काळरात्र....!!!!!
लेखनविषय:
काव्यरस
लहानपणापासून पहात होतो मी तिला
लोक सांगायचे कि ती वेडी आहे
खायला काळ आणि भुईला भार अशी
एक बिन अकलेची घोडी आहे
मेंदूने असहकार पुकारला असला
तरी शरिराने आपल कर्तव्य बजावलं होतं
तिच्या निरागस मनाला न जुमानता
तिला ज्वानीच्या बाजारात आणलं होतं
एका ओल्या काळरात्री गावाच्या वेशीवर
ती भांबावलेली सैरभैर रडवेली दिसली
मला पहाताच " आई गर्दीत हरवली"
निरागसपणे सांगुन दात विचकून हसली
अश्याच संधीच्या शोधात मी देखील होतो
म्हटलं मनात की शिकार आयतीच गवसली
क्षणातच तिच्या गोबर्या गालावर वळ उमटले
मुस्काट दाबून तिला झुडूपांत फरफटवली
पाऊस आता बेभान कोसळत होता
मला अडवायला जिवाचे रान करत होता
त्याच्या राज्यातले हे वासनेचे कौर्य पाहुन
चंद्र ही ढगांच्या आड तोंड लपवत होता
बर्याच वेळाने तो बिभीत्स खेळ थांबला
धरणी हळहळली,आसंमतानेही निषेध नोंदवला
त्या विटंबित झालेल्या कलेवराची
निर्जीवता बघुन माझ्याही काळजाचा ठोका चुकला
सावरताच स्वतःला घडलेल्या कृत्याची सल बोचली
आपल्या पापाचा पुरावा तिथेच गाडुन धूम ठोकली
थोडे दिवस चाललेली गडबड बिनबोभाट थंडावली
त्यावेळी मी ही सुखावलो "चला नसती ब्याद टळली"
त्या रात्री केव्हातरी गडगडाटाने दचकून जाग आली
पाहिल तर बाहेर पाउस अन कोपर्यात ती उभी होती
विजेच्या लखलखाटात ओठांवर गहिर हास्य नाचवत
थिजलेल्या डोळ्यांनी पहात, दात विचकून हसत होती.
वाचने
5600
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आयला...तो स्पा एक न आता
In reply to आयला...तो स्पा एक न आता by टवाळ कार्टा
@मिपावर भयकथांचा मोसम सुरु
In reply to @मिपावर भयकथांचा मोसम सुरु by अत्रुप्त आत्मा
+१.
In reply to आयला...तो स्पा एक न आता by टवाळ कार्टा
कल्पना चांगली आहे
बाब्बॊ
In reply to बाब्बॊ by स्पा
धन्यवाद "स्पा"
भयानक रसात पार बुचकळून
विदारक सत्य. अशा घटना अगदी
पुढे काय झालं ? खरंच मी पा वर
In reply to पुढे काय झालं ? खरंच मी पा वर by तुडतुडी
माझ्या माहितीत तरी मिपावर
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
भयानक सत्य
प्रतिसादासाठी धन्यवाद
आई..ग्ग....
कविता थेट पोचते आहे!
खुनी कवी मोकळ्या डोसक्यानी
एक एकटा एकटाच, तुमचं जेवढं पण
छान म्हणावस वाटत नाही पण
ही तुझि सर्वात मस्त कविता
In reply to ही तुझि सर्वात मस्त कविता by रसिकामहाबळ
धन्यवाद रसिका
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे
मिपावरच्या बेस्ट कवितांपेकी
In reply to मिपावरच्या बेस्ट कवितांपेकी by जव्हेरगंज
धन्यवाद मालक
मस्त
मनपुर्वक आभार