ज्ञानेश्वरीतील शब्द मालवणी बोलीत (मराठी भाषा दिन २०१६)
In reply to रोचक माहिती.. by जेपी
In reply to सुरेख by प्रीत-मोहर
चित्पावनीत आणि भटी भाषेतया दोन्ही वेगळ्या भाषा आहेत? भटी भाषा हे नाव प्रथमच ऐकतोय. कोकणापुरते बोलायचे तर भट = चित्पावन आणि बामण = सारस्वत असे क्लासिफिकेशन ऐकलेले आहे, त्यामुळे भटी = चित्पावनी असे वाटते. तसे नसेल तर भटी म्हणजे कुठली भाषा याचा खुलासा व्हावा ही विनंती.
In reply to चित्पावनीत आणि भटी भाषेत by बॅटमॅन
In reply to चित्पावनीत आणि भटी भाषेत by बॅटमॅन
In reply to चित्पावनीत आणि भटी भाषेत by बॅटमॅन
In reply to या दोन्ही वेगळ्या बोली आहेत. by पिशी अबोली
In reply to भटी = पद्ये असं तुमच्या by बॅटमॅन
In reply to तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो by प्रीत-मोहर
In reply to इतरत्रही असेच. by राही
वेरी म्हणजे पर्यंतकन्नडमध्ये (र) वरेगे म्हणजे पर्यंत. महाराश्ट्र, द. कोकण, कारवार, कर्नाटक अशी लिंक असण्यास हरकत नाही. यादवकालीन मराठीत कन्नड प्रभाव असणारच. कानडी वारकरी मंडळीना इतर संतांच्या अभंगापेक्षा ज्ञानेश्वरी बरीच समजते असे बघितलेय.
In reply to इतरत्रही असेच. by राही
'विरुढी' म्हणजे सध्याचे बिरडे. वि+रुह- रुजणे,....हा राही यांनी दिलेला अर्थ पटला. पूर्वी पुण्यात लग्नाच्या जेवणात "बिरड्याची उसळ " हा पदार्थ अत्यावश्यक होता. बिरडे म्हणजे अंकुरलेले(मोड आलेले ),विरुढलेले, कडवे वाल.
In reply to इतरत्रही असेच. by राही
वेरी म्हणजे पर्यंत. नव्या मराठीत 'वेरी'चे 'वर' झाले. जसे: तोवर जाऊ नको, किंवा मी येईस्तोवर थांब.असे राही लिहितात ते ठीकच आहे.योगायोग म्हणजे याच मालिकेतील "ओबामा आलारे ! " या बोली भाषेतील गोष्टीत वेरी हे अव्यय , पर्यंत,पावेतो या अर्थी, दोनदा आले आहे. मराठी पद्यलेखनात याच अर्थाचा "वरी" असा पर्याय आहे.उदा, "जोवरी पैसा,तोवरी बैसा." "तोंवरी रे तोंवरी । जंबूक गर्जना करी। जोंवरी पंचानना देखिला नाही रे बाप ।"
In reply to वेरी-वरी-वर by यनावाला
In reply to कोंकणी आणि ज्ञानेश्वरी by राही
In reply to कोंकणी कित्येक शतके स्टॅग्नंट by एस
In reply to पोर्तुगीज़ प्रभाव by राही
In reply to माहितीपूर्ण. by प्रचेतस
In reply to माहितीपूर्ण. by प्रचेतस
In reply to रोमन लिपी by यनावाला
In reply to हो. १५५६ मध्ये अॅबसिनिअन by अभ्या..
In reply to थोडासा वेगळा प्रश्न आहे माझा. by सतिश गावडे
In reply to थोडासा वेगळा प्रश्न आहे माझा. by सतिश गावडे
In reply to होय by राही
In reply to होय by राही
In reply to थोडासा वेगळा प्रश्न आहे माझा. by सतिश गावडे
"ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीतील भाषा आणि त्यांच्या "मोगरा फुलला" किंवा "पैल तो गे काऊ कोकताहे" या अभंगांतील भाषा यामध्ये खुपच फरक जाणवतो. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. त्यामुळे ग्रंथलेखन आणि उत्स्फूर्त काव्य याविषयीच्या भाषा वापराचे काही संकेत त्या काळी असावेत का?’..असे संकेत असण्याची मुळीच शक्यता नाही. मात्र तुमचा प्रश्न मूलभूत आहे. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानदेवांच्या अभंगांची भाषा यांत मोठी भिन्नता आहे ही गोष्ट तुमच्या ध्यानी आली हे प्रशंसनीय आहे. विचारपूर्वक वाचले, थोडी भाषाचिकित्सा केली तरच हे लक्षात येऊ शकते. [तुम्हाला पडलेल्या प्रश्नावर गेली कांही वर्षे विचार करतो आहे. (सतत नव्हे. आठवेल तेव्हा. ) तीन पर्याय सुचतात. लेखन पूर्ण झालेले नाही. असो. ] ज्ञानेश्वर नाथपंथीय होते. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे (अ.सहावा). त्यांचे गुरू निवृत्तिनाथ हेही नाथपंथीच होते. नाथपंथात विठ्ठल भक्तीला स्थान नाही. ज्ञानेश्वरीत विठोबा,पंढरपूर, वारी,भागवत पंथ यांचा कुठेही उल्लेख नाही. तुम्ही म्हणाल गीतेत नाही म्हणून ज्ञानेश्वरीत नाही. गीता आहे सातशे श्लोकांची तर ज्ञानेश्वरीत आहेत नऊसहस्र ओव्या.गीतेत नसलेल्या कित्येक गोष्टी ज्ञानेश्वरीत आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ गीतेवरील टीका नव्हे. ती स्वतंत्र रचना आहे. ज्ञानेश्वरी,अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तीनही रचनांची भाषा समजण्यास क्लिष्ट आहे. तर ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग तसेच "बाप रखुमादेवीवरू" ही नाममुद्रा असलेले अभंग अगदी प्रासादिक म्हणजे आकलनसुलभ आहेत. "अवघाची संसार सुखाचा करीन ।आनंदे भरीन तिन्ही लोक । जाईन गे माये तया पंढरपूरा ।भेटेन माहेरा..." हा अभंग ज्ञानदेवांचा आहे. (असा माझा समज आहे.) सतीश गावडे यांना पडलेला प्रश्न ज्ञानेश्वरांच्या रचनांचा थोडा- फार परिचय असणार्या सर्वांनाच पडावा असा आहे.
In reply to शाबास ! व्हेरी गुड by यनावाला
In reply to शाबास ! व्हेरी गुड by यनावाला
In reply to शाबास ! व्हेरी गुड by यनावाला
रोचक लेख.अजून वाचायला आवडेल.