"द सिक्रेट" : विचारांना कंपने असतात!
In reply to rhonda Byrne ही लेखिका आहे by काकासाहेब केंजळे
In reply to "इतनी शिद्दत से मैनें तुमको by जेपी
In reply to हा मूळ डायलाॅग बहुतेक by विजय पुरोहित
In reply to होय सर,डाॅयलाॅग असा आहे. by चेक आणि मेट
In reply to होय सर,डाॅयलाॅग असा आहे. by चेक आणि मेट
In reply to काहीही हां श्री! by आदूबाळ
एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय?लेखिका किंवा तशी पुस्तके लिहलेले अनेकजण म्हणतात, काही गोष्टींना निसर्गनियम आहेत, मॅच जिंकण्याचा स्ट्राँग विचार खेळाडूंनी करावा लागतो साहेब.आपण विचार करून काय उपयोग,मॅच ते खेळतात ना? आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना(भारताबाहेर) आधीच आमचे खेळाडू निम्मे घाबरलेले असतात,मग समिश्र विचार तयार होतात,काय म्हणता?
In reply to एका माणसाच्या विचारांना कंपनं by चेक आणि मेट
In reply to म्हणजे इच्छित ते घडलं की by आदूबाळ
In reply to म्हणजे इच्छित ते घडलं की by आदूबाळ
In reply to काहीही हां श्री! by आदूबाळ
The special theory of relativity forbids us to assume the ether to consist of particles observable through time, but the hypothesis of ether in itself is not in conflict with the special theory of relativity.बरं अवकाश स्वतः सुद्धा विचितर् वागतो हे तुम्हाला माहिती असेलच. Empty space has more energy than everything in the Universe, combined "No Empty Space in the Universe" --Dark Matter Discovered to Fill Intergalactic Space बरं आजचीच बातमी घ्या. गुरुत्वीय लहरींचा शोध लागलेला आहे. लहरींच्या पर्सारणाला माध्यम लागतं हे तुम्हाला माहीत आहेच. इथे हे माध्यम अवकाश आहे. म्हणजे अवकाश स्वतःच एखाद्या दर्वापर्माणं काम करतं, त्याचं आकुंचन, पर्सरण होतं, ते ताणलं जातं हे आता सिद्ध झालेलं आहे. तात्पर्य, इथरची कल्पना एका अर्थी खरीच आहे. ती ज्या लोकांनी मांडली त्यांच्या कल्पनेपलीकडे ती खरी ठरते आहे.
In reply to तुम्हाला कृष्णदर्व्या बद्दल by काळा पहाड
.विवेकानंद म्हणतात-"आता आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळातील विचारांमुळेच.आणि हे पुस्तक आपले ( वाचकाचे ) विचार मजबूत करण्याचा ''प्रयत्न'' करते. मानसिक शांततेच्या बदल्यात तुम्हाला एखादे साम्राज्यही मिळाले तरी प्रत्यक्षात तुम्ही अपयशीच म्हणवले जाल. बाकी पुस्तक परिचय इथे दिल्याबद्दल धन्यवाद घेईन म्हणतोय
बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.अगदी खरयं,पुस्तकं खपवण्यासाठी काहीही प्रपंच करतात. But overall आपण नेहमी positive thinking केली पाहीजे,असा एकंदरीत लेखिकेचा आशय आहे.
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
In reply to मग लेखक काय म्हणताहेत? उगीच by विजय पुरोहित
In reply to विजय भाऊ केव्हा पूर्ण करणार ? by मयुरMK
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?मी ही हेच म्हणतोय, बाकि आम्ही फक्त पुस्तक परिक्षण केलं.इतकच पण quantum physics वाले विचारांना कंपन असतं म्हणतात कि घासकडवी साहेब?
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाहीसर, तुम्ही केलेल्या पदार्थविज्ञानातील + मनोविज्ञान + मानवी शरीरावरच्या संशोधनाची लिंक प्रसिद्ध करणार का प्लीज. बाकी तुम्ही कॉमनसेन्स वगैरे बोलणार असाल तर मी कॉमनसेन्स शी विसंगत एक बातमी देतो. आणि शिवाय ती बातमी कुठली तरीच सांगतोय हे म्हणू नये म्हणून चार लिंका देतो. http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3107996/Our-entire-lives-ILLUSION-New-test-backs-theory-reality-doesn-t-exist-look-it.html http://www.gizmag.com/quantum-theory-reality-anu/37866/ http://themindunleashed.org/2015/06/new-mind-blowing-experiment-confirms-that-reality-doesnt-exist-if-you-are-not-looking-at-it.html http://discovermagazine.com/2002/jun/featuniverse या बातमी पूर्वी तुम्ही या थियरी ला (खरं तर ती थियरी नाहीये पण ऑब्झर्वेबल फॅक्ट ला थियरी मध्ये बसवायचा प्रयत्न चालू आहे) असंच म्हणाला असतात. तेव्हा सायन्स मध्ये भंपक वगैरे शब्द वापरले जात नाहीत हे नक्की समजा. जे आज विचित्र वाटतं ते खरं असू शकतं. खरा सायंटीस्ट हा शब्द सुद्धा वापरत नाही.
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
In reply to याचे व्हिडीओ पाहिले होते. by उगा काहितरीच
In reply to सर्वोत्तम मत उ.का. काका... by विजय पुरोहित
In reply to याचे व्हिडीओ पाहिले होते. by उगा काहितरीच
थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .थोडंफार नव्हे, बरंच अवास्तव आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं. जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून.
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतीलमात्र सकारात्मक विचार आणि ध्येयाच्या दिशेने नेटाने चालू असलेले प्रयत्न यापेक्षाही प्रभावी असा नकारात्मक घटक तुमच्या यशाच्या मार्गात खीळ घालू शकतो. लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते.
In reply to लोकांचे काय घेऊन बसलात हो, by सतिश गावडे
लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटतेसहमत मराठीतही अशी पुस्तके यायला लागलीत हल्ली चाळीस-पन्नास पाने असतात आणि किंमत दोनशे-तीनशे रूपये सांगतात.
अणूपासून प्रत्येक गोष्ट बनलेली आहे,त्या अणूच्या हजारो/लाखो पट आत शिरल्यास "क्वार्क्स"नावाची गोष्ट दिसली,त्याच्याही हजारो पट आत शिरल्यावर एक गोष्ट सापडली ती म्हणजे फक्त "कंपन" जगातील सजीव निर्जिव गोष्टी एक ठाराविक फ्रिक्वेन्सीला कंपन पावत आहे!सर्व चराचर केवळ एका निर्गुण निराकार कंपनांचं अविष्कार आहे हे जर मनात ठसलं तर त्या कंपनांत मिसळुन जाण्यापलिकडे काहि इच्छा शिल्लकच राहाणार नाहि. त्याचा वापर करुन भौतिक समृद्धी प्राप्त करण्याचा विचार तर फार लांब राहिला. बाकि ज्ञानेश्वर, विवेकानंद वगैरेंनी जे काहि म्हटलय ते फार वेगळ्या कॉण्टेक्स्ट्ने... अर्थात, सकारात्मकता वाढवायला जर अशा थेअरीची मदत होत असेल तर त्यात काहि वाईट नाहि.
त्या विरुद्ध पाहीलं तर काही प्राण्यांना आईची किंवा आधाराची जन्मतः खूप गरज असते. उदाहरणार्थ पाहीलं तर कुत्रा किंवा वाघ इत्यादी. हे प्राणी अॅडप्टीव डीसीजन मेकिंग करू शकतात. थोडक्यात बोलायचं झालं तर निसर्गाने केलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही बदल करण्यास ते सक्षम असतात. त्यांना शिकवता येऊ शकते. माणसा मध्ये ही क्षमता सर्वात जास्त आहे. पण जन्मतः असलेलं प्रोग्रॅमिंग आणि नंतर शिकल्या गेलेल्या गोष्टी यात खणखणीत गल्लत होऊ शकते.
जन्मतः असलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही चुकीचं आहे का? नक्कीच नाही. शिकलेल्या गोष्टी आणि जन्मत: असलेल्या गोष्टी एकमेकांबरोबर बदलता येतात का हे बघण्यासाठी डार्विनने एक प्रयोग केला होता. त्याने काचे मागे साप ठेवून काचेपलीकडे चेहरा नेला. जेव्हा केव्हा साप दंश मारतो तेव्हा प्रतिक्षिप्त क्रियेने तो मागे सरकायचा. भरपूर प्रयत्न केल्या नंतर पण त्याला त्याची नैसर्गिक प्रक्षिप्त क्रिया बदलता आली नव्हती. खरं तर काच आहे हे त्याला माहीती होतं, पण त्याला त्या क्रियेवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. भितीचे ट्रीगर्स त्याचे रॅशनल डीसीजन मेकींग बाजूला ठेवत त्याला भावनिक निर्णय घ्यायला लावत होते. आणि उत्क्रांती मध्ये ही पायरी नसती तर आपले पुर्वज शांतपणे अच्छा, सिंह येतोय ? बर्र्र!, तो माणसाला खाऊ शकतो बर्र्रच!, किंवा त्याला भूक नसली तर खाणार नाही. बघू की त्याला भूक आहे का, नसेल तर का फुकट पळून एनर्जी घालवा? अशा वेळखाऊ प्रक्रियेत अडकले असते. आणि नक्कीच टीकून राहीले नसते. (reflexive decision making)
उत्क्रांतीमध्ये असे बरेच बदल घडले आहेत. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन असते. आपल्या रक्ता मध्ये असलेले हिमोग्लोबिन ऑक्सिजन फुफुसांतुन बाकी शरीराला पुरवतात. आणि जर का हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर प्राणी मरू शकतो. मरतोच. आपण कधी बर्फातले मासे पाहीले तर त्यांच रक्त पांढरे असते आणि त्यात हिमोग्लोबिन अजिबात नसते. त्यांच्या वावरण्याच्या वातावरणात रक्त गोठू शकते, ह्रूदयाला रक्त बाकी शरीरा पर्यंत पोहोचवणे न जमल्यास मृत्यू पक्का. पण बर्फाळ प्रदेशातील माशांनी हिमोग्लोबिन सोडून दिलं.
निसर्गतः अतिथंड असलेल्या पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो. वातावरणातील ऑक्सिजन ते थेट त्वचेद्वारे घेतात.
उत्क्रांती मध्ये झालेले बदल ! डार्विनचा नियम सर्वायव्हल ऑफ स्ट्राँगेस्ट बद्दल बोलत नाही.
उगाच भुक्कड गप्पा मारत मुद्द्यापासून दूर आलो. ते एकीकडे असोच. मुद्दा असा आहे की उत्क्रांती मध्ये मिळालेलं डीफॉल्ट प्रोग्रॅमिंग काहीसं या पद्धतीचं आहे. ते ओव्हर राईड करता येणं अजून फारसं कोणाला जमलेलं नाही. जर का तुमच्या दोन इंचावरून सव्वाशे किमी प्रतितास वेगाने गाडी गेली, तर हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे इत्यादी प्रतिक्रिया शरीर देतं. वास्तविक पहाता धोका टळलेला असला तरी पण तरीही ते होतंचं.
नैसर्गिक निर्णय प्रक्रियेमागचं तर्कशास्त्र नेम़कं कसं आहे. आपली डीफॉल्ट सेटींग्स नेमकी कशी आहेत? आणि त्यातली काही सेटींग्स हुकली आहेत काय?
वैयक्तिक आयुष्यातल्या अथवा कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये दैव आणि कौशल्य दोन्ही गोष्टीचा प्रभाव असतो. दैवाचा प्रभाव असतो म्ह्णण्याचे कारण असं की सर्व गोष्टी समजून घेता येत नाहीत. त्यांचे भाकीत करता येत नाही. आणि मानवी स्वभाव ही गोष्ट स्वीकारत नाही.(default progrmming!) we prefer wrong data over no data. काहीच माहीती न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणारी चुकीची माहीती सुद्धा स्विकारण्याकडे आपला कल असतो.
काही प्रमाणात गोष्टी आकडेवारीवर उतरवता येतात, पण त्यातही चुका होउ शकतात.
उदाहरण देतो,
१)-
समजा तुम्हाला (किंवा मला :) ) एखादा शर्ट विकत घ्यायचा आहे. शर्टची किंम्मत हजार रुपये आहे. शर्टची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हा शर्ट तुला शंभर रुपयात मिळेल. (९०% सवलत!), परफेक्ट हाच शर्ट, हीच क्वालीटी. दहा मिनीटे चालायचं, आणि नउशे रुपये वाचवायचे.
ही डील घेणार?
आता दुसरी केस-
२) समजा गाडी विकत घ्यायची आहे. गाडीची किंम्मत पंधरा लाख रुपये आहे. गाडीची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हीच गाडी तुला चौदा लाख नव्व्याण्णव हजार शंभर रुपयात मिळेल. (९०० रुपये सवलत!), परफेक्ट हीच गाडी, हीच क्वालीटी.
ही डील घेणार?
समोरासमोर प्रश्न विचारला तर बहुतांश लोकं पहीली डील घेतात, दुसरी घेत नाहीत. टक्केवारी गंडवते. वास्तविक पहाता दोन्हीकडे दहा मिनीटे खर्च करून नऊशेच रुपये वाचणार आहेत. त्या नऊशे रुपयांची बाकी काही खरेदी करा. कोणही "पंधरा लाखावर वाचवलेले नऊशे ?" किंवा "हजारावर वाचवलेले नऊशे"? असं विचारणार नाहीये. तरी असं का होतं? (psychological maladjustments ?)
एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते.
खालच्या फोटोत काही लॉटरीची तिकीटं आहेत.
या तिकीटांच्या नंबर्स कडे नीट बघा,
या पैकी कोणत्या तिकीटाचा मालक " पुढच्या वेळेस साठी जास्त प्रयत्न करेन " असं म्हणेल?
एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. पटतंय?
उगाच कोणी मला हॉगवॉर्ट्स मधून अॅडमिशनचे घुबड यावं असा विचार करत बसला तर ते होणार आहे काय? ही एक टोकाची केस झाली, इथे काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे, मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं.
एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. योग्य निर्णय प्रक्रिया फक्त आपल्या हातात असते. बाकी बर्याच घटकांवर आपण काहीच करू शकत नाही.
लॉटरी/ जुगारा मधली अजून एक केस बघता येइल.
रौलेट चक्राला ३८ स्लॉट्स आहेत. १ ते ३६, ० आणि ००. तुमच्या आवडीच्या आकड्यावर १००० रुपये लावा. जिंकलात तर ३५००० रुपये जिंकाल, हरलात तर १००० रुपये जातील.
प्रोबॅब्लिटी पाहीली तर १/३८= २.६
३५००० पे ऑफ साठी वाजवी भाव = २.६*५५०००= ९४७.३ rs
इथे हजार रुपयांच्या कितीही पैजा लावल्या तरीही कॅसिनो बरोबर जिंकून पैसे कमावणे शक्य आहे काय?
आक्षेप पॉझीटीव असण्याला नाही, विशफुल असण्याला आहे. परत एकदा तेच वाक्य लिहीतोय, एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते.
An optimist is a person who sees a green light everywhere, while a pessimist sees only the red stoplight... the truly wise person is colorblind.In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
An optimist is a person who sees a green light everywhere, while a pessimist sees only the red stoplight... the truly wise person is colorblind.अगदी, अगदी!
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
In reply to छान प्रतिसाद by सतिश गावडे
In reply to धन्स :) by लॉरी टांगटूंगकर
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
In reply to चुकीची विचारसरणी आणि घोर अज्ञान by विवेक ठाकूर
In reply to खिक्क..!! by राघव
In reply to . by कवितानागेश
In reply to . by कवितानागेश
चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)चर्चा नाही ओ. विचारांच्या मूर्त/जड स्वरूपाचे लेखिकेने सिक्रेट थियरीमद्दे रूपांतर केलय जेणेकरून पुस्तकाचा खप वाढावा :)
झक्कासच विषय मांडलात...