Skip to main content

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

लेखक काकासाहेब केंजळे यांनी गुरुवार, 11/02/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही

वाचने 34063
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

म्हणजे आम्ही कुत्रे आहोत तर?? "स्वतःची चूक असून ती न मान्य करण्याचा तुमचा हट्टी स्वभाव" मला आधीच कळला होता.आणि त्यावर आत्ताच परत शिक्कामोर्तब झाले. आम्ही गेल्यालो परत आलो तुमचा प्रतिसाद पाहून भातावर जरा तूप घेवून खात चला,बुद्धी स्थिर होईल. आणि संमं वरचा प्रतिसाद राहू दे साहेबांचा.निदान त्यांच्या समर्थकांना तरी त्यांच्या बुरख्याच्या आतील चेहरा दिसू दे. काय म्हणता? बाकि दुसरा कोणता आयडी घेवून येणार ते आत्ताच सांगा. (आम्हीही आखाड्यातले पैलवान आहोत)

In reply to by संदीप डांगे

कुठलाही प्रतिसाद देतांना किमान पातळीचा संयम बाळगत चला. ही केवळ विनंतीच आहे उपदेश , सल्ला , आग्रह, मार्गदर्शन , शिकवणे इ. काहीच नाही याची खात्री बाळगा. पटल्यास घ्या अन्यथा सोडुन द्या हे मी तुमच्या विवेकावर सोपवतो.

In reply to by संदीप डांगे

>>>> च्यामारी लोक फार भूंकायलेत आजकाल. संदीप सेठ, पटलं नाही. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by संदीप डांगे

डांगे ब्वा ये बात कुछ हजम नहीं हुई भाई! माझ्यामते तुम्हाला वाद विवाद आवडतात, त्याचे सुद्धा नियम असतात, परवा तुम्हीच "ज्या धाग्यावरची धूणी तिथेच" हा नियम मांडला होता, वैच आज तुमने तोड़ डाला, अन ते ही साधारण भाषा सोडुन! गलत बात, पटले नाही मनापासून

इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित, विज्ञान. शाळेत असताना शिकलेल्या सगळ्या विषयांची एकत्र खिचडी केली आहे. आधी या सगळ्या महापुरुषांची तारखेप्रमाणे यादी करा बघु. मग आपण प्रत्येकाची सविस्तर चर्चा करूयात. यावेळी मी पॉकॉवाल्यांबरोबर आहे.

फार गहन विचार करून काकासाहेंबाना अनुमोदन द्यावे का?असे किंचीत मनाला चाटून गेले.

In reply to by अजया

मी तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हो असं देऊन विषयच संपवून टाकणार होते. न रहेगा प्रश्न, ना रहेगा धागेका उद्देश! कै बोल्ती?

In reply to by अजया

अगं उद्देश सगळीकडेच दिसतो त्यांचा. आपण झाडावर बसुन त्यांच्या उद्देशाची वाट लागताना बघायचं. अशा रटाळ, भिकार आणि मुख्य म्हणजे मठ्ठ लिखाणाचं तेवढंच एक भवितव्य असू शकतं. बाकी पुरुष किती ही हुशार असले तरी यांच्या धाग्यात यांची हुशारी दिसेना मला.. असो ,माझ्या हुशारी ची मर्यादा असावी ;)

या उपरोक्त लिस्टमधल्या सर्व पुरुषपुंगवांना जगात आणण्याच्या कामाचं जरासं चतकोर क्रेडिट द्यावं का या पिछाडीवरच्या दुय्यम जिवांना? की उपरोक्त स्पेशल पुरुषविशेष ऑपॉप आले?

आता पुरूष येणार तावातावाने भांडायला ." महिला कशा श्रेष्ठ" याच्यावर अन् महिला मास्त चीज पॉपकॉर्न घेऊन बसणार मॕच बघत. अन् कोण म्हणतं महिला हुशार नाही म्हणून ? ;-)

जर स्त्री पुरुष समान आहेत अशी बहुतेकांची धारणा असेल तर यावर चर्चा करण्यास काय हरकत आहे. जर स्त्रीकडे पुरुषाएवढीव बुद्धी व क्षमता आहेत किंवा होत्या तर सर्व क्षेत्रात त्या पिछाडीवर का आहेत ,हा सामाजिक विषय हाताळण्यास काय हरकत आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

माईसाहेब मोड ऑन ह्यांच्या म्हणण्यानुसार काकासाहेबांची यादी फारतर दहा हजार वर्षे जुनी असेल हि मागची दहा हजार वर्षे स्त्रिया मागच्या दहा हजार वर्षापुर्वी त्या मागची मिलियन्स ऑफ वर्षात पुरुषांनी कोणते यश संपादन केले याचा शोध घेत होत्या आणि अजुनही तोच शोध घेण्यात व्यस्त आहेत कारण काही केल्या काही गवसतच नाही. माईसाहेब मोड ऑफ

कोण पुरुष....? धन्यवाद..!!!

आवळ्याचं लोणचं केलंय. कोणाला पाककृती पाहिजे का?

In reply to by माहितगार

मी मधे चंद्रराज कंपनीचं आणलं होतं. त्यांचं माईनमूळ, करवंद, लिंबाचं गोड लोणचं, कैरी छुंदा, मिरची लिंबू हिरवं लोणचं अशी खूप छान छान लोणची मिळतात.

In reply to by माहितगार

भोकरं म्हणजे "गोंदण्या"चा मोठा भाऊ. कच्छी गृह उद्योगवाल्यांकडे मिळतात ही लोणची.गुजराथी लोकं करतात.

त्यापेक्षा वेगळा विदर्भ दे ना....

In reply to by पैसा

अय्या...ऋतिक रोशन किंवा मिलिंद सोमण किंवा गेला बाजार रणवीर सिंग तरी...मिळतील का...?? इश्श्श्य्...

In reply to by स्वप्नांची राणी

त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंडा असतील ना! तो एक प्रॉब्लेम. स्वतंत्र विदर्भासहित फक्त बबन मिळेल असे माईंचे हे म्हणाले आताच.

स्त्रीया काय करत होत्या? स्त्रीया तेव्हा शेती करत होत्या, मुलांचं संगोपन करत होत्या, बाजरीच्या भाकरी करत होत्या, भजे, पुरणाच्या पोळया, साध्या पोळया करत होत्या, अन्न आणि संगोपन ही जवाबदारी पार पाडत होत्या असं वाटतं. त्यांनी का शोध लावले नाहित? धुनं,भांडी, जेवण, ऑफिस, दुपारचं महिला मंडळाच्या ऑफिस गप्पा आणि उरलेल्या वेळात काम, पुन्हा सासू सासरे नंदा यांची सेवा, नव-याला चहा पाणी, मुलांचा होम वर्क, इथं त्यांना स्वत:कड़े बघायला फुरसत नव्हती त्यामुळे त्यांनी शोध लावले नसावेत असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृपया धाग्याशी संबंधित प्रतिसाद द्यावेत. असे प्रतिसाद आल्यास आयडी ख़ारिज करण्यात येईल....संम, हुकुमावरून

यंदा आंब्याचा मोहर कसा आलाय ? या वर्षी तरी भरपूर आंबे खायला मिळू दे रे देवा

In reply to by जेपी

अशा कै-या तलवारीने कापल्या पाहिजेत. -दिलीप बिरुटे (तलवार म्यान करून विचारांनी कै-या कापू पाहणारा)

In reply to by जेपी

शस्त्र हातात घेणार नाही, सांगेन गोष्टी चार युक्तीच्या या दिलेल्या शब्दामुळे हात बांधले गेले आहेत. -दिलीप बिरुटे (डबल ब्यारल गुंडाळुन ठेवलेला)

मिपावरच्या स्त्रीया एवढ्या बाळबोध ,चिडक्या , आणि पळकाढू असतील असे वाटले न्हवते. स्त्री पुरुष समान आहेत ना! मग चर्चा करा ना , फालतूगिरी करुन धागा का खराब करत आहात. मिपा एक चांगले संस्थळ आहे ,परंतू फालतूगिरी करणे ,वनलायनर टाकणे अश्या प्रकाराने संस्थाळाची रया जात आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

माईसाहेब मोड ऑन काकासाहेब तुम्हाला स्वतः शिवाय इतर पुरुषांनी काय काय यश संपादन केले हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, स्त्रियांनी काय केले नाही हे शोधण्यासाठी एक पाव नोबेल, उरलेल आर्ध नोबेल तुम्हाला पूर्ण नोबेल मिळाल्यानंतर. माईसाहेब मोड ऑफ

In reply to by काकासाहेब केंजळे

साई SSSSSSSSSSSSSSSSS सुट्ट्यो SSSSSSSSS आँ ! गल्ली चुकले वाटतं. ... पळायचं च होतं मला पण पोरखेळ बघुन थांबले.. या की गं खेळायला.. हुर्र र्र र्र र्र्र

In reply to by काकासाहेब केंजळे

मी पळकाढु नाय्ये ब्वॉ...मी चालतेय..!! नवे नवे शोध लावले असते पण मेले हे गुढगे फार दुखतात हल्ली...

In reply to by काकासाहेब केंजळे

मिपाकरात बरेचसे टाईम्पास वाले आहेत हे कटु सत्य आहे.सायन्स वरच्या धाग्यास किती प्रतिसाद मिळतो?

बाळबोध, चिडक्या,पळकाढू यात स्त्रिया आघाडीवर आहेत,हा शोध कोणी लावला बॉ?