आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी?
आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?
आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं?
आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे?
कोण विचार करतं याचा? कोणीच नाही!
फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स.
संपलं?
आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत!
का बरं असं?
का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का?
एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल.
"अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|"
"ह्यॅ! किसने कहाँ?"
"सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अॅडमिश आराम से हो जाएगा.."
"अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|"
"अरे SC के लिए तो ८५% है! पता है?"
"कौन वो भंगी?"
"नही SC वाला"
"वही- भंगी! साला यहाँ पे हमें अॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!"
"कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|"
"क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|"
(तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|"
"वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?"
"देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता"
"क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ"
"देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|"
"तू क्यु इतना डर रहा है?"
"डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|"
"मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर"
"गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|"
"लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?"
"देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|"
"साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?"
"जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!"
या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले.
थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्या मित्राबरोबर बोलायला लागला..
"क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?"
"वो बहोत डरपोक है|"
"नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें"
त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला-
"कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...
अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!"
ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का?
आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!"
जात
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!
पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.
एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!
आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो.
असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली.
पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....
वाचने
72961
प्रतिक्रिया
374
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजवर आयुष्य याच तत्त्वावर चालत आलोय...
स्त्री - पुरुष आरक्षण
येस सर गुड पॉइण्ट. तिथे कुणा
In reply to स्त्री - पुरुष आरक्षण by कपिलमुनी
मुद्दा भरकटवू नका
In reply to येस सर गुड पॉइण्ट. तिथे कुणा by संदीप डांगे
आरक्षणामुळे लायक मुलांना संधी
In reply to मुद्दा भरकटवू नका by सुबोध खरे
इथे फक्त जातीवरील
In reply to मुद्दा भरकटवू नका by सुबोध खरे
आरक्षण असून सुद्धा म्हणावा
मिपावर आरक्षण विषयी इतका
उपयोग झाला आहे.
In reply to मिपावर आरक्षण विषयी इतका by हेमंत लाटकर
कोणाला?
तुम्ही 'काय' चे उत्तर न
In reply to कोणाला? by हेमंत लाटकर
कपालहस्तमुद्रा माझी !
घटनेत आरक्षण करावं की नको यावर नि:संदिग्ध भाष्य नाही. जी काही तरतूद आहे तीत आरक्षणाचा निर्णय सर्वस्वी सरकारवर सोपवला आहे.
यात अमान्य करण्यासारखं काय आहे बुवा? आ.न., -गा.पै.I am kinda started enjoying
In reply to कपालहस्तमुद्रा माझी ! by गामा पैलवान
..
In reply to I am kinda started enjoying by संदीप डांगे
तुम्हाला कळलं नाही काय
In reply to .. by मोगा
..
In reply to तुम्हाला कळलं नाही काय by संदीप डांगे
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो ....
In reply to .. by मोगा
इथे प्रतिसाद आहे : http:/
In reply to I am kinda started enjoying by संदीप डांगे
.
In reply to कपालहस्तमुद्रा माझी ! by गामा पैलवान
थांकू रोहित
...
In reply to थांकू रोहित by निनाद मुक्काम …
बिहार बद्दल आपणाला काय माहीती
बाप्पुराव, अख्ख्या
In reply to बिहार बद्दल आपणाला काय माहीती by कैलासवासी सोन्याबापु
अन कायदेशीर आरेरावीची परवानगी
In reply to बिहार बद्दल आपणाला काय माहीती by कैलासवासी सोन्याबापु
मिपा सारख्या म्हणले आहे साहेब
In reply to अन कायदेशीर आरेरावीची परवानगी by मृत्युन्जय
मला देखील दोन्हीकडचे प्रतिसाद
In reply to मिपा सारख्या म्हणले आहे साहेब by कैलासवासी सोन्याबापु
आपण देत असलेल्या आदराबद्दल मी
In reply to मला देखील दोन्हीकडचे प्रतिसाद by मृत्युन्जय
इथे इतरही काही मतिमंद आयडी
In reply to मला देखील दोन्हीकडचे प्रतिसाद by मृत्युन्जय
तसेच हे फक्त तुम्हाला न
In reply to इथे इतरही काही मतिमंद आयडी by तर्राट जोकर
इथल्या सदस्यांना 'मतिमंद'
In reply to तसेच हे फक्त तुम्हाला न by मृत्युन्जय
मी कुणावरही वैयक्तिक चिखलफेक
In reply to इथल्या सदस्यांना 'मतिमंद' by तर्राट जोकर
@मृत्युन्जय,
In reply to मला देखील दोन्हीकडचे प्रतिसाद by मृत्युन्जय
प्रस्तुत घटनेत दलितांची
In reply to बिहार बद्दल आपणाला काय माहीती by कैलासवासी सोन्याबापु
आेठात एक पोटात एक!
कोणाच्या? तुमच्या न, मग बरोबर
In reply to आेठात एक पोटात एक! by हेमंत लाटकर
बापू वरचा प्रतिसाद तुम्हाला
माझा अनुभव
काही लोक तर इथे तसं काही
In reply to माझा अनुभव by माहितगार
तुमचा अनुभव खोटा असेल हो, बघा
In reply to काही लोक तर इथे तसं काही by संदीप डांगे
त्याग त्याग त्याग त्याग !!!
मिळेल ती साधी डिग्री घेउन
In reply to त्याग त्याग त्याग त्याग !!! by मोगा
हे वाचले नै का ?
In reply to मिळेल ती साधी डिग्री घेउन by सुबोध खरे
अनुभव बोलायला बसलो तर इथे
आरक्षण ह्या विषयावर मिपा वर
In reply to अनुभव बोलायला बसलो तर इथे by कैलासवासी सोन्याबापु
+१११ गाववाले
In reply to आरक्षण ह्या विषयावर मिपा वर by होबासराव
अनुभवाचे सार्वत्रिकरण
In reply to +१११ गाववाले by कैलासवासी सोन्याबापु
एक एससी सुद्धा आरक्षण घेऊन
In reply to +१११ गाववाले by कैलासवासी सोन्याबापु
बस बापु, सौ सुनार की एक लौहार
In reply to अनुभव बोलायला बसलो तर इथे by कैलासवासी सोन्याबापु
बापू साहेब
In reply to अनुभव बोलायला बसलो तर इथे by कैलासवासी सोन्याबापु
बैंग ऑन डॉक साब!!! आजही
In reply to बापू साहेब by सुबोध खरे
हे राम!
In reply to अनुभव बोलायला बसलो तर इथे by कैलासवासी सोन्याबापु
चला, धागा सोडायची वेळ आली. गा
भारतीय राजकारण आणि निवडणूका
In reply to चला, धागा सोडायची वेळ आली. गा by संदीप डांगे
डॉक्टरसाहेब, आपली लेजिस्लेटीव
In reply to भारतीय राजकारण आणि निवडणूका by सुबोध खरे
चला, धागा सोडायची वेळ आली.
In reply to चला, धागा सोडायची वेळ आली. गा by संदीप डांगे
राखीव जागांबद्दलचा एक वेगळा
..
In reply to राखीव जागांबद्दलचा एक वेगळा by श्रीगुरुजी
अभ्यासक्रम आहे. नोकरी नाही.
In reply to राखीव जागांबद्दलचा एक वेगळा by श्रीगुरुजी
(१) प्रवेशाचे कडक नियम काही
In reply to अभ्यासक्रम आहे. नोकरी नाही. by तर्राट जोकर
ह्यात पुरावे कुठे आहेत? ही
In reply to (१) प्रवेशाचे कडक नियम काही by श्रीगुरुजी
ही ऐकीव माहिती नाही किंवा
In reply to ह्यात पुरावे कुठे आहेत? ही by तर्राट जोकर
मी त्याच अभ्यासक्रमाचा
In reply to ही ऐकीव माहिती नाही किंवा by श्रीगुरुजी
मी क्रिकेटवर अनेक धागे
In reply to मी त्याच अभ्यासक्रमाचा by संदीप डांगे
श्रीगुरुजींच्या या
In reply to (१) प्रवेशाचे कडक नियम काही by श्रीगुरुजी
सकारात्मक कृती आणि गुणवत्ता न
In reply to श्रीगुरुजींच्या या by माहितगार
सकारात्मक कृती साठी स्कोप
In reply to सकारात्मक कृती आणि गुणवत्ता न by श्रीगुरुजी
तशी त्यांना संधीच मिळाली नाही
In reply to सकारात्मक कृती साठी स्कोप by माहितगार
बादवे, "तथाकथित
In reply to सकारात्मक कृती साठी स्कोप by माहितगार
सध्या असलेल्या आरक्षणा सोबत
आता आहे पन्नास टक्के हाताशी.
In reply to सध्या असलेल्या आरक्षणा सोबत by हेमंत लाटकर
बस्स!!
आपापली मते मंडणार्या सर्व
संदीप डांगे यांना प्रतिसाद ....
तुमच्यासाठी खास.
In reply to संदीप डांगे यांना प्रतिसाद .... by गामा पैलवान
धागा जरा वाचंत चला ....
In reply to तुमच्यासाठी खास. by संदीप डांगे
...
In reply to धागा जरा वाचंत चला .... by गामा पैलवान
मोगाजी,
In reply to ... by मोगा
..
In reply to मोगाजी, by सुबोध खरे
तुम्ही एकदा https://en
In reply to .. by मोगा
..
In reply to तुम्ही एकदा https://en by सुबोध खरे
तुणतुणे
In reply to .. by मोगा
सरकारी नोकरी हि अर्हता नसताना
In reply to मोगाजी, by सुबोध खरे
त जो
In reply to सरकारी नोकरी हि अर्हता नसताना by तर्राट जोकर
मी कुणाचीच रि ओढत नाही. फक्त
In reply to त जो by सुबोध खरे
प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले.
In reply to धागा जरा वाचंत चला .... by गामा पैलवान
मेकॉले जितका आम्ही तठस्थ
In reply to प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले. by संदीप डांगे
गामाजी वाद मिटलाय हो हा!
In reply to धागा जरा वाचंत चला .... by गामा पैलवान
मंडळी हि चर्चा वाचली, धागा
=))
In reply to मंडळी हि चर्चा वाचली, धागा by माहितगार
त्यापेक्षा मिपा बायका
In reply to =)) by पैसा