फर्निचर
लेखनप्रकार
तुमचे कधी फर्निचर होते का?
परवा घाजीनी बघितला. क्निव्नियंट अम्नेशिया बद्दल मला संपुर्ण माहिती आहे. रोज बघतो. टेंपररी अम्नेशिया सुद्धा माहित असावा. त्याची गरज पण होती.
एकुलती एक प्रेमळ बायको तीची आई आली रे आली की फितुर का होते हह्याचे उत्तर गेल्या २३ वर्षात मिळालेले नाही. आणि ते आता मिळेल असे वाटत नाही. तसे सासु आल्यावर जेवणाची अंमळ चंगळ असते. पण तेवढेच.
कायम केंद्रबींदु रहाण्याची सवय तशी वाईटच. सासरची माणसे घरी आल्यावर मी एकदम नॉर्मल रहातो. पण ते'जावई' 'भावोजी' 'मान' वगैरे बगैरे ची सवय त्यांना मोडवत नाही. मी कितीही सांगितले तरी. त्यामुळे घरात घुसल्यावार अगदी खडे तालीम असते. अवघडल्यासारखे होते. मी पण नाद सोडुन दिला आहे. काय करणार. चिरंजीव मात्र ही परिस्थिती ओळखुन आहेत हीच काय ती चंदेरी झालर. त्याच्या हक्काच्या वेळात काही बदल नसतो.
एका लग्नाकरता सासुबाई घरी आल्या आहेत. सात दिवस रहाणार आहेत. येते चार पाच दिवस " तुम्ही किती वाजता कामाला जाणार" हे एकच वाक्य बायको नक्की बोलणार. (वाटच बघत असते). बाकी सर्व ५ फुटावरुन. समृद्ध सहजिवनासाठी स्पेस द्यावी असे म्हणतात. पण एवढी? रात्री २.३० वाजता काय गप्पा असतात कोणास ठाउक. असो.
एकटी सासु आली तर माझा टिपॉय किंवा डायनिंग टेबल होते.(जेवण ठेवायला)
मेहुणी आली की सोफा (लक जोरदार असेल तर बायको सोफावर बाजुला बसेल)
सासु आणि मेहुणी एकत्र आली की झुंबर.(नुसताच लटकत प्रकाश द्यायचा)
आजारपणात सासु होती तेंव्हा तर पुर्ण बॅचलर्(केरसुणी)
आता घाजीनी बघितल्यावर ठरवले आहे घरात आल्यावर १२ तासाचा टेंपररी अम्नेशिया चा उपयोग करायचा. आपण कोण आहे ते संपुर्ण विसरुन जायचे. उगाच जीवाला घोर कशाला द्यायचा. बाकी साथीला तात्या,रामदास, ब्रिटीश ही मित्रमंडळी आहेतच की.
ही मंडळी बिझी असतील तर वेगवेगळे चित्रपट वाजवायचे.
ह्या वेळेला मात्र बायकोला सांगणार आहे ,कोण येणार आहेत आणि किती दिवस असणार आहेत ते दोन दिवस आधी कळाले पाहीजे.पुर्वसुचना मिळाली की खुप गोष्टीचे नियोजन करता येते. तेवढा त्रास कमी.
जाता जाता: एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटी वर माझा विश्वास नाही त्यामुळे वर्षाला ३ ते ४ वेळा फर्निचर होणे होणेच आहे. बरे असते. पुर्ण वर्षाच्या न कळत झालेल्या जखमावरचा अगदी योग्य उपाय.
वाचने
4640
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
हम्म. चालु
घरोघरी मातिच्या चुलि :)
अरे वा
बट्टु
In reply to बट्टु by विनायक प्रभू
मर्फिच्या
खरं सांगायचं तर
In reply to खरं सांगायचं तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला कळलेले ...
In reply to खरं सांगायचं तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा..
In reply to हाहाहा.. by प्राजु
ढण्यवाद
In reply to खरं सांगायचं तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं असं
चिरंजीव
दोन तात्पर्ये
In reply to दोन तात्पर्ये by सर्वसाक्षी
अगदी मनातले बोललात
जगदंब
समृद्ध
मला कळले ते असे
आता मला जे समजावले त्यावरून
अमेरिकेतल्यांचा विचार करा सर !
फर्निचर
In reply to फर्निचर by विजुभाऊ
आवडला