हिमालय..
लेखनप्रकार
हिमालय. त्याचं वेड लागतं.
नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.
हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.
कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता. अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?
त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!
आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....
“There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."
*****
सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाशचित्रांपैकी काही.


वाचने
43114
वाचनखूण
प्रतिक्रिया
116
अप्रतिम वर्णन आणि फोटो
वा..
सुंदर...
In reply to सुंदर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा डॉ, इतकाच लेख. पुढे मग
In reply to प्रा डॉ, इतकाच लेख. पुढे मग by यशोधरा
खरच स्वप्नवत.
निव्वळ सुरेख फोटो! डोळ्याचे
काय जब्बरदस्त फोटो!
In reply to काय जब्बरदस्त फोटो! by आदूबाळ
पोस्ट प्रोसेसिंग केलेलं आहे
यशो,
यशो, सुरेख वर्णन आणि फोटो..अगदी असेच म्हणतेसुंदर .... पूढे शब्द संपले !
अप्रतिम फोटो आणि लेखही!
@धागाकर्ती यशोधरा,
सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची
सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची
लेख आणि फोटो, दोन्हीही
अप्रतिम....
अप्रतिम फोटो....
In reply to अप्रतिम फोटो.... by भटक्य आणि उनाड
लकी आहात राव. छ्या..
In reply to अप्रतिम फोटो.... by भटक्य आणि उनाड
हायला! नशीबवान आहातच पण
In reply to हायला! नशीबवान आहातच पण by यशोधरा
धन्यवाद !!
लाsssssssजsssवाssssssssब
In reply to लाsssssssजsssवाssssssssब by अर्धवटराव
तू तिकडेच वस्ती कर. >>
अप्रतिम!
फार सुरेख
याची वाट पहात होते.
अप्रतीम !
In reply to अप्रतीम ! by पहाटवारा
अगदीच भा पो :)
In reply to अप्रतीम ! by पहाटवारा
वेजीटेशन = वनश्री
काय क्लास फोटो आहेत.. बरेच
In reply to काय क्लास फोटो आहेत.. बरेच by तुमचा अभिषेक
लेखही तितकाच सुंदर !!!
नितांत सुंदर, फोटो आणि लेख
मस्त !!!
...हिमालय......!!!!
जब्बरदस्त! __/\__
___/\___
अत्यंत विलोभनीय फोटो
अहाहा
ताई ट्रेक बद्दल अजुन माहीती
In reply to ताई ट्रेक बद्दल अजुन माहीती by आनन्दिता
हो, लिहिते इथेच.
चित्रे भारी आलीयेत. वर्णन
अहाहा...कसलं गार वाटलं फोटो बघुन
सर्वांचे मनापासून आभार.
'नग'ण्य
वा!!
वर्णन अतिशय आवडले आणि फोटु पण
In reply to वर्णन अतिशय आवडले आणि फोटु पण by ज्ञानोबाचे पैजार
+१
व्वा !
लाजवाब....
वर्णन करायला शब्द संपले.
स्वर्ग
अप्रतिम!
अप्रतिम.
...हरवलेय. परत सापडले की
मस्त...........
मस्त आहेत
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून
काय लिहिलं आहेस गं
गेले २/३ दिवस नुसता धागा बघत होतो...
फोटो अतिशय आवडले. अजून टाकले
वल्लाह !
सहीच !!
आवडले.
सुंदर लाजवाब
In reply to सुंदर लाजवाब by प्रमोद देर्देकर
धन्यवाद. कॅमेरा Nikon D 60,
In reply to धन्यवाद. कॅमेरा Nikon D 60, by यशोधरा
धन्स यशोधातै
In reply to धन्यवाद. कॅमेरा Nikon D 60, by यशोधरा
चांगली माहीती
In reply to चांगली माहीती by सखी
हो सखी. मी बंगलोरच्या एका
In reply to हो सखी. मी बंगलोरच्या एका by यशोधरा
हे काय?
In reply to हे काय? by विकास
हिमालय कधीच बिचारा नसतो, कधीच
In reply to हो सखी. मी बंगलोरच्या एका by यशोधरा
धन्यवाद यशो. मग सध्यातरी
In reply to धन्यवाद यशो. मग सध्यातरी by सखी
सखी, उत्तरं. :)
वाव... काय सुरेख फोटो आहेत.
जबराट...!!!
लाजबाब फोटो...
सुंदर
In reply to सुंदर by विकास
विकासदादा, ही घ्या.
In reply to विकासदादा, ही घ्या. by यशोधरा
धन्यवाद!
In reply to विकासदादा, ही घ्या. by यशोधरा
मस्तच..
In reply to विकासदादा, ही घ्या. by यशोधरा
अप्रतीम कविता.. लेख.. फोटू..
अप्रतिम.
In reply to अप्रतिम. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका, तो फोटो गडसर पास
In reply to पेठकरकाका, तो फोटो गडसर पास by यशोधरा
व्वाव!
In reply to व्वाव! by विकास
हो, आकाशाचे प्रतिबिंब आहे
In reply to पेठकरकाका, तो फोटो गडसर पास by यशोधरा
ओह.!
अद्भुत.
अदभुत ....
In reply to अदभुत .... by विटेकर
देवतात्मा >> अगदी, अगदी :
म्हणून तर
अप्रतिम
मस्त लेखन आणि