रात्र
लेखनविषय:
काव्यरस
दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल
फिरती सभोवताली तारांगणे विशाल
निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली
चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ...
तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला
तो केवडा सुगंधी केसात माळलेला
तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली
हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ...
स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे
गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे
तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी
वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ...
थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली
आता छटा सुखाची अंतात गुंफलेली
अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली
चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली...
© अदिती जोशी
unaadpaus.blogspot.com
वाचने
3642
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
नेहमीप्रमाणे.....एकदम नादमय. आवडली.
सुरेख!
Lay bhari kas suchat tula ameya
In reply to Lay bhari kas suchat tula by आनंदमयी
व्हाटइसधिस?
In reply to ? by एस
एस भाऊशी बाडिस.
कविता सुंदर आहे. पण या प्रतिक्रियेचा अर्थ कळला नाही. आनंदमयी, दुसर्या कोणाच्या कविता इथे पोस्ट करत आहात का?
In reply to Lay bhari kas suchat tula by आनंदमयी
माझ्या वडिलान्नी नुकतच अंतर्जाल वापरणे शिकण्यास सुरुवात केली आहे... डेस्कटॉप वर हे पेज उघडे असताना त्यान्नी ह्या कवितेवर स्वतःचं फेसबुक पेज समजून प्रतिक्रीया दिली.. मला हे लक्षात आलं असूनसुद्धा प्रतिक्रीया काढून टाकता येत नव्हती...
कविता माझीच आहे.. :) आपल्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद...
वाह
अतिशय सुरेख!गुणगुणायला लावणारी कविता!
सगळ्या कडव्यांतील शेवटची ओळ सुंदर आहे..
अर्थात कविता नक्की कुणाची हा प्रश्न मलाही पडला आहे आता..
राघव
अप्रतीम!
सुंदर कविता! चार रात्रीत अख्खा जीवनपट उलगडला आहे!
खुप आवडली कविता. या कवितेमध्ये प्रचंड सुंदर आशय भरलेला आहे आणि भाषेच्या सौंदर्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच.
या अशा कविताच मराठी साहित्याला समृद्ध बनवित असतात आणि वेगळ्याच उंचीवर घेऊन जात असतात.
पुढील लेखनासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!
सुरेख आहे! कवीतेत रात्र उतरली आहे...
Sundar aahe.. khupach aavadali..
क्लास