोबीचे कोफ्ते घाला , बारीक चिरलेली कोथीबीर घालून सजवा यात कसुरी मेथी हि घालतात. आता २ मिनिटे वाफ काढा कोबी कोफ्ता करी चापण्यासाठी तयार आहे e यात जरा कोफ्ते विर्घळेत ;) पण चालतय ;) l * तुम्ही यात कोबी ऐवजी बटाटा / भोपळा / मेथी / तुमची आवडती कुठलीही आवडती भाजी वापरू शकता.

वाचने 15375 वाचनखूण प्रतिक्रिया 38

सस्नेह 11/03/2016 - 12:04
पिवशे, पाककुशल व्हायचं चांगलंच मनावर घेतलंयस वाट्टं ! काय न्यूज ? बाकी कोफ्ते करीत शिरताच पाघळलेले दिसतात..!

निशांत_खाडे 11/03/2016 - 12:57
जे बात.. जबराट झालंय!! फोटूतर एकसे एक दीसायलेत. रच्याकने, कोफ्ते बनवताना ३/४ वाटी बेसन व १/४ वाटी कॉर्नफ्लोर घेतल्यास कोफ्ते विरघळणार नाहीत.

In reply to by नूतन सावंत

सस्नेह 11/03/2016 - 14:48
पिवशीला 'पियु' म्हणण्याचा हक्क राखीव असून तो अजून कोणत्याही मिपाकरास मिळालेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by सस्नेह

यशोधरा 12/03/2016 - 16:41
हेल्लो, मी पण पियूच म्हणते तिला आणि म्हणणार! कोई आब्जेक्शन? =)) पियु, पियु तूस झालेंय तरी काय गो? भलतीच ना गो तू सुग्रण व्हावयास लागलीस! पण कोबी? नक्को!

In reply to by इशा१२३

अभ्या.. 11/03/2016 - 14:55
हा ना. ही वाक्ये याची साक्ष आहेत चक्क.
वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली
थोडे चपटे ठेवा म्हणजे आतपर्यंत तळले जातील
आधी लाल तिखट घालून घ्या ( याने ग्रेविचा रंग लाल राहतो )
थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातल्यामुळे ग्रेवीची चव टिकून राहते.

अन्नू 12/03/2016 - 00:15
एकावर एक रेशीपी फ्रि??!!!!

श्रीरंग_जोशी 12/03/2016 - 00:20
मलई कोफ्ता सोडून कोफ्त्याचे इतर प्रकार खूप आवडतात. पाककौशल्याचे नवनवीन प्रयोग जोरात सुरु आहेत. आता सादरीकरणात सुधारणा अपेक्षित.

दिपक.कुवेत 12/03/2016 - 11:57
हे कोफ्ते ट्राय करायचे मनात होतेच आता नक्किच पानात उतरतील....

विवेकपटाईत 12/03/2016 - 16:33
कृती आवडली. कोफ्ते तसे मला आवडतातच, टमाटर टाकले असते तर आणखीन मजा आली असती (तूर्त आम्हा दिल्लीकरांना प्रत्येक ग्रेवीत टमाटर टाकण्याची सवय आहे). गेल्या महिन्यात आमच्या सौ गाजर आणि गोबी किसून असेच कोफ्ते बनविले होते, जाम आवडले.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. 12/03/2016 - 16:58
आमच्या सौ गाजर आणि गोबी किसून असेच कोफ्ते बनविले होते,
स्वल्पविराम राह्यलाय की 'ने' राह्यलाय? रेसेपी भारीच ना पण. ;)

सविता००१ 12/03/2016 - 18:06
झक्कास रेसिपी. सुगरण झालीस की चक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/03/2016 - 18:27
दोन्ही पाककृत्या आवडल्या. मस्त सांगुन पाहतो जमतं का आम्हाला. :) >>>आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात. या वाक्यामुळे मी पाकृ वाचायला घेतली. या कोबीचा आणि त्या भेंडीची भाजी बनू शकते याचा शोध कोणी लावला त्याला भेटून एकदा धु धु धुवायचा आहे. पण, आपल्या कोबीच्या पाकृतीने त्याला मी क्षमा केलं आहे. :) -दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो 12/03/2016 - 18:32
aa aaaaaaaa ह्या सिर्यलींचे एपिसोड परत चालु होणारेत म्हणे =)) रच्याकने झक्कास रेसिपी. कोबी फक्तं पछडीमधुन खात असल्याने पास. :)!!!!!!!!!!!!!!!!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

कॅप्टन जॅक स्पॅरो 12/03/2016 - 18:58
तुम्हालाचं ठौक असणार. आम्ही ताटात वाढलं जातं ते निमुटपणे नं खाणार्‍या वर्गात मोडतो =))

कंजूस 12/03/2016 - 20:48
झकास लागते ही.फोटू छान. कोबीचं रशियन सलाड नावाचा प्रकारही चांगला लागतो. आणखी एक स्टफ्ट कॅबेज ( कोबीच्या पानात गु्ंडाळलेलं पंजाबी समोशात असते ते वाटाणे बटाट्याचं सारण भरून.) थोडं जून पान खपतं.

नाखु 14/03/2016 - 11:37
आणि लेकीलाही कोबी खिलवण्याचा "राजेशाही" मार्ग दाखवल्याबद्दल आभार. चांगली पाकृ आणि कप्तानाची (समर्पक मालीका चित्रांनी) धागा सजावट पुर्ण झाली. कोबी देव्ष्टा बालक असलेला पालक नाखु

पैसा 14/03/2016 - 11:41
मस्त रेसिपी! कोथिंबिरीचं एकेक पान काढून सजावट करायचा पेशन्स आला का?

हासिनी 14/03/2016 - 13:10
रेसिपी मस्तय ग!! खायला केव्हा बोलवतेस? ;)