हिटलरने खरंच आत्महत्या केली का?
हॉटेल इडन
अर्जेंटीनातून आलेल्या या खबर्याने दिलेल्या माहितीचा एफबीआयच्या अधिकार्यांवर चांगलाच परिणाम झाला होता. खुद्दं डायरेक्टर जे एडगर हूवरने लॉस एंजलिसमध्ये येऊन या खबर्याची भेट घेतली आणि त्याच्याकडे तपशीलवार चौकशी केली! हूवरशी बोलताना त्याने हिटलरने प्रवास केलेल्या प्रत्येक भूभागाची माहिती दिलीच, पण त्याने मुक्काम केलेल्या गावांची नावं आणि घरांची माहितीही पुरवली! या माहितीची हूवरला इतकी खात्री पटली होती की त्याने ही माहिती काही अमेरीकन जनरल्सना दिली! परंतु पुढे काहीच झालं नाही!
जे एडगर हूवरने १३ नोव्हेंबर १९४५ ला ब्युनॉस आयर्समधल्या अमेरीकन वकिलातीला लिहीलेल्या पत्रात हिटलर जर्मनीतून निसटून अर्जेंटीनात आल्याची पक्की खात्री असल्याचं स्पष्टपणे लिहीलं होतं. काही महिने अगोदरच ब्युनॉस आयर्समध्ये असलेल्या अमेरीकन नेव्हीच्या अधिकार्यांकडून हिटलर अर्जेंटीनाच्या आश्रयाला आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हूवरच्या या पत्रामुळे एफबीआयची हिटलर अर्जेंटीनात असल्याची पक्की खात्री पटल्याचंच सिद्धं होत होतं! इतकंच नव्हे तर एलियान्ड्रो बस्टीलो या आर्कीटेक्टने अर्जेंटीनात उभारलेल्या बव्हेरीयन पद्धतीच्या आलीशान व्हिलाचं डिझाईनही एफबीआयला मिळालं होतं!
२१ सप्टेंबर १९४५ ला एफाबीआयच्या फाईल १०५-४१० मधली ही नोंद हिटलरच्या आगमनाचं वर्णन करते -
"Approximately two hours later the second sub came ashore and HITLER, two women, another doctor, and several more men ... were aboard. By pre-arranged plan with six top Argentine officials, pack horses were waiting for the group and by daylight all supplies were loaded on the horses and an all-day trip inland toward the foothills of the southern Andes was started."
एफबीआयच्या साईटवर आजही ही फाईल सामान्य वाचकाला उपलब्धं आहे!
हिटलरची एफबीआय फाईल
२०१० मध्ये एफबीआयने खुल्या केलेल्या फाईल्समध्ये या खबर्याचं नाव गाय्डॅनो असं नमूद केलं आहे.
Hitler esta Vivo (Hitler is Alive) या पुस्तकात लाडीसालो साब्झो या हंगेरीयन सैनिकाने अर्जेंटीनामध्ये यू-५३० ही पाणबुडी आल्याचं नमूद केलं आहे. या पुस्तकात त्याने हिटलरचा अंटार्क्टीकामध्ये पसार होण्याचा प्लान होता असा दावा केला आहे! १९३८-३९ ,मध्ये अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर गेलेल्या जर्मन संशोधकांनी आणि नेव्हीच्या अधिकार्यांनी वॅडेल समुद्र आणि क्वीन मॉड पेनिन्सुलाच्या परिसरात हिटलरच्या वास्तव्यासाठी जागा पाहून ठेवल्याचं साब्झोने प्रतिपादन केलं आहे! अर्थात हा दावा चुकीचा होता!
एफबीआयची कागदपत्रं खुली होण्यापूर्वी २००३ मध्येच अर्जंटीनाचा लेखक एबल बस्ती 'हिटलर इन अर्जेंटीना' या त्याच्या पुस्तकात हिटलरच्या अर्जेंटीनातील वास्तव्याची साद्यंत हकीकत मांडली होती!
आपल्या या पुस्तकासाठी बस्तीने सुमारे सात वर्ष संशोधनात घालवली होती! अर्जेंटीनाच्या दक्षिणेला असलेल्या पॅट्गोनिया प्रांतात हिटलरचं वास्तंव्य होतं असं बस्तीचं ठाम मत होतं! या प्रदेशात अनेकदा त्याने भटकंती केली. अनेक लोकांच्या त्याने मुलाखती घेतल्या होत्या! दूरदूरच्या प्रदेशात असलेल्या अनेक रांचवर अनेकदा त्याला शस्त्रसज्ज असलेल्या जर्मनांकडून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या!
बस्तीच्या दाव्यानुसार नाझींना अर्जेंटीनात आणून सुरक्षितरित्या पुनर्वसन करण्यामागे मोलाचा वाटा होता तो रोडॉल्फो फ्रूएड याचा. रोडॉल्फो हा लुडविग फ्रूएड या जर्मन कोट्याधिशाचा मुलगा जुआन पेरॉनचा सेक्रेटरी होता. जोसेफ मेंगेल, अॅडॉल्फ आईकमन यांना अर्जेंटीनात आणण्यातही फ्रूएडचाच हात होता. जर्मनीतून निसटून स्पेनला गेल्यावर आणि पुढे कॅनरी आयलंड्समधून जर्मन पाणबुडीतून प्रवास करुन हिटलर आणि इव्हा ब्राऊन इतर नाझींसह पॅट्गोनियाच्या किनार्यावर उतरले होते! जर्मनी - स्पेन - अर्जेंटीना असा पलायनाचा मार्ग हिमलरच्या एस एस संघटनेने आखला होता! याच मार्गाने पुढे आईकमन, मेंगेल, बार्बी इत्यादी नाझी अर्जेंटीनाला आले होते!
स्पेनमधल्या एका जेसुईट पाद्र्याची बस्तीने गाठ घेतली होती. या पाद्र्याचे कुटुंबिय हिटलरचे निकटचे स्नेही होते. जर्मनी़तून निसटल्यावर काही दिवसांसाठी हिटलरचं स्पेनच्या कॅन्टाबेरीया प्रांतात वास्तंव्य होतं. या वास्तव्यादरम्यान हिटलरशी प्रत्यक्षं भेट झालेल्या आणि त्याला पाहिलेल्या स्पॅनिश लोकांच्याही बस्तीने मुलाखती घेतल्या होत्या. या सर्वांनी १९४५ च्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिटलरला स्पेनमध्ये पाहिल्याचं ठामपणे म्हटलं आहे!
ब्रिटीश सरकारच्या आणि एम आय ६ च्या कागदपत्रांनुसार मेच्या पहिल्या आठवड्यात जर्मन पाणबुड्यांचा एक काफीला स्पेनच्या किनार्यावरुन निघून कॅनरी आयलंड्सवर आला. एव्हाना हिटलरने कॅन्टाबेरीया प्रांत सोडून कॅनरी आयलंड्सवर मुक्काम ठोकला होता! दोन दिवस कॅनरी आयलंड्सवर थांबल्यावर हा काफीला थेट दक्षिण अर्जेंटीनाच्या दिशेने निघाला.
१९४५ च्या जुलै-ऑगस्टच्या दरम्यान हिटलर, ब्राऊन आणि इतरांचं रिओ नेग्रो परगण्यात कॅलेटा डी लॉस लॉरोस या खेड्याच्या किनार्यावर आगमन झालं! समुद्रकिनार्यावर उतरल्यावर हिटलरने ला हसिएन्डा सॅन रॅमॉन इथे आश्रय घेतला. काही काळ तो वॉल्टर आईकहॉर्नच्या हॉटेलमध्ये मुक्कामास होता! पुढे यथावकाश लेक नाहुल हुआपी याच्या काठावर असलेल्या व्हिला ला अँगोस्टुरा इथल्या एका रँचवर हिटलरचं वास्तव्यं होतं! हे ठिकाण बस्ती राहत असलेल्या बॅरीलोचे पासून सुमारे ५० मैल उत्तरेला आहे! या रँचवर केवळ बोटीनेच जाणं शक्यं होतं!
व्हिला ला अॅगोस्टुरा
आपल्या संशोधनादरम्यान बस्तीने हेलॉईस लुआनची गाठ घेतली. लुआन नाझींना देण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांचा 'टेस्टर' होता! नाझींवर कोणत्याही प्रकारे विषप्रयोग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत होती! लुआनने अनेकदा खुद्दं हिटलरला देण्यात येणार्या जेवणंही 'टेस्ट' केलं होतं! लुआनप्रमाणेच हिटलरची स्वयंपाकीण कार्मेन टोरेंट्गुई हिची भाची अँजेला सोरियानी हिनेही हिटलरला अनेकदा पाहिल्याचं बस्तीला सांगितलं होतं!
'इन द फूट्स्टेप्स ऑफ हिटलर' या आपल्या दुसर्या पुस्तकात बस्तीने एका ब्राझिलीयन सैनिकाची साक्षं दिली आहे. हा सैनिक म्हणतो,
"५ फेब्रुवारी १९७१ मध्ये हिटलरचा वृद्धापकाळाने अंत झाला! त्याचं पराग्वेमध्ये दफन करण्यात आलं! आज त्या जागेवर एक अत्याधुनिक हॉटेल उभं आहे!"
बस्तीच्या दाव्यानुसार १९७१ मध्ये मृत्यू होण्यापूर्वी हिटलर आणि इव्हा यांना दोन मुली झाल्या होत्या!
अमेरीकन संशोधक जेरॉम कोर्सीच्या दाव्यानुसार अॅलन डलेसनेच हिटलरला जर्मनीतून निसटण्यास मदत केली होती! डलेस तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास होता आणि इथून युद्धव्याप्त युरोपमधील अमेरीकन हेरांच्या जाळ्याचं नियंत्रण करत होता!
१९४३ पासूनच हिटलरचा सेक्रेटरी असलेला मार्टीन बोरमनने अॅक्टन अॅल्डर्फ्लग (प्रोजेक्ट इगल फ्लाईट) नुसार मोठ्या प्रमाणावर जर्मनीतून पैसा बाहेर पाठवण्यास सुरवात केली होती! १९४३-४५ च्या दरम्यान बोरमनने सुमारे २०० अर्जेंटीनी कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली होती! त्याच्या जोडीला पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि तुर्कस्तान यातील कंपन्यांचाही समावेश होता! इतकंच नाही तर सुमारे साडेनऊशेच्यावर जर्मन कंपन्या त्याने याकाळात तयार केल्या! त्यापैकी ७७० कंपन्या युद्धात तटस्थं असलेल्या राष्ट्रांत होत्या! एकट्या अर्जेंटीनातच यातील ९८ कंपन्या निर्माण करण्यात आल्या! इतकंच करुन बोरमन थांबला नाही, तर अमेरीका आणि कॅनडा यांच्या शेअरबाजारात तेजीत असलेल्या अनेक इंटरनॅशनल कंपन्यांचे शेअर्स त्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते! १९४३ मध्ये जुआन पेरॉन अर्जेंटीनामध्ये सत्तेवर आल्यावर बोरमनने अर्जेंटीनात नाझी जर्मनांसाठी वसाहत उभारण्याच्या कामाला वेगाने सुरवात केली होती!
अमेरीकेच्या नॅशनल अर्काईव्ह्जमध्ये असलेल्या एका डॉक्युमेंट्रीनुसार हिटलर यू-५३० या पाणबुडीने अर्जेंटीनाला पोहोचला होता! पाणबुडीत असलेल्या सर्व नाझींना सुरक्षीतपणे अर्जेंटीनाच्या किनार्यावर उतरवल्यावर कमांडर ऑटो वेरमथ आणि एक्झीक्युटीव्ह ऑफीसर कार्ल फेलीक्स शुलर यांनी मार देल प्लाटा या अर्जेंटीनाच्या बंदरात आपल्या पाणबुडीसह शरणागती पत्करली!
कोर्सीच्या संशोधनातून आणि सिद्धांतामधून काही महत्वाचे प्रश्नं पुढे येतात ते म्हणजे,
रशियनांनी हिटलरचं प्रेत जाळून त्याचे उरलेसुरलेले अवशेष नेल्यावरही हिटलरचा मृत्यू झाल्याचा खात्रीलायक पुरावा अमेरीकन अधिकार्यांना का मिळू शकला नाही?
खुद्दं स्टॅलिन आणि आयसेनहॉवर दोघांनाही हिटलरचा मृत्यू झालेला नाही असं का वाटत होतं?
अर्जेंटीनाच्या वृत्तपत्रांनी हिटलर अर्जेंटीनात आल्याचं उघडपणे छापल्यावरही अमेरीकन सरकार आणि आर्मीच्या अधिकार्यांनी अधिक खोलवर तपास करण्याचं का टाळलं? हिटलरच्या पलायनाला खुद्दं अॅलन डलेसने सहाय्यं केल्याचं कारण यामागे असावं का?
हिटलर आणि इव्हा ब्राऊनने आत्महत्या केली असल्यास त्यांच्या मृतदेहांचा एकही फोटो का घेतला नाही?
कोर्सीच्या दाव्यानुसार यामागचं कारण एकच होतं, ते म्हणजे हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती तर तो अर्जेंटीनामध्ये निसटला होता! अर्जेंटीनामध्ये त्याच्या बर्चेसगाडेन इथल्या घराप्रमाणेच बांधण्यात आलेल्या बव्हेरीयन व्हिलामध्ये त्याने आपले अखेरचे दिवस काढले होते!
हिटलर इन अर्जेंटीना या आपल्या डॉक्युमेंट्रीत नोअॅम शॅलेव्हनेही हिटलरने जर्मनीतून पसार होऊन अर्जेंटीनामध्ये आश्रय घेतल्याचं प्रतिपादन केलं आहे.
२८ एप्रिल १९४५ ला हिटलरने उपलब्धं असलेली सर्व विमानं वापरुन जर्मनी आणि डेन्मार्क यांच्यातील मार्ग सुरक्षीत करण्याचा आदेश दिला होता! वास्तविक ज्या मार्गाचा जर्मनीला कोणत्याही प्रकारे उपयोग नव्हता तो मार्ग इतका सुरक्षीत करण्यामागचं एकमेव कारण असू शकत होतं, ते म्हणजे खुद्दं हिटलरला त्या मार्गाने सुरक्षीतपणे जर्मनीतून बाहेर पडायचं होतं!
जर्मनीतून बाहेर पडल्यावर डेन्मार्क - स्पेन - कॅनरी आयलंड या मार्गाने हिटलर अर्जेंटीनाला आला. काही काळ त्याने आईकहॉर्न दांपत्याच्या हॉटेल इडनमध्ये मुक्काम केला होता. याच मुक्कामात हिटलरला प्रत्यक्ष पाहिलेल्या एका वेट्रेसने शॅलेव्हला संपूर्ण डीटेल्स सांगितले.
कॅटलिना गॅमेरो ही हॉटेल ईडन मध्येच स्वयंपाकीण कम सहाय्यक म्हणून कामाला होती. आईकहॉर्न दांपत्याचा नाझी जर्मनीला असलेला पाठींबा सर्वश्रुत होताच. हॉटेलमधल्या जवळपास प्रत्येक खोलीत आणि लॉबीतही अनेक ठिकाणी हिटलरची अनेक पोस्टर्स टांगलेली होती. खुद्दं आईकहॉर्न दांपत्याला मूलबाळ नसल्याने ते कॅटलिनाला आपल्या मुलीप्रमाणेच वागवत असत!
१९४८ मध्ये आईकहॉर्न दांपत्याने कॅटलिनाला एका खास पाहुण्याच्या वास्तव्याबद्दल काही खास सूचना दिल्या! हा पाहुणा केव़ळ आईकहॉर्न कुटुंबियांच्या नातेवाईकांसाठी वापरण्यात येणार्या एका व्हिलामध्ये राहणार होता. त्या पाहुण्याशी बोलायची किंवा कोणत्याही प्रकारे संवाद साधण्यापासून सर्वांना सक्तं मनाई करण्यात आली होती! हा पाहुणा इतरांप्रमाणे डायनिंग रुममध्ये जेवण घेणार नव्हता! दिवसातून तीन वेळा त्याचं अन्नं त्याच्या व्हिलामध्ये सर्व्ह करण्याची जबाबदारी कॅटलिनावर होती!
एका दुपारी एक लिमोझीन हॉटेलसमोर येऊन थांबली आणि त्यातून खाली उतरले खुद्दं हिटलर आणि इव्हा ब्राऊन! सर्वजण चकीत होऊन पाहत असतानाच दोघं लॉबीत निघून गेले! हिटलरने आपल्या मिशीला चाट दिली असली आणि डोक्यावरचे केस विरळ झालेले असले तरी तो नि:संशय हिटलरच होता हे कॅटलिनाने ओळखलं होतं! ती म्हणते,
"I work at the Hotel as a waitress. The hotel is owned by Eda Eichhorn, a Nazi who gets funds by Josef Göbbels, Nazi Propaganda Minister. In 1948, I saw a limo with only 4 doors. When a door opens, I saw Hitler with his wife Eva Braunn going to the lobby. The 'Hitler of the Andes' is the Hitler we all know at the television. Although he cut off his moustache and has a little hair, he wears a wig on it, yes he do. Usually, the lobby is full of people. But in 3 days Hitler lives there, the downstairs is reserved. Eda told me; "What ever you've seen, act as like you don't." So i joke with the chauffeur not too tell the secrets to anyone. but it's been a long time, so I don't care anymore!"
तीन दिवस, दिवसातून तीन वेळा कॅटलिना हिटलर आणि इव्हा ब्राऊन यांना सर्व्हीस देत होती, परंतु दोघांपैकी एकाशीही ती चकार शब्दं बोलली नाही! तीन दिवसांनी हिटलर आणि इव्हा आले तसेच निघून गेले! हिटलरचं वर्णन करताना कॅटलिनाने त्याला पार्किन्सन्समुळे नीट चालता येत नसल्याचाही उल्लेख केला होता!
कॅटलिनाच्या म्हणण्यानुसार १९६१ मध्ये वॉल्टर आईकहॉर्नचं निधन झाल्यावर दर आठवड्याला हिटलरचा न चुकता इडा आईकहॉर्नची चौकशी करण्यासाठी फोन येत असे! १९६४ मध्ये इडाच्या मृत्यूपर्यंत हे फोनचं सत्रं सुरु होतं!
कॅटलिना गॅमेरो प्रमाणेच हिटलरला अर्जेंटीनामध्ये पाहिल्याचं ठामपणे प्रतिपादन केलं नर्स असलेल्या मॅफल्डा फॅल्कन हिने. फॅल्कनचा जन्म जर्मनीत झाला होता. दुसर्या महायुद्धाच्या सुरवातीच्या काळात रेडक्रॉसच्या एका हॉस्पीटलमध्ये ती नर्स म्हणून काम करत होती. जर्मनीच्या फ्रान्सवरील आक्रमणादरम्यान जखमी झालेल्या सैनिकांना या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एक दिवस या सैनिकांना भेटण्यासाठी खुद्दं हिटलरची स्वारी हॉस्पीटलमध्ये अवतरली! मॅफल्डाने त्याचं जवळून निरीक्षण केलं. त्याचे निळे भेदक डोळे तिच्या पक्के लक्षात राहिले होते!
महायुद्ध संपल्यावर फॅल्कन आणि तिच्या नवर्याने अर्जेंटीनाच्या पॅटागोनिया प्रांतात स्थलांतर केलं. मॅफल्डा कमोडोर रिव्हाद्विया इथल्या एका हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असताना एका जर्मन सैनिकाला इथे भरती करण्यात आलं होतं. एक दिवस या सैनिकाला भेटण्यासाठी तीन माणसं आली होती. सुमारे दहा फूट अंतरावरुन मॅफल्डा त्यांच्याकडे पाहत असतानाच त्यांच्यातल्या एकाची तिच्याशी नजरानजर झाली आणि पुन्हा एकदा जर्मनीत पाहिलेले ते भेदक निळे डोळे तिच्या नजरेस पडले! मिशी विना आणि बर्यापैकी केस पांढरे झालेले असूनही तिने त्याला लगेच ओळखलं! तो हिटलरच होता. परंतु तरीही खात्री करुन घेण्यासाठी ते तिघं निघून गेल्यावर तिने त्या सैनिकाकडे सहजपणे चौकशी केली. इतर दोघांची त्याने नावं सांगितल्यावर तिने विचारलं,
"And the third?"
"The Fuhrer!" तो जर्मन सैनिक उत्तरला!
ब्रिटीश संशोधक आणि लेखक सायमन डन्स्टन आणि जेरार्ड विल्यम्स यांनी आपल्या 'ग्रे वुल्फ' या पुस्तकात हिटलरने जर्मनीतून पसार होऊन अर्जेंटीनाला पोहोचेपर्यंतच्या प्रवासाचं तपशीलवार वर्णन केलं आहे! हिटलरने १९४५ मध्ये आत्महत्या केली नसून तो अर्जेंटीनाला सटकल्याचा त्यांनी ठामपणे दावा केला आहे!
बर्लिनमध्ये हिटलरची चॅन्सेलरीच केवळ जमिनीखाली होती असं नाही तर सुमारे हजारेक बंकर्स जमिनीखाली होते. या बंकर्सच्या जोडीला काही फॅक्टर्याही जमिनीखाली उभारण्यात आल्या होत्या! इतकंच नाही तर या सर्व बंकर्स आणि फॅक्टर्यांना जोडणार्या अनेक गुप्त वाटा आणि भुयारांचा सुळसुळाट होता! हिटलरच्या चॅन्सलरीखालच्या स्ट्डीमधून यापैकी अनेक भुयारांमध्ये निसटणं अगदी सहज शक्यं होतं!
डन्स्टन आणि विल्यम्स यांच्या दाव्यानुसार २७ एप्रिलच्या रात्रीच हिटलर, इव्हा ब्राऊन आणि इव्हाचा मेव्हणा हर्मान फेगेलाईन चॅन्सेलरीतून भुयाराच्या मार्गाने निसटले आणि त्यांच्या जागी बोरमनने निवडलेले त्यांचे तोतये बसवण्यात आले. परंतु या सगळ्या दाव्यामध्ये एक महत्वाची गल्लत आहे ती म्हणजे फेगेलाईनच्या बाबतीत. हिमलरने शरणागती पत्करण्याबाबत वाटाघाटी सुरु केल्यावर हिमलरचा प्रतिनिधी असलेल्या फेगेलाईनवर कोर्ट मार्शल करुन त्याला देहांताची शिक्षा फर्मावण्यात आली होती! चॅन्सलरीच्या बागेत त्याला २८ एप्रिल १९४५ ला गोळ्या घाळण्यात आला!
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बर्लिनमधून विमानाने बाहेर पडणं शक्यं होतं का?
२३ एप्रिलला एकमेव महिला जर्मन फायटरपायलट असलेली बेटे उसे आपल्या अॅराडो ६६ विमानातून गॅटॉव विमानतळावर उतरली. रॅंग्सडॉर्फ इथल्या आपल्या घरातून आपला तान्हा मुलगा, त्याची नॅनी आणि काही जखमी जर्मन सैनिकांसह तिने पुन्हा २३ एप्रिलला बर्लिन सोडलं. त्याच दिवशी हिटलरचा आर्कीटेक्ट अल्बर्ट स्पीअर गॅटॉव विमानतळावर उतरला! दुसर्या विमानाने तो शहराच्या मध्यवर्ती भागात चॅन्सेलरीजवळ असलेल्या पूर्व-पश्चिम अशा हायवेवर उतरला! या हायवेचं तात्पुरत्या रन वे मध्ये रुपांतर करण्यात आलं होतं! हिटलरचा वैयक्तीक वैमानिक हान्स बोअर याच्याकडे या रन वे च्या देखभालीची जबाबदारी होती. २६ एप्रिलला दोन जुंकर्स-५२ विमानं या रन वे वर उतरली! त्याच दिवशी गॅटॉव विमानतळावर बर्लिनच्या संरक्षणासाठी आणण्यात आलेली ५०० नौसेनिकांची तुकडी उतरली!
त्याच दिवशी सुप्रसिद्ध जर्मन महिला वैमानिक हाना रित्श आणि जनरल रॉबर्ट व्हॅन ग्राम गॅटॉव विमानतळावर उतरुन हिटलरच्या भेटीला आले! २९ एप्रिलला रशियनांनी गॅटॉव विमानतळ ताब्यात घेतला असला तरी चॅन्सेलरीजवळच्या रन वे वर अद्याप जर्मनांचा कब्जा होता! २९ एप्रिलला पहाटे १.०० वाजता रित्श आणि ग्राम यांनी याच रन वे वरुन बर्लिन सोडलं! याच रन वे वर एक जुंकर्स-५२ विमान निघण्याच्या तयारीत उभं असल्याचं त्यांच्या नजरेस पडलं होतं. या विमानाचा वैमानिक होता पीटर बॉम्गार्ट!
याच विमानातून हिटलर आणि इव्हाने बर्लिनमधून पोबारा केला होता का? बोम्गार्टने न्यूरेंबर्ग खटल्यात दिलेल्या साक्षीत तसाच दावा केला होता!
हिटलर अर्जेंटीनामध्ये आल्यावर काही काळ ब्यूनॉस आयर्समध्ये वास्तव्यास असल्याचंही एका अर्जेंटीनी वेटरच्या साक्षीवरुन पुढे आलं. या वेटरचं नाव होतं रॉबर्टो ब्रून! ब्रून ज्या हॉटेलमध्ये काम करत होता ते एका कॉर्सिकन व्यक्तीच्या मालकीचं होतं. हा मालक फ्रान्समधून पळून अर्जेंटीनाला आला होता आणि फ्रेंच पोलिस त्याच्या मागावर होते! फ्रान्सवर जर्मनीची सत्ता असताना त्याने उघडपणे जर्मनांना मदत केली होती!
ब्रून हॉटेलमध्ये आल्यावर सुमारे सहा-सात महिन्यांनी एक दिवस एका खास पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली! या पाहुण्यासाठी एक खास शेफ बोलावण्यात आला होता! ब्रून म्हणतो,
"I remember black hair with little touches of white, a skinny face, no mustache. When he got up from the table to walk, Mandaver was with me to one side. And all the people were respecting him!"
"Do you know who it is?" हॉटेलचा मॅनेजर मॅन्डॉव्हरने विचारलं.
"No"
"the Fuhrer!"
ब्रूनने हिटलरप्रमाणेच आणखीन एक व्यक्ती तिथे पाहिल्याचा दावा केला. मार्टीन बोरमन!
इव्हा ब्राऊनचं वर्णन करताना ब्रून म्ह्णतो,
"The manager told us there was a group of ladies for tea, and he had been told by his Corsican boss to be very careful with these woman because they were all related to these people!"
Eva Hitler was about 40, not pretty, semi –pretty, very reserved and very demanding, she gave ‘strong’ orders, and was dressed in the fashion of the time. She was the boss there!"
डन्स्टन आणि विल्यम्सच्या पुस्तकात नाझी डॉक्टर जोसेफ मेंगेलचा ब्राझीलमधल्या एका रेस्टॉरंटमधला फोटोही आहे! याबरोबरच आणखीन एक अविश्वसनीय दावा या पुस्तकात करण्यात आला आहे,
१९४३ पासूनच अर्न्स्ट काल्टेनब्रूनर, मार्टीन बोरमन आणि खुद्दं हिमलर यांनी दोस्त राष्ट्रांच्या प्रमुख अधिकार्यांशी आणि त्यांच्या करवी प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून हिटलर आणि त्याच्याशी एकनिष्ठ असणार्यांची हत्या करण्याचा आणि दोस्तांना सामील होऊन रशियाविरुद्ध लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता! चर्चील, आयसेनहॉवर, पॅटन यांची या प्रस्तावाला मान्यता होती, परंतु रुझवेल्टने मात्रं याला नकार दिला होता! हा प्रस्ताव मान्य केला असता तर किमान दोन वर्ष आधी महायुद्ध थांबलं असतं आणि शेवटच्या टप्प्यात गॅस चेंबर्समध्ये मारले गेलेले वीस लाख ज्यू आणि स्लाव्हवंशीय वाचले असते आणि कॉन्सन्ट्रेशन कँप्सही बंद झाले असते!
डन्स्टन-विल्यम्स यांचा हा दावा मात्रं ओढूनताणून आणलेला वाटतो!
नुकताच २०१५ च्या मध्यावर 'हंटींग हिटलर' ही डॉक्युमेंट्री सिरीज बनवणार्या टीमला एक अनपेक्षीत शोध लागला!
बर्लिनच्या टेंपलहॉर्फ विमानतळाजवळ तपासणी़ करत असताना सीआयएचा माजी अधिकारी असलेल्या बॉब बेअर आणि ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यात सहभागी असलेला टिम केनेडी यांना टेंपलहॉर्फ विमानतळाच्या खाली असलेल्या यू६ या सबवे स्टेशनजवळची एक भिंत पोकळ असल्याचं ध्यानात आलं! आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी सोनारच्या सहाय्याने भिंतीची तपासणी केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला!
ही भिंत म्हणजे बर्लिनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चॅन्सेलरीकडे जाणार्या भुयाराचं तोंड होतं!
या भिंतीपलीकडे भुयार असल्याचं ध्यानात येताच हिटलर जर्मनीतून पसार झाल्याची बेअर आणि केनेडी यांची पक्की खात्री पटली! २१ एप्रिलच्या रात्री टेंपलहॉर्फ विमानतळावरुन १० जुंकर्स-५२ विमानं बरच सामान घेऊन उडाली होती! या दहापैकी ८ विमानांमध्ये हिटलरचं सामान असल्याचा त्यांचा दावा होता! खुद्दं हिटलर आणि इव्हा ब्राऊन, मार्टीन बोरमन याच मार्गाने २८-२९ एप्रिलच्या सुमारास निसटले असावे असा बेअरचा तर्क आहे!
एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे हिटलर आणि इव्हा ब्राऊन अर्जेंटीनाला आले असं मानलं तरी त्यांचा चरितार्थ कसा चालत होता?
दुसर्या महायुद्धाचा भडका उडण्यापूर्वीपासूनच जर्मनीने पादाक्रांत केलेल्या ऑस्ट्रीया आणि चेकोस्लोव्हाकीयात असलेल्या संपत्तीची आणि दुर्मिळ पेंटींग्ज आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूंची मनसोक्तं लूट केली होती! पुढे सार्या युरोपवर वर्चस्वं प्रस्थापित केल्यावर यात अधिकाधीक भर पडत गेली! जर्मनीतून हिटलर निसटण्यापूर्वीच बोरमनने ही सर्व लूट जर्मनीबाहेर काढून अर्जेंटीनाला आणली होती! या सर्व लुटीच्या आधारेच हिटलरने उर्वरीत आयुष्यं आरामात व्यतित केलं असा बहुतेक सर्वांचा दावा आहे!
हिटलर जर्मनीतून निसटून अर्जेंटीनामध्ये नाही तर इक्वेडोरमध्ये गेला आणि मरेपर्यंत ख्रिस्ती धर्मगुरु म्हणून वावरला असा अमेरीकन आर्मीचा निवृत्त कर्नल वेंडेल स्टीफन्सचा दावा आहे! १९८१ मध्ये स्टीफन्सने इक्वेडोरच्या क्युनेका या लहानशा शहराला भेट दिली होती. इथे त्याची गाठ एका वृद्ध पाद्र्याशी पडली. या पाद्र्याशी बातचीत केल्यावर आणि त्याचं लक्षपूर्वक निरीक्षण केल्यावर हा पाद्री दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात हिटलर असल्याची त्याची पक्की खात्री पटली! या पाद्र्याजवळ असलेला दुर्मिळ पेंटींग्ज आणि इतर वस्तूंचा संग्रह पाहिल्यावर तर स्टीफन्सला कोणतीच शंका उरली नाही! परंतु स्टीफन्सच्या दाव्याकडे कोणीच लक्षं दिलं नाही!
स्टीफन्सने हिटलर असल्याचा दावा केलेला हा पाद्री म्हणजे फादर क्रेस्पी!
फादर क्रेस्पी
क्रेस्पीच्या म्हणण्याप्रमाणे तो इटलीतल्या ऑस्ट्रीयन घराण्यात जन्माला आला होता. १९४३ मध्ये तो व्हेटीकनला गेला. व्हेटीकनमध्ये दोन वर्षांनी त्याची पाद्री म्हणून नेमणूक करण्यात आलीच, त्याचबरोबर व्हेटीकनला मिळणार्या दुर्मिळ वस्तुसंग्रहाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली! १९४३ नंतर तो कधीच व्हेटीकनमधून बाहेर पडला नव्हता. १९५६ मध्ये त्याची इक्वेडोरच्या क्युनेका इथे पाद्री म्हणून नेमणूक करण्यात आली. इथे येताना त्याने आपला वैयक्तीक कलासंग्रह बरोबर आणला होता!
क्युनेका हे गाव नाझी युद्धगुन्हेगारांचा शोध घेणार्यांना फरार नाझींचं आश्रयस्थान म्हणूनच माहीत होतं! इथे आल्यावर फादर क्रेस्पी खूपच साधं आयुष्य जगत होता! त्याला भेटायला येणार्या प्रत्येकाला तो रोख रक्कम भेट देत असे! गावकर्यांनाही त्याने त्याच्या चर्च आणि परिसरात कोणी परका माणूस घुसू नये याची खबरदारी घेण्यासाठी भरघोस रक्कम दिली होती! त्याला भेटायला येणारे बहुतेक सर्व लोक हे जर्मन होते!
१९८२ मध्ये ९० व्या वर्षी फादर क्रेस्पीचा मृत्यू झाला तेव्हा सुमारे २००० लोक त्याच्या अंत्यविधीला हजर होते! यात जोडीला शस्त्रधारी संरक्षक असलेल्या अनेक जर्मनांचा समावेश होता! क्रेस्पीचा अंत्यसंस्कार एखाद्या सम्राटाला शोभेल अशा इतमामाने करण्यात आला! त्याच्या स्मृतीस्थानाची आजही दर आठवड्याला सफाई करण्यात येते आणि त्यावर कायम ताजी फुलं वाहिलेली असतात! ही फुलं पाठवणारे मात्रं अज्ञात आहेत!
फादर क्रेस्पीच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे राहिलेल्या कलासंग्रहाची किंमत कोट्यावधी डॉलर्सच्या घरात होती! यातील बर्याच पेंटींग्ज आणि इतर वस्तू या खुद्दं हिटलरच्या संग्रहात असल्याचं अनेक जर्मनांचं मत होतं! फादर क्रेस्पीच्या मृत्यूनंतर १६ मे १९८२ या दिवशी दोन कार्गो विमानांमध्ये त्याचा सर्व कलासंग्रह चढवण्यात आला आणि त्यानंतर तो कोणाच्याही दृष्टीस पडलेला नाही!
फादर क्रेस्पी आणि हिटलर यांची तुलना केल्यावर काही मनोरंजक गोष्टी समोर येतात -
हिटलरच्या मृत्यूची तारीख - ३० एप्रिल १९४५
क्रेस्पीच्या मृत्यूची तारीक - ३० एप्रिल १९८२
क्रेस्पीचा कलासंग्रह हा बॅबिलोनियन होता असा त्याचा दावा होता! हिटलरलाही बॅबिलनियन संस्कृतीचं प्रचंड आकर्षण होतं. जर्मनिया हे शहर त्याला बॅबिलोनियन शहराप्रमाणे वसवायचं होतं! हिटलर आणि क्रेस्पी दोघंही कलासक्तं होते आणि दोघांनाही कलासंग्रहाचा शौक होता! दोघंही शुद्ध शाकाहारी होते!
सर्वात महत्वाचं म्हणजे फादर क्रेस्पीला पार्किन्ससने ग्रासलं होतं. बोलताना तो 'आर' या अक्षराचा उच्चार मुद्दाम हेल काढल्यासारखा करत असे! अगदी हुबेहुब हिटलरसारखाच!
फादर क्रेस्पीचा इंटरव्ह्यू
फादर क्रेस्पी हा हिटलर होता का?
हिटलर जर्मनीतून पसार होऊन इंडोनेशियाला गेला असाही एका संशोधकाने दावा केला आहे!
ब्रिटीश इतिहास संशोधक गाय वॉल्टर्स मात्रं या सर्व संशोधनाची आणि हिटलर अर्जेंटीनाला निसटला या सिद्धांताची खिल्ली उडवताना म्हणतो,
"Its 2,000 per cent rubbish!"
हिटलरच्या बंकरमध्ये हजर असलेल्यांची साक्षं जास्तं महत्वाची आहे असं बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. त्यांच्या साक्षीनुसार हिटलरने आत्महत्याच केली आहे!
परंतु आत्महत्या करणारा हिटलरचा तोतया असला तर?
युद्धाच्या अखेरच्या काळात हिटलरवर उपचार करणारे बहुसंख्य डॉक्टर रहस्यमयरित्या गायब झाले! अपवाद हिटलरचा डेंटीस्ट! या डेंटीस्टनेच हिटलरच्या मृतदेहाची खात्री पटवल्याचा रशियनांचा दावा आहे, परंतु मग डीएनए टेस्टचं काय? हिटलरची कवटी म्हणून जो दावा रशियनांनी केला आहे ती ना हिटलरची कवटी आहे ना इव्हा ब्राऊनची!
आणखीन एक महत्वाचा प्रश्नं म्हणजे इव्हा ब्राऊनच्या मृतदेहाचा एकही फोटो कसा नाही?
रशियनांनी चॅन्सेलरीचा ताबा घेतल्यावर जनरल विल्हेम मोहन्क, हिन्झ लिन्ग, ऑटो गुन्शे आणि हान्स बोअर यांना रशियनांनी अटक केली. हिटलरच्या मृत्यूचं नेमकं रहस्य यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकाने उलटसुलट विधानं केली!
मोहन्क म्हणाला,
"I personally did not see the Führer's body and I don't know what was done to it."
बोअर म्हणाला,
"I have never seen Hitler dead."
सर्वात धक्कादायक खुलासा होता तो लिन्गचा! लिन्ग म्हणाला,
"I did not see Hitler, but toward the end noticed two bodies wrapped in carpet being carried out of the Bunker. I had assumed the bodies to be those of the Hitler couple, only later had he been told that this was the case!"
लिन्गची ही जबानी कमालीची धक्कादायक आहे, कारण बहुसंख्य इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे खुद्दं लिन्गनेच हिटलरचा मृतदेह चॅन्सेलरीच्या बागेत नेला! आपण नेत असलेला मृतदेह कोणाचा आहे हे लिन्गला माहीत नव्हतं?
हिटलरचा अंगरक्षक रोचस मिश पुढे म्हणाला,
"I did not hear any shots!"
महायुद्धाच्या काळात हुबेहूब हिटलरसारखे दिसणारे किमान दोन तोतये एस एस ने तयार केले होते हे ब्रिटीश आणि अमेरीकन हेरखात्याच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे. या दोनपैकीच एक तोतयाने बर्लिनमध्ये आत्महत्या करुन हिटलरचा अर्जेंटीनाला जाण्याचा मार्ग मोकळा केला होता का? आश्चर्य म्हणजे वर्षानुवर्ष हिटलरबरोबर वावरणार्यांनी आणि हिटलरला जवळून ओळखणार्यांनी हिट्लरचा तोतया ओळखला नसता का? दुसर्या महायुद्धानंतर इतक्या वर्षांत इतक्यावेळा तपासणी करुनही एकानेही बर्लिनमध्ये हिटलरच्या तोतयाने आत्महत्या केली असं म्हटलेलं नाही!
परंतु मग अर्जेंटीनात हिटलरला प्रत्यक्षं पाहिलेल्या लोकांचं काय?
एबल बस्तीने तर हिटलर आणि इव्हा यांना दोन मुली झाल्याचाही दावा केला आहे. या दोन मुलींबरोबर हिटलरचा फोटोही त्याच्या पुस्तकात आहे. या दोन मुली सध्या कुठे आहेत?
गोबेल्सचा मुलगा हेल्मट हा माग्डा गोबेल्सला हिटलरपासून झाला होता यात कितपत तथ्यं आहे?
या गिसेला फ्लिशर हिने लिहीलेल्या पुस्तकात तिची आई जर्मन अॅथलिट टिली फ्लिशर आणि बाप हिटलर असल्याचा दावा केला आहे! या दाव्यात कितपत तथ्य आहे?
१९४५ मध्ये बर्लिनमध्ये असताना इव्हा ब्राऊन प्रेग्नंट होती हा दावा कितपत खरा आहे?
हिटलरचा मृत्यू नेमका कधी झाला?
१९४५? १९६२? १९६४? १९७३? का १९८२?
हिटलरचं शेवटी नक्की काय झालं?
--------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ :-
Revealed - Hitler in Argentina
Hitler of the Andes
Ten Days to Die - Michael Mussamanno
Speaking Frankly - James Byrnes
Hittler in Argentina - Abel Basti
In the Footsteps of Hitler - Abel Basti
Hitler's Exile - Abel Basti
Hunting Hitler: New Scientific Evidence That Hitler Escaped Nazi Germany - Jerome Corsi
Grey Wolf: The Escape of Adolf Hitler - Gerard Williams, Simon Dunstan
In reply to वाखुसाआ. by एस
In reply to हे प्रचि पहाच by गामा पैलवान
In reply to गामा पैलवान, by ऋत्विका
In reply to सुंदर लेख! by बोका-ए-आझम
In reply to अभ्यासपूर्ण लेखन by श्रीरंग_जोशी
In reply to अभ्यासपूर्ण लेखन by श्रीरंग_जोशी
In reply to !! by भृशुंडी
In reply to !! by भृशुंडी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big Worldहिटलर आणि क्रेस्पी दोघंही (.............)शुद्ध शाकाहारी होते!हिटलर हा नंतर नंतर प्रकृतीच्या कारणासाठी शाकाहारी झाला होता असं वाचलंय. जर तसं असेल तर त्याला शुद्ध शाकाहारी म्हणता येइल का? धन्यवाद!!
In reply to जबरदस्तं माहिती. हिटलरनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्युंचं शिरकाण ही एक गोष्ट सोडली तर अशी करारी आणि देशभक्तीने भारलेली लोक्स खुप कमी असतातअत्यंत थिल्लर अन बेजबाबदार विधान. आपल्यासारखे लोक जर इतकी अविचारी प्रतिक्रिया देत असतील तर इतर कुणाकडून काय अपेक्षा करायची कळेना झालंय.
In reply to ज्युंचं शिरकाण ही एक गोष्ट by असंका
In reply to +1 by जव्हेरगंज
In reply to ज्युंचं शिरकाण ही एक गोष्ट by असंका
In reply to फासे उलटे पडले असते तर, by भंकस बाबा
In reply to भाऊ क्रेडिट एकट्या हिवाळ्याला by कैलासवासी सोन्याबापु

In reply to भाऊ क्रेडिट एकट्या हिवाळ्याला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to उपमर्द , तो कसा? by भंकस बाबा
In reply to फासे उलटे पडले असते तर, by भंकस बाबा
In reply to हिटलरने रशियावर आक्रमण करून by हेमंत लाटकर
In reply to ज्युंचं शिरकाण ही एक गोष्ट by असंका
In reply to ह्यामधे अविचारी काय आहे समजेल by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ह्यामधे अविचारी काय आहे समजेल by कॅप्टन जॅक स्पॅरो
कारण मी ज्युंच्या वंशसंहाराचा निषेधचं केलेला आहेआपण म्हणताय की ते सोडलं तर. पण 'सोडून देणं' हा निषेध नाही. आणि कौतुक कसलं तर देशाभिमान? करारीपणा? देश म्हणजे त्यातले नागरीक नव्हेत काय? देश म्हणजे काय अशी आपली कल्पना आहे? त्याचा अभिमान आहे की नाही हे ठरवायची काय कसोटी? आपल्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात आपल्या मनाला येइल त्या नव्वद लाख - ९०,००,००० लोकांना - त्यात एक लाख लहान मुलं ही- ठार मारण्यात या देशाभिमानाचा आणि करारीपणाचा वाटा किती?
In reply to तुम्ही तो जगावा या पद्धतीचे by असंका
In reply to असंका असकाय करताय? तेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असंका असकाय करताय? तेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असंका असकाय करताय? तेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to थोडी गडबड आहे कॅप्टन.. हिटलर by स्रुजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big WorldIn reply to सध्या भारतात कुणीही बांडगुळं by मदनबाण
In reply to ही बांडगुळं आहेत? खरंच?? by स्रुजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big WorldIn reply to ही बांडगुळं आहेत? खरंच?? by मदनबाण
In reply to गल्लत होते आहे. त्यांना by स्रुजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big WorldIn reply to बांडगुळं कोण हे बदलत राहतं. by मदनबाण
In reply to थोडी गडबड आहे कॅप्टन.. हिटलर by स्रुजा
In reply to असंका असकाय करताय? तेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी तर अजुन पुढे जाउन सांगतो, असाचं एखादा हिटलर भारतामधे जन्माला यावा. त्याने सगळ्या राष्ट्रविरोधी बांडगुळांचा सार्वजनिक जागी मुळापासुन साफसफाया करावा. दुसर्या महायुद्धामधली ज्यु लोकांची बाजु मला नीट माहिती नाही पण आत्ता भारतातली जी बांडगुळं आहेत त्यांची नक्कीचं माहिती आहे. तस्मात त्यांच्या थडग्यावर रडणारा कोणी नसावा अशी अपेक्षा.प्रचंड असहमत! साहेब, अशा प्रकारची अस्थिरता आजच्या काळात परवडणारी नाही. बोलायला सोपं असतं हे .पण करायला जवळजवळ अशक्य . हिटलरचा काळ वेगळा होता. आजच्या काळात तशी परिस्थिती उद्भवली तर पूर्ण मानवजात नष्ट होईल कदाचित . तेव्हा "त्यांनाही" चांगली , गुण्यागोविंदाने रहाण्याची बुद्धी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
In reply to असंका असकाय करताय? तेचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चिमण बरोबर सहमत by होबासराव
In reply to +१* by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बाप्पु by होबासराव
In reply to विरोध फक्त ह्याला आहे. by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चिमण बरोबर सहमत by होबासराव
In reply to जबरदस्तं माहिती. हिटलरनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to पत्रकार आणि इतिहासकार by बोका-ए-आझम
In reply to पत्रकार आणि इतिहासकार by बोका-ए-आझम
In reply to + १ फार सुंदर पुस्तक आहे हे. by स्रुजा
In reply to +१ वि ग कानिटकर बहुतेक का by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ वि ग कानिटकर बहुतेक का by कैलासवासी सोन्याबापु
In reply to + १ फार सुंदर पुस्तक आहे हे. by स्रुजा
नाझी भस्मासूराचा उदयास्तअत्यंत एकांगी पुस्तक आहे ते, पण हिटलर बद्दल आकर्षण निर्माण होण्यास त्याच पुस्तकाने मदत केली हे हि खरे.
In reply to एकांगी पुस्तक by महासंग्राम
In reply to एकांगी पुस्तक by महासंग्राम
In reply to एकांगी पुस्तक by महासंग्राम
In reply to पत्रकार आणि इतिहासकार by बोका-ए-आझम
In reply to दुसर्या महायुद्धाला सुरवात by ऋत्विका
In reply to दुसर्या महायुद्धाला सुरवात by ऋत्विका
In reply to दुसर्या महायुद्धाला सुरवात by ऋत्विका
In reply to विनम्र दुरुस्ती -- कंटिन्युड by मन१
In reply to दुसर्या महायुद्धाला सुरवात by ऋत्विका
In reply to दुसर्या महायुद्धाला सुरवात by ऋत्विका
In reply to विनम्र दुरुस्ती by मन१
In reply to ज्यू- रशिया by मन१
In reply to पत्रकार आणि इतिहासकार by बोका-ए-आझम
In reply to जबरदस्तं माहिती. हिटलरनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॕप्टनजी , बाडिस ! हिटलर वाईट by उगा काहितरीच
In reply to History TV १८ वर हंटिंग हिटलर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to History TV १८ वर हंटिंग हिटलर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to फार सुंदर लेख. स्पार्टाकस by आदूबाळ
In reply to फार सुंदर लेख. स्पार्टाकस by आदूबाळ
वाखुसाआ.