एक वर्षानंतर . . .
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________In reply to म्हणजे भुजबळांवरील by श्रीगुरुजी
In reply to हाय कंबख्त तूने तुरीचं वरण by कैलासवासी सोन्याबापु
In reply to म by मोगा
In reply to ROFL by श्रीगुरुजी
In reply to काय गुर्जी हे ! by मोगा
In reply to १० मे २००४ ते १० मे २०१४ - by राजेश घासकडवी
In reply to जर सेन्सेक्सच्या आकड्यांवरूनच by श्रीगुरुजी
In reply to नाही हो, पहिल्या एकवीस by राजेश घासकडवी
In reply to मार्केट हे कोणता पक्ष सत्तेवर by श्रीगुरुजी
In reply to पुन्हा एकदा ROFL. by संदीप डांगे
In reply to मार्केट हे कोणता पक्ष सत्तेवर by श्रीगुरुजी
कोणता पक्ष सत्तेवर आहे किंवा कोणता पक्ष सत्तेवर नाही यावर सेन्सेक्स वरखाली करीत नाही किंवा आपल्या आवडीचे सरकार सत्तेवर आहे म्हणून सेन्सेक्स वर न्यायचा व आपल्या आवडीचे सरकार नसेल तर सेन्सेक्स खाली न्यायचा असे कधीच नसते.निवडणुकीचे निकाल लागल्यावर मोदी सरकार आलं म्हणून मार्केट उत्साहाने वर गेलं होतं त्याच्या बातम्या झाल्या होत्या. त्यावेळी कोणीच 'अहो नाही हो, मार्केटचा आणि सरकारचा काही संबंधन नसतो' असं म्हटलं नव्हतं. आता गेलं वर्षभर प्रचंड घसरगुंडी चालू आहे म्हटल्यावर हा युक्तिवाद सुरू झाला. फारच मजेदार आहे सगळं प्रकरण. दोन वर्षांनी म्हणाल की 'जीडीपी ग्रोथचा आणि कुठचं सरकार आहे याचा काही संबंध नसतो.' किंवा 'महागाई किती आहे याचा आणि सरकारचा संबंध नसतो.' जेव्हा म्हणाल तेव्हा वाचायला मजा येईल.
In reply to कोणता पक्ष सत्तेवर आहे किंवा by राजेश घासकडवी
In reply to कोणता पक्ष सत्तेवर आहे किंवा by राजेश घासकडवी
In reply to बर्याच गोष्टींची गल्लत होते by श्रीगुरुजी
कोणत्याही कंपनीच्या समभागाची भविष्यातील वाटचाल बघताना ते तब्बल वेगवेगळ्या ९९ घटकांचा अभ्यास करून अंदाज काढतात. कोणते सरकार आहे हा त्या ९९ मुद्द्यातला एक मुद्दा असतोतुम्ही भाषा फार तोलूनमापून वापरता याबद्दल तुमचं अभिनंदन करावं की ती वापरून तुम्ही मुद्दा डावलण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल तक्रार करावी हे कळत नाही. अहो, कंपनी वेगळी, ती मायक्रोइकॉनॉमीत येते. आख्खं मार्केट हे मॅक्रोइकॉनॉमीचा भाग असतं. आणि त्यावर सरकारचा प्रचंड प्रभाव असतो. द व्होल इज बिगर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स. असो. मग आता तुमच्याच युक्तिवादानुसार जीडीपीदेखील कंपन्या आणि व्यक्तींनी मिळवलेल्या उत्पन्नाने ठरतं आणि त्यात किती वाढ होईल हे सरकारच्या हाती नसतं. मग तुम्ही या लेखात आलेख काढून जीडीपी ग्रोथ रेट का दाखवला आहे? आणि हो, तोही घसरला आहे. सरकारनेच आपला जीडीपी ग्रोथ ८+ टक्के होणार नाही ७ ते ७.५ टक्के होईल असं म्हटलेलं आहे. युनोनेही म्हटलेलं आहे. हे आत्ता. २०१६ च्या शेवटी काय होतं पाहूया. जरा तो वरचा चार्ट बदलण्याची संपादकांना विनंती कराल का?
In reply to कोणत्याही कंपनीच्या समभागाची by राजेश घासकडवी
In reply to सेन्सेक्स किंवा निफ्टी हा by श्रीगुरुजी
गुंतवणुकदार गुंतवणुक करताना सरकार कोणते आहे, आवडते का नावडते, जातीयवादी की निधर्मी, सहिष्णु की असहिष्णु इ. गोष्टींचा कधीच विचार करीत नाहीत.जातीयवाद? सहिष्णुता? हे कुठून काढलंत तुम्ही? मी फक्त आर्थिक विकासाविषयी बोलतो आहे. परदेशातून किती गुंतवणुक आकर्षित झाली, जीडीपी ग्रोथ रेट काय आहे, भारतांतर्गत पैसा किती खेळता आहे, सरकारी धोरणं व्यापारउदीमासाठी किती चांगली आहेत या सगळ्यावर उत्पादन, कंपन्यांचा फायदा आणि पर्यायाने सेन्सेक्स अवलंबून असतो. माझा मुद्दा असा आहे की जे आहे ते मान्य करत जा. दरवेळी 'जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला कारण सरकारची चूक नाही, पाऊसच मेला कमी झाला' 'मार्केट आपटलं ते मार्केटच्या दोषामुळे, सरकारमुळे नै कै' असले युक्तिवाद करत राहिलात तर तुमची जी आहे ती विश्वासार्हताही कमी होईल. एकदातरी जर तुम्ही 'हम्म्म, हा गंभीर मुद्दा आहे खरा. इथे सरकार कमी पडलं खरं.' असं मोकळेपणाने म्हणा की. नाहीतर तुम्ही स्वतंत्र विश्लेषक वाटण्याऐवजी सरकारचे प्रवक्ते वाटता.
In reply to गुंतवणुकदार गुंतवणुक करताना by राजेश घासकडवी
मी फक्त आर्थिक विकासाविषयी बोलतो आहे. परदेशातून किती गुंतवणुक आकर्षित झाली, जीडीपी ग्रोथ रेट काय आहे, भारतांतर्गत पैसा किती खेळता आहे, सरकारी धोरणं व्यापारउदीमासाठी किती चांगली आहेत या सगळ्यावर उत्पादन, कंपन्यांचा फायदा आणि पर्यायाने सेन्सेक्स अवलंबून असतो.बरोबर आहे. याव्यतिरिक्त इतरही घटक असतात. परंतु यातल्या नक्की कोणत्या घटकांमुळे सेन्सेक्स कमी झाला किंवा फारसा वाढला नाही याविषयी अवाक्षर न काढता युपीएच्या काळातील पहिल्या २१ महिन्यात इतकीइतकी वाढ होती आणि मोदी सरकारच्या पहिल्या २१ महिन्यात त्या तुलनेने वाढ कमी आहे कारण मार्केटला हे सरकार आवडलेले दिसत नाही असा निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात. इतकेच नव्हे तर अगदी कराचीच्या एक्स्चेंजचे देखील उदाहरण देऊन आपण पाकिस्तानच्या मागे आहोत असाही निष्कर्ष काढलात. 'हेच का अच्छे दिन' अशी उपरोधिक कॉमेंटही केलीत. तुमची प्रतिक्रिया ही सागरिका घोषच्या ट्विटसारखीच होती.
माझा मुद्दा असा आहे की जे आहे ते मान्य करत जा. दरवेळी 'जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला कारण सरकारची चूक नाही, पाऊसच मेला कमी झाला' 'मार्केट आपटलं ते मार्केटच्या दोषामुळे, सरकारमुळे नै कै' असले युक्तिवाद करत राहिलात तर तुमची जी आहे ती विश्वासार्हताही कमी होईल. एकदातरी जर तुम्ही 'हम्म्म, हा गंभीर मुद्दा आहे खरा. इथे सरकार कमी पडलं खरं.' असं मोकळेपणाने म्हणा की. नाहीतर तुम्ही स्वतंत्र विश्लेषक वाटण्याऐवजी सरकारचे प्रवक्ते वाटता.काय नक्की मान्य करायचे? मार्केटला हे सरकार आवडले नाही हे मान्य करायचे का भारत पाकिस्तानच्या मागे आहे हे मान्य करायचे का अच्छे दिन आले नाहीत हे मान्य करायचे का मोदी सरकार पेक्षा युपीए सरकार जास्त चांगले होते हे मान्य करायचे? पाऊस २०१४ मध्ये आणि २०१५ मध्ये खूप कमी झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतीउत्पादनावरही परीणाम झाला ही देखील वस्तुस्थिती आहे. भारताच्या जीडीपी मध्ये शेतीक्षेत्राचा सुमारे १८% वाटा आहे. त्यामुळे शेतीउत्पादन घटले की त्याचा जीडीपीवर त्या प्रमाणात परीणाम होणार ही वस्तुस्थिती आहे. हे जर मान्यच करायची तुमची तयारी नसेल तर कितीही सांगून काहीही उपयोग नाही.
In reply to मी फक्त आर्थिक विकासाविषयी by श्रीगुरुजी
In reply to नाही हो, पहिल्या एकवीस by राजेश घासकडवी
In reply to घासू गुरुजी by सुबोध खरे
In reply to घासू गुरुजी by सुबोध खरे
९ मार्च २००९ ला सेन्सेक्स सर्वात तळाला म्हणजे ८१६० ला आला होता. तेंव्हा कोणी मनमोहन सिंह यांना दोष दिला नव्हतात्या दिवशी आख्ख्या जगातले मोजून सर्व इंडेक्सेस चाळीस पन्नास टक्क्यांनी आपटलेले होते. ती त्सुनामी होती. त्यामुळे खाली जाण्याचा दोष, आणि त्यातून सावरून वर येण्याचं श्रेय देण्यात अर्थ नाही.
तेंव्हा जागतिक मंदी पुढे सरकार काहीही करू शकत नव्हते तशीच परिस्थिती आजही आहे.हे मात्र खरं नाही. अमेरिकन मार्केट या काळात जैसे थे आहे. बीआरआयसी पैकी रशिया आणि चायना मार्केटं सुमारे तीस टक्के वर आहेत, ब्राझिलचे इंडेक्स वीस टक्के खाली आहेत. आणि आपला सेन्सेक्स पुन्हा जवळपास जैसे थे आहे. आपल्या परिसरात बघितलं तर, पाकिस्तान, बांग्लादेशचे स्टॉक्स आपल्या पुढे आहेत, श्रीलंका जवळपास बरोबरीला आहे. म्हणजे ब्रिक देशांत चारापैकी तिसरा नंबर, आपल्या परिसरात चारांपैकी तिसरा नंबर... ही काही चांगली चिन्हं नाहीत इतकंच म्हणणं आहे. आपल्या देशाचा 'आर्थिक विकास हा अग्रक्रम' अशी प्रतिमा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. ते होत नाहीये. (हा प्रतिसाद शब्दसंख्येने तुमच्या प्रतिसादाइतकाच किंवा कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा तो फाट्यावर मारला जाणार नाही अशी आशा आहे.)
In reply to तुमचे सगळे मुद्दे साधारण by राजेश घासकडवी
In reply to बीआरआयसी पैकी रशिया आणि चायना by सुबोध खरे
In reply to बीआरआयसी पैकी रशिया आणि चायना by सुबोध खरे
राहिली गोष्ट पाकिस्तानची त्यांचे GDP BSE च्या एक दिवसाच्या उलाढालीइतकं आहे.हे विधान चुकीचं आहे. पाकिस्तानचं जीडीपी सुमारे २४३ बिलियन डॉलर्स आहे. बीएसइची दिवसाची उलाढाल अर्धा बिलियनची आहे.
दहा लाख रुपयात पाच टक्के खाली आणि चाळीस पैशात १० टक्के वर यात काही फरक आहे का ?पाकिस्तानचं जीडीपी भारताच्या सुमारे एक सप्तमांश ते एक अष्टमांशच्या दरम्यान आहे (गेली अनेक दशकं), आणि दरडोई उत्पन्न भारताशी तुलनात्मक आहे (पंधरावीस टक्के कमी). तेव्हा दहा लाख आणि चाळीस पैसे ही दिशाभूल करणारं विधान आहे.
आपण केवळ सांख्यिकीचे हस्तचलाखी दाखविता आहात असे वाटते.
कि केवळ शाब्दिक कोलांट्याअशा टिप्पणी आल्या नसत्या तर बरं झालं असतं. आधीच्या प्रतिसादातही 'मेगाबायटी प्रतिसाद फाट्यावर मारले जातील' वगैरे म्हटलं होतंत. अशा गोष्टी टाळाव्यात. तुमचे अनेक मेगाबायटी प्रतिसाद मी मनापासून वाचतो. तेव्हा किती लिहिलं आहे यापेक्षा बरोबर लिहिलंय की चूक लिहिलंय हे महत्त्वाचं.
In reply to मी सतत १० मे २०१४ ते by राजेश घासकडवी
In reply to राजेश घासकडवी जी by सुबोध खरे
In reply to राजेश घासकडवी जी by सुबोध खरे
In reply to बाकी सगळे बरोबर आहे डॉक्टर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बाकी मोदी द्वेष्ट्यानि by सुबोध खरे
In reply to बरोबर बोललात सर! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मी सतत १० मे २०१४ ते by राजेश घासकडवी
In reply to १० मे २००४ ते १० मे २०१४ - by राजेश घासकडवी
१० मे २००४ ते १० मे २०१४ - सेन्सेक्स वाढून ५०७० वरून २२९०० वर गेला. म्हणजे दहा वर्षांत साडेचारपट. वर्षाला १६ टक्केसामान्य भाषेत विज्ञान लेखमाला रंगवणारे घासकडवी गुर्जी तुम्हीच ना?? :प मलाही असच वाटायचं पुर्वी... वय वर्षे १ ते २० एव्हरेज १०% टक्क्यानी वाढणारी बॉडी पुढल्या १ वर्षातं एकच ट्क्का वाढली म्हणजे यंदाचा तांदुळ, गहु, दुध, शिग्रेट, व्हॉडका बॉडीला आवडला नाहि :ड
In reply to गुर्जी... by अर्धवटराव
In reply to उदाहरण गमतीदार आहे. मात्र ते by राजेश घासकडवी
या लेखात नवीन राजवट आल्यावर सगळं कसं बहुतांश सुधारलेलं आहे असा युक्तिवाद आहे. मात्र इतर काही पॅरॅमीटर्स ढासळलेलेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्केट. चांगल्याचं श्रेय घ्यायचं, आणि वाईटाला इदं न मम म्हणायचं हे चालणार नाहीहे थोडं अवांतर होईल, पण अधोगती रोखणं हे देखील प्रगतीच्या आलेखात काऊण्ट करावं लागतं. आणि एकुणच भारतीय व्यापाराला पाव-अर्धा शतकानंतर येणार्या उभारणीच्या नादात या सरकारने नियर फ्युचरशी तडजोड केली हे मला वैयक्तीकरित्या काहि चुकीची वाटत नाहि. अर्थात, आता उशीर होत चालला आहे असं दिसतय. टाटा सारख्या संयमीत व्यक्तीने कानपिचक्या द्याव्या म्हणजे प्रकरण गंभीर होत चाललं आहे.
In reply to मार्केट वर सत्ताधाऱ्याचा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हजार प्रतिसाद व्हावेत म्हणून आमचा पण एक प्रतिसाद..... by मुक्त विहारि
हजार प्रतिसाद व्हावेत म्हणून आमचा पण एक प्रतिसाद.....मुवि, कितीही धागे येवोत, तुमच्या १४०५ प्रतिसाद मिळालेल्या धाग्याची बरोबरी कोणताही धागा करू शकणार नाही. तुमच्या धाग्याचा विक्रम अबाधितच राहील.
In reply to डिसेंबर २०१४ मध्ये जम्मू by श्रीगुरुजी
बाणराव सुबोध खरे - Tue, 09/02/2016 - 20:33 बाणराव जर गुरुजींच्या "एक वर्षानंतर" धाग्यावर चक्कर मारा. काही लोक कसे "बाजार आणि सरकार" यावर (काहीच्या) काही प्रतिसाद टाकत आहेत ते पाहण्यासाठी. अंमळ मनोरंजन होईल.>>दोन वर्षांआधीपर्यंत "बाजार आणि सरकार" ह्याबद्दलच ह्या इथल्या 'काही लोकां'पेक्षा, जरा जास्तच मनोरंजन आज सत्तेत असणारे करत होते, नाही का डॉक्टरसाहेब? त्या मनोरंजनामुळेच आपल्याला सत्ता मिळाली हेही ते कबूल करतात. पण बहुतेक आता 'त्यांना' कळले असावे की बाजार आणि सरकारचा तसा फार काही संबंध नसतो. दोन वर्षांआधी कळत नव्हते अडाण्यांना बिचार्यांना. :-)
In reply to जागतिक घडामोडींच्या by संदीप डांगे
पण एकूणच धोरणात्मकदृष्ट्या आताचे सरकार मागच्या सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहे,हे मी या ठिकाणी सांगू इच्छितोह्या सरकारचे एखादे असे धोरण सांगा ज्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सुसह्य झाले आहे.
In reply to पण एकूणच धोरणात्मकदृष्ट्या by मार्मिक गोडसे
In reply to रस्ते बांधणीचा दर वाढलेला आहे by अनुप ढेरे
ह्या सरकारचे एखादे असे धोरण सांगा ज्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सुसह्य झाले आहे.सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होणे हा एकच विकासाचा मापदंड आहे का?? मुळात माणसाने सर्वसामान्य असूच नये,असामान्य असावे. आणि ते सर्वस्वी स्वतःवर अवलंबून आहे,सरकार/प्रशाषन निमित्तमात्र असते, म्हणजे बघा,शौचालय बांधा म्हणून सरकारने लोकांना सांगावे लागते.पण तरीही मुर्दाडपणे लोकं उघड्यावर बसतातच ना!! आता अशा लोकांचे जीवन आणखी कसे सुसह्य करायचे?
In reply to ह्या सरकारचे एखादे असे धोरण by चेक आणि मेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008In reply to सर्वसामान्य नागरिकांचे जीवन by मदनबाण
In reply to महाराष्ट्रात जिथे महिन्यातुन by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008मुळात माणसाने सर्वसामान्य असूच नये,असामान्य असावे.एकंदरीत तुम्हाला तत्वज्ञानाचा अखाडा उघडण्यातच अधिक रस आहे असे दिसते. तुमच्या आयडीला शोभेल असे प्रतिसाद देण्याऐवजी तुम्ही Castling करून राजाला किल्ल्यात लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.
In reply to मुळात माणसाने सर्वसामान्य by मार्मिक गोडसे
तुम्ही Castling करून राजाला किल्ल्यात लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.पहिली गोष्ट मी भक्त नाही,व्यक्तीपूजा मला सर्वस्वी अमान्य आहे. दुसरी गोष्ट तटस्थपणे विचार करावा लागतो,म्हणजे बघा दोन बाजू असतात आणि त्याअनुषंगाने आपण प्रकट होत असतो.पण तिसरी सुद्धा एक बाजू असते हे आपण विसरतो बरं का!! देशात असणार्या बहुतांश लोकांचा जीवन जगण्याबाबतच्या दृष्टिकोन 'आपण गरीब आहोत' असाच असतो. आणि आपली सोच(हिंदी शब्द) जशी असते तसाच माणूस बनत असतो आणि तशाच प्रकारचे आयुष्य आपण जगतो. भारतीय जनमानस आणि प्रगत पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. म्हणजे बघा "thoughts become things" आपण जसा सकारात्मक विचार करतो तशाच घटना आयुष्यात घडतात आणि जीवन सुखकर होते. प्रगत राष्ट्रांनी पण कोठून तरी सुरूवात केली असेलच ना?? तर मुद्दा असा कि 'भारतीय जनसामान्यांची विचार करण्याची पद्धती'कशी असते?? पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये असणारा तो अवगुण आहे,बर ते जै दे. आता शौचालयाचा मुद्दा-
महाराष्ट्रात जिथे महिन्यातुन एकदाच पाणी येते, तिथे लोक उघड्यावर जाणार नाहीत तर काय करणार ? ढुंगण धुणे ही सुद्धा तिथे चैन समजली जात असावी !हे मात्र कायतरीच!! सरकारी शौचालये असताना त्यांचा वापर न करणारी लोकं पाहिलेली आहेत.आहात कुठे?? आणि किती पाणी लागतं ओ?? बरं पाणी असणार्या ठिकाणी पण तीच परिस्थीती. बरं थांबतो आता,सरकारची कातडी वाचण्याचा काहीही हेतू नाही. असच आपलं सांगितलं सहज,बाकि काय नै आणि हे तत्वज्ञान सांगतोय असं वाटू शकतं, शेवटी 'आदमी कि सोच' हा मुद्दा येतोच. . . . . -- चेक आणि मेट
In reply to तुम्ही Castling करून राजाला by चेक आणि मेट
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
In reply to तुम्ही Castling करून राजाला by चेक आणि मेट
In reply to तुम्ही विवेकानंद आहात का ? by चेक आणि मेट
In reply to नमस्कार गुरुजी by कपिलमुनी
In reply to तुम्ही विवेकानंद आहात का ? by चेक आणि मेट
In reply to तुम्ही विवेकानंद आहात का ? by चेक आणि मेट
In reply to तुम्ही विवेकानंद आहात का ? by चेक आणि मेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008In reply to प्रत्येकजण विवेकानंद बनू शकत by मदनबाण
In reply to http://www.susana.org/en by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project IntroductionIn reply to @कपिलमुनि by चेक आणि मेट
In reply to मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पहिली गोष्ट मी भक्त नाही,व्यक्तीपूजा मला सर्वस्वी अमान्य आहे.असे मी म्ह्टलेच नाही.
एकूणच धोरणात्मकदृष्ट्या आताचे सरकार मागच्या सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहे,हे मी या ठिकाणी सांगू इच्छितोसांगा आताच्या सरकारची 'एक पाऊल पुढे' कथा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to १००० साठी माझा एक प्रतिसाद by मी-सौरभ
In reply to सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण by सुबोध खरे
In reply to दिल्लीच्या वार्षिक by श्रीगुरुजी
In reply to म्हणायला तर बीजेपी न पण १० by नाना स्कॉच
In reply to नानासाहेब by सुबोध खरे
पण स्वतः तेच करत आहेत. मग हा सोवळेपणाचा डांगोरा कशासाठी ?"पार्टी विथ डिफरन्स" हा नारा कुणाचा होता बरे?
In reply to सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण by सुबोध खरे
सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि त्यांनी "दिल्लीच्या" जनतेच्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असल्याच्या चार पाच पानी मोठ्या मोठ्या जाहिराती "मुंबईच्या" वृत्तपत्रात येत आहेत. याचे पैसे कोण देणार आहे याचे कुतूहल लागून राहिले आहे.आआप जाहिरातीत सुद्धा असत्य माहिती पुरवित आहेत. इंडियन एक्सप्रेस मध्ये १७ फेब्रुवारीच्या अंकात आआपची २ पूर्ण पाने जाहिरात आहे. आआपने वर्षभर काय केले याचे वर्णन आहे. एका कॉलमचा मथळा "Delhi gov scraps management quota in private schools" असा असून त्यात खालील वाक्ये आहेत. Much to the respite of parents running for nursery admission, the Delhi government has scrapped the management quota in the private schools. त्या जाहिरातीत आपल्या सरकारने नर्सरी प्रवेशातील व्यवस्थापन कोटा स्क्रॅप केल्याबद्दल केजरीवालांनी स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे सविस्तर वर्णन आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. http://indiatoday.intoday.in/story/delhi-high-court-stays-delhi-governments-order-to-scrap-management-quota-in-private-schools/1/587515.html The Delhi High Court today has put a stay on Delhi Government's circular that scrapped many criteria for nursery admissions, including management quota. The high court today ruled that management quota will continue this year for nursery admissions. ही बातमी ४ फेब्रुवारीची असून सुद्धा १७ फेब्रुवारीच्या जाहिरातील आआप सरकार पूर्णपणे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्याच १५ फेब्रुवारीच्या आवृत्तीत आआपच्या अजून एका जाहिरातीचा मथळा आहे "Kejariwal proven right: CAG audit confirms scam of crores in private power distribution companies". प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे हे ऑडिट झालेलेच नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने कॅगला हे ऑडिट करण्याचा दिल्ली सरकारचा आदेश रद्द केला आहे. जर ऑडिट झालेलेच नाही आणि रद्द झालेले आहे तर कॅग ऑडिटने वीज वितरण कंपन्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला आहे असे केजरीवाल कशाच्या जोरावर म्हणतात. इथेही जनतेची पूर्ण दिशाभूल केली जात आहे. http://www.ndtv.com/delhi-news/cag-cannot-audit-discoms-accounts-high-court-1238109 The Delhi High Court today cancelled the AAP government's decision to get the accounts of three private power distribution companies audited by the Comptroller and Auditor General (CAG). न्यायालयाचा हा निर्णय ऑक्टोबर २०१५ मध्ये दिलेला आहे. परंतु १५ फेब्रुवारी २०१६ च्या जाहिरातील केजरीवाल त्याविषयी असत्य माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. यात आश्चर्य काहीच नाही. असत्यकथन, खोटे आरोप, कांगावा, जनतेची दिशाभूल, भ्रष्टाचार्यांना पाठिंबा हीच आआपवाल्यांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
In reply to सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण by श्रीगुरुजी
In reply to बापरे इतके धडधडीत खोटं? by सुबोध खरे
In reply to SC issues notice to three by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब, by नाना स्कॉच
In reply to बापरे इतके धडधडीत खोटं? by सुबोध खरे
बापरे इतके धडधडीत खोटं?अजून एक. त्याच जाहिरात मालिकेत एका जाहिरातीत असे वाक्य आहे.
"दिल्लीच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभर वीज दर वाढले नाहीत."आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की Delhi Electricity Regulatory Commission (DERC) या कंपनीने ९ जुलै २०१५ ला वीज दरात ६% वाढ केलेली आहे.
DERC hikes power tariff by 6%- http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-power-tariff-hiked-by-up-to-6-per-cent-to-come-into-effect-from-monday/
महिला आआपची आहे असे ती घटना घडल्यावर सर्व वृत्तपत्रातून आले होते.याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिला तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या . बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो. इथे माझ्या म्हणण्याची दखल मिपाकरांनी घेतली आणि खोटेपणा उघडा पाडला याबद्दल आभार
In reply to गुरुजी by कपिलमुनी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिलाहहपुवा. आआपकडून आलेले स्टेटमेंट म्हणजे पुरावा कधीपासून झाला? उद्या तुम्ही काँग्रेसच्या अधिकृत ईमेल आयडीवर ईमेल पाठवून विचाराल की २-जी तरंगलहरी वाटपात घोटाळा झाला होता का किंवा कोळसा खाण वाटप करताना भ्रष्टाचार झाला होता का? आणि त्यांचे उत्तर पुरावा म्हणून वापराल.
तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या. आम आदमी सेना व आआप हे एक नसून आम आदमी सेना ही आआपमधील लोकांनीच सुरु केलेली संघटना आहे हे मी सुरवातीपासूनच सांगत आहे. एक संघटना आहे व एक राजकीय पक्ष आहे. परंतु त्या राजकीय पक्षातीलच मंडळी या संघटनेत आहेत. भावना अरोरा ही एकाच वेळी आआपची सदस्य असून आम आदमी सेनेची सुद्धा सदस्य आहे. अशी 'दुहेरी निष्ठा' असलेले नेते सर्व पक्षात असतात. इथेही तसेच आहे. तरीही शंका असेल तर खालील वृत्त वाचा. http://www.indiasamvad.co.in/Special-Stories/INSIDE-STORY-Who-is-Bhawna-Arora-and-conspiracy-behind-ink-attack-on-CM-Kejriwal-10343 त्याच वृत्तातून, According to information, Bhawna Arora is the in-charge and member of Aam Aadmi Party's (AAP) rebel group Aam Aadmi Sena. Also, Aam Aadmi Sena's Punjab wing had sent Bhawna to launch an ink attack on Kejriwal. The woman claimed to be a member of AAP's Punjab wing and mentioned that the party has betrayed her.
बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो.पुन्हा एकदा हहपुवा. २-जी तरंगलहरी घोटाळा बाहेर आल्यावर काँग्रेसची कपिल सिब्बलांनी त्यात घोटाळा झालाच नाही. झिरो लॉस झाला अशी काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडली होती. ती भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याने न्यायालयाने स्वीकारली असती तर? एखाद्या पक्षाने मांडलेली भूमिका हे कोणीच पुरावा म्हणून विश्वास ठेवत नाहीत कारण कोणताही पक्ष नेहमी स्वतःचाच बचाव करतो व त्यासाठी संपूर्ण असत्य विधाने सुद्धा सांगितली जातात. झोपेचे सोंग तुम्हीच घेतले आहे. मुळात ज्या पक्षाचा अध्यक्ष वारंवार असत्यकथन करीत असतो त्या पक्षाची अधिकृत भूमिका कधीच विश्वासार्ह नसते.
In reply to याचाच पुरावा मागत आहे . मी एक by श्रीगुरुजी
In reply to हा कोणता सोर्स ? by कपिलमुनी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
In reply to पुराव्यांसाठी पाठपुरावा by ट्रेड मार्क
In reply to छे छे! असल्या गोष्टींचे by श्रीगुरुजी
In reply to पुराव्यांसाठी पाठपुरावा by ट्रेड मार्क
In reply to ट्रेडमार्क by कपिलमुनी
In reply to आयला by ट्रेड मार्क
In reply to पळवाट? by कपिलमुनी
In reply to मुनीवर्य, by श्रीगुरुजी
In reply to त्या इमेलवरून दिलेली माहिती by नाव आडनाव
In reply to मी माहिती मागणारच नाही. जी by श्रीगुरुजी
In reply to contact@aamaadmiparty.org by मोदक
There is nothing false published in ad provided by Delhi government. 1. AAP Government had taken a decision and published it as a government order. This decision has not ruled out by court. A stay has been brought to this decision for current academic year after some challenges to it by oppositions. This came after considering the delay in a process of courts final decision on completely scrapping the management quota. We have put our stand on the same and very much confident to win this case. 2: We request you to read the decision of Hon. Supreme court issued on 18th January 2016 about the CAG Audit of Delhi discoms. That will clarify the validity of our advertisement.पहिला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला असून नर्सरीसाठी मॅनेजमेंट कोटा या वर्षासाठी सुरूच राहील असा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आआपने अपील केले असून ते प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत "नर्सरीतील मॅनेजमेंट कोटा आमच्या सरकारने रद्द केला" हा जाहिरातीतील दावा चुकीचा ठरतो. आआप सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागण्याचा कितीही आत्मविश्वास असला तरी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. समजा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय? दुसरा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासंबंधी आपले म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी २०१६ ला दिल्लीतील ३ वीज वितरण कंपन्यांना नोटिस पाठविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला आहे. उच्च न्यायालयाने कॅगने ऑडिट करण्याचा निर्णय रद्द केल्याने हे ऑडिट होऊ शकले नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने कॅगच्या ऑडिटला हिरवा कंदिल दाखविला तरच त्यानंतरच ते सुरु होईल. परंतु त्याबाबतीत आताच "वीज वितरण कंपन्यांमध्ये प्रचंड घोटाळा असून या ऑडिटच्या अहवालामुळे ते सिद्ध झाले आहे" असा आआपचा जाहिरातीत केलेला दावा चुकीचा ठरतो. जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय?
In reply to धन्यवाद! by श्रीगुरुजी
रद्दअन
स्थिगितीमधले अंतर आता आम्हाला तुम्हांस सांगावे लागेल काय गुरूजी??
In reply to पहिला निर्णय उच्च न्यायालयाने by नाना स्कॉच
In reply to मी माहिती मागणारच नाही. जी by श्रीगुरुजी
In reply to मुनीवर्य, by श्रीगुरुजी
In reply to भाजपचा असा माहिती by नाव आडनाव
In reply to सध्या मिपावर दोनच विषय सगळ्या by तर्राट जोकर

In reply to तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी by होबासराव
In reply to आगामी पंजाब निवडणुकांच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अरेवा गुरुजींचा धागा म्हणे by माहितगार
In reply to अंदाज बरोबर आहे by कपिलमुनी
In reply to हरयानातील जाटांना राखीव जागा by श्रीगुरुजी
In reply to भाजपा by कपिलमुनी
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to आपल्या राजकीय फायद्यासाठी by तर्राट जोकर
In reply to भाजप एकंदरीत प्रतिक्रियावादी by श्रीगुरुजी
In reply to धर्मावरून राजकारण करणार् by तर्राट जोकर
In reply to नाही. वर लिहिल्याप्रमाणे भाजप by श्रीगुरुजी
In reply to बघा बरं गुरुजी. आता ह्या by तर्राट जोकर
In reply to प्रतिक्रियावादी म्हणजे काय हे by श्रीगुरुजी
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to आरक्षण by कपिलमुनी
In reply to आरक्षण by कपिलमुनी
आय डॉण्ट नो