मौजा ही मौजा
आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही.
१९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना. त्याने शर्ट खेचायला सुरु केला. होईल ते होईल ह्या विचाराने परत उठलो. बायको तोंडातल्या तोंडात काहीतरी पुट्पुटली. दुर्लक्ष केले. हवाईसुंदरीने करवली सारखे केबीन च्या दरवाजाबाहेर अडवले. "रिस्ट्रिक्टेड एरिया" "म्हणुन कणी कापली. आलो बापडा परत सीटवर. बायकोची विजयी मुद्रा निर्विकार पणे बघितली.
सुमारे १५ मिनिटाने मुलाला डोळा मारला. त्याने पण लगेच बोट वर केले. टॉयलेटच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॉकपीट कडे मार्गक्रमण केले. हवाईसुंद-या वाढप्याच्या कामात मग्न होत्या. त्यामुळे माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सऱळ केबिन कडे जाउन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला. पायलट बाहेर आला. त्याचे आय कार्ड बघितले. आडनाव बघुन कोकणीतच विचारले. अरे सायबा, चेल्ल्यान (मुलाने)कॉकपीट पळवचे (बघायचे) आसा म्होण बॉड (डोके) वाइट केल्यान. भायल्यान पळवपाक दी रे.
तो कॅप्टन हसला. त्याने मुलाला माझ्या हातातुन घेतले. आत नेले. . मी आपला दरवाजाबाहेर उभा. सुमारे दहा मिनिटाने दोघेही बाहेर आले. बाहेरुन मलाही कॉकपीट दर्शन झाले. जबडा पडणे म्हणजे काय ते त्या दिवशी मला कळले. हातात मुलाला दिल्यावर कॅप्टन म्हणाला, बरो हुशार आसा रे तुगेलो पुत. आता ताणे बोईंग प्लेन चलयला. ताका पायलट कर. चिरंजीवांच्या चेहे-यावर विलक्षण समाधान दिसत होते. 'कंप्युटर ड्रिवन ऑटो नेविगेशन सिस्टिम" विमान आपोआप उडत होते. आणि त्या मुळे त्याला स्टीक पण हातात दिली होती त्या कॅप्टन ने. आजही हा प्रसंग आठवतो तेंव्हा एकच विचार येतो, मुलाची फँटसी पुर्ण करु शकलो ते फक्त 'नकार" समिकरणातुन बाहेर काढल्यामुळे.
पुढच्या वर्षी हाच फंडा वापरुन कुमठा ते कारवार प्रवास ट्रेन च्या ड्रायवर केबिन मधुन केला. को पायलट च्या सीट वर चिरंजीव्.ताशी १०० ने झालेला तो प्रवास कधीच विसरता येणार नाही. बाप भी खुश बेटा भी खुश. त्याच्या पुढच्या वर्षी 'मांडवी क्रुझ" पण कॅप्टनच्या सीट वर बसुन स्टीयरीग हातात घेउन मुलगा तर बाप बाजुला हातात बिअर च्या ग्लासा सकट.
बर्-याच वेळेला असे वाटते अशा किती तरी संधी आपण सोडतो फक्त विचारायला घाबरुन. नकार मिळायच्या आधीच तो गृहित धरुन. भोक पडत नाही अंगाला नकार आला म्हणुन."प्राईम मिनिस्टर आहे का, नकाराने अपमान व्हायला".
जाताजाता: प्राईम मिनिस्टर ला पण नकार घ्यावा लागतो. नकाराने अपमान होत असेल तर तो करुन घ्यावा लागतो. मग तुमची आमची काय कथा? पण चुकुन होकार आला तर "मौजा ही मौजा".
वाचने
11785
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
आशय पटला
In reply to आशय पटला by ऋषिकेश
+१
सुरेख संदेश
येस! यू डिड इट.
पटले
आशय
In reply to आशय by प्रदीप
नकार देणे!
In reply to नकार देणे! by पांथस्थ
आता असाच
In reply to आशय by प्रदीप
पायलटने मुलाचे केलेले कौतुक......
मौजा आवडली.
In reply to मौजा आवडली. by शितल
हाहाहा..
संध्या
In reply to संध्या by विनायक प्रभू
मला मात्र
खरे आहे
मस्त
नक्कीच अशा नकार मिळण्याच्या भितीने मी पण खुप
मौजा ही मौजा!
In reply to मौजा ही मौजा! by संजय अभ्यंकर
सहमत आहे!
वा साहेब
मौजा ही मौजा
In reply to मौजा ही मौजा by कोलबेर
मौजा ही मौजा
चांगले
नकारही पचवायचा
फार म्हणजे
प्राईम
आशय आणि
मस्तच मस्त..
अजून एक आठवण
तो पायलट
In reply to तो पायलट by धनंजय
हा धनंजय गोवेकरांचा..
In reply to हा धनंजय गोवेकरांचा.. by प्राजु
माझा प्रयत्न
In reply to माझा प्रयत्न by सुनील
लै भारी.
In reply to लै भारी. by विनायक प्रभू
:)))))
In reply to लै भारी. by विनायक प्रभू
'चला आता
माझ्या
In reply to माझ्या by रामदास
काय झाले
In reply to माझ्या by रामदास
आठवण
In reply to माझ्या by रामदास
हा हा हा
In reply to माझ्या by रामदास
:)))
र॑गेल फिल्डमार्शल
गेल्या वर्षी
मिरज
प्रभूसर, छा
नो
In reply to नो by कपिल काळे
एन् ओ, नो चा
In reply to नो by कपिल काळे
वाह
टाळ्या...
आमचाही अनुभव!
पॉजिटीव एटिट्युड
दे धडक ...
नकार