पुण्यात जरा ऊदासच वाटलं
लेखनविषय:
काव्यरस
पुण्यात जरा ऊदासच वाटलं
शुक्रवार पेठेत एक माकड मारलं
रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो
महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला
मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला
चालत चालत मिरजेला गेलो
वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला
सांगोल्याला मावशीच्या घरी
तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला
पंढरपुरात जेव्हा पोहोचलो
विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला
चंद्रभागेत बुडी मारुन
पुन्हा परतीचा रस्ता शोधला
पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं
_________________
(आधारीत )
वाचने
8199
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
पण पुण्यात उदास का वाटलं ?
-दिलीप बिरुटे
कशावर आधारित? मस्त आहे पण.. ;-)
In reply to कशावर आधारित? मस्त आहे पण.. ; by संदीप डांगे
यावर आधारित आहे:
मुंबईनं भिकेस लावलं
कल्याणला गूळ खाल्ला
ज्या गावाला नाव नव्हतं
पण एक धबधबा होता
तिथं एक ब्लँकेट विकलं
अन पोटभर पाणी प्यालो
पिंपळाची पानं चघळत
नाशकापर्यंत आलो
तिथं तुकाराम विकला
अन् वर खिमापाव खाल्ला
जेव्हा आग्रारोड सोडला
तेव्हा एक चप्पल तुटलं
न मागता मिळालेली
कांदाभाकर खाऊन ऊठलो
ढुंगणाखालची हॅवरसॅक
उचलून पाठीवर घेतली
मग दोन मैल विचार केला
अन परतायचं ठरवलं
- अरुण कोलटकर
In reply to यावर आधारित आहे: by आदूबाळ
ह्यासाठी धन्यवाद! अर्थगर्भ आहे कविता.
In reply to यावर आधारित आहे: by आदूबाळ
या कवितेसाठी धन्यवाद! खूप सुरेख आहे.
In reply to यावर आधारित आहे: by आदूबाळ
हो ,
यावरच आधारित आहे
धन्यवाद :)
In reply to यावर आधारित आहे: by आदूबाळ
मुंबईने भिकेस लावल्यावर पुण्याला आलात. मग उदास वाटणारच!
असो.
तुमची कविता समजली नव्हती. हि कविता दिल्यावर आता न समज्लेल्या दोन कविता झाल्या.
कशावर आधारित समजले नाही.पण कविता मस्तच आहे.
पण पुण्यात उदास का वाटलं ?
पुण्यात जरा काय...फुल्ल उदास असते हो. मी येतच नाही आजकाल. :(
पुणे आवडलं नै तर हुंबैला चला. विचार करायला पण वेळ भेटणार नाय. अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार्या सर्वांना लांबूनच साष्टांग नमस्कार.
पण पुण्यात उदास का वाटलं ? >>>>
कवितेतच ऊत्तर द्यायचा प्रयत्न केलाय .
बघा सापडले तर :)
माकड मारल्याचं ( एका हुच्चभ्रूला सुनावलं) त्याचं प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावरसुद्धा शुक्रवारपेठेत स्वागतच झालं "या एकदा सवड काढून."
कोल्हापुरचे सहकार मसाला दुध आणी मिरजेची शिवाप्पा हलवाइची लस्सी .
पूर्वीचे पुणे राहिले नाही.
पुण्यात उदास वाटले तर बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे. तिथल्या स्वर्गिय वातावरणाने आणि जेवणाने उदासिनता कुठल्या कुठे पळून जाते. निदान तिथल्या बिलाने तरी नक्कीच जाईल.
In reply to पुण्यात उदास वाटले तर by सतिश गावडे
बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे, आल्यावर त्यावर धागे काढावेत मग आपला आणि बऱ्याच मिपाकरांचा उदासपणा नक्की जातो
मलाही पुण्याला येऊन माकड मारायचे आहेच एकदा.
In reply to मलाही पुण्याला येऊन माकड by अजया
माकडाने काय घोड मारलाय !
In reply to माकडाने काय घोड मारलाय ! by जेपी
काय हे....कोणी माकड मारायची भाषा करतयं...कोणी हत्ती मारायची भाषा करतयं.....
जव्हेरभाऊ नाही आवडली.
मै भाभीको बोला
क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ?
भड़क गयी साली
रहमान बोला गोली चलाऊँगा
मै बोला एक रंडीके वास्ते?
चलाव गोली गांडू.
- अरुण कोलटकर
In reply to ही अजून एक by जव्हेरगंज
हे विडंबन वा अजुन जे काय तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते अजिबात आवडल नाही.
मुळ कविच्या वहीवर विनाकारण चिंखडण्यासारख वाटलं.
असो.
एकतर पुणं..
त्यात पेठ..
तीही..
असो.
पुण्यात सर्वाधिक माकडं स... आणि श... पेठेत आढळून येतात बहुधा.
In reply to हम्म.. by नीलमोहर
हे नियमांत बस्ते का?
In reply to हे नियमांत बस्ते का? by टवाळ कार्टा
मी खर्र्रया - खुर्र्या शेपटीवाल्या प्राण्यांबद्दल (स्वतः पाहिलेले) लिहीले आहे.
आपण कशाबद्दल म्हणताय ;)
(पेठ निवासी)
In reply to हम्म.. by नीलमोहर
पेठेतली माकडं म्हणे आजकाल कोथ्रुडात ट्रान्स्फर झालीयेत.
काहीतरी समजेल असे लिहा ना जव्हेरभौ!! उगीच डोक्याला शॉट
@
पुण्यात जरा ऊदासच वाटलं>> अस्स्सं!!!
गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनेसवे गाणी
चाफा बोलेना, चाफा चालेना
ऊदास वाटल... काहिहि हा जव्हेरजी ...
छान.