सकाळची मुंबै
तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी.
असो.
१. मुखपृष्ठ
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
वाचने
18570
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
मुंबईचे हे फोटोज खूप आवडले.
मुंबई शहर कधी निवांतपणे पाहिलच नसल्याने अधिकच भावले.
यावरुन आठवले - सर्वसाक्षी यांची मुंबईचे आगळे रूप पाहताना ही लेखमालिका.
In reply to खूप आवडले by श्रीरंग_जोशी
धन्यवाद श्रीरंग!
सर्वसाक्षींनी वेगळ्याच आणि दिलखेचक पद्धतीने फोटो घेतलेत, मालिका शेअर केल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद!
मस्तच … अप्रतिम …
छान फोटो. अगदी मुंबईत फिरून आल्यासारखे वाटले...
मस्त फोटो.
फोटो छान आले आहेत
छान फटु हाय साहेब!
सगळ्यात शेवटचा मोनोक्रोम विशेष आवडला, काळा आणि पांढरा या २ रंगात फोटो जे काही दिसतात ना ते अगदी खासच असतात.
मस्त आलेत सगळेच फोटो , नजर दिसते
सुंदर प्रचि.
मजा आली सकाळची मुंबै बघताना !
संडासाहेब, तुमची आणखी कलाकारी अशीच येवु द्या
सुंदर आहेत फोटो. अजून आवडतील पाहायला. सकाळी ऑफिसला निघालेले लोक, लंचटाईमला बाहेर पडून खातात त्यासंबंधित दृश्ये, संध्याकाळी लोकल्/बस ची धावाधाव, रात्रीची मुंबई, मराठी, गुजराती, पारशी प्रभाव, ब्रिटिश प्रभाव ई पॅटर्न्स ही होतील चांगले कदाचित. ट्रेन्स क्रिकेट हे सुद्धा.
In reply to मस्त! by फारएन्ड
धन्यवाद फारएन्डसर! अजून नक्कीच एक दोन फेर्या मारणार आहेच. एवढ्या मोठ्या मुंबईत किती काय काय घडत असतं, तुम्ही म्हटले ते विषय आहेत यादी. पॅटर्न्स ची कल्पनाही सुंदर आहे, आवडली. त्या कल्पनेवर काम करायला खरंच आवडेल.
मुंबईत जाउन पोहोचलो एकदम्
वाह वाह ...
:)
फोटो आवडले. जियो संदीपसेठ.
-दिलीप बिरुटे
वा झकासच !
खूप आवडले