किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?
हा धागा लेख तसा केवळ अनाहितांसाठी मर्यादीत ठेवलेला नाही. या आठवड्या भरात 'कौटुंबीक टिमवर्क आणि नवर्यांचे जोखीम व्यवस्थापन' असा काहीसा कडबोळे विषय चर्चेस टाकण्याचा मानस आहे :). पण तत्पुर्वी किचन मॅनेजमेंट ! , म्हणजे कसे आहे ज्या घरी किचनची जबाबदारी पुरुषांची असते तेथेही बहुधा किचन रचना आणि व्यवस्थापनाचा अंतीम निर्णय घरातील स्त्रीकडेच असण्याची शक्यता अधिक (घरजावयांना किचन व्यवस्थापनात किती से मिळतो माहित नाही ;) असो). आणि बरे स्त्रियांचा से का असु नये ? बरेच मागे शरु रांगणेकरांचे व्यवस्थापन विषयक पुस्तक वाचले होते त्यात त्यांनी स्त्रियांच्या किचन मॅनेजमेंटचे बरेच कौतुक केले होते असे काहीसे आठवते (कुणाला त्या पुस्तकाचे नाव आठवते का ?).
पण माझा व्यक्तिगत अनुभव स्त्रियांना जन्मजात व्यवस्थापन कौशल्याचे ब्लँकेट सर्टीफीकेट देत नाही म्हणजे उडदामाजी काळे गोरे तसे स्त्रियांमध्ये काहींची किचन मॅनेजमेंट लाजवाब असेलही पण सर्वच स्त्रियांना जन्मजात कौशल्य असते त्यांच्यावर अन्याय करणारे होईल :). काही गोष्टीत कुणी पुढे दुसर्या काही गोष्टीत कोणी पुढे असे असणारच तर या धागा चर्चेच्या माध्यमातून तुम्ही किचन व्यवस्थापन कसे करता हे जाणून घ्यावयाचे आहे.
१अ ) किचन मॅनेजमेंट -स्वैपाकघरात व्यवस्थापन कौशल्याची गरज असते का ? किचन मध्ये वापरलेल्या व्यवस्थापन कौशल्याचे किचनबाहेर काही उपयोग होऊ शकतात का ?
१ब) ज्यांना किचनचे व्यवस्थापन जमत नाही असे वाटते त्यांना काय काय अडचणी येतात ?
२) किचनच्या कामांचे आणि वेळेचे तुम्ही पुर्वनियोजन करता का ? तुमचे पुर्वनियजन अॅडहॉक कधीतरी असते का की नियमीत असते ? तुमच्या पुर्वनियोजनात तुमच्या जोडीदाराचा अथवा कुटूंबातील इतर व्यक्तिंचा सहभाग असतो का ? समजा तुम्ही एकटे/ट्या पुर्वनियोजन करत असाल तर तुमच्या पुर्वनियोजनाची कल्पना तुमच्या जोडीदारास आणि कुटूंबीयांना असते का ? की तुम्ही कोणतेही पुर्वनियोजन न करता अॅडहॉक पद्धतीने कामे करता ? पुर्वनियोजनात अथवा अॅडहॉक विदाऊट पुर्वनियोजनात तुम्ही कामांच्या प्रिओरायटी कशा ठरवता ? ठरवलेल्या प्रिओरायटी प्रमाणे कामे करता का ?
३) तुम्ही किचन मधील सामान भरण्याचे व्यवस्थापन करता का असल्यास कसे करता ?
४) भरलेले सामान आणि चिजवस्तु कुटूंबातील व्यक्तिंना विचारत बसावे लागू नये म्हणून काय व्यवस्था केलेली असते ?
५) किचन मधील वेळेचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ? वेळा पाळता का ? खासकरुन शाळा आणि ऑफीसच्या वेळा कितपत परफेक्टली पाळता का निघण्याची वेळ झालेली नाही नाही झालचे एवढे खाऊन जा म्हणून उशीर करवता ? -वेळा पाळल्या जाव्यात म्हणून काय टिप्स द्याल- ब्रेकफास्ट केला जातो का वेळत होतो का ?
* ऐसिअक्षरे संस्थळावर एक संबंधीत विषयावर कौलचर्चा सकाळी शुन्य ब्रेकफास्ट + चहा दुपारीच जेवण ही संस्कृती कार्यालयीन कामाच्या लाईफस्टाईलसाठी सयूक्तीक आहे का ? अशी काहीशी वेगळी चर्चा लावली आहे त्यातपण आपण सहभागी होऊ शकता अथवा त्या बद्दल इथे आपली मते व्यक्त करु शकता.
६) पदार्थ किती शिजवायचा याचे अंदाज तुम्ही कसे बांधता ? तुमचे अंदाज कितपत बरोबर येतात / उरलेल्या पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
७) रेफ्रीजरेटर मधील पदार्थांचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता ?
८) पुर्वनियोजीत पणे असल्यास कौटूंबिक टिमवर्कचे स्वरुप कसे असते ?
९) प्रत्येक गोष्ट जागच्या जागी मिळावी म्हणुन तुम्ही काय मेथडॉलॉजी वापरता ?
१०) समजा की तुम्ही नौकरी करता अथवा तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यावयाचा आहे किंवा बाहेरची कामे करावयाची आहेत तर किचन कामे चटकन /वेगाने आटपली जावीत म्हणून तुम्ही काय करता ?
सध्यातरी एवढे प्रश्न सुचले आहेत चर्चेतून अजून काही प्रश्न आल्यास हवे आहेत. चर्चा चालू करुयात.
*वेळ व्यवस्थापना बद्दल एक स्वतंत्र धागाचर्चा : २-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन
प्रतिसादांसाठी चर्चासहभागासाठी आभार.
वाचन
39820
प्रतिक्रिया
0