मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काम दाखव फेकू...

तर्राट जोकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काम दाखव फेकू तुला देशी (गाय) ची शपथ हाय! ।।धृ।। राखी सावंतचा भाऊ अशी ओळख लोकांत टेलीप्रिंटरवरचे भाषण हा चुकवतो जोशात हात वर करुनी उभा हा जोरात आता कीती बोलतो हीच भीती सारे घोरात ।।१।। विदेश फिरुनी डोक्यात वारं ह्याच्या भरलं चार दिवस परतुनी पुन्हा गडप्प झालं कुठे होई फजीती ह्याची पण कॅमेरामनचाच लळा ।।२।। सेल्फी घेई कॅमेर्‍यातुन हा होई स्वतःच हीरो मनाच्याच करे बाता कामं सगळे झीरो पक्ष नाही दिसत कुठे यालाच फुटला गळा ।।३।। घोषणांच्या नोटा उधळी जणू नवरदेव भक्तांना येतो माजून भलताच चेव सरत-सरत येई पुण्याई लाटेची भरत-भरत आली घटका ही परतीची कसली ही वेळ देशावरती आणील अच्छे दिनचे प्रॉमिस कधीच होणे नाही ।।४।। प्रेरणास्रोतः

वाचन 8163 प्रतिक्रिया 15