Skip to main content

आवाज वाढव राहुल....

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी बुधवार, 03/02/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
आवाज वाढव राहुल तुला कांग्रेस (आय) ची शपथ हाय! ।।धृ।। आलियाचा भाऊ अशी ओळख लोकांत लिहून दिलेले भाषण हा करतो जोशात बाह्या मागे सारुनी उभा हा जोरात काय बोलतो हीच भीती सारे घोरात ।।१।। विपश्यना करुनी पोटात वारं ह्याच्या भरलं चार दिवस बोलबोलुनी पुन्हा गप्प झालं कुठे होई फजीती ह्याची अन कापे हा चळचळा ।।२।। शॉट देई डोक्याला हा होई स्वतःच झीरो मनाशीच म्हणे की होईन कधीतरी हीरो पक्ष नाही स्ट्रॉन्ग कुठे अकलेचा फुटला नळा ।।३।। नटून-थटून येई जणू नवरदेव कांग्रेसवाले ठेवती पाण्यामधी देव सरत-सरत येई पुण्याई पूर्वजांची भरत-भरत आली घटका ही पक्षाची कसली ही वेळ पक्षावरती येई सत्तेचे दर्शन वाटे पुन्हा कधीच नाही ।।४।।
लेखनविषय:

वाचने 2125
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया