मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्मरणवस्तू संकलन

अनाहिता · · विशेष
स्मरणवस्तू खरेदी हा कुठल्याही भटकंतीत असायलाच हवा असा कार्यक्रम. कुठे सहलीला निघायचा अवकाश, की तिथे जाऊन आलेल्यांच्या सूचना सुरू होतात, "हे आण नक्की", "तो इकडचा रस्ता आहे ना तिथे हे छान मिळतं" वगैरे. शिवाय "माझ्यासाठी हे आण हो येताना" अशा मागण्या सुद्धा. ;) कधी घाईत असताना सुद्धा किमान एक तरी वस्तू घेऊयात आठवण म्हणून, असं म्हणत पटकन केलेली खरेदी असेल. तर कधी वेळ हाताशी आहे म्हणून भरपूर दुकानं पालथी घालत, किमतीसाठी घासाघीस करत स्वतःसाठी, जवळच्या व्यक्तींसाठी, मित्र मैत्रिणींसाठी सहलीचं एक प्रतीक म्हणून घेतलेल्या वस्तू असतील. या स्मरणवस्तू बघून मनोमन आपण पुन्हा ती सहल, त्या आठवणी अनुभवतो. बघा जरा, काय काय सापडलंय अनाहितांच्या घरात - MadhuraDeshpande SwatiDinesh Ajaya Hemangi MadhuraAjayaSwatidinesh (उजवीकडून) १. कँडल स्टँड, हंगेरियन पाप्रिका (हंगेरी), काडेपेटी (ऑस्ट्रिया) कप (पॅरीस), काचेची स्टारफिश (मुरानो ग्लास फॅक्टरी, इटली) २. घोडा (मुरानो ग्लास फॅक्टरी, इटली), इजिप्शियन किंगचा पुतळा (सिंगापुर) मेर्लिऑन (Merlion) (सिंगापुर) पवनचक्की आणि लाकडी बूट (अ‍ॅमस्टरडॅम), कागदी पंखा (सिंगापूर आणि स्पेन) ३. कियांते बॉटल (कियांते, इटली) अगरबत्ती व मेणबत्ती टू इन वन स्टँड (दक्षिण भारत), मॅग्नेट (चनिया, ग्रीस), एंजल मास्क(व्हेनिस, इटली) ४. मोर (बहारीन), बाहुल्या (थायलंड) ५. - भातुकली (तुळशीबाग, पुणे) ६. मॅग्नेट्स - १. क्रेटर लेक (पोर्टलँड, ओरेगन) २. यलोस्टोन नॅशनल पार्क (वायोमिंग) ३. जॉन्सन स्पेस सेंटर - नासा (टेक्सास) ४. मॅमॉथ हॉट स्प्रिंग, यलोस्टोन नॅशनल पार्क (वायोमिंग) ५. पावसात भिजलेलं सिअ‍ॅटल (वॉशिंग्टन) ६. आमची मुंबई ७. सेंट ऑगस्टीन (फ्लोरीडा) ८. ब्रूकलीन ब्रीज, (न्यूयॉर्क) ९. टेक्सास १०. सॉल्ट लेक सिटी (युटाह) ११. लिबर्टी बेल (फिलाडेल्फीया, पेन्सिल्वेनिया) १२.पॉवेल्स बुक्स (पोर्टलँड, ओरेगन) १३.ट्युलीप फेस्टीवल (स्कॅगिट वॅली, वॉशिंग्टन) १४. क्लोंडायक गोल्ड रश नॅशनल पार्क (सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन) ७. शोभेच्या वस्तू (ब्लॅक फॉरेस्ट, साल्झबुर्ग) , सान जिमिन्यॅनो पॉटरी, (इटली), कूककूक क्लॉक (ब्लॅक फॉरेस्ट), काऊ बेल (स्वित्झर्लंड) https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

वाचन 5384 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रीत-मोहर Tue, 03/08/2016 - 21:08
किती सुरेख, यातली प्रत्येक गोष्ट आपल्यापैकी कुणाची तरी एखाद्या सुंदर अश्या भटकंतीची आठवण आहे हे माहिती असल्याने माझ्याही जवळची झाली :) . मी शक्यतो स्वतःसाठी खूप कमी घेते, यापुढे स्वतःसाठी ही काहीतरी घेईन :)

बरखा Wed, 03/09/2016 - 13:10
फोटो बघुन कधी एकदा आपल्या कडे पण अश्या वस्तुंचे संकलन होईल असे वाटायला लागले आहे. प्रत्येक वस्तु खुप सुंदर आहे. नुसतेच फोटो न टकता त्यांची अधिक माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

सगळी सुविनेर (souvenir) मस्त आहेत. एक सुचना--प्रत्येक फोटोखाली त्या फोटोची माहीती टाकल्यास वरखाली स्क्रोल करायला लागणार नाही.

संग्राम Wed, 03/09/2016 - 16:36
मला कि-चेन गोळा करायची आवड आहे ... कुठल्याही भटकंतीत कि-चेन घेणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो